राज्यात सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे अनेक गावात नेहमी अध्यापनाचे धडे देणाऱ्या शिक्षकांची बदली होत असल्याने विद्यार्थी रडताना दिसत आहेत हिंगोलीत एका शिक्षिकेची बदली झाल्याने संपूर्ण गाव रडल आहे, हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील आसोंदा गावात प्राथमिक शाळेत शिक्षणाचे धडे देणाऱ्या कल्पना वानरे यांची हिंगोली तालुक्यातील पेडगाव जिल्हा परिषद शाळेत बदली झाली सात वर्षापासून मायेचा ओलावा देत शिक्षणाचे धडे देणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना कल्पना मॅडम यांची बदली झाल्याची बातमी समजताच त्यांनी अक्षरशा टाहो फोडला, चिमुकले महिला आणि गावातील वयोवृद्ध माणसेही धाय मोकळून रडू लागले आपल्या कुटुंबातील कुणीतरी परदेशी कायमचे निघून जावे एवढं दुःख या गावातील चिमुकल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना झाले होते.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेनितुरा नदीला आलेल्या पाण्यामुळे लातूर कलबुर्गी रस्त्यावर पाणी आल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कसगी गावाजवळ पूल पाण्याखाली गेला.कलबुर्गी आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.दरम्यान या परिस्थितीची ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.तसेच पोलिसांनी देखील पुल परीसरात बंदोबस्त ठेवला आहे तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रविण स्वामी यांनी केली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी वसीम देशमुख यांच्यासह चार ते पाच जणांवर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
वाशिम वरून नांदेडला पूर पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दत्ता भरणे जात असताना हिंगोलीतील पूर परिस्थितीची पाहणी का केली नाही म्हणून संतप्त झाले होते शिवसैनिक
अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाखवले होते काळे झेंडे
कर्जत तालुक्यातील कर्जत शहरासह रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने व रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रशासनाचा निषेध करत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे नेतृत्वात भीक मागून आंदोलन करण्यात आले आहे. मनसेने भिक मागून आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तात्काळ संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचे इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
जालन्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालन्यातील भाटेपूरी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशी, सोयाबीनसह फळबागा धोक्यात आल्या आहेत. भाटेपूरी येथील शेतकरी राम आटोळे या शेतकऱ्याचं सहा एकर कपाशी पीक पावसामुळे जमीनदोस्त झालंय. यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला. शासनाने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
घरात घुसून एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या नात्यातल्याच एका व्यक्तीने केल्याची माहिती आहे. तळोजा फेस-2 मध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 44 वर्षीय मोहम्मद आयुब साहिल याने आपल्याच नात्यातील एका 17 वर्षीय मुलीला भर दुपारी घरात घुसून तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांच्या हद्दीमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.. मी आज सकाळी येत असताना विविध ठिकाणी ही समस्या निदर्शनास आली गेल्या अनेक दिवसात निवडणुका झालेल्या नाहीत.. त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून आता प्रशासकांची एक आढावा बैठक घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.. याबरोबरच बीड जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाटा परिसरात मालेगाव तालूका पोलिसांनी छापा टाकत अवैध गांजाची तस्करी करणा-या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा १५ किलो ३६१ ग्रॅम गांजा जप्त केलाय.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी शिंदखेडा येथिल शरद हिरालाल शिंदे याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
खामगाव शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे व त्यासाठी रस्त्याच्या बाजूने सात ते आठ फूट खोल नाली खोदली आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यात वृद्ध व लहान मुलं जखमी होताना दिसत आहे. रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात शहरातील डॉ. ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कार ने जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीत त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला. यात डॉ.ब्रह्मानंद टाले हे गंभीर जखमी झालेत. वारंवार शहरात ड्रेनेज लाईन साठी खोदून ठेवलेल्या नालीत वृद्ध लहान मुलं पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढलं आहे. मात्र संबंधित कंत्राटदार कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाईची मागणी खामगाव शहरातील नागरिक करत आहेत.
अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी ही पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांनी आज देखील भल्या पहाटे आपला पिंपरी चिंचवड शहर दौरा सुरू केला आहे. यावेळी अजित पवार यांनी महा मेट्रच्या कार्यालयात महा मेट्रोच्या पुढील कामकाजा विषयी आढावा बैठक देखिल घेतली आहे. त्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार मिलन या उपक्रमा अंतर्गत शहरातील माजी पदाधिकाऱ्यांचा घरी जाऊन सदिच्छा भेट घेणार आहेत.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाटा परिसरात मालेगाव तालूका पोलिसांनी छापा टाकत अवैध गांजाची तस्करी करणा-या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा १५ किलो ३६१ ग्रॅम गांजा जप्त केलाय.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी शिंदखेडा येथिल शरद हिरालाल शिंदे याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आंदेकर टोळीची २७ खाती गोठवली; ५० लाख रुपये पोलिसांच्या हाती
पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणातील तपासात आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर आले आहेत.
पोलिसांनी बंडू आंदेकर व सहकाऱ्यांची तब्बल २७ बँक खाती गोठवली असून त्यांत ५० लाख ६६ हजार ९९९ रुपये असल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वी घरझडतीत कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
आरोपींच्या स्थावर मालमत्तेचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, वनराज आंदेकर खुनाच्या बदल्यासाठी टोळीने आंबेगाव पठार परिसरात रेकी केल्याचे उघड झाले असून संबंधित तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडे आहे
मेघगर्जनेसह पाऊस
रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव.
हलक्या ते मध्यम सरी
मुंबई,पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सांगली
मेट्रोसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली असली तरी प्रवाशांना पार्किंगसाठी स्वतंत्र सुविधा नसल्याने त्यांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी भर रस्त्यातच वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी होते आणि पोलिसांकडून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे प्रवाशांनाही दंडाचा भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र, या त्रासातून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. मेट्रो स्थानकांच्या परिसरात महापालिकेकडून महामेट्रोला २० जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून या जागांची अंतिम नोंदणी करण्यात आली असून, लवकरच त्या जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापन विभाग प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली.
नवरात्रोत्सवात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील देवींची शक्तिस्थळे दर्शनासाठी पीएमपीएमएलकडून दोन विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीबरोबरच ग्रुप बुकिंगसाठी बससेवा उपलब्ध होणार आहे, या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..
शारदीय नवरात्रोत्सवास उद्या पासून सुरूवात होत आहे. यामुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात साबुदाणा, भगर आणि शेंगदाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी, साबुदाणाच्या भावात किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे. शेंगदाणा आणि भगरीचे भाव स्थिर आहेत.
देशात तामिळनाडू राज्यातील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाण्याचे उत्पादन होते. तेथून मालाची निर्यात होते. येथील घाऊक बाजारात एक्स्ट्रा सुपर फाइन, मिल्क व्हाइट आणि साधा प्रकारातील साबुदाणा दाखल होत असून दररोज ९० ते ११० टन आवक होत आहे.
ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक क्षणात वाहून गेले.यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कामठवडा कुऱ्हाड शेतशिवारात नाल्यालगत शेत आहे.नाल्याला पूर आल्याने पुराचे पाणी प्रचंड वेगाने शेतात शिरले, काही तासांतच शेतात उभे पीक पाण्याने गिळंकृत केले.शेतात केवळ आता दगड धोंडे उरले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी राठोड यांचेच नव्हे तर नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचेही शंभर टक्के पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकरी हवालदिल झालाय.एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे पिकांचे नुकसान, अशा दुहेरी संकटात शेतकरी कुटुंबे सापडली आहेत.महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. आम्हाला जगण्यासाठी आधार हवा आहे, अशी आर्त हाक पीडित शेतकरी देत आहेत.
नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला झाली सुरुवात
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थित फ्लॅग ऑफ करून मॅरेथॉन स्पर्धेला झाली सुरुवात
पोलीस कवायत मैदान पासून राजवाडा आणि पुन्हा पोलीस कवायत मैदानाचा पाच किलोमीटरचा मॅरेथॉनचा मार्ग
सातारा जिल्ह्यातून 2 हजाराहून अधिक स्पर्धकांचा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी
धाराशिव च्या भुम तालुक्यात गेली तीन दिवसापासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असुन या पावसामुळे भोनगिरी,साबळेवाडी शिवारातील शेतरस्ते देखील पाण्यात गेले आहेत तर शेतातील काढणीला आलेले सोयाबीन व जमीन देखील खरवडुन गेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकरी करत आहे
उल्हासनगर मध्ये एका प्ले ग्रुप मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याने कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने चिमुकल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्ले ग्रुप ची शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.