Maharashtra News Live Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: मिरजगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : मान्सून रखडला, महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत पोहचणार, राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी

- वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी

- पंधरा ते वीस मिनिट बरसल्या पावसाच्या सरी

- उकाड्याने त्रस्त नागरिकांनी दिलासा

- जिल्ह्यात आज सकाळपासुन होते ढगाळ वातावरण

मिरजगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले. गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मशागतीची कामे पूर्ण झाल्याने खरीप हंगामातील पेरणी आणि इतर शेतीकामांना वेग मिळणार असल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.

नांदेडमध्ये खासगी शाळेच्या गोडाऊनला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

नांदेड शहरातील तरोडा परिसरातील सावित्रीनगर येथे असलेल्या श्री साई तेलुगु एज्युकेशन सोसायटीच्या प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत लाकडी व फायबर बेंच, प्लास्टिक खुर्च्या, टेन्टसह लाखो रुपयांचे शालेय साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. धुराचे प्रचंड लोट उसळल्याने परिसरात घबराट पसरली होती. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

latur : लातूरमध्ये भीषण अपघात; बस खाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

लातूरच्या गरुड चौक परिसरात एक अपघाताची घटना घडली आहे. वेगात जाणाऱ्या बसखाली येऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. पाठीमागून जाणाऱ्या दुचाकीस्वाराची गाडी स्लीप झाल्याने दुचाकीस्वार बसच्या पाठीमागील चाकाखाली आला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलाय.

Nashik : नाशिक-नांदगाव बसचा भीषण अपघात

नाशिक-नांदगाव बसला संध्याकाळच्या सुमारास मनमाड-चांदवड रस्त्यावर शिंगवे परिसरात अपघात झाल्याची घटना घडली आहे. नाशिकला जाणारी नांदगाव-नाशिक ही शेवटची बस मनमाड येथून संध्याकाळी 6 नंतर निघत असते. मनमाड येथून ही बस नाशिककडे निघाल्यानंतर शिंगवे परिसरात भरधाव येणारी कारने बसला मागून धडक दिल्याने कारमधील चार जण जखमी झाले. यामुळे मात्र बसमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करत त्यांना दुसऱ्या बसने पाठवण्यात आले. तर जखमींना मनमाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

Palghar : पालघरमध्ये ट्रकखाली उडी मारून वृद्धाची आत्महत्या

पालघर - भरधाव ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन वयोवृद्ध इसमाची आत्महत्या

पालघरच्या बोईसर तारापूर रोडवरील स्टेट बँके समोरील घटना

अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

सलीम अफजल इंग्रजी या 70 वर्षीय वयोवृद्धाची आत्महत्या

ट्रकच्या पुढील भाग पुढे गेल्यानंतर मागील चाकाखाली येऊन वयोवृद्धाची आत्महत्या

घटनेने परिसरात खळबळ .

gokul geete : गोकुळ गीते विधानस परिषद निवडणूक लढण्यावर ठाम

- गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात यश नाहीच

- भाजप बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम

- गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसेंसोबत झाली विमानतळावर बैठक

- गोकुळ गीते उद्यापर्यंत जाहीर पाठिंबा देतील असा गिरीश महाजनांना विश्वास

- गोकुळ गीतेंनी प्रतिक्रिया न देताच माध्यमांना चकवा देत ठोकली धूम

नाशिकच्या नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नाशिकच्या नांदगाव तालुक्यात आज संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे,अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ झाली.अचानक झालेल्या पावसामुळे मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून, बळी राजाच्या शेतीच्या कामाला वेग येणार आहे

पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

गुरुवारी दुपारी चार वाजता आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करणारा आंदोलन

अभिजीत दिपके यांनी ट्विट करून दिली माहिती

Nanded : भोकर पोलिस विभागाची मोठी कारवाई, बनावट व भेसळयुक्त खताचा साठा जप्त

भोकर पोलिस आणि कृषी विभागाची मोठी कारवाई: बनावट व भेसळयुक्त खताचा साठा जप्त.

या खरीप हंगामात कृषी विभागाच्या पथकाकडून इतर तीन कारवाया.

अंदाजे पन्नास लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कृषी विकास अधिकाऱ्यांची माहिती.

Nashik Power Cut : नाशिकमध्ये वादळाने पडले विद्युत पोल

-मनमाड व आजूबाजूच्या परिसरात काल वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने काल संध्याकाळ पासून अर्धे मनमाड शहर अंधारात बुडाले आहे

महावितरण कंपनी कडून दुपार पासून कंत्राटी कर्मचाऱ्यां कडून महावितरण कडून युद्ध पातळीवर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असून,टप्प्या टप्याने शहरातील काही भागात वीज पुरवठा होईल असे महावितरण कडून सांगण्यात आलय.

निफाड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे बिबट्या पकडला

नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला असून खडक माळेगाव येथील शिंदे वस्तीवर आज पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला

शेतकरी रामेश्वर शिंदे यांच्या शेत परिसरात बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास येताच स्थानिक शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीने कांदा साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जाळीच्या साहाय्याने बिबट्याला पकडून ठेवले

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महामंडळावर पुन्हा एकदा समर्थ पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

माजी अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल आणि अभिनेते आनंद काळे यांच्या चित्रकार्मी पॅनल यांच्यात थेट लढत झाली.

अभिनेत्री विभागातून वर्षा उसगावकर यांची, विभागातून ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांची तर संकलन विभागातून विजय खोचीकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे.

Amravati Rain Alert : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

शेतकऱ्यांमध्ये आनंद, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Birhad Morcha : किसन सभेचा नांदगाव तहसील कार्यालयावर बिर्हाड मोर्चा,आंदोलन

नाशिकच्या नांदगाव तहसिल कार्यालयावर किसान सभे तर्फे विविध मागण्यांसाठी भव्य बिर्हाड मोर्चा आंदोलन करण्यात आले

वनजमिनी,गायरान जमिनी करणाऱ्यांच्या ताब्यात द्याव्या असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी झालेली नाही

सरसकट कर्ज माफी चे आश्वासन देऊन त्यात अटी शर्ती टाकून शेतकऱ्यांना फसवले

कांद्याला 3 हजार रुपये हमीभाव व 1 हजार रुपये अनुदान द्यावे अशा विविध मागण्यासाठी हे बिर्हाड आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची दिशा ठरणार - संजय राऊत

Beed : बीडमध्ये काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात 

- बीडमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.

- वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

- जिल्ह्यातील पाणी पातळीत तापमान वाढल्याने मोठी घट होत होती या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार खासदारांसोबत दोन तास बैठक 

सध्या अमरावतीमध्ये विधानपरिषदेची निवडणूक सुरू आहे, याच अनुषंगाने अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर आहेत, दरम्यान एका हॉटेलमध्ये त्यांनी राज्यसभा खासदार अनिल बोंडे, निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, आमदार उमेश यावलकर, आमदार प्रवीण तायडे, केवळराम काळे यांच्यासोबत विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आढावा घेत निवडणुकी संदर्भात सविस्तर माहिती घेतली...

 रेल्वे प्रवासा दरम्यान चोरीची घटना,2 आरोपी अटकेत

राजस्थान येथील मार्केटींगचा व्यवसाय करणार नरेश जाट हे 4 दिवसांपूर्वी पंजाब मेल ने मुंबई येथे सोन्या-चांदीचे दागिने,व मोठी रोख रक्कम घेऊन जात असताना बाथरूमला गेले असता मनमाड रेल्वे स्थानकात त्यांच्या बॅगा चोरीला गेल्याच लक्षात आलं.

Pune: दूषित पाणीपुरवठा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

दूषित पाणीपुरवठा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे महापालिकेच्या विरोधात आंदोलन

नागरिकांच्या आरोग्याशी पालिका खेळत असल्याचा आरोप

गेल्या काही महिन्यांपासून वडगाव शेरी, विश्रांतवाडी, लोहगाव परिसरात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा

पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी

अमरावतीत लागलेल्या आगीमध्ये लाडकीबहीण योजनेचे दस्ताऐवज जळून खाक 

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती आवारात असलेल्या एकात्मिक बालविकास रेकॉर्ड रूम ला लागली आग आहे. आगीमध्ये पी पी पी किट,ऑफिशियल कागदपत्रे, जळून खाक झाली आहे.

Nashik : नाशिकमध्ये वादळी वारा पावसाने डाळिंब बागेला फटका

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदरडी परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे शेतकरी लक्ष्मण पगार यांच्या 2 एकरातील डाळिंब बागेला फटका बसलाय.

सोने दीड हजार रूपयांनी झालं स्वस्त

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण सोमवारीही कायम राहिली. शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात घट झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी किंमती आणखी खाली आल्या आहेत. यात चांदी तब्‍बल ४ हजार रूपयांनी तर सोने दीड हजार रूपयांनी खाली आले आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

भाजप आमदार आक्रमक

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि वेगवेगळ्या शासकीय विभागाचे कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याच्या मुद्द्यावरून आज भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिक्षक मुख्यालय राहत नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ढासाळलेली आहे त्यासोबतच आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक गावात मुख्यालय राहत नसल्यामुळे सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. याप्रकरणी अनेकदा पत्र देऊनही कारवाई होत नसल्यामुळे आज बैठक बोलावून याचा जाब आमदार बंब यांनी विचारला.

महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी

महाबळेश्वर येथील मुख्य एसटी बस स्थानकात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. बस स्थानकातील बस तब्बल एक तास उशिराने सोडल्याचे कारण विचारणाऱ्या प्रवाशांना तसेच माहिती घेण्यासाठी गेलेल्या स्थानिक पत्रकारांना वाहतूक निरीक्षकाने थेट माज दाखवत पत्रकार हे ब्लॅकमेलर दलाल आहेत असा शब्द प्रयोग केला

बुलढाणा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 5.78 लाखांचा गुटखा जप्त

बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने देवळघाट येथे कारवाई करून 5 लाख 78 हजार 900 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त केले.

गुप्त माहितीच्या आधारे स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.

या प्रकरणी चिखली येथील एका 59 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरण

सहभागी झालेल्या सर्व तरुणांच्या पालकांना पुणे पोलिस पाठवणार नोटीस

सहभागी झालेल्या तरुणांचे आणि त्यांच्या पालकांचे होणार समुपदेशन

पुणे पोलिसांकडून पालकांना सुद्धा समज दिली जाणार

आळंदी मरकळ येथे झालेल्या अनधिकृत पार्टी मध्ये १०० पेक्षा अधिक तरुण आणि तरुणी झाले होते सहभागी

हिंगोलीत शेतकरी कर्जमाफीच्या जीआरची शेतकऱ्यांनी केली होळी

शेतकरी कर्जमाफीच्या जीआरची शेतकऱ्यांनी केली होळी

हिंगोलीच्या गोरेगाव मध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात केले आंदोलन

सरकारने शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी केल्याचा आरोप

सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या घोषणा

कोल्हापूरात शक्तिपीठ महामार्गावरून समर्थक - विरोधक आमदारांमध्ये कलगीतुरा

शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात समर्थक आणि विरोधक आमदारांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. महामार्गाला विरोध करण्यासाठी उद्या कोल्हापुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी हा प्रकल्प शेतकरी आणि जनतेवर लादला जात असल्याचा आरोप केला आहे.

बार्शी - सोलापूर मार्गांवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात

बार्शी - सोलापूर मार्गांवरील कारंब्याजवळ झाला आहे भीषण अपघात

या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी

दुचाकीवरील दोघेही कारंबा गावचे आहेत रहिवासी

आज सकाळी शेताला जातं असताना ट्रकने दिलेल्या जोरदार धडकीमुळे झाला अपघात

संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला आहे

नाशिकमध्ये चांदवड बाजार समितीत नाफेडची खरेदी पहिल्याच दिवशी ठप्प

- शासनाच्या निर्णयानुसार बाजार समिती आवारातच नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू होणार होती…

- मात्र चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजच्या पहिल्याच दिवशी नाफेडची खरेदी प्रत्यक्षात सुरूच होऊ शकली नाही…

- कांदा व्यापारी आणि नाफेडने नियुक्त केलेल्या खरेदीदार संस्थांच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती…

- मात्र नियोजित वेळेनंतर तब्बल अर्धा तास उलटूनही खरेदीदार संस्थांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित न राहिल्याने व्यापाऱ्यांनी नियमित कांदा लिलाव सुरू केले…

- परिणामी आज चांदवड बाजार समितीत नाफेडमार्फत एकाही कांद्याची खरेदी झालेली नसल्याची माहिती

नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

* आमदार सरोज अहिरे यांच्या उपस्थितीत आंदोलन

* रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी भुजबळ यांच्यासह इतर आमदारांच्या घरासमोर केले आहेत आंदोलन..

* भूसंपादन प्रक्रिय करताना बिल्डर धार्जिणे निर्णय होत असल्याचा आरोप

* योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी नाराज

घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागल्याने नंदुरबारच्या ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले

देशभरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात अचानक 29 रुपयांची वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांवर, गृहिणींवर होताना दिसत आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू महागल्या असताना, आता गॅस सिलेंडरच्या दरवाढीने घरगुती अर्थकारणाचे गणित आणखी बिघडले आहे.

धाराशिवमध्ये भाविकांची लुट करणाऱ्या बोगस पुजारी व एजंटाविरोधात मंदिर संस्थानची धडक मोहीम

तुळजाभवानी मंदिरात दोन दिवसात पाच संशयित बोगस पुजारी विशेष पथकाच्या ताब्यात

दोन पुजाऱ्यांना मंदिर संस्थांनी केले पोलिसांच्या स्वाधीन तर तीन पुजाऱ्यांची चौकशी सुरू

बोगसगिरी करणाऱ्या संशयित पुजाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची मंदिर संस्थानची माहिती

मंदिर परिसरात भाविकांची आर्थीक फसवणूक आणि अनधिकृत पुजारी व्यवसायाला आळा घालण्यासाठी संस्थानने केली विशेष मोहीम सुरू

मोहिमे अंतर्गत सलग दोन दिवसांत पाच अनाधिकृत पुजारी पथकाच्या जाळ्यात

नाशिकमध्ये रामकुंडावर ठाकरे सेनेचं आंदोलन

- गोदावरी नदीत सांडपाणी मिसळत असल्यानं ठाकरे सेना आक्रमक

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे झालेल्या तोडफोडीत सांडपाणी गोदावरी नदी पात्रात मिसळत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन

- ठाकरे सेनेचे नगरसेवक नदीपात्रात उतरले, थेट नदी पात्रात उतरून ठाकरे सेनेचं आंदोलन

- दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे पावित्र्य धोक्यात

- गोदावरी नदीत ड्रेनेज व दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

- भाविक स्नानासाठी येत असलेल्या गोदावरीची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप

- पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेनेकडून तीव्र आंदोलन

शटर उचकटून ६० लाखांचे टुल्स लांबवले; सीसीटीव्हीत चोरटे कैद

छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव फाट्याजवळील एका टूल्स विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ६० लाख रुपयांचे सीएनसी व व्हीएनसी मशिनरीचे महागडे कटिंग टूल्स चोरून नेल्याची मोठी घटना उघडकीस आली.

सातारा महामार्गावर एसटी बसचा अपघात

सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याच्यानजीक खोपी गावाच्या हद्दीत, भरधाव एसटी बस रस्त्याकडेच्या गटरात कलल्याने अपघात झाल्याची घटना

साताऱ्याहून मुंबई सेंट्रलला ही बस चालली होती

डीवायडर तोडून बस थेट गटरात शिरली

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.. बस मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत..

साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना बसचा हा अपघात झाला

अपघातात बस मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या गटरात जाऊन अडकली.सुदैवाने बस पूर्णपणे पलटी न झाल्याने अनर्थ टळलाय..

अपघातानंतर स्थानिकांनी आणि महामार्गावर प्रवास करणाऱ्या इतर प्रवास्यांनी.

बसमधील प्रवास्यांना सुखरूप बाहेर काढले.

दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात

मुंबई येथील दादरमध्ये बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.

नीट प्रकरणातील आरोपी मनिषा वाघमारेला "वर्टिगो" आजार

"वर्टिगो" असल्याचे सांगत न्यायालयाकडे जामिनासाठी वाघमारे ची याचिका

पेपरफुटी प्रकरणी वाघमारे ने पेपर वाटल्याचा सी बी आय ने आरोप करत याचिकेला केला विरोध

रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या पेपर वाटले, सी बी आय कडे विद्यार्थ्यांचे जबाब

मनिषा वाघमारेच्या जामीन अर्जावर आता ९ जून रोजी सुनावणी

नीट पेपरफुटी प्रकरणात मनिषा वाघमारे न्यायालयीन कोठडीत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

शिवसेना राष्ट्रीय कार्यकरिणीच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहे

युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद. युरियासाठी शेतकरी आक्रमक होत घातला गोंधळ. अकोट तालुक्यात युरियाचा 200 पोते माल आल्याने दुकानदाराकडून प्रत्येकी शेतकऱ्याला एक पोत देण्यासाठी होतोये हट्ट. यावरून शेतकरी आक्रमक. कृषी सेवा केंद्र समोर शेतकऱ्यांनी घातला गोंधळ.. घटनास्थळी पोलीस आणि आरसीपी पथक दाखल ... कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची समजूत करण्याचा प्रयत्न.. दरम्यान, आज शेतकऱ्यांची पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही शेतकऱ्यांची गर्दी युरिया खताच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर होताना दिसतंये. दुकान उघडण्याची वेळ होण्यापूर्वीच पहाटे 4 वाजतापासून अनेक शेतकरी दुकानासमोर रांगेत उभे असल्याचे दिसून आलेय. खरीप हंगामाच्या तयारीसाठी युरिया खतांची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना युरियासाठी सकाळपासूनच प्रतीक्षा करावी लागत आहे. युरियासाठी लागलेल्या रांगेमध्ये महिला शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहेये. सकाळपासूनच महिला रांगेत ताटकळत बसूनं आहेत. 400 वर शेतकऱ्यांची युरियासाठी रांग अकोट शहरातल्या कृषी सेवा केंद्रावर दिसून येत आहे..

खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद. युरियासाठी शेतकरी आक्रमक होत घातला गोंधळ. अकोट तालुक्यात युरियाचा 200 पोते माल आल्याने दुकानदाराकडून प्रत्येकी शेतकऱ्याला एक पोत देण्यासाठी होतोये हट्ट. यावरून शेतकरी आक्रमक. कृषी सेवा केंद्र समोर शेतकऱ्यांनी घातला गोंधळ.. घटनास्थळी पोलीस आणि आरसीपी पथक दाखल ... कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची समजूत करण्याचा प्रयत्न..

राज्यात १ मार्च ते ५ जून या कालावधीत उष्माघाताचे एकूण २९२ रुग्ण

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या १५ घटनांची नोंद

यापैकी सहा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे अधिकृतपणे निश्चित

उष्माघातामुळे झालेल्या सहा मृत्यूंपैकी लातूर जिल्ह्यात एक, अकोला जिल्ह्यात दोन, गडचिरोली जिल्ह्यात एक आणि जळगाव जिल्ह्यात दोन मृत्यूंची नोंद

जून महिन्यात सुद्धा राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने उच्चांक गाठत असल्याने, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

Maharashtra News Live Update:धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

धाराशिव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कळंब तालुक्यातील कळंब लातूर राज्य महामार्गावरील खडकीजवळील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावरील पुलाचं काम सुरू असून त्या बाजूला भराव टाकून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र काल रात्री झालेल्या पावसाने हा रस्ता वाहून गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या पुलाचे काम सुरू केल्यामुळे हा फटका बसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. परिसरातील शेती उपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाल आहे.

आषाढी वारी: माउलींच्या रथासाठी जांभूळकर परिवाराची देखणी खिल्लार बैलजोडी रवाना; रानवडे परिवाराकडे सुपूर्द

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी पालखी सोहळ्याचे वेध लागले असतानाच, माउलींच्या रथ ओढण्यासाठी लागणाऱ्या बैलजोडीचा मान मिळणे हा वारकऱ्यांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. असाच एक भक्तीने भारावून टाकणारा प्रसंग समोर आलाय पुण्याच्या वाकड येथील जांभूळकर परिवाराने पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेली देखणी खिल्लार बैलजोडी आता माउलींच्या रथाला जुंपली जाणार आहे. माऊलींच्या पायी वारीचा पालखी रथ ओढण्याचा यंदाच्या वर्षीचा मान आळंदीतल्या रानवडे परिवाराकडे आलाय आता ही बैलजोडी मोठ्या उत्साहात सुपूर्द करण्यात आलीय

वादळी वाऱ्यामुळे नांदेड - वसमत मार्गावरील मोठे विद्युत खांब कोसळले.

वादळी वाऱ्यामुळे नांदेड - वसमत मार्गावरील विद्युत खांब कोसळले. त्यामूळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.काल रात्री नांदेड जिल्हयात मोठा पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नांदेड - वसमत मार्गावरील मरळक पाटी जवळ मोठे विद्युत खांब कोसळले.विद्युत तारा मुख्य रस्त्यावर लोंबकळत असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

राज्यात सरकार कोणाचेही असो, ते आपले असो की परके, आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, कारण शिवसेनेचा डीएनए हा आंदोलनाचा आहे,असा आक्रमक इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. शिवसेना-प्रहार कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.आपल्या भाषणात आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी नुकताच गोंदिया दौऱ्यावरून आलो असून तिथे अजूनही धानाची खरेदी पूर्ण झालेली नाही, अर्ध्याहून अधिक धान खरेदी विना पडून आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

पवन मावळात काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

पवन मावळातील वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेला उजाळा देणारा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा येळसे येथे कॉलेजच्या किर्तनाने मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण पवन मावळ वारकरी समाज आणि भाविक भक्तांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्याला पंचक्रोशीतील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित या सप्ताहात पहाटेच्या काकडा भजनापासून ते रात्रीच्या हरि जागरापर्यंत अखंड नामस्मरण, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचने, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळाला. यात पवन मावळातील विविध गावांच्या सहकार्याने आयोजित हा भक्तीमय उत्सव पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

मुंबईकरांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेवर धावणार १२ नव्या AC लोकल; वेळापत्रक पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT