Shreya Maskar
आज (21 सप्टेंबर) करीना कपूरचा वाढदिवस आहे. ती 45 वर्षांची झाली.
करीना कपूरला 'बेबो' या टोपणनावाने हाक मारली जाते. 'बेबो' नाव कसे पडले जाणून घेऊयात.
करीना कपूरच्या वडिलांनी रणधीर कपूर यांनी अभिनेत्रीचे टोपणनाव बेबो ठेवले.
करीना कपूर आणि करिश्मा कपूर दोघी बहिणी आहेत. ज्यांना 'लोलो' आणि 'बेबो' या नावाने ओळखले जाते.
करिश्मा कपूरने एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, तिची आई बबिता कपूर या इटालियन अभिनेत्री, मॉडेल जीना लोलोब्रिगिडा यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. तसेच करिश्माची आई सिंधी असल्यामुळे ती'लोलो लोली' नावाचा गोड पदार्थ बनवायची. यावरून करिश्माचे नाव लोलो ठेवण्यात आले.
करिश्माने सांगितले , जेव्हा करीनाचा जन्म झाला तेव्हा सगळ्यांना वाटले की आता हिचेही मजेदार, गोंडस नाव ठेवावे. तेव्हा ती लहान होती. म्हणून माझे वडील तिला बेबो म्हणायला लागले. 'लोलो' जुळते 'बेबो' नाव ठेवले.
करीना कपूरने 2012ला सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली.
करीना कपूर आणि सैफ अली खानला दोन मुलं आहेत. जेह आणि तैमूर