Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्ह्याला आज आँरेंज अलर्ट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये धो धो पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Dhanshri Shintre

Navi Mumbai: सकाळपासून नवी मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरूवात

सकाळपासून नवी मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरू झाली आहे

वाशी बेलापूर खारघर नेरूळ उरण ऐरोली या भागात पाऊस रिमझिम पडत आहे

नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाला आहे

आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे दोन्ही महानगरपालिकेकडून करण्यात आवाहन आला आहे

Lonavala: लोणावळ्यात 24 तासात 88 मिलीमीटर पावसाची नोंद

मावळा सह लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

त्यामुळे लोणावळ्यात 24 तासात 88 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

राज्यात सर्वत्र स्पर्धेचा पाऊस सुरू असून वातावरणातील बदलामुळे सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे .

हवामान विभागाच्या विभागाने 30 सप्टेंबर पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान मावळच्या घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस असल्यामुळे नदी नाल्यांनाही महापूर आलेला आहे.

मावळा सह लोणावळ्यातही रात्रभर पाऊस पडत आहे. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे....

युवाशेतकऱ्यांनी शेतातील उपटली कपाशीची झाडे, नुकसान भरपाई न दिल्यास आत्महत्या करण्याचा दिला इशारा

शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळला कर्ज काढून शेती केली पण आता नदीचे पाणी शेतात शिरल्याने सर्व काही उध्वस्त झालं पीक वाचवणे अशक्य झालं म्हणून शेतातील कपाशीची झाड उपटण्याच्या पर्याय युवा शेतकऱ्यांनी निवडला सरकाराने आम्हाला हेक्टरी 50 हजार रुपये मोबदला दिला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा देखील युवा शेतकऱ्यांनी दिलीय.

रस्ता दुरुस्तीसाठी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं अनोख आंदोलन

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कोळगाव ते कळमगव्हाण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या या गड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे, आणि त्या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो.

प्रशासन,लोकप्रतिनिधीकडे वारंवार मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने शिवसेनेच्या उबाठा गटाच्या वतीने रस्त्यावरील गड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत रस्ता दुरुस्तीसाठी अनोखा आंदोलन करण्यात आलं.. यावेळी या आंदोलनात गावकरी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका मदत कार्यासाठी सज्ज

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यासह रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी मुख्यालयासह सर्व विभागांमधील आपत्ती निवारण कक्ष यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी बचाव व मदत कार्यासाठी सज्ज राहावे असेही निर्देश दिले आहेत.

Nashik: नाशिक जिल्ह्यात संततधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले

नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले असून पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे पहावयास मिळत मनमाड जवळच्या चांदवड तालुक्यातील शिंगवे परिसरात असलेल्या कांद्याच्या शेतात पाणीच पाणी साचले असून शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे

Palghar: पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा

28 ते 29 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले आहे.

मध्यरात्रीपासूनच विजांच्या कडकडासह पावसाने जोरदार पडण्यास सुरुवात केली आहे.

वसई विरार शहरात सकाळपासून मुसलदार पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखलभाग जलमय झालेले आहेत.

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्याला आज आँरेंज अलर्ट

मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

समुद्रात वादळजन्य परिस्थिती उद्भवू शकते मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन

गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 59.24 मिमी इतका सरासरी पाऊस

30 सप्टेंबर पर्यंत रत्नागिरीत पावसाचा इशारा

अक्कलकोट तालुक्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे तोळणूरमध्ये घराची भिंत कोसळून तिघे जखमी

सततच्या पावसामुळे चढावर असलेल्या अहमदपाशा पिरजादे पाटील यांची दगडी घराची भिंत शेजारच्या भारताबाई उन्नद यांच्या घरावर कोसळल्याने घडली दुर्घटना

या दुर्घटनेत उन्नद कुटुंबातील एक लहान मुलगा आणि दोन महिला जखमी असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून घराची पडझड झाल्याने आर्थिक फटका बसला आहे.

कर्जत नगरपालिकेच्या परिसरामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मुसलदार पाऊस पडत असल्यामुळे

कर्जत नगरपालिकेच्या परिसरामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी साचला आहे

त्यामुळे काही सोसायटींमध्ये पाणी गेलेलं आहे

अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यात ठीक ठिकाणी रात्रभर पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणची वाहतूक ठप्प..

नद्या नाल्या ओसांडून वाहत असून काही ठिकाणी गावात शिरले नदीचे पाणी....

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील आणि जेऊर गावात नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन ठप्प...

जिल्हा प्रशासनाचे आवाहन कामाशिवाय बाहेर पडू नका..

Solapur: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी ; सोलापूर - मुंबई विमानसेवा तिकीट बुकिंगला झाली सुरुवात

येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या पहिल्या उड्डाणाची सर्व 72 सीट्स झाल्या बुक ; कालपासून सुरु झाली होती बुकिंग

आठवड्यातील चार दिवस सोलापूर - मुंबई विमानसेवेचा लाभ घेता येणार

स्टार एअरलाईन्स या वेबसाईटवर सोलापूरकरांचा बुकिंगला मिळतोय चांगला प्रतिसाद

आठवड्यातील मंगळावर,बुधवार,शुक्रवार आणि शनिवार या दिवशी मुंबईसाठी विमानसेवा असेल सुरु

Dharashiv: धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका

जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड

130 शाळेतील 387 वर्गखोल्याचे काही प्रमाणात नुकसान

तर 25 शाळेत पाणी शिरल्याने साहित्य व पोषण आहार भिजला , दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती

Jalna: जालन्यातील वरुड शिवारात मुसळधार पाऊस, द्राक्ष बागांमध्ये साचलं गुडघाभर पाणी

जालन्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे खरिपातील पिकांच अतोनात नुकसान झाल आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील अडचणी सापडला आहे . द्राक्ष बागांवर करपा, डावणी यांसह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने याचा फटका उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील हवालदील झाला आहे. जालन्यातील वरुड शिवारातील द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने द्राक्ष बागा देखील धोक्यात आल्या आहे

Beed: नारायणगडावरील मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

बीड च्या श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडावरती गतवर्षी प्रमाणे याही वर्षी दसरा मेळाव्याच आयोजन केलं असून यावर्षीच्या मेळाव्यावरती पावसाचे सावट आहे.मात्र मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तेवढ्याच ताकतीने लाखो समाज बांधव मेळाव्यास उपस्थिती लावणार असून मोठ्या उत्साहात मेळावा होणार असल्याचे गडाचे महंत शिवाजी महाराज व मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले आहे.नारायण गडावरील पार्किंग सह 350 एक करा वरती हा दसरा मेळावा होणार असून मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे अशी माहिती ही देण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात 2 जागीच ठार 2 तर 2 गंभीर जखमी

वाशिमच्या कारंजा जवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीये, संभाजीनगर वरून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने पिकअप गाडीला मागून जोडदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला असून, या अपघातात पिकअप वाहतील 2 जन ठार झाले तर ट्रकमधील 2 जन गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ चॅनल क्रमांक 213 वर झाला आहे.

पीकअप हा टमाटे घेऊन नागपूर कडे जात होता..तर आयशर ट्रक हा छत्तीसगड जात असताना भरधाव ट्रक ने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याच सांगितल्या जातंय..

बार्शी तालुक्याला रात्रभर पावसाने झोडपलं,आगळगाव मधीलचांदणी नदी झाली ओव्हर फ्लो

- आगळगाव येथील चांदणी नदीवरून शेतकरी आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

- चांदणी नदीवर पुराचं पाणी आल्यामुळे ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्यासाठी करावी लागत आहे कसरत

- आगळगाव येथील चांदणी नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी

- दरम्यान,सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन उडीद कांदा पिकाचे मोठे नुकसान..

Pune Rain Update: आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

आज दिनांक 28/09/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून औरंगाबाद, जळगाव, पुणे , रत्नागिरी येथे पुढील ३ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.

अक्कलकोट तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद

- शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट- वागदरी वाहतूक बंद

- अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही वाहतूक बंद झालीय

- आज देखील सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे

अतिवृष्टीचा फटका! नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक ठप्प

शिर्डी परिसरात महामार्ग गेला पाण्याखाली...

ओढ्या नाल्यांना पूर...

नागरिकांची तारांबळ...

परिसरातील शेती पाण्याखाली...

काल रात्री ओढ्यात दोन जण गेले होते वाहून...

एकाला वाचवण्यात यश तर दुसऱ्याचा शोध सुरू...

स्थानिकांनी दिली माहिती...

Nashik: हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळ पासून सर्वत्र जोरदार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्ट नंतर नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळ पासून सर्वत्र जोरदार पाऊस बरत असून मनमाड शहर प परिसरात रात्री पासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पांझन व रामगूळना नदीला पूर आला आहे,3 दिवसांपूर्वीच वागदर्दी धरण ओव्हर फ्लो झाले होते त्यानंतर रात्रीतून झालेल्या पावसाने नद्या ना पूर आला असून एक पूल पाण्याखाली गेलाय

धाराशिवच्या भुम मधील बेदरवाडी गावाला जोडणारा पुल तुटल्याने गावचा संपर्क तुटला

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भुमच्या बेदरवाडी गावाला जोडणार पुल तुटला आहे त्यामुळे या गावाचा भुम ला जा ये करणारा संपर्क पुर्णपणे तुटला आहे.अतिवृष्टीमुळे परीसरात मोठ नुकसान देखील झालय, तर पुराच्या पाण्यात वाहुन आलेल्या जनावरे देखील या तुटलेल्या पुलाच्या भागात अडकल्याच चित्र पाहायला मिळत

Hingoli: स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रमाला गेले आणि पुरात अडकले

वसमत तालुक्यातल्या डोनवाडा येथे काल एका महिलेचा अंत्यविधी झाल्या नंतर आज स्मशानभुमीत सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या महिला व नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते गावकऱ्यांच्या मदतीने स्मशानभूमीत सावडण्यासाठी गेलेल्या महिला व नागरिकांना पुराच्या पाण्यातून दोरीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्याचे काम ग्रामस्थांनी केले .या गावात लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्यामुळे गावापासून लांब असलेल्या ठिकाणी अंत्यविधी करावी लागते हा त्रास मागील अनेक वर्षभरापासून चालू आहे अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही स्मशान भूमी मिळत नाही दरम्यान स्मशानभूमी सावडण्याच्या कार्यक्रमासाठी दाखल झालेल्या नागरिकांना अचानक पुराच्या पाण्याने वेढा घातला त्यामुळे हे नागरिक जवळपास दोन तास पुराच्या पाण्यात अडकले होते

भामरागड पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे 100 गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला

पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे भामरागड ते आलापल्ली रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे वारंवार होत असलेल्या पुरामुळे नागरिकाकडून असंतोष निर्माण होत आहे नवीन पुलाची निर्मिती लवकरात लवकर करून नागरिकांना सोयीसाठी सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नवीन पुलाचे काम संत गतीने चालू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Jalna: जालन्यातील अनेक भागांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस, खरिपातील पिके पाण्याखाली

जालन्यात अनेक भागांमध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला आहे या पावसामुळे पुन्हा एकदा खरिपातील पिके पाण्याखाली गेली आहे. जालन्यातील वझर सराटे या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्याने खरीपातील सोयाबीनसह कपाशी पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात काल मध्यरात्री अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे..

मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडले

अमरावती जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे, जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील धरणांची पातळी देखील वाढली पश्चिम विदर्भातील सगळ्यात मोठ्या समाजाल्या जाणाऱ्य अमरावती जिल्ह्यातील मोर्शी अप्पर वर्धा धरणात 98 टक्के जलसाठा झाल्याने व पावसाचा ओघ वाढत असल्याने अप्पर वर्धा धरणाची तेरापैकी सात दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आलेली आहे. यामुळे आसपासच्या गावांना व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे परंतु मागील दोन दिवसापासून काही ठिकाणी सतत आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान्य पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे

शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे व झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी आता पूर्णपणे हवालदिल झालेला आहे

शारदीय नवरात्र उत्सवात सहाव्या माळे निमित्त तुळजाभवानी मातेची मांडली मुरली अलंकार महापूजा

तुळजापुरात नवरात्र उत्सवात सहाव्या माळे निमित्त तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांसाठी मुरली अलंकार महापूजा खुली होती.ही पुजा मांडण्यापुर्वी तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येवुन धुपारती नंतर अंगारा काढण्यात आला यावेळी महंत,पुजारी,सेवेकरी व मंदीर संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.शनिवारी दिवसभरात लाखो भाविकांनी देवीच्या मुरली वाजवतानाच्या रुपाचे दर्शन घेतले.

राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आमदार रवी राणांची मागणी..

शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगणार..

पैसे आपल्या बापाचे नाही आहे मायबाप शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारपर्यंत पोहोचायची आहे...

मुख्यमंत्री पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे

रवी राणांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांना खडसावलं*

आमदार रवी राणा यांच्याकडून अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी..

तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट पूरग्रस्तांच्या मदतीला

तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलं आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १ कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टच्या वतीने ५१ लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे.आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे,ज्यांचे अती नुकसान झाले आहे त्यांना देखील वेगळी मदत मंदिर संस्थान आणि तेरणा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे यंदा मराठवाड्यावर अभूतपूर्व संकट ओढवलं आहे. यावेळी तेरणा ट्रस्ट आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीला धावून आलं आहे.

पाण्यात मध्यभागी अडकलेल्या 70 वर्षे इसमासह नऊ जनावरांचे थिलोरी ग्रामस्थांनी वाचवले प्राण

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.नदी नाले हे तुडुंब भरून वाहत होते. तर संपूर्ण शेतामध्ये सुद्धा नदीचे स्वरूप पाहायला मिळाले यादरम्यान दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाट्या जवळ असलेल्या रस्त्यावरील मोठ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती. याच पुलाच्या नाल्याच्या मध्यभागी थीलोरी येथील शेतमजूर सहदेव बेंदाजी थोरात हे आपल्या बकऱ्या घेऊन शेतामध्ये चारण्यासाठी शेतामध्ये गेले होते.मात्र अचानक पाऊस सुरू झाला व यात ते आपल्या बकऱ्या सह नाल्याच्या मध्यभागी अडकले.सहदेवराव थोरात हे घरी परत न आल्याने गावातील काही लोकांनी शेताकडे जाऊन पाहिले असता सहदेवराव थोरात हे नाल्याच्या मध्ये भागी अडकल्याचे लक्षात आले गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Dharashiv: धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे कांद्याचा झाला चिखल,कांदा पिकात पाणीच पाणी

धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे मोठ नुकसान झालय,सोयाबीन पिक पुर्णपणे उद्ध्वस्त झालय तर कांदा देखील आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सडुन जात आहे.कांद्याच्या शेताला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाल आहे शेतकऱ्यांने केलेला खर्च वाया गेला असुन त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले

काढणीवर आलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अजूनही कायम

डोंगरी व तितुर नदीला मोठा पूर, नदीकाठच्या नागरिकांना रात्री सुरक्षित स्थळे हलवले.

हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसराला पाण्याचा वेढा

शहरातील अनेक सखल भागात साचले पाणी

रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित

अग्निशमन दलाने रात्रभर पुराचा सायरन वाजवत नागरिकांना सतर्क केले.

Thane News: ठाणेकरांना आज पहाटे पासून झोडपून काढले

ठाणेकरांना आज पहाटे पासून झोडपून काढलेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असतानाच घोडबंदर रोड वर मेट्रो चे काम सुरू आहे. त्या मुळे त्याठिकाणी असलेले मानपाडा, कासारवडवली या ठिकाणी पाणी साचले आहे. अज दिवसभर पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gmail Safety: हॅकर्सपासून तुमचे Gmail वाचवायचे का? वापरा 'हे' सोपे ट्रिक्स

Pressure Cooker: स्वयंपाकघरातील कुकर किती दिवसांनी बदलावा?

Crime : ३ मुलींची इंस्टाग्राम Live वर हत्या, धक्कादायक घटनेनंतर जनसमुदाय भडकला, रस्त्यावर उतरले हजारो लोक

India vs Pakistan Final: फायनलसाठी टीममध्ये 'हे' दोन मोठे बदल होणारच; पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी सूर्या सेना सज्ज

Swami Chaitanyananda Saraswati: १७ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वामी चैतन्यानंदला अटक, पोलिसांनी पहाटे आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT