Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राज्यातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रात थंडीची चाहूल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

सावंतवाडीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा

सावंतवाडीत भाजपच्या झालेल्या मेळाव्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक वॉर सुरू झाला आहे. मी नितेश राणे मुळे नव्हे तर रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामुळे नगराध्यक्ष झालो होतो असं सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नितेश राणे यांच्यावर पलटवार केला आहे. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख तसेच माजी नगराध्यक्ष संजू परब यांना मीच नगराध्यक्ष केलं. मात्र, तेच मला रोज उठून आव्हान देतात, तेव्हा आश्चर्य वाटतं असं वक्तव्य सावंतवाडीतील मेळाव्यात नितेश राणे यांनी त्यांचं नाव न घेता केलं होतं. मात्र मी रविंद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामुळे नगराध्यक्ष झालो असं सांगत नितेश राणेंचं हे आवाहन संजू परब यांनी पलटवून लावलय. सध्या कोकणात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे पाहुयात नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते आणि त्याला संजू परब यांनी काय उत्तर दिलंय.

भुसावळ रेल्वेला १३८ कोटी ७२ लाखांचा महसूल फुकट्या प्रवाशांसह विविध स्रोतांमधून उत्पन्नात लक्षणीय वाढ

भुसावळ रेल्वे विभागाने ऑक्टोबरमध्ये फुकट्या प्रवाशांसह विविध स्त्रोतांमधून उत्पन्नात लक्षणीय वाढ केली आहे. २०२४ च्या तुलनेत १५ टक्के अधिक महसूल मिळविला आहे. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे रेल्वेने एकूण १३८ कोटी ७२ लाखांचा महसूल मिळविला आहे. भुसावळ रेल्वे विभागाने यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत तिकीट तपासणी मोहिमेंतर्गत विना व अनियमित तिकीट, विनापावती मालवाहून नेणाऱ्या एक लाख आठ हजार ९४० प्रवाशांकडून नऊ कोटी ९४ लाखांचा दंड वसूल केला. दिवाळी व छट पूजेनिमित्त प्रवासी संख्येत झालेली वाढ लक्षात घेता भुसावळ विभागात प्रवासी व्यवस्थापनासाठी सर्वांगीण गर्दी नियंत्रण व्यवस्था प्रभावी अमलात आणण्यात आली. तक्रार निराकरणासंदर्भात भुसावळ विभागाने भारतीय रेल्वेत तिसरा क्रमांक मिळविला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल अनारक्षित तिकीट प्रणाली विभागातील भुसावळसह सात स्थानकांवर कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये तीन हजार २४५ अनारक्षित तिकिटांची नोंद झाली. प्रखर विपणन उपक्रम व ग्राहक संवादामुळे भुसावळ रेल्वे विभागाने कांदा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यातून नऊ कोटी पाच लाखांचा महसूल मिळाला.

वाशिमच्या बाजार समितीत बिजवाई सोयाबीनला ७ हजार ३०० रुपयांचा उच्चांकी दर 

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सातत्याने वाढत आहे. काल तब्बल १४ हजार क्विंटल सोयाबीनची नोंद झाली. यात बिजवाई सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल ७ हजार ३०० रुपये इतका उच्चांकी दर मिळालाय. मात्र इतर सामान्य सोयाबीनला केवळ ४ हजार ३८० रुपये प्रतिक्विंटलचाच दर मिळतोय. त्यामुळे दोन्ही दरांमध्ये तब्बल जवळपास तीन हजार रुपयांचा फरक दिसून येतोय. बिजवाई सोयाबीनचा दर हा सरकारच्या हमीभावापेक्षाही जास्त निघाल्याने बिजवाई करणारे शेतकरी खूश असले, तरी साधे सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित भाव अजूनही मिळत नाहीय.

म्हसळ्यातल्या ठाकरोली गावाबाहेर जमीन विक्री बंदच्या लागल्या पाट्या

पुण्यात जमिन विक्रीचा घोटाळा चर्चेत असतानाच रायगडच्या म्हसळ्यातील ठाकरोली ग्रामस्थांनी गाव परिसरात जमिन विक्री बंदीचे बॅनर लावले आहेत. मुंबई आणि पुणे शहरापासून तीन चार तासाच्या अंतरावर असणाऱ्या रायगड जिल्ह्याला मुंबई आणि पुणेकरांनी सेकंड होम म्हणून पसंती दिली आहे. विस्तीर्ण असा समुद्र किनारा रायगडला लाभल्याने येथे पर्यटन व्यवसाय देखील वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये फार्म हाऊस संस्कृती वाढीस लागली आहे. यामुळे येथील गावातील गावपण हरवल असून हे वाचवण्यासाठी ठाकरोली ग्रामस्थांनी जमिन बचाव, गाव बचाव अभियान सुरु करीत गाव परिसरात जमिन विक्री बंदीचे बॅनर लावले आहेत. कायदेशीर दृष्ट्या हे किती योग्य, अयोग्य हा विषय वादाचा असला तरी ठाकरोली ग्रामस्थांच्या या अनोख्या बॅनरची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

मनपा निवडणुका जवळ आल्याने कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याच्या मुख्यमंत्री यांच्या सूचना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल संध्याकाळी त्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील दिवाळी मिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते...

- गेल्या वेळी मनपा मध्ये भाजप चे 108 नगरसेवक निवडून आले होते यंदा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याच फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले लक्ष्य.

- पुढील वर्षी होणारी नागपूर विभाग पदवीधरची जागा परत मिळविण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्री यांनी केला. गेला वेळी ती जागा पराभूत झाल्याच शल्य असल्याचं फडनविस यांनी दिवाळी मिलन कार्यक्रमात पदाधिकाऱ्यासमोर सांगितलं.

पुण्यातील कोंढवा भागात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

पुण्यातील कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर

अनधिकृत बांधकाम केलेल्या अनेक इमारती केल्या जमीनदोस्त

१८ हजार ५०० चौ.मी. भागावर अतिक्रम विरोधी पथकाची कारवाई

कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये, पुणे महानगरपालिका चे आवाहन

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

खगोलशास्त्रज्ञ डॉ. नरेश दधिच यांचे चीनमध्ये निधन झालेय. ते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अंतर विद्याशाखीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकीशास्त्र केंद्राचे (आयुका) माजी संचालक होते.

८१ व्या वर्षी चीनमधील बीजिंग येथे हृदयविकाराने गुरवारी झाले निधन झाले. डॉ. दधिच हे बीजिंगमध्ये संयुक्त संशोधनासाठी महिनाभर गेले होते. गेल्या एक दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत ठीक होती. मात्र, स्थानिक वेळेनुसार दुपारी त्याचे निधन झाले. डॉ. दाधिच यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न होत असून लवकरच ते भारतात आणण्यात येणार आहे

BEED - अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर.

आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी लागली आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिलाच उमेदवार जाहीर करण्यात आला आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेमध्ये निवडणूक होत आहे त्यापैकी गेवराई नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना उमेदवारी देत थेट विजयसिंह पंडित यांच्याकडून या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

Amrnath | अंबरनाथ नगरपालिकेवर एक लाख टक्के कमळच फुलणार!

अंबरनाथ नगरपालिकेवर एक लाख टक्के कमळच फुलणार, असं म्हणत भाजपाने आज अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून तेजश्री विश्वजीत करंजुले यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika-Vijay Wedding: तारीख ठरली! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार उडणार; उदयपूरमध्ये होणार शाही विवाह

Vande Bharat Express : ४ नव्या वंदे भारत धावणार, कोणता आहे मार्ग? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Leopard Terror in AhilyaNagar: जुन्नरनंतर आहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत; बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

Maharashtra : EWS आणि BPL वीज ग्राहकांना, २५ वर्ष मोफत वीज मिळणार |VIDEO

Sanjay Raut : संजय राऊतांची भावनिक पोस्ट; हॉस्पिटलमध्येही थांबली नाही लेखणी

SCROLL FOR NEXT