परभणीच्या जिंतूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात साप चक्क फरशी वर फिरताना दिसला हा साप फरशी च्या फटीतून आल्याचे रुग्ण सांगत आहेत. मात्र हा साप दिसल्या नंतर रुग्णालयात मात्र गोंधळ उडाला होता. काही रुग्णाच्या नातेवाईकांनी तो साप पकडून बाहेर सोडण्यात आला महत्वाचे म्हणजे नेहमी वर्दल असलेल्या ठिकाणी हा साप दिसून आल्याने आता रुग्णात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर रुग्णालयातील ढिसाळ कारभार हा समोर येत आहे तर रुग्णालयातील कारभारावर प्रश्न चिंन्ह उपस्थित केले जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी, पांढरकवडा आणि यवतमाळ तालुक्यात वीज पडून हिरामण कुमरे,अनिल फरताडे ,धर्मचरण भगत अशा तीन व्यक्तीचा मृत्यू झाला असून यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथे एका शेतकऱ्यांच्या 12 बकऱ्या मृत पावल्या च्या घटना घडली.
घनसोली या प्रभागातील अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत नागरिक समस्या बाबत मनसेकडून थाळीनाद मोर्चा"काढण्यात
नवी मुंबई महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे
मीरा भाईंदर महापालिकेच्या दालनात केम छो बारचा मुद्दा गाजला होता. त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी बुलडोजर बाबाचे यापूर्वी बॅनर झळकवले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी चालवा रे बुलडोझर असं म्हटलं आणि त्यानंतर काही तासातच पालिकेची तोडक कारवाई करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
आयटी पार्क हिंजवडी परिसरातील एका मल्टिनशनल आयटी कंपनीच्या वर आज संध्याकाळ दरम्यान अचानक हेलिकॉप्टर उडू लागल्याने, तसेच त्या हेलिकॉप्टर मधून एनएसजीचे जवान उतरू लागल्याने एकच चर्चेला उधाण आलं होतं.
रस्त्यांवरील खड्डे, अपुरा पाणीपुरवठा आणि पालिकेकडून लादला जाणारा कर या तिहेरी समस्यांवर आज उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी पनवेल महापालिकेवर जोरदार मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि तरुणांचा सहभाग होता.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मनसे शिष्टमंडळास दमदाटी केली असल्याचा आरोप
मनसे नेते किशोर शिंदे याना गुंड म्हणून तुला महाराष्ट्राच्या बाहेर फेकतो असा दम दिला असल्याचा आरोप
त्यामुळे मनसे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करत आहेत
सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चार ही तरुण सुखरूप
चौघे ही तरुण बेस कॅम्पमध्ये सुखरूप असल्याची माहिती
विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे हे चौघे सोलापुरातील तरुण उत्तराखंड गेले होते
गंगोत्री येथील बेस कॅम्पमध्ये सर्व जण सुखरूप असल्याचा मेसेज यातील एका तरुणाने आपल्या मित्राला वॉट्सअप द्वारे पाठवला आहे
तर जिल्हा प्रशासनाने देखील माहिती तपासली असता सर्व जण सुखरूप असल्याचे समजले आले
मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने सपंर्क होतं नसल्याचे तरुणांनी मेसेज द्वारे कळवले आहे
दरम्यान उत्तराखंड येथील परिस्थिती नियंत्रणात येताच चौघेही सोलापूरला परत येतील
वनताराचे अधिकारी कोल्हापुरात दाखल
महादेवी हत्तींनी संदर्भात कोल्हापुरात होणार बैठक
कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील जैन मठामध्ये थोड्याच वेळात होणार बैठक
नांदणी मठ इथं आयोजित करण्यात आली होती बैठक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बैठकीचे ठिकाण बदललं
शेतात बैल चारत असताना अचानक आभाळ दाटून आलेला अशात वीज कोसळून एक तरुण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळच्या वणी तालुक्यातील तेजापूर शेतशिवारात घडली.धम्मरत्न सुधाकर भगत (23) असे वीज कोसळून ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.गजानन दिवाकर कोंडेकर (24) व पूनम संजय मालेकर (23) हे दोन्ही गंभीर जखमी झाले आहे.
गोट्या गीतेचे पुन्हा अनिल उर्फ आप्पा दळवी सोबतचे फोटो व्हायरल.
अनिल उर्फ आप्पा दळवी गोट्याचा गॉड फादर असल्याची परिसरामध्ये चर्चा.
अनिल उर्फ आप्पा दळवी ला ताब्यात घ्या गोट्या चां शोध लागेल नागरिकांमधून मागणी.
अनिल उर्फ आप्पा दळवी च्या गळ्यात सोन्याचे लॉकेट आप्पा दळवी ला कोणाचा आशीर्वाद?
- बीड शहरातील आणि शासकीय विश्रामगृह परिसरातील अनाधिकृत बॅनर हटवले.
- कालच शेतकरी कामगार पक्षाचे बॅनर पाठवल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते झाले होते आक्रमक.
- इतरांचे देखील अनाधिकृत बॅनर हटवण्याची केली होती मागणी.
- आज अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त लागलेले अनधिकृत बॅनर नगरपरिषदेकडून हटवायला सुरुवात झाली आहे.
सोलापूर -
सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चार ही तरुण सुखरूप
चौघे ही तरुण बेस कॅम्पमध्ये सुखरूप असल्याची माहिती
विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे हे चौघे सोलापुरातील तरुण उत्तराखंड गेले होते
गंगोत्री येथील बेस कॅम्पमध्ये सर्व जण सुखरूप असल्याचा मेसेज यातील एका तरुणाने आपल्या मित्राला वॉट्सअप द्वारे पाठवला आहे
तर जिल्हा प्रशासनाने देखील माहिती तपासली असता सर्व जण सुखरूप असल्याचे समजले आले
मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने सपंर्क होतं नसल्याचे तरुणांनी मेसेज द्वारे कळवले आहे
दरम्यान उत्तराखंड येथील परिस्थिती नियंत्रणात येताच चौघेही सोलापूरला परत येतील
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली.
या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते.
यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ आणि इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
नाशिक -
- किरकोळ वादातून बंदूक काढल्याचा आरोप खोटा
- भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे भावूक
- प्रतिक्रिया देताना निकुळे यांना आश्रु अनावर
- किरकोळ वादामध्ये निकुळे यांनी बंदूक काढल्याचा होता आरोप
- एका शिक्षकाने केला होता निकुळे यांच्यावर आरोप
- मात्र मी आदिवासी गरीब कुटुंबातून वर आलो आहे
- मला बदनाम करण्याचा प्रयत्न - निकुळे यांनी व्यक्त केली भावना
रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील हेदवतड येथे भास्कर जाधव यांची सभा
भास्कर जाधव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सिंदूर ऑपरेशनवरून टीका
काश्मीरमध्ये पर्यटकांना शोधून शोधून मारण्यात आलं, त्याचा बदला घेण्यासाठी सिंदूर ऑपरेशन राबविण्यात आलं
आपण भावनीक होतो, बरं झालं सरकारने मेल्याना धडा शिकवला
2012 मध्ये नरेंद्र मोदी काँगेसला प्रश्न विचारत होते, आतंकवादी आले कसे
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध बंदची घोषणा केली
वर्धा -
- वर्धेच्या सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाची आत्महत्या
- शिक्षकाने गळफास लाऊन केली आत्महत्या
- शाळेच्या परिसरात असलेल्या क्वाटर मध्ये केली आत्महत्या
नाशिक -
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा पहिलाच नाशिक दौरा
- नाशिकमध्ये शशिकांत शिंदे यांचं पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
- नाशिकच्या मुंबई नाक्यावर शशिकांत शिंदे यांचं जल्लोषात स्वागत
- शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला सुरुवात
महादेवी उर्फ माधुरी हत्ती वनताराकडे सुपुर्द करण्यात यावा असे HPC (हाय पॅावर कमिटीने )आदेश दिल्यामुळेच माधुरी हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आली आहे. राज्य सरकार व वनतारा यांनी माधुरी हत्ती परत पाठविण्याबाबत सकारात्मक भुमिका घेतल्याबद्दल स्वागत. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत वेळकाढूपणा करून जनसामान्यांच्या भावना दुखावून तीव्रता वाढत आहेत असे राजू शेट्टी म्हणालेत. मुळातच माधुरी हत्ती ही तंदुरूस्त असल्यामुळेच सलग ४८ प्रवास करून जामनगर वनतारा येथे पोहचली आहे. यामुळे तिच्यावर फार काही उपचार करणे गरजचे आहे असे वाटत नाही. तरीसुध्दा ती अधिक सदृढ व्हावे असे वनताराच्या तज्ञाना वाटत असेल तर त्यांनी माधुरीला नांदणी मध्ये आणून आमच्या डोळ्यांसमोर उपचार करावेत. आम्ही त्यांना पुर्ण सहकार्य करू. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेगवेगळे विकल्प तयार होवून पुन्हा वेगळे वळण लागते. ज्यापध्दतीने बेकायदेशीर पणे अहवाल तयार करून माधुरी हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आली. त्यापध्दतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मा. महामहिम राष्ट्रपती यांना विनंती करून लाखो लोकांच्या अस्मिता असलेल्या माधुरी हत्तीस तातडीने नांदणी मठाच्या स्वाधीन करण्यात यावे. वनताराने माधुरी हत्तीवर जे उपचार करायचे आहेत ते नांदणी येथे येवून करावे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत माधुरीला परत आणण्याचा हा लढा असाच सुरू राहील. असेही राजू शेट्टी म्हणालेत.
- निफाड येथील कांदा उत्पादक शेतकरी गोपाळराव संपत गाजरे यांनी पाच लाख रुपये खर्च करत नऊ बिगे म्हणजे साडेचार एकर शेतामध्ये उन्हाळ कांद्याचे पीक घेतले पीकही जोरदार आले मात्र कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतामध्ये चाळ बांधत त्यामध्ये 700 क्विंटल कांदा साठवला होता मात्र रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींने कांद्याची साठवलेली चाळच जाळून टाकल्याने हातातोंडाशी आलेला घास फिरवल्यामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न तसेच घेतलेले सोसायटीचे 12 लाख रुपयांचे कर्ज फेडावे कसे मोठा प्रश्न उभा राहिला आहे या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेत संबंधितावर कठोर कारवाई करावी तसेच शासनाने कर्ज माफ करावे किंवा भरघोस मदत करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे
हिंगोलीत ध्वज लावण्यावरून दोन गट आमने सामने आले आहेत,हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बेरोळा गावात ही घटना घडली आहे, या गावातील दोन समाजातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर अनाधिकृत रित्या ध्वज लावून रस्त्याचे विद्रुपीकरण केले होते दरम्यान प्रशासनाने पोलिसांना सूचना देत दोन्ही ध्वज काढण्याचे आदेश दिले त्यानंतर या ठिकाणी चांगलाच राडा झाला या प्रकरणी औंढा पोलिसांनी ध्वज लावणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पॉलिटिलायझेशन इन जुडीसीरी अँड क्रिमिनलजेशन ऑफ पॉलिटिक्स हे आता महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या लोकशाहीच डिफिनेशन झाले आहे. राजकारण काय तर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, आणि जुडीसिरी काय तर पॉलिटीलायझेशन ऑफ जुडीसीरी इतकं बेधडक इतकं खोटं हे लोक कसे काय करू शकतो याचा आम्हाला आश्चर्य आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अलाहाबाद हायकोर्टाने त्यांचा इलेक्शन रद्द केलं होतं, म्हणजे त्यावेळी ज्युडिसरी ही इंडिपेंडेंट होती. आता तर पूर्ण पॉलिटिलायझेशन झालेला आहे कुठल्या गोष्टीला अर्थ उरलेला नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसने त्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
गोळीबारात पोलीस कर्मचारी जखमी...
उमेश सूर्यवंशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव...
जखमी पोलीस कर्मचाऱ्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी केल दाखल...
कृषी बाजार समितीच्या परिसरात निवडणूक यंत्रांच्या निग्राणीसाठी होते नियुक्त...
गोळी का झाडली याचं कारण अद्याप अस्पष्ट...
आझाद नगर पोलीस घटनास्थळी दाखल...
काल सकाळी 11 वाजता या तरुणांनी कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे असून सुखरूप असल्याचे सांगितले होते
मात्र कालपासून चौघाचेही फोन लागत नसल्याची कुटुंबियांची माहिती
विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे सोलापुरातील चौघे उत्तराखंड गेलेले तरुण
सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघाची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय
एका ट्रक ने थेट सिग्नल चा खांब तोडला
ट्रक ने दिलेल्या धडकेत थेट सिग्नलचा खांब कोसळला
सुदैवाने कोणती ही जीवितहानी झाली नाही
ही घटना आज सकाळी ११ वाजता पुण्यातील वडगाव पुलाजवळ घडली
ससून रुग्णालयाचा पीडित मुलींच्या तपासणीचा अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त...
पोलिसांनी पीडित तरुणींना हाणमार केल्याचा आरोप केलाय...
मात्र ससून रुग्णालयाच्या तपासणी अहवाला तरुणींना कोणतीही ताजी दुखापत नसल्याचे समोर आलेय....
पीडित मुलीने ससून रुग्णालयात 2/8/2025 ला 5.40 pm ला तपासणी केलीय..
यामध्ये तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी निरीक्षण नोंदवले आहे...
पुणे शहरातील फुरसुंगी मध्ये एका थार गाडीतून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई करत २६ किलो गांजासह ही थार गाडी जप्त केली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. एका थार गाडीतून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली करत परिसरात सापळा रचला आणि गाडीची तपासणी केली. गाडीच्या आतून तब्बल २६ किलो गांजा सापडला. त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत २२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली.
महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- हृदयविकाराने विद्यार्थिनीचा शाळेत मृत्यू
- नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव
- शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना आली चक्कर
नांदेड येथील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले 11 पर्यटक आले एकत्र
नांदेड मधील सर्व पर्यटक यमुनोत्री येथे सुखरूप
जिल्हा प्रशासन पर्यटकांच्या सातत्याने संपर्कात
सचिन पत्तेवार युवकाने पाठवले यमुनोत्री परिसरातील व्हिडिओ
- खड्ड्यांमुळे नाशिककरांना सहन करावा लागतोय त्रास आणि मनस्ताप
- भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी
- फरांदे नागरिकांसोबत खड्ड्यांसंदर्भात करतायत चर्चा, नागरिकांच्या जाणून घेतायत समस्या
चालता ट्रकला भीषण आग आगीमध्ये ट्रकचं मोठं नुकसान
आग लागल्याचे लक्षात येताच ट्रक चालकांनी ट्रक रस्त्या शेजारी केला उभा त्यामुळे कोणतीही जीवित हानी नाही
* नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील धक्कादायक प्रकार..
* गाडीचा कट लागल्याने भाजपाचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी थेट बंदूक काढल्याचा आरोप
* जीवे मारण्याची देखील दिली धमकी
* पीडित शिक्षक तरुणाने केली नाशिक पोलिस आयुक्तांकडे तक्रार ..
दोन गाड्यांची तोडफोड
पुण्यात मध्यवर्ती भागात भांडणातून दोन गाड्यांची तोडफोड
नारायण पेठेत भर गर्दीच्या ठिकाणी घडली घटना
हत्याराने वार करत एक जण जखमी
विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल
सोलापूर महापालिकेतील हुतात्मा उद्यानात पाणी शिरल्याचे चित्र दिसून येत आहे.
- सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या उद्यानात पाणीच पाणी
- सोलापूर महापालिकेने भुईकोट किल्ल्याच्या खंडगात उभारलेल्या हुतात्मा उद्यानात पाणीच पाणी
- हुतात्मा उद्यानाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले
- विद्यार्थ्यांना पाऊस पडून शाळेला सुट्टी अपेक्षित असते मात्र पावसामुळे मुलांच्या लाडक्या उद्यानालाच आता आठवडाभर सुट्टी पडणार आहे
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व थकव्याचे रुग्ण वाढले आहेत.
औषध घेतल्यावरही ताप न उतरल्याने नागरिक त्रस्त आहेत. विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे.
बदलत्या हवामानामुळे इन्फ्लुएंझा, आरएसव्ही, स्वाईन फ्लू यांसारख्या व्हायरसचा प्रभाव वाढला आहे.
बालरोगतज्ज्ञ व डॉक्टरांच्या मते, सध्या हे आजार एक ते दोन आठवड्यांपर्यंत टिकतात.
रुग्णांची संख्या ३०% वाढली असून, पूर्वीपेक्षा आजार उशिरा बरे होत आहेत. मात्र, गंभीर स्थिती नसल्याने रुग्णांना भरती करण्याची गरज भासत नाही.
- ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही एकंच कविता दोन्ही वर्गात असल्याने पालकांना संभ्रम
- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ?
- मुलांचा अभ्यासक्रमात चुका कायम असल्यानं सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय
- पहिल्या वर्गात पान क्रमांक २८ तर दुसरीका पान नंबर १६ वर तिच कवीता
- केवळ चित्र बदलण्यात आले, पण दोन्ही वर्गात एकंच कविता....
- त्यामुळे कॉपी पेस्ट करण्याचं प्रकार आहे की चूक आहे हे कळायला मार्ग नाही....
- लहान मुलांच्या बाबतीत हा हलगर्जीपणा पण तर नाही ना?
नागपूर वरून पुण्याला जात असताना घडला अपघात,होडाईची वरना याच्या चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने दत्तरापूर येथील घराच्या पोर्च मध्ये कार शिरली
या घटनेत वाहनातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना यवतमाळ इंथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घरातील सगळे जण रूम मध्ये असल्याने जिवितहानी झाली नाही,हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील दतरामपूर या गावाजवळ अद्यापही रस्त्याचा काम अपूर्णच असल्याने इथे वारंवार अपघात होताहेत
रात्रभर सुरु असणाऱ्या पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी गावातील ग्रामस्थांच्या घरात शिरले पाणी
मनगुळी गावात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण गावाला प्राप्त झाले तळ्याचे स्वरूप
मनगुळीच्या ग्रामस्थांना रात्र काढावी लागली पावसात तर,पावसाच्या माऱ्यामुळे मनगुळीच्या ग्रामस्थांच जनजीवन झाले विस्कळीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रात्री पासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असून आज सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागात सकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर काही भागात पावसाची रीपरीप सुरू आहे. मागील पाच ते सहा दिवस पावसाने पुर्णता विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला आहे.
अजित दादा हे शब्दाचे पक्के आहेत. दिलेला शब्द अजितदादा पाळतात.माझी सिनॅरिटी काउंट करून मला मंत्रिपद देण्याचा शब्द अजितदादा यांनी दिल्याचे विधान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे.नांदेडच्या कंधार तालुक्यातील चिखली येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रताप पाटील चिखलीकर बोलत होते. 2004 मध्ये मी शिलाई मशीन या निशाणीवर निवडणूक जिंकली.त्यावेळेस मला तुझी पहिली वेळ आहे. तू थांब. शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणाले तुझी पहिली वेळ आहे तू थांब. भाजपमधून निवडून आलो भाजपवाले म्हणाले तुझी पहिली वेळ आहे तू थांब.आता राष्ट्रवादी मधून निवडून आलो. परंतु आता दादाने मला शब्द दिला आहे माझी 2004 पासूनची सिनॅरिटी काउंट करून मला मंत्रिपद देण्याचं आश्वासन अजितदादांनी दिलं असल्याचं विधान राष्ट्रवादीचे कंधार लोहा विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केल आहे.
पुणे-नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
-येत्या महिनाभरात ही रेल्वे गाडी सुरू करण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या बोर्डाकडून करण्यास सुरुवात झाली आहे.
-या रेल्वे गाडीमुळे पुणे-नागपूर प्रवास सुमारे दीड ते दोन तासांनी कमी होणार आहे.
-पुणे -नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, ही मागणी दोन वर्षांपासून करण्यात येत होती
-नाशिकच्या कळवण पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे विहिरीत पडलेल्या सप्तश्रृंग गड येथील रामदास सुर्यवंशी या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले.कळवण मधिल दादा धुमसे यांच्या विहिरीत पडल्याची माहिती पोलिसांना कळविण्यात येताच पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने रामदास सुर्यवंशी याला सुखरुप बाहेर काढले,त्याच्या हाता तोंडाला जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गौरी गणपती सणाच्या तोंडावर बेदाण्याचे दर प्रती किलो 20 ते 25 रुपयांनी घसरले आहेत. महिना भरानंतरही दराची घसरण सुरूच आहे. दर कमी झाल्याने बेदाणा उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान चीन मधून नेपाळमार्गे चोरट्या मार्गाने येणार्या बेदाण्यावर बंदी घालावी, अशी मागणी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापार्यांनी केली आहे.
यावर्षी सोलापूर,सांगली, सातारा यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर बेदाण्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. मागील वर्षभरापासून बाजारात बेदाण्याचे दर टिकून होते. बेदाण्याला उच्चांकी 450 ते 550 रुपये प्रती किलो दर मिळाला होता. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतर्यांना चांगले दिवस आले होते.
नाशिक जिल्हयाच्या मनमाड-मालेगावसह काही भागात गेल्या तीन आठवड्या पासून पावसाने हुलकावणी दिल्याने दिवसभर कडक ऊन पडत आहे.सकाळ पासूनच हळू हळू ऊन्हाचा पारा वाढत असल्याने नागरीकांना उन्हाचे चटके बसू लागले आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसात रोज अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.मात्र आता पावसाळ्यात ऊन्हा पारा वाढत असल्याच चित्र पहावयास मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील असलेली लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट ग्राउंड फ्लोअरला येऊन आदळली होती. ही घटना दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये घडली होती. यामध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्याला किरकोळ इजा झाली होती. मात्र सुदैवाने इतर कोणालाही इजा झाली नाही. यानंतर बीडच्या विद्युत विभागाने डॉक्टर अरुण बडे यांच्या शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटलला पत्र दिले असुन यामध्ये आपल्या हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या लिफ्टला परवानगी नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर लिफ्ट तात्काळ बंद करावी आणि विद्युत विभागाकडून लिफ्टची परवानगी मिळवावी तसे न केल्यास आणि लिफ्ट चालू ठेवल्यास जीवित किंवा वित्त हानी झाल्यास हॉस्पिटलची जबाबदारी असेल असा उल्लेख करण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड मुक्कामी असून बीडमध्ये ते तीन वाजता दाखल होत आहेत अजित पवार दोन दिवसाच्या बीड मुक्कामी येत असून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे वडवणी मध्ये मुंडे पिता मित्रांचा पक्षप्रवेश त्याचबरोबर शासकीय कामा बाबतचा आढावा ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहेत. त्याचबरोबर पक्षातील पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत.
धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून फेटा बांधण्यास नकार
29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार
मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिवमध्ये गाठीभेटी दौरा , मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय सहभाग घेणार असल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं
महाविकास आघाडी आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असेल आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं
पुणे मार्केट यार्ड, सेल पिंपळगाव, आणि आंबी मावळ येथील विविध हातभट्ट्यावर छापे मारत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 19 लाख 71 हजार 200 रुपयांची माल हस्तगत केली आहे. एकूण पाच गुन्ह्यांमध्ये चार आरोपीसह 3220 लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण 19 लाख 71 हजार दोनशे रुपये किमतीचा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवा राठोड, सोमनाथ थोटे, विष्णू उदावंत, आणि सुशील सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन विभागाच्या वतीने तीन तुकड्या करून छापे मारून हा सर्व हातभट्टीचा माल जप्त करण्यात आलेला आहे..
नवेल महानगरपालिका निवडणूक दृष्टीने भाजपने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खिडूकपाडा गावातील ग्रामस्थांनी तसेच शेतकरी कामगार पक्षातील काही नेत्यांनी भाजप मध्ये माथाडी कामगार आणि खिडूकपाडा गावातील नागरिकांनी भाजपमध्ये प्रक्ष प्रवेश केला.यावेळी माजी खासदार राम ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नागराध्यक्ष जे.एम.म्हात्रे., माजी नगरसेवक ग्रामस्थ उपस्थित होते....
तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या रासायनिक कंपन्यांकडून एमपीसीबीच्या नियमांचे उल्लंघन होत असून, शुद्धीकरण न केलेले घातक रसायन थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे भूजलस्रोत व शेती गंभीरपणे दूषित झाली असून, नागरिकांना अतिसार, उलट्या-जुलाब अशा आजारांचा त्रास सहन करावा लागत आहे.
गोटगाव व तळोजा वसाहतीतील नागरिकांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार केली आहे. रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे खारघर व तळोजा परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. सीईटीपी बंद असून औद्योगिक कचरा सिडको डम्पिंग यार्डमध्ये प्रक्रिया न करता साठवला जात असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
वारंवार निवेदने दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि पनवेल महापालिकेला दोषी कंपन्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यंदाच्या जुलैमध्ये पावसाने शहराकडे पाठ फिरवण्याचे स्पष्ट झाले आहे.
जुलैमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला असून
यावर्षीचा पाऊस गेल्या चार वर्षातील नीचांक ठरला आहे.
येत्या काही दिवसात पाऊस अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.
जुलैमध्ये पुण्यात सरासरी 185 मिलिमीटर पाऊस पडतो
मात्र यंदा 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दोन ऑगस्ट पासून पुण्यात पावसाने उघडीत घेतली आहे.
मानाच्या पाच मंडळ आणि इतर महत्त्वाच्या पाच मंडळांना प्रशासनाकडून वेगळा न्याय दिला जातो
इतर गणेश मंडळाच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना
मानाच्या गणपती नंतर विसर्जन मिरवणूक सुरू करण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडळी गणेश मंडळ ठाम.
दगडूशेठ गणपती मंडळ आणि आमच्यात कुठलाही वाद नाही मानाच्या गणपतीची मिरवणूक दोन वाजता पुढे जाते दगडूशेठ चार वाजता येतो त्यामुळे आम्ही मधल्या काळात मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची भूमिका
पोलीस आयुक्त कडून मानाच्या पाच आणि इतर महत्त्वाच्या पाच गणेश मंडळांना सूचना
तुम्ही महत्त्वाची शहरातील गणेश मंडळ असल्याने इतर गणेश मंडळाच्या समस्या जाणून घेऊन समन्वयाने तोडगा काढा
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला हक्काचे कार्यालय मिळाले आहे.
वाकडेवाडी येथे पक्षाचे शहर कार्यालयाचे साठी जागा निश्चित केली आहे
अजित पवार यांच्या हस्ते १५ ऑगस्टला कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.