रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकर्यांचे आमरण उपोषण
अहील्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या शिंपोरा, मानेवाडी, बाभुळगाव या तीन गावातील ग्रामस्थांनचे आमरण उपोषण
उजनी धरणावरुन सुरु असलेल्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामामुळे रस्त्याची झाली आहे दुरावस्था
करपडी फाटा ते बाभुळगाव दरम्यान रस्ता नव्याने करण्याची ग्रामस्थांची मागणी
रस्त्याचे काम होईपर्यंत आष्टी उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम बंद ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी
पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार
गंगुबाई संभाजी शिंदे नवरात्री फेस्टिवलचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन
पुण्यातील हडपसरमध्ये महादेववाडीत कार्यक्रमाचे आयोजन
उत्तर प्रदेशाच्या कानपूरमध्ये 'आय लव मोहम्मद ' चा लावलेला फलक हटवून उत्तर प्रदेश सरकारने हटवून फलक लावणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी हातात आय लव मोहम्मदचे फलक घेऊन जोरदार निदर्शने केली.यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.तसेच या सरकार सुबुद्धी देण्यासाठी विशेष दुवा पठण केले.सरकारने द्वेषाचे राजकारण करू नये अन्यथा आम्ही संविधानिक मार्गाने याविरुद्ध आवाज उठवू असा इशाराही माजी आ.शेख यांनी दिला.
- वीज पडून दोन ठार, एक गंभीर
- वर्धेच्या वायगाव निपानी नजीकच्या भिवापूर परिसरातील घटना
- संध्याकाळी सव्वा सात वाजता सुमारास घडली घटना
- संबंधित तिघेही दुचाकीने नियोजक ठिकाणी जात होते. दरम्यान ते पावसापासून बचाव करण्याकरिता झाडाखाली थांबले. दरम्यान झाडावर वीज पडली.
AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाच्या वतीने उद्या ऑरेंज अलर्ट
खबरदारी म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढले आदेश
नांदेड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात ३ दिवसांनंतर पुन्हा एकदा पाऊसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात विविध भागात पाऊस बरसत होता. तर सायंकाळी पाऊसाचा जोर वाढला असून जिल्यातील पालम गंगाखेड तालुक्यात ढग फूटी सदृश्य पाऊस झाला आहे. धारसुर, गोंडगाव, पेठशिवणी भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीनाल्यासह शेतशिवरात पाणी वाहू लागले आहे. सततच्या पावसामुळे आता शेतकऱ्याचे उरलेसुरले पीक ही हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
तुळजापूर डान्स प्रकरणावरील साम टिव्हीने दाखवलेल्या बातमीनंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिलगिरी व्यक्त केली. परिपत्रक जारी करत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील उड्डाणपूल पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केली.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेलोना गावातील शेतात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली.यावेळी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले. या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सुमारे ८० टक्के शेंगांमध्ये दाणे तयारच झालेले नाहीत, तर उरलेला दाणा अत्यंत बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही परवडणारा नाही.या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनच येणार नाही. एकीकडे अतिवृष्टी, दुसरीकडे रोगाचा प्रादुर्भाव सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत देणे आवश्यक आहे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. या रोगाचा प्रादुर्भाव यवतमाळ, वाशिम, वर्धा , चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यात झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांना एक क्विंटल देखील उत्पन्न मिळणार नाही, शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे नुकसाना होणार आहे याबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
- उद्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा न्यायालयाच्या ७ मजली नूतन इमारतीचे होणार आहे उद्घाटन
- या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही मुख्यमंत्री राहणार आहेत उपस्थित
- याच कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई आजच नाशिकमध्ये दाखल
गोताने शिवारामध्ये असलेल्या बंधाऱ्याच्या सांडव्याची उंची प्रशासनाने कमी केल्यामुळे यावर्षी भरमसाठ पाऊस होऊन देखील बंधाऱ्यात कमी प्रमाणात पाणी शिल्लक राहत असल्यामुळे गोताने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे,
जोरदार पाऊस होऊन देखील पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेला बंधाऱ्यात पाणी कमी साचत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे, आणि बंधाऱ्याच्या डागडुजीचे काम करतेवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी खोटे आश्वासन देऊन काम करून घेतल्यामुळे ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
- माढा 21, करमाळा 18, अक्कलकोट 6, मंद्रूप 16, उत्तर सोलापूर 8 गावं बाधित
- 17 बोटीद्वारे बचावकार्य करण्यात आले.
- NDRF च्या दोन तुकड्या आणि 8 बोट होत्या
- माढा तालुक्यातील तांदुळवाडी, म्हैसगाव, निमगाव, दारफळ, केवड, सुलतानपूर आदी गावात जास्त नुकसान
- पूर जास्त असल्याने 22 तारखेला रिस्क्यू ऑपरेशन थांबवले
- 23 ला 8 लोकांना हेलिकॉप्टर ने काढले पण हवामान खराब असल्याने आम्ही ते थांबवलें
- 24 तारखेला NDRF ने उरलेल्या लोकांना काढले
- सुलतानपूर येथील लोकांना बाहेर काढले.
- आर्मीची मदत घेऊन 24 तारखेला सुलतानपूर येथून 150 ते 200 लोकांना बाहेर काढले.
- NDRF ने वाकाव मध्ये 23 तारखेला 59, 24 तारखेला 90 लोकांना बाहेर काढले.
- नाशिकच्या ईदगाह मैदानावर आदिवासी महापंचायतला सुरुवात
- आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आदिवासींची महापंचायत
- अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत महापंचायत
- “ना लोकसभा, ना विधानसभा – सबसे बडी ग्रामसभा” आदिवासींची घोषणा
- बंजारा समाजाच्या घुसखोरीला अटकाव करण्यासाठी आदिवासी समाज आक्रमक
- आदिवासी आश्रमशाळेतील बाह्यस्रोत भरतीचा शासन आदेश रद्द करावा
- पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पेसा अंतर्गत 17 संवर्गांमध्ये भरती
- पेसा निधी वाढवणे, पेसा गावातील सरपंच- सदस्यांचे मानधन वाढवणे यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी महापंचायत
अग्निशमन दलाची 5 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल
आग विझविण्याचे काम सुरू
सिंदफणा व बिंदुसरा नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो. अशा महादेव मळी या ठिकाणी असणाऱ्या नदीवरील पूल या दोन्हीच्या पाण्याने वाहून गेला.
पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून हा पूल बांधला होता. पुल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे.
त्याचबरोबर महादेव माळी संगमेश्वर मंदिरात राहणाऱ्या व शिकणाऱ्या महाराज लोकांनाही मोठा फटका या पुराच्या पाण्याचा बसला आहे.
महादेव मळी येथील देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. लवकरात लवकर आपुल बांधून देण्यात यावा अशी मागणी महाराज बडखे यांनी केले.
मोठ नुकसान संगमेश्वर मंदिराचे झालेला आहे टाळ मृदुंग पखवाद सर्व पाण्यामध्ये भिजल्याने खराब झालं आहे.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या महापुरामुळे तालुक्यातील सुमारे 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत.
मोठ्या कष्टाने आणि हिमतीने वाढवलेल्या द्राक्ष बागा डोळ्यात देखत महापुरामध्ये वाहून गेल्याने या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे.
माढा तालुक्यातील मानेगाव, केवड, वाकाव,खैराव,कुंभेज,दारफळ निमगाव या भागातील हजारो हेक्टर वरील द्राक्ष बागा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.
हिंगोलीच्या डोंगरकडा येथील शेतकरी जठण गावंडे यांच्या शेतात अतिवृष्टीने केळीच्या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे केळीच्या बागेत मागील चार दिवसापासून पाणी साचल्याने केळीची झाडे नष्ट झाली आहेत गावंडे यांनी प्रशासनाला शेतातील पंचनामे करण्याची सूचना केली मात्र सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मतं दिल्याने संतप्त झालेल्या शेतकरी गावंडे यांनी हातात कोयता घेत पंचनामे आधीच आपली केळीची बाग छाटणी केली आहे सहा महिने या बागेचा सांभाळ केला हजारो रुपये या बागेच्या संगोपनावर खर्च झाला असल्याची भावना या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान गावंडे यांच्यासारख्याच शेकडो शेतकऱ्यांच्या विविध पीक आणि फळांच्या बागा अतिवृष्टीने भुईसपाट झाल्या आहेत.
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत जाहीर करावी या मागणीसाठी आडवला ताफा
बार्शी तालुक्यातील कारी गावामध्ये हा ताफा आडवण्यात आलाय
ताफा आडवल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी गाडीतून उतरून शेतकऱ्यांची समजूत काढली
सरकार त्यांना लवकरच मदत जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले त्यानंतर शेतकऱ्यांनी ताफा सोडला
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील राहाता येथे आयोजित नागरी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला.
जलसंपदा विभागाकडून कालव्यांच्या नुतनीकरणासाठी तब्बल 491 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने राहाता शहरात त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमुळे मंत्री विखे पाटील यांनी हा सत्कार टाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत खुला कांदा लिलावाचे उद्घाटन तसेच जलसंपदा विभागाच्या शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन पार पडलय.
नाशिकच्या येवला शहरात आज आदिवासी भिल्ल समाजातर्फे येवला तहसिलवर मोर्चा काढण्यात आला.
हैद्राबाद गॅझेटइयरच्या आधार घेऊन बंजारा,धनगर,कैकाडी जातींना एसटी प्रवर्गात घेण्यात आदिवासी समाजाने विरोध केला आहे.
दुस-या समाजाचे काही नेते दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करीत असून अशा नेत्यांवर अँक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणी साठी आदिवासी समाजाचे व एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली येवल्याती विंचूर चौफुली ते तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येमे मोर्चात आदिवासी भिल्ल समाज बांधव सहभागी झाले होते.
उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याशी केली धनगर समाज आरक्षण संधर्भात चर्चा..
दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाला आजचा 10 दिवस
शिवसेनेचे जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह ईतर उपस्थीत
अमरावती -
आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती भाजपाची आढावा बैठक सुरू.
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित...
पुढील वर्षी नोव्हेंबर मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.
त्या अनुषंगाने भाजपची आढावा बैठक पार पडत आहे.. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पाच जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी हजर..
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी आज त्यांच्या उपस्थित काही पक्ष प्रवेश आयोजित केले होते. या निमित्ताने अजित पवार यांनी एकाच कार्यक्रमात तीन पक्षातील प्रतिनिधींचे राष्ट्रवादी मध्ये स्वागत केले. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस अशा तीन पक्षातील मान्यवरांनी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यापैकी पुणे जिल्ह्यातील दोन जुन्या सहकाऱ्यांची परत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करण्यासाठी राष्ट्रवादी मध्ये "घरवापसी" झाली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे आणि जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. पुणे शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत रोहन सुरवसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी मध्ये "एन्ट्री" घेतली. या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने मोर्चा बांधणी करायला सुरुवात केली आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त देशभरातील भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला
सकाळी पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत दोन लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन
दर्शनासाठी भक्तांच्या लांब रांगा तर मुखदर्शनासाठी देखील भाविकांनी केलीय गर्दी
सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर झाला आहे
तरुणाला बॅटने मारहण केल्याप्रकरणी केली होती अटक
सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका तरुणाला बॅटने मारहाण केलेल्या प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला
बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला बॅटने मारहाण केल्याचा प्रकार सोशल माध्यमावर व्हायरल व्हिडिओतून समोर आला होता
चकलांबा पोलिस ठाण्यात या प्रकरणी खोक्या विरोधात गुन्हा दाखल होता
दरम्यान आता बीड जिल्हा सत्र न्यायालयाने खोक्याला चार महिन्यानंतर जामीन मंजूर केला
यवतमाळ जिल्ह्यात धुवाधार पावसाला सुरुवात, विजांचा कडकडाट सह मुसळधार पाऊस
हवामान विभागाने येलो अलर्ट चा दिला होता इशारा, मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता
जिल्ह्यातील कापूस सोयाबीन पिकांना पुन्हा फटका बसण्याची शक्यता
पुण्यात सध्या घरफोडी, वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. अशा एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी अगदी नावाप्रमाणे "गुडघ्यावर" आणलं. पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडी चा प्रकार झाला होता. तसेच काही मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांनी सुद्धा हैदोस घातला होता अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी त्यांची "वरात" काढली. पुण्यातील हडपसर भागात ठिकाणी या आरोपींनी दहशत निर्माण होईल असे कृत्य केले तिथून या आरोपींचा गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड हडपसर पोलिसांनी काढली...
राज ठाकरे उद्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर
सीना नदीला आलेल्या पूर परिस्थिती आणि नुकसानीची पाहणी करणार...
उध्दव ठाकरे यांच्या नंतर राज ठाकरे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर...
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची माहिती..
पुण्यात आज पाऊसाचा अंदाज
पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट
पुढील ३ तासात पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.
इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हप्तेखोर, जातीयवादी असून खोटे गुन्हे दाखल करतात, असे गंभीर आरोप करत त्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्याची मागणी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली असून यासंदर्भात त्यांचे गेली पाच दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे, या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या वतीने इंदापूर येथे "भिक मागो आंदोलन" करण्यात आले.आंदोलकांनी हातात डबे घेत आणि टाळ वाजवत नागरिकांना भीक मागितली..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कात्रज दूध उत्पादक संघ सर्वसाधारण वार्षिक सभा
पुण्यातील कात्रज दूध डेअरी मध्ये सर्व साधारण सभेचे आयोजन
सभेला अनेक ठिकाणचे शेतकरी उपस्थितीत
मराठवाड्यात पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल केला.या पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.महिना उलटला परंतु नांदेड जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरु आहे. मराठवाड्यात मोठा पाऊस झाला. या पावसामुळे गोदावरी सह उपनद्यांना मोठा पूर आलाय.या पुरामुळे नदी काठच्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत. सोयाबीन, कापूस,यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही पिके पाण्या खाली आहेत. सोयाबीन पिकाचा अक्षरशः चिखल झाला आहे.एकरी 50 हजार रुपय तात्काळ आर्थिक मदत शासनाने द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.
जुन्नर तालुक्यातील निमदरी हे राज्यातील फुलांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील शंभर टक्के शेतकरी फुलशेतीतून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात. यंदा पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे अनेक ठिकाणी फुलांचे नुकसान झाले, मात्र निमदरीतील शेतकऱ्यांनी वेळीच सावधानता बाळगून शेवंतीची शेती सुरक्षित ठेवली. सध्या गावातील शेतमळे शेवंतीच्या फुलांनी फुलून गेले आहेत. नवरात्राच्या पार्श्वभूमीवर शेवंतीच्या फुलांना प्रचंड मागणी असून, बाजारभाव शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटलं आहे.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे सीने काठची शेती गेली पाण्याखाली ; शेतकऱ्यांना बसला मोठा फटका
मागच्या 4 ते 5 दिवसांपासून शेती पाण्याखाली असल्याने खरीप पिके सडण्याची शक्यता
सोलापूर - विजयपूर महामार्ग अजून ही पाण्याखाली असल्याने आजूबाजूच्या शेतीला बसला मोठा फटका
त्यामुळे शेतकऱ्यांपुढे यामुळे मोठं आर्थिक संकट उभे टाकले आहे.
पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ खर्डी या भागात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अनेक पिके पाण्यात आहेत तर अनेक शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले आहेत अशा अडचणीच्या काळात मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे धावून आले आहेत. त्यांनी आज पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून त्यांना रोख स्वरूपात दहा हजारांची मदत केली आहे.
तपकिरी शेटफळ येथील शेतकरी सदाशिव चौगुले यांची चार एकर डाळिंबाची काढणीस आलेल्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे या शेतकऱ्याच्या बागेची पाहणी करून या शेतकऱ्याला दहा हजाराची तात्काळ मदत केली आहे यावेळी दिलीप धोत्रे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशीही फोन द्वारे संवाद साधून सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली यावेळी दत्तात्रय भरणे यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे तत्काळ आदेश दिले जातील असे आश्वासन दिले आहे. थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रांजणगावजवळ डिझेल टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. या अपघातात टँकर रस्त्यालगत उलटून मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले. दरम्यान अपघातग्रस्त टँकरमधून डिझेल दुसऱ्या टँकरमध्ये हलविण्याचे काम सुरू असून, लाखो लिटर डिझेल वाया गेल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या भीषण अपघातात सुदैवाने कुठलाही जीवितहानी झालेली नाही.
महाराष्ट्रातील परतीच्या पाऊसाने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जनशक्ती संघटनेची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ ही २८ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित आहे. परंतु मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच २६ ते २८ सप्टेंबरला हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.
साधारणपणे जास्तीत जास्त १ ते २ आठवडे परीक्षा पुढे ढकलून पूरस्थिती पूर्वपदावर येताच परीक्षा घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
आपण विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
लातूरच्या निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे ओढ्याला पूर आल्याने गावातील विद्यार्थ्यांना जेसीबीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. मागच्या 5 दिवसापासून सतत पाऊस पडतो आहे, ओढ्याला पूर आल्याने वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणा बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
24 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना
बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण काशिनाथ गवसाने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय
तर कारी गावातील शेतकरी शरद भागवत गंभीर यांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली
शेतकरी संकटात असताना नाच गाण्यात व्यस्त असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक
धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारणार
धाराशिव जिल्ह्यातील जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांचा इशारा
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तुळजापुरात नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमात डान्स वरून शेतकऱ्यांच्या संतप्त भावना
नाशिक -
- कुंभमेळ्यासाठी सरकार २६८ एकर जागेचे भूसंपादन करणार
- आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर साधूग्रामसाठी तपोवनातील २६८ एकर जागा कायमस्वरूपी संपादित करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जागाधारकांना मोबदला म्युनिसिपल बॉण्डद्वारे चार टप्प्यांत दिला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर -
ओला दुष्काळाच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांशी बोलू
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती
रामदास आठवले यांच्याकडून पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा
जळगाव -
केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर
लवकरच होणार केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वाटपाची प्रक्रिया
जळगाव जिल्ह्यात सुमारे १ लाख ८० हजार लाख हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड होत आहे
हवामानाधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत उन्हाळ्यातील अतिउच्च तापमानामुळे केळीचे नुकसान
३१ जुलै २०२५ पर्यंत नुकसानभरपाईचे दावे वितरित होणे अपेक्षित होते
पण हवामान केंद्रांची प्रमाणित आकडेवारी उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना विमा रकमेपासून वंचित राहावे लागले.
नागपूर -
- शालार्थ आयडी घोटाळ्यात ३० शिक्षकांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती
- राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश
- २६ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे सरकारला नागपूर खंडपीठाचे आदेश
- शालार्थ आयडी घोटाळ्यात सुरु असलेल्या वादग्रस्त चौकशी विरोधात या शिक्षकांनी याचिका दाखल केली होती
- शिक्षण आयुक्तांनी या शिक्षकांच्या चौकशीचे आदेश दिले होते
नागपूर -
- जिल्हा परिषद रोस्टरविरोधात टाकलेली याचिका नागपूर खंडपीठानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा फेटाळून लावली
- बुलढाण्याचे संजय वडतकर यांच्यासह १३ कार्यकर्त्यांची विशेष अनुमती याचिका फेटाळली.
- न्यायमूर्ती सूर्य कांत आणि उज्जल भुयान यांचा निकाल..निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपाचे ठोस कारण नाही
- १९ सप्टेंबरला मुंबई हायकोर्ट, नागपूर खंडपीठानेही याचिका फेटाळली होती. ग्रामविकास विभागाने नियम २०२५ नुसार झीरो रोस्टर लागू केले.
- सरकारचा निर्णय अवैध, मनमानी असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा अमान्य करत याचिका फेटाळली..
नागपूर
- नगरसेवक पदाचे तिकीट हवे असेल तर पदवीधर निवडणुकीसाठी हजार मतदारांची नोंदणी अनिवार्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इच्छुक उमेदवारांना टार्गेट
- पदवीधरचा गड परत मिळवण्यासाठी भाजपकडून निवडणुकीच्या सव्वा वर्षापूर्वीपासूनच जोरदार तयारी
- काल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नागपूर विभागीय कार्यकर्त्यांची झाली बैठक
पंढरपूर -
पूर ओसरायला सुरुवात होताच पुन्हा सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अतिवृष्टीचा अंदाज असल्याने सीना नदीला पुन्हा पुराचा धोका
अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पुन्हा पाणी सुटणार
रत्नागिरी - लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव जंगलातून साग झाडाची चोरी
राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथील सात जणांना वनविभागाने घेतले ताब्यात
सागाचे ३१ ओणके वनविभागाकडून करण्यात आले जप्त
२८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक क्रेन देखिल वनविभाच्या ताब्यात
नागपूर
- नागपूर विमानतळावरून ८ महिन्यांत ३०९ उड्डाण रद्द, ३,८३२ विमानांना झाला विलंब
- यावर्षी ८ आपत्कालीन लँडिंग, तर २०२२ ते २०२५ दरम्यान एकूण ३८ विमानांना आपत्कालीन लँडिंग करावी लागली.
- १ जानेवारी ते ३१ ऑगस्टदरम्यान १९.३७ लाख प्रवाशांची आवागमन नोंदवण्यात आलीय...
- विमानतळाला लँडिंग, पार्किंग, यूडीएफ मधून ८,७८०.१२ लाख महसूल, तर खर्च २,४९४.३७ लाख.
- खासगी १,१८६ विमान व १७८ हेलिकॉप्टर उड्डाणांमधून ७७ लाख महसूल मिळाला.
- प्रवासी संख्या कमी असल्याने कोल्हापूर, लखनौ, बेळगाव, नाशिक, चेन्नई, नांदेड व छत्रपती संभाजीनगर विमानसेवा बंद करण्यात आल्या.
नाशिक -
- २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट
- इंदूरमार्गे जयपूर फ्लाइट पुन्हा कनेक्ट, इंडिगो एअरलाईन्सकडून विमानसेवा उपलब्ध
- विमानसेवेसाठी ७८ आसनी एटीआर विमानांचा वापर
- तिकिटाचे दर व वेळापत्रक लवकरच होणार जाहीर
- नाशिकमधील औद्योगिक संघटनांच्या मागणीनंतर निर्णय
पुणे -
रात्रीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विशाल चंदनशिवे याला सापळा रचून गुन्हे शाखा चार च्या पथकाने केली अटक
त्याच्याकडून जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसानी केला हस्तगत
खराडी भागातून आरोपीला अटक केली असून त्याने या आधी ही अनेक ठिकाणी घरफोड्या केलेल्या असल्याची माहिती
गेल्या काही दिवसापसून पुण्यात घरफोड्या करण्याचे प्रमाण वाढले आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.