धाराशिव जिल्ह्यातील वागेगव्हाण गावातून नागरिकांनी सुरू केलं सुरक्षित स्थळी स्थलांतर
काल रात्री पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
पूर परिस्थिती निर्माण होण्याआधीच प्रशासनाच्या आवाहनानुसार नागरिकांच स्थलांतर
भूम आणि परंडा तालुक्यात जिल्हा पत्ती व्यवस्थापन पथक थोड्याच वेळा दाखल होणार
अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं; तालुक्यात दोन दिवसांपासून पडत आहे पाऊस
सतत पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील नद्या नाले वाहतायत तुडुंब
खैराट गावाजवळील ओढा झाला ओव्हरफ्लो; ग्रामीण भागातील रस्ते गेले पाण्याखाली
खैराट गावातील ओढा ओव्हर-फ्लो झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून काढावी लागत आहे वाट
तालुका प्रशासनाने दिला आहे सतर्कतेचा इशारा
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत बीड येथे ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ओबीसी महाएल्गार मेळाव्यास ओबीसी समाज बांधव, भगिनींनी, युवक, युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मेळाव्याचे आयोजक ॲड. सुभाष राऊत यांनी केले आहे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रांगणात छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यात पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. मात्र या पावसाचा जनजीवनावर कुठलाही परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडले होते. मात्र हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाट्यासह उपनगरात जोरदार पाऊस
शहरातील उपनगरात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात
पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांची तारांबळ
पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट
धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू
अनेक गावांचा संपर्क तुटला तर अनेकांच्या दुकानात शिरले पाणी
कळंब शहरातील मुख्य बाजार पेठेला तळ्याचे स्वरूप
छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल
मागील दोन तीन दिवसापासून ताप, खोकला, सर्दी, अशक्तपणा जाणवत होता
आज जास्त त्रास जाणवू लागल्याने गॅलेक्सी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उपचार सुरू आहेत. तब्येत थोडी खालावली आहे. काळजी नसावी.
त्यांच्यावर पुढील दोन तीन दिवस उपचार करण्यात येणार आहे.
गांजा विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन महिला आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक
विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने खुळेवाडी, चंदननगर परिसरात सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघी महिलांना ठोकल्या बेड्या
महिलांकडून विक्रीसाठी आणलेला 30 ते 40 हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी केला जप्त
सोनाबाई अंकुश पवार ,सुवर्णा अशोक पवार ,शालन कांतीलाल जाधव अशी अटक केलेल्या तीन महिला आरोपींची नावे
तिन्ही आरोपी महिला या स्वतःच्या राहत्या घरातून करत होत्या गांजाची विक्री
भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीतील विसर्ग वाढला...
उजनीतून भीमा नदीला पाणी सोडले...
भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भीमा नदीत पाणी सोडल्याने पंढरपूरच्या वाळवंटातील मंदिरांना पाण्याचा वेढा तर जुना दगडी पूल पाण्याखाली...
चंद्रभागा नदीला पुन्हा पूर...
सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट असताना उजनी धरण क्षेत्रात मोठा पाऊस
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
कोकणासाठी पुढचे तीन दिवस आँरेज अलर्ट
कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
किनारपट्टी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार
रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ
रत्नागिरीत आज दिवसभर पावसाची संतधार राहणार
अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी परळी तालुक्यातील पोहोनेर येथे पोहोचलेले बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले. पंचनामे करण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या सोनवणे यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते राजेसाहेब देशमुख आणि त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परळी मतदारसंघातील पोहोनेर गावालाही अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला असून, शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी आज गावाला भेट दिली.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल रात्रीपासून परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे याच पावसाचा फटका पुन्हा एकदा शेती पिकांना बसण्याची शक्यता आहे . आधीच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि या पावसामुळे आता पुन्हा एकदा उरलेसुरले पिक ही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे . नदी नाले ओसंडून वाहत असताना आता शहरात रस्त्यावर पाणी साचू लागले आहेत नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे
अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओ बी सी समाजाचा मेळावा
मेळाव्याला लक्ष्मण हाके उपस्थित राहणार
मेळाव्यात हाके यांच्या भाषणाकडं आणि भूमिकेकडे अनेकांचे लक्ष
दक्षिण सोलापूर तालुक्यात आज पहाटेपासून सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे उळे - कासेगाव पूल पुन्हा गेला पाण्याखाली
उळे - कासेगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक झाली बंद ; कासेगावचा संपर्क तुटला
उळे - कासेगाव पुलावरून पाण्याचा प्रवाह जोरदार वाहत असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाली निर्माण
मागील अनेक दिवसांपासून उळे - कासेगाव या पुलाची उंची वाढवावी अशी आहे ग्रामस्थांची मागणी
पहाटेपासून सातारा शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाला सुरवात...
हवामान खात्याकडून सातारा जिल्ह्याला दिला होता ऑरेंज अलर्ट...
माढा तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने सीना नदीकाठच्या गावांमधील लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
सीना नदीच्या पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. सध्या पूराचे पाणी कमी झाले असले तरी पावसामुळे पुन्हा नदीकाठच्या लोकांमध्ये पुराची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार सकाळपासून सोलापूर शहरात सुरूय पावसाची जोरदार बॅटिंग
सोलापूरसह अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस झाला तर पुन्हा सोलापूर जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता झाली निर्माण
दरम्यान,सकाळपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापुकरांची झाली तारांबळ
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी कडून उद्योग लावण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली, मात्र अमरावती जिल्ह्यात 200 आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 लोकांनी अद्याप उद्योग उभारले नाहीत, त्यामुळे 350 जणांना नोटीस देण्यात आली आहे, अमरावती जिल्ह्यातील एमआयडीसीत 1141 उद्योगासाठी जमीन दिली गेली होती, त्यापैकी 715 उद्योग येथे चालू आहेत, तर 226 उद्योग बंद झाले आहेत, आणि 200भूखंडावर उद्योग सुरू केले नाही, यवतमाळ जिल्ह्यात 547 उद्योग सुरू आहेत आणि 150 उद्योग बंद झाले आहेत, त्यामुळे ज्यांनी भूखंड घेतले त्यांनी जर उद्योग सुरू केले नाही तर त्यांची भूखंड परत घेतल्या जाईल असा इशारा शासनाने दिला आहे
पाच तासांपासून पुराचे पाणी ओसरत नसल्याने गावाकडे येण्यासाठी शेतकरी नदीत उतरला
प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील शेतकऱ्यांकडून धोकादायक स्थितीत प्रवास
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात अडकलेत शेतकरी पुराच्या पाण्यात
- सलग तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- गंगापूरसह धरणात नव्यानं पाण्याची आवक वाढण्याची शक्यता
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
- गंगापूर धरणातून १६५९ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
- नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ
- रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा
- दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ
- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार
- पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
हिंगोली जिल्हा प्रशासनाचे आदेश
जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद राहणार
पूर परिस्थिती ओढवल्याने प्रशासनाचा निर्णय
मध्यरात्री देखील जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्याला आज आँरेंज अलर्ट
मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल हवामान विभागाचा अंदाज
असाच पाऊस पडत राहीला तर भातशेतीवर परिणाम होण्याची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावली आहे. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची रीपरीप सुरू असून जिल्ह्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या भात पिक चांगलेच बहरून आले आहे मात्र पावसाचा जोर वाढल्यास भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनूसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी दिली माहिती
हवामान विभागाने आज 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट केला जारी
धाराशिव जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या / सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी जाहीर
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलीय. पहाटे वांगणी, बदलापूर तसेच नेरळ भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे इथल्या भातशेतीचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीय. या भागात मोठ्या प्रमाणात पावसाळी भाजीपाला पिकवला जातो.
ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहे. अशातच अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वंदना टॉकीज परिसरात पाणी साचले आहे.
गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाचा इशारा
राज्यात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता
या सर्व जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे
शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी
पुणे शहरात पहाटेच्या वेळी मुसळधार पावसाने लावली हजेरी
२ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन
अतिवृष्टीमुळे बहुतांश राज्यातील पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष आणि संघटनांनीही कर्जमाफीची मागणी रेटली आहे. असे असले तरी, सरकारकडून शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्याचावत कसलीही हालवाल मंत्रालय पातळीवर दिसत नाही.
कर्जमाफी देण्याऐवजी नुकसानभरपाईचे निकष बदलून अधिक दिलासा देण्याचा मार्ग मध्या अवलंबिला जाण्याची शक्यता अधिक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
आज आणि उद्या मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता
२७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वारे पश्चिम दिशेने वाहू लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रात याचा परिणाम होणार असल्याची शक्यता
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट मिळण्याची शक्यता
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता
लातूर जिल्हा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलाय, तर जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
उल्हासनगर अंबरनाथ भागात जोरदार पावसाची हजेरी
सकाळी पाच वाजल्यापासून या भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे
अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
नवरात्री मंडळांची अचानक आलेल्या पावसामुळे धावफळ
मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. विजांच्या प्रचंड गडगडाटासह सुमारे दोन तास कोसळलेल्या या मुसळधार पावसानं तुमसर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. तुमसर शहरातील प्रसिद्ध बावली मंदिरात या पावसाचं पाणी शिरलं. रात्रीलाचं अनेकांनी मोटरपंप लावून शिरलेलं पावसाचं पाणी बाहेर काढल्याचही बघायला मिळालं. तर नगरपालेकेच्या विरोधात नागरिक व भाविक चांगलेच संतापले आहेत.कापणीला आलेलं भातपीक ही मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी भुईसपाट झालय. यामुळं शेतकरी आता आर्थिक विवंचनेत सापडलाय. लाखांदूर, लाखनी, मोहाडी या तालुक्यातही या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय.
पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी अपडेट
घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ च्या घरावर पोलिसांचा छापा
घायवळ चे तीन वाहने पोलिसांनी केली जप्त
वाहनांमध्ये एक एस यू व्ही कार सह दोन दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त
कोथरूड पोलिसांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोठा फौजफाटा काल या कारवाई दरम्यान तैनात
कोथरूड गोळीबार प्रकरणी निलेश घायवळ यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल
घायवळ सध्या लंडन मध्ये असल्याची माहिती असल्याने त्याविरोधात पुणे पोलिसांची लुक आऊट नोटीस
धाराशिव जिल्ह्यात राञी पासुन पावसाला सुरुवात
धाराशिव जिल्ह्यातील भुम,परंडा,कळंब,धाराशिव,लोहारा,उमरगा सह सर्वच भागात पाऊस सुरू
भुम तालुक्यातील अंबी येथील नदीला पुर,गावातील अंबीका देवी मंदीराच्या पायऱ्या पाण्यात
कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील तेरणा नदीला पुर,सोयाबीन पिक पुर्णपणे पाण्याखाली,शेताला तळ्याचे स्वरुप
राञी पासुन जिल्हाभरात पावसाचा जोर वाढला
नवी मुंबईत पावसाला सुरुवात
दमदार पावसाची हजेरी
क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाला सकाळपासून सुरुवात
खारघर कोपरखैरणे वाशी इत्यादी ठिकाणी पाऊस सुरूC
हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे मध्यरात्री व सकाळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूर आला आहे तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले आहे दरम्यान हिंगोली शहरांमध्ये देखील सार्वजनिक दसरा उत्सवात पाऊस बर असल्याने अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.