Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर मुंबईतील काशीमीरा पोलिसांची धाड

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२५, गणेशोत्सवाचा, ओबीसी आरक्षण वाद, मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण जीआर, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर मुंबईतील काशीमीरा पोलिसांची धाड

हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट...

आज सकाळपासूनच नंदुरबार शहरासह परिसरात मुसळधार पाऊस....

नंदुरबार शहरातील अनेक सकल भागात सातला पावसाचे पाणी....

नंदुरबार शहरातील परशुराम चौकात गुडघाभर पाणी, अनेक दुकानांमध्ये शिरला पावसाचे पाणी....

पुढील 24 तासात अति मुसळधार पावसाची शक्यता...

श्रीगणरायला निरोप देण्यासाठी विविध सोयी-सुविधांसह बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज

अनंत चतुर्दशीला बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत गणरायाचे विसर्जन केले जाते. मुंबईत बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले आहे. तर, मुंबईतील चौपाट्यांवरही विसर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुण्यातील मानाचे आणि इतर गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लांब रांगा

लाल महाल पासून दगडूशेठ मंदिरापर्यंत लांब रांगा

Kalyan : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 264 हरकती,11 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या चार सदस्यीय १२२ सदस्य निवडीसाठी ३२ पॅनल च्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण २६४ हरकती दाखल झाल्या आहेत. त्या हरकतींवर सुनावणी ११ सप्टेंबर ला होणार आहे.सबधीत हरकत घेतलेल्या नागरिकांनी ११ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आवाहन या वेळी पालिकेकडून करण्यात आले आहे. ३ ते ६ आक्टोंबर पर्यंत अंतिम प्रभाग जाहीर होणार असल्याची माहिती रमेश मिसाळ निवडणूक अधिकारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांनी दिली आहे.

Nashik : मालेगाव संगमेश्वर येथे शैक्षणिक साहित्यातून साकारली 18 फुटी गणरायाची मूर्ती...

नाशिकच्या मालेगाव येथील संगमेश्वर डांगचे चाळ येथील श्रीकृष्ण गणेश मंडळ दरवर्षी विविध कलाकृतीतून गणरायाची मूर्ती साकारत असते. यावर्षी देखील या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहित्य म्हणजे पुस्तक, पाटी, पेन, पेन्सिल आदी साहित्यातून 18 फुटी गणरायाची मूर्ती साकारली असून यात रोज नवनवीन विद्यार्थ्यांना या बाप्पाची आरती करण्याचा मान मिळत असतो. ही मूर्ती सध्या शहारत गणेश भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे

Pune : पुण्यातील ढोल ताशा पथकाचे थायलंड मध्ये वादन

पुण्यातील ढोल ताशा पथकाची ख्याती विविध देशात पोहचली आहे. याची आणखी एक प्रचिती आता समोर आली आहे. थायलंड बँकॉक येथील विश्व हिंदू परिषद आयोजित गणेशोत्सवाच्या निमित्ताने नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट ने वादन करत त्यांची कला सादर केली. दिमाखदार मिरवणुकीबरोबर ढोल ताशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गणपती बाप्पा समुद्रात विसर्जन करताना तराफ्यावरती वादन करण्यात आले.

गणेशोत्सवाचे हे अठरावे वर्ष असून मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला...

NANDED : तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न.

तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न.

पोलिस आणि नागरिकांनी वेळीच शेतकऱ्याला रोखल्याने अनर्थ टळला.

Pune : पुण्यातील पहिलं मंडळ ज्याने सोलार द्वारे वीज निर्मिती करत संपूर्ण मंडप उजाळल....

सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून पुणे शहराचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात.पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध विषयांवर देखावे करण्यात आले असून हे देखावे पाहण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहे.अश्यातच पुण्यातील भवानी पेठ येथील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट असा पहिला मंडळ आहे ज्या मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात सोलार पॅनल तयार करत संपूर्ण मंडळ दिव्यांनी उजाळल असून मंडळाकडून खडकवासला धरणातील कॅनल चा देखावा करत यावर सोलार लावण्यात आलं आहे.

Kolhapur : कोल्हापूर परिक्षेत्रात गणेश विसर्जन मिरवणुकीला तगडा बंदोबस्त

कोल्हापूर परिक्षेत्रात गणेश विसर्जन मिरवणुकीला तगडा बंदोबस्त

८ हजार पोलीस ५ हजार होमगार्ड आणि srpf च्या ५ तुकड्या असणार तैनात

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा आय जी सुनील फुलारी यांचा इशारा

गणेश आगमन मिरवणुकीत आवाजाचे उल्लंघन करणाऱ्या ८०० मंडळावर कारवाई

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४० आरोपींवर लावला मोका

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आक्रमक

Pune : पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाकडून विविध संत महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन

पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाकडून यंदा विविध संत महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन गणेश भक्तांना घडवून दिलं आहे. यामध्ये नऊ ते दहा संत महापुरुषांच्या पादुकांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांच्या गणेश भक्तांना दर्शन करता येतंय. याशिवाय शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी शंकर महाराज, संत बाळूमामा नित्यानंद स्वामी, श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज नेम करोली बाबा, दगडूशेठ दत्त मंदिरातील पादुका आदींचा समावेश आहे. उत्सव काळात भजन, कीर्तनाच्या पार्श्वभूमीवर पादुकांची मिरवणूक काढली गेली. छत्रपती राजाराम महाराज मंडळाची स्थापना १८९२ मध्ये झाली आहे. २४ तास श्रीं चे दर्शन घेत उत्सवाचा आनंद भक्तांना घेता आला. देशातील धार्मिक देवस्थानांचे देखावे उभारण्याची मंडळाची परंपरा आहे. विशेष म्हणजे मंडळ वर्गणी जमा करत नाही. तसेच संपूर्ण देखावा हा फळ्यांवर उभा केला जातो.

Pune :  पुण्यात साकारला गेला संगमनेरच्या "अन्सार चाचा" च्या वडापावचा देखावा

सामाजिक सांगोपांगतेचा आदर्श ठेवत पुण्यातील अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने संगमनेरच्या "अन्सार चाचा" च्या वडापावचा जिवंत देखावा सादर केला आहे. मागील 20 वर्षापासून दरवर्षी मंडळ सामाजिक विषयावर भाषा करणारे देखावे सादर करतात. अध्यक्ष नरेश राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाने या देखाव्याला “मी आता प्रसाद रुपी समतेचा वडापाव” नाव दिलं आहे. प्रत्येक जिवंत देखाव्यानंतर भाविकांना जात-धर्मादरहित प्रसाद म्हणून "वडापाव" वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमात संगमनेर येथील प्रसिद्ध वडापाव विक्रेते,अन्सार चाचा इनामदार, यांनी आपल्या आवाजात जात-धर्म न पाहता सर्वांमध्ये समानतेचा संदेश दिला आहे हे या देखाव्यातून सादर केलं आहे.

Eknath Shinde : जीएसटीचा निर्णय धाडसी आणि ऐतिहासिक आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र सरकारने जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही गोष्टींवर कर कमी झाला आहे तर काही गोष्टी महागल्या आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "जीएसटीचा निर्णय धाडसी आणि ऐतिहासीक आहे. यामुळे सर्व सामान्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. तसेच विरोधकांना देखील याचा फायदा होईल पण त्यांना ही चपराक देखील आहे."

Mumbai News : मुंबई हायकोर्ट परिसरात वाहनातून सीएनजीची गळती

मुंबई हायकोर्ट परिसरात वाहनातून सीएनजीची गळती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

Nashik News : नाशिकच्या मालेगावात भीषण आग; तीन घरे जळून खाक

नाशिकच्या मालेगाव शहरातील हिरापूर वार्ड भागात आग लागून तीन घरे आगीत भस्मात झाल्याने यात घरातील सर्व सामान जळून खाक झाली. आग लागल्याचे समजतात मालेगाव महापालिकेच्या पाच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Beed News : मनोज जरांगेंचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले

आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केलं आणि त्यांच्या उपोषणा संदर्भाचे बॅनर बीडच्या परळी हायवेवरील पोखरी फाटा येथे लावण्यात आले होते. मात्र ते बॅनर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले आहे. असा आरोप मराठा समाज बांधवांनी केला आहे.

Buldhana News : कंत्राटी आरोग्य कर्मचारी पंधरा दिवसापासून बेमुदत संपावर

बुलढाण्यात शासकीय आरोग्य सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अधिकारी गेल्या पंधरा दिवसापासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. मात्र अजूनही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने आज बुलढाण्यात थाळी नाद करत या कर्मचाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरोदर महिला, लहान बालकांची गैरसोय झाली.

Raigad Traffic : सलग दुसऱ्या दिवशी गणेशभक्तांचे हाल; मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

लाडक्या गणरायाला निरोप देऊन कोकणवासीय मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. चौपदरीकरणाचे काम बहुतेक ठिकाणी पूर्ण झाले असले तरी इंदापुर, माणगाव आणि लोणेरे परिसरात रस्ते अद्यापही अरुंद आहे. दरम्यान या वाहतूक कोंडीमुळे सलग दुसऱ्यादिवशी गणेशभक्तांना बहतूककोंडीला सामोरे जावं लागत आहे.

अंबादास दानवेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येऊन भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. कालपासून गॅलेक्सी हॉस्पिटलला विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटी सुरू झाल्यात.

लक्ष्मण हाके यांनी दोन समुहात भांडण लावण्याचे काम करू नये- शहाजी बापू पाटील

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली आहे. लक्ष्मण हाके यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समुहात भांडण लावण्याचे काम करू नये. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ते शरद पवारांच्या विरोधात बोलत आहेत असा आरोपही केला.

छगन भुजबळ नाराज नाहीत, त्यांच्या मनातील शंका दूर करू - मुख्यमंत्री फडणवीस

छगन भुजबळ नाराज नाहीत.

भुजबळांच्या मनातील शंका दूर करू.

अनेक ओबीसी संघटनांकडून जीआरचं स्वागत.

ओबीसींवर अन्याय होणार नाही. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

सिंधुदुर्ग ते कोल्हापूरला जोडणाऱ्या तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली

सिंधुदुर्ग ते कोल्हापूरला जोडणाऱ्या तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ११६ जीवरील गगनबावडा घाटात मोठी दरड कोसळली. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई शहर व उपनगरासाठी ईद ए मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल

मुंबई शहर व उपनगरासाठी ईद ए मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल

आता ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर

अनंत चतुर्दशी निमित्ताने मुस्लिम बांधवांनी केली होती मागणी

ईदनिमित्त शुक्रवार ऐवजी सोमवारी कार्यक्रमांचे केले नियोजन

मुंबई वगळता इतर जिल्ह्यांत मात्र ५ सप्टेंबरलाच ईदची सुट्टी कायम

आजच शासन निर्णय जारी होण्याची शक्यता

ओबीसी मराठ्याची आग गावागावात लागली पाहिजे - बच्चू कडू

महाराष्ट्रातला राजकारणामध्ये कुठेतरी एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे,छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला कोर्टात खेचण्याची भाषा बोललेली आहे,या वर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की,गावागावात जाती-जाती, धर्मावर वाद होऊ नये. देवेंद्रजींनी कौशल्य वापरलं पाहिजे. बीजेपीने ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण वापरलं, जे कौशल्य वापरलं, ते या प्रश्नांमध्ये का वापरत नाही? त्यांच्याकडे कमी आहे. केंद्रात तुम्ही आहात, राज्यात तुम्ही आहात. कायमचा वाद मिटवा ना. पण तुम्हाला लढू द्यायचं आहे. ओबीसी मराठ्याची आग गावागावात लागली पाहिजे. हीच तुमची मानसिकता असं वाटतं एकंदरीत, ती मानसिकता सोडून महाराष्ट्र कसा वाचेल? याचा सरकारने विचार करणं महत्वाचं आहे. कोणी कुणाच्या वाट्याचं घेतलं नाही पाहिजे आणि कोणी कुणाच्या वाट्याचं दिलं नाही पाहिजे.

सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी सोडली जनावरे

- सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी सोडली जनावरे

- उत्पादन होण्याची आशा मावळल्याने सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरे

- येलो मोझॅक व चारकोल रॉटच्या प्रादुर्भावाचा सोयाबीनला फटका

- केळझर येथील शेतकऱ्याने सोयाबीनच्या शेतात सोडली जनावरे

- जिल्ह्यातील सोयाबीनवर विविध भागात येलो मोजक चारकोल रॉट व हुमणी ओळीचा प्रादुर्भाव

- सोयाबीनचे पीक शेंगा येण्याच्या अवस्थेत पिवळे पडत असल्याने शेतकरी संकटात

- कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना गरज

- नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

- तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी

- अद्याप कृषी विभागाकडून सोयाबीन वर आलेल्या रोगावर कोणतेही मार्गदर्शन नाहीय

- कृषी विभागाने शेतकऱ्यांना तात्काळ मार्गदर्शन करण्याची मागणी

माणगावमध्ये सशस्त्र दरोडा, महिलेची हत्या

माणगावच्या भादाव येथे 20 ग्राम सोन्याच्या दागिन्या करीता एका वृध्द महिलेची हत्या करण्यात आली आहे. कुंभे धरण प्रकल्पच्या पुर्नवसन वसाहतीतील हि घटना असून सदर मयत महिला घरात एकटी राहत होती. शांताबाई कांबळे वय वर्ष 76 असे मयत वृध्देचे नाव आहे. अज्ञात चोरट्यांनी वृध्देच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तीची हत्या केली. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Washim: मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

वाशिम -

मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

जीआर रद्द करण्याची मागणी.

मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात आज ओबीसी समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याच बघायला मिळालं.

वाशिमच्या मालेगाव येथे ओबीसीच्या वतीने दुचाकी रॅलीसह मालेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी घोषणाबाजी करत विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जारी केलेला जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

जीआर रद्द झाला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

Nagpur: ओबीसी जागृत आहे हे तायवाडेसरांनी दाखवून दिले - परिणय फुके

परिणय फुके -

ओबीसी जागृत आहे हे तायवाडे सरांनी दाखवून दिले,

मुख्यमंत्री यांनी दोन्ही समाजाला न्याय दिला

गोव्यात मुख्यमंत्री यांनी सांगितलं सदैव पाठीशी आहे मागण्या पूर्ण करू असे म्हटले होते,

यात 6 दिवसाच्या उपोषणात 12 मागण्या पूर्ण झाल्या आहे,

दोन विषयात मुख्यमंत्री यांच्याशी मंगळवारी चर्चा करण्याचा प्रयत्न करू, सर्वात जास्त ओबीसींसाठी जीआर काढणारे महाराष्ट्र राज्य ठरेल,

मागण्या पूर्ण झाल्या उपोषण सोडावे,

Pune: पुण्यात ओबीसीचे महाघटांनाद आंदोलन, मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी

पुणे -

पुण्यात ओबीसीचे महाघटांनाद आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालया जवळ ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी "महाघंटानाद आंदोलन" करण्यात येणार आहे .

या "महाघंटानाद आंदोलना" नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षण जी आर रद्द झालाच पाहिजे

Chhagan Bhujbal: ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी सुरक्षा वाढवली

- भुजबळांचा नाशिक मधील भुजबळ फार्मवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात

- मराठा आरक्षणाच्या जीआरला भुजबळांनी विरोध केल्यानंतर भुजबळांच्या निवासस्थानी पोलिसांच्या सुरक्षेत वाढ

- भुजबळांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट

- मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पोलीस प्रशासनाकडून खबरदारी

Pune: पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाज रचनेवर ७८५ हरकती

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आज एका दिवसात ७८५ हरकती नोंदविल्या गेल्या

गेल्या १० दिवसात केवल ५९५ हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या होत्या. पण एका दिवसात त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त हरकतींचा पाऊस आज पडला आहे.

आज दुपारी तीन वाजेपर्यंत किती हरकत येतात पहावं लागणार

प्रभाग क्रमांक तीन, विमान नगर लोहगाव, प्रभाग क्रमांक 24 कमला नेहरू रास्ता, पेठ, प्रभाग क्रमांक 34 नऱ्हे वडगाव बुद्रुक,

अनेक प्रभागात एकही हरकत नाही..

Manoj Jarange: कुणी कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच- मनोज जरांगे पाटील

मी माझ्या समजााला आरक्षण मिळवून देणारच

आम्ही काहीच टेन्शन घेत नाही

ओबीसीमध्ये मराठ्यांना मीच घालणार आणि आरक्षण मीच देणार

आणि कितीही काय झालं त्याचा आम्हाला फरक पडत नाही- मनोज जरांगे पाटीलOBR

Manoj Jarange: आम्हाला उपसमिती त्यांनाही पाहिजे- मनोज जरांगे पाटील

ओबीसी साठी उपसमिती केली आम्हाला हरकत नाही

आम्हाला उपसमिती त्यांनाही पाहिजे, आम्हाला निधी दिला पाहिजे. पण चांगली गोष्ट आहे गोरगरीबांसाठी चांगले आहे

दलीत मुसलमनांसाठी करा

शेतकऱ्यांसाठी, आदिवासी आणि मायक्रो ओबीसी साठी उपसमित्या करा

होऊ द्या ना गरिबाचे कल्याण होऊ द्या

Nandurbar: नंदुरबारमध्ये आज ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट....

नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात...

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार मध्ये पुन्हा पावसाला सुरुवात.....

Nande: नांदेड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

नांदेड शहर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर प्रारूप प्रभाग रचना बुधवारी जाहीर करण्यात आली. 2017 च्या निवडणुकीप्रमाणे शहरात 20 प्रभाग राहणार असून एकूण सदस्यांची संख्या 81 राहणार आहे. ही प्रारूप प्रभाग रचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून त्यावर नागरिकांनी येत्या 15 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

Amravati: अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी बस स्थानकांसाठी चक्काजाम आंदोलन सुरू

अंजनसिंगी येथे बस्थानाक व्हावे या मागणी साठी हजारो नागरिक जक्का जाम आंदोलनात रस्त्यावर....

आंदोलनावर तोडगा काढन्यासाठी प्रशासनाचे अधिकारी उपस्थिती...

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू काँग्रेस पक्षाचे पंकज वानखडे व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान व सर्व पक्षीय राजकीय नेते कार्यकर्ते नागरिक चक्काजाम आंदोलनात सहभागी

Dharashiv: उमरगा येथे पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरीक त्रस्त

धाराशिव - उमरगा येथे पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरीक त्रस्त

रस्त्याची मोठी दुरावस्था

तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा स्थानिक नागरीकांचा इशारा

Jalna: जालना शहर महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग रचना जाहीर

जालना शहर महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग रचना जाहीर

नगरसेवकाची संख्या आता 65 वर जाणार

15 सप्टेंबर पर्यंत हरकती दाखल करता येणार

16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार सुनावणी.

Yavatmal:  यवतमाळ पोलिसांची 3 हजार 976 जणांवर कारवाई

यवतमाळ पोलिसांची 3 हजार 976 जणांवर कारवाई

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलिस रेकॉर्डवरील 3 हजार 976 जणांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून सर्वांना विविध कलमा अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Washim: वाशिममध्ये प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्याला धबधब्याच स्वरूप

वाशिम -

वाशिममध्ये प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्याला धबधब्याच स्वरूप

वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे अनेक प्रकल्प तुडुंब भरले असून ओव्हरफ्लो होत आहेत.

मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प सुद्धा भरल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने या सांडव्याला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहे.

Satara: कराड तालुक्यातील किरपे-येणके रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू ठार

कराड -

कराड तालुक्यातील किरपे-येणके रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू ठार

मृत पिल्लाची आई पिल्लाच रक्त पितानाचा exclusive व्हिडीओ साम टी. व्ही. कडे

आज पहाटे साडे तीनची घटना

अज्ञात वाहनाचा वनविभागाकडून शोध सुरू

Amravati: संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यात सोयाबीनवर एलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव

अमरावती -

संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यात सोयाबीनवर एलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव

जिल्ह्यात 50 टक्के पेक्षा अधिक सोयाबीन पिकांवर येलो

मोझॅक रोगाचं सावट

सोयाबीन पीक पडले पिवळे; यावर्षी सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाही

सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार.. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Amravati: अमरावती जिल्ह्यात बांधकाम कामगारांना साहित्य वाटपासाठी केवळ एकच केंद्र, कामगारांची मोठी गर्दी

अमरावती -

अमरावती जिल्ह्यात बांधकाम कामगारांना साहित्य वाटपासाठी केवळ एकच केंद्र

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथील केंद्रावर साहित्य घेण्यासाठी बांधकाम कामगारांची मोठी गर्दी उसळली

रात्रीपासून बांधकाम कामगार चिखलात रांगा लावून.. साहित्य घेण्यासाठी तीन किमी पर्यंतची रांग

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बांधकाम कामगार साहित्य घेण्यासाठी दाभा केंद्रावर पोहोचले

Sindhudurg: वैभववाडीतील गगनबावडा घाटात दरड कोसळली

सिंधुदुर्ग -

वैभववाडीतील गगनबावडा घाटात दरड कोसळली

मोठमोठे दगड आणि माती आली रस्त्यावर

दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प.

सकाळी आठ वाजता कोसळली दरड

संध्याकाळी चार वाजेपर्यंत रस्त्यावरील दरड हटवून वाहतूक करणार सुरू

कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्या प्रवाशांची होणार गैरसोय

Pune: गणेश कला क्रीडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

पुणे -

गणेश कला क्रीडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उदघाटन

पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

उपमुख्यमंत्री अजित पवार करणार असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Nagpur: मंत्री अतुल सावे नागपुरात दाखल, ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण स्थळी देणार भेट

- मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्यावर मराठा समाजाचे आंदोलन मागे घेण्यात आले

- मात्र ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण आज सहाव्या दिवशी सुरूच

- मंत्री अतुल सावे नागपुरात दाखल, ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण स्थळी देणार भेट

- सरकारकडून ओबीसीच्या मागण्या संदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही

- ओबीसी महासंघाची भूमिका

Nagpur: राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला आज सहावा दिवस

नागपूर -

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला आज सहावा दिवस

आश्वासन मिळालेल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही यावर ठाम

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायडे यांची स्पष्ट भूमिका...

ओबीसी मंत्री अतुल सावे थोड्याच वेळात ओबीसी आंदोलकांना संविधान चौकात देणार...

आंदोलन सोडवण्यासाठी करणार प्रयत्न...

Ratnagiri: मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजपमधील प्रवेश लांबणीवर

रत्नागिरी- मनसे नेते वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर

आज मुंबईत वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये होणार होता पक्ष प्रवेश

आज होणारा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला

भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती होणार होता पक्ष प्रवेश

पक्ष प्रवेश दोन दिवस लांबणीवर सुत्रांची माहिती

Pune: पीएमसी रोड मित्र' ॲपला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे -

पीएमसी रोड मित्र' ॲपला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

21 दिवसांत 1000 हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी, 976 तक्रारीचे निवारण

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेकडे थेट करता याव्यात, यासाठी 'पीएमसी रोड मित्र' ॲप सुरु करण्यात आले आहे

महापालिकेच्या पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची माहिती

Pune: गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोरमध्ये पोलिसांनी काढला रूटमार्च

पुणे -

गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोरमध्ये पोलिसांनी काढला रूटमार्च

सण - उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, भोरच्या प्रमुख बाजारपेठ परिसरातून आणि संवेदनशील भागातून काढला रूटमार्च

गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक असावा तसेच परिसरात उत्सवाच्या काळात काही अनुचित घटना घडू नये या करिता रूटमार्चचे आयोजन

सोशल मीडियावर कुठल्याही आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नये, जातीय सलोखा राखून गणेशोत्सव आणि ईद शांततेत साजरी करावी भोर पोलिसांचं नागरिकांना आवाहन

Pune: राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या वतीने  आंदोलन

पुणे -

राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या आंदोलन

आरक्षणाच्या कृती समिती आणि समता परिषद यांच्या आज पुण्यात बारा वाजता आंदोलन

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर ओबीसी संघटनांचे आंदोलन

Buldhana: बुलडाण्यात ट्रकची ट्रेलरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू 

बुलडाणा-

ट्रकने ट्रेलरला दिली जोरदार धडक

अपघातात दोन जण ठार

खामगाव येथील घटना

Nashik: नाशिकला २ दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट, गणपती विसर्जनावर पावसाचं सावट

नाशिक -

- नाशिकला पावसाचा २ दिवस ऑरेंज अलर्ट, गणपती विसर्जनावर पावसाचं सावट

- शहरासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवणार

- गंगापूर धरण ९८ टक्के भरलेलं असल्यानं पाऊस वाढल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता

- नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Nashik:  नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेच्या हरकती आणि सूचना मांडण्यासाठी आज शेवटचा दिवस

नाशिक -

- नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेच्या हरकती आणि सूचना मांडण्यासाठी आज शेवटचा दिवस

- प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर मागील तेरा दिवसात प्रशासनाकडे नोंदवण्यात आल्या ७८ हरकती

- प्राप्त हरकतींमध्ये प्रभाग २२ आणि ३१ संदर्भात आत्तापर्यंत सर्वाधिक ३९ तक्रारी दाखल

- प्राप्त तक्रारी आणि हरकतींवर ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान पूर्ण केली जाणार सुनावणी

- त्यानंतर अंतिम प्रभाग रचना शासनाच्या नगरविकास विभागाकडे केली जाणार सादर

- पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT