पहिले मतं खाण्यासाठी हैदराबाद वाले पतंग उडवण्याची सुपारी घेत होते मात्र परभणीत आता आमच्याकडचे दुर्राणी हे इकडे तिकडे गेले आणि आता काँग्रेसमध्ये गेलेत तेच काँग्रेसचे नेते आता सुपारी घेत आहेत त्यामुळे मुस्लिम समुदायांना त्यांच्या पाठीशी राहू नये असे आवाहन करत राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट आहे मात्र वैचारिक युती नाही असे गंभीर विधान राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी परभणीच्या गंगाखेडमध्ये केले आहे.
काही वेळापूर्वी जामिनावर गजा मारणे यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर मारणे गुन्हे उपायुक्त यांच्या भेटीला गेला. कोथरुड परिसरात १९ फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती.
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ दरम्यान शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी केला आहे.
- राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटलांनी दिले होते अजित पवारांना चॅलेंज
- विजयाची पहिली सलामी ही अनगरने दिली.
- तुमच्या मुलाने कोणाला तरी चॅलेंज दिले मला बरे वाटले
थोड्यावेळात मुख्यमंत्री भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत करणार भाषण...
शिक्षणापासून तर हॉस्पिटल पर्यंतच्या सर्व व्यवस्था काँग्रेस पक्षाने उभे केलेले आहेत. मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसच्या काळात झालेली आहे. ज्या रेल्वे स्टेशनवर चाय विकलं ते रेल्वे स्टेशन सुद्धा काँग्रेसच्या काळात बांधला गेला होता यांनी काहीच केलं नाही याचा विचार तुम्हाला दोन तारखेला करायचा आहे अशी प्रतिक्रिया आज गडचिरोली येथील प्रचार सभेत विजय वडेट्टीवार यांनी केली आहे
पुण्यातील कात्रज परिसरात काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करून पसार झालेल्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. या सगळ्या टोळक्याला घेऊन पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी त्यांची परिसरातून धिंड काढली.
- भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री यांची सभा
- हिंगणघाट येथे भाजपची विजय संकल्प सभा
- मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
- सभेला मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती
- देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वाग
पुण्यातील कात्रज परिसरात काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करून पसार झालेल्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली.
या सगळ्या टोळक्याला घेऊन पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी त्यांची परिसरातून धिंड काढली.
नांदेडच्या हिमायतनगर नगर पंचायती साठी निवडणूक होत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात असून सर्वच पक्षाचे नेते प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात घिरट्या घालत आहेत. आज नांदेडच्या हिमायतनगर येथे एकाच व्यासपीठावर भाजपा आणि शिवसेनेची सभा झाली.सुरुवातीला भाजपाची अशोक चाव्हण यांच्या उपस्थितीत याच व्यासपीठावर सभा झाली. नियोजित वेळे पेक्षा भाजपच्या सभेला विलंब झाला.आणि मंत्री गुलाबराव पाटील सभेच्या ठिकाणी पोहचले
वर्सोवा बीच परिसरात फिरायला आलेल्या महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रवी ईश्वर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली. फिर्यादीने खर्चासाठी 30,000 रुपये देण्यास नकार दिल्यावर आरोपी संतप्त झाला होता. अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतूस आणि चॉपर असा शस्त्रसाठा जप्त केला. आरोपीवर शस्त्र कायद्यासह विविध कठोर कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचे पूर्वीचेही गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वर्सोवा पोलिस पथकाने केली.
सुनील तटकरेंवरील आरोपांवरून राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक....
सेनेचे आमदार महेंद्र दळवींना राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांचे प्रतिउत्तर...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महेंद्र दळवींना अटकाव करण्याची राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदेंची मागणी...
- हिंगणघाट येथे भाजपाची विजय संकल्प सभा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार सभा
- काही वेळेत मुख्यमंत्री होणार हिंगणघाट येथे दाखल
- हिंगणघाट येथे भाजपा आणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात आहे चूरशीची लढत
- मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष
बोरीवली पूर्व येथील दुकानाचे शटर तोडून तांब्याचे तीन बंडल चोरून नेणाऱ्या दोन सराईत चोरांना कस्तूरबा पोलिसांनी मीरा रोड परिसरातून अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सनोज हरिजन (27) आणि सोनू दुबे यांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी सनोज हरिजनवर पूर्वीही चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली रिक्शा आणि तांबे वायरचे बंडल जप्त केले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय
मानाजीनगरकडून महामार्ग प्रवेश बंद,जांभूळवाडी परिसरातील दोन रस्ते कायमस्वरूपी बंद
नवले पूल परिसरात नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक विभागाने सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देत महत्त्वपूर्ण बदल लागू केले आहेत.
नऱ्हे गावातील मानाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांना आता थेट मुंबई–बंगळूर महामार्गावर प्रवेश करता येणार नाही.
जीवित हानी झालेल्या घटनेनंतर वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट झाल्या असून भविष्यातील धोका टाळण्यासाठी हा प्रवेशमार्ग कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचे दुभाजक लावून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता या बाजूने येणाऱ्या वाहनांना फक्त सर्व्हिस रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.
नवले पुलाकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या जांभूळवाडी तलावाजवळील हॉटेल व लॉज परिसरातील दोन रस्तेही लोखंडी दुभाजकाद्वारे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत.
या मार्गावरून मोठ्या प्रमाणात उलट दिशेने वाहने येत असल्याने सतत अपघाताचा धोका निर्माण होत होता.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार असून प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावे ; प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे. जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक. सावरकरांच्या जन्मभूमी भगूर मधील सावरकर वाड्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट पुष्पहार अर्पण करत केलं अभिवादन.
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे या करिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलीय.
जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.
मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे.
केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील,
येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेय
वाशिम जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा.
वाशिम शहरात होणार जाहीर सभा..
काही वेळातच मुख्यमंत्री सभास्थळी पोहचणार.
वाशिम नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रचार सभा.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे व इतर नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाच्या प्रचारासाठी सभा...
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवुन, कोट्यावधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गजानन मारणे याला जामीन मंजूर झाला आहे का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. कोथरुड परिसरात १९ फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती.गजानन मारणे आणि टोळीला न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.फिर्यादी देवेंद्र जोग यांनी स्वतः कोर्टात हजर राहून कोणीही चिथावनी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यावेळी दाखल केले होते. तुम्हाला आज विशेष मोका न्यायालयाने मारलेला जामीन मंजूर केलाय एक लाखाच्या जात मुचलक्यावर आज जमीन मंजूर झाला आहे. अशी माहिती एडवोकेट विजय ठोंबरे यांनी दिली.
"मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापुन काढू" हे शब्द कुण्या नक्षलवाद्याचे नाहीत तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी जाहीर व्यासपीठावरून विरोधकांना दिलेली ही धमकी आहे. राजकीय विरोध असावा पण विरोधकांना थेट कापून टाकण्याची ही मानसिकता भाजप नेत्यांमध्ये येते कुठून? पाशवी सत्तेच्या बळावर विरोधकांना मारून टाकण्याची भाषा होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. सदा सर्वकाळ सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना विरोधकांचे एन्काऊंटर करायची परवानगी दिलीय का? मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या आमदारांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांचाही आशिष देशमुखांच्या या भाषेला पाठिंबा आहे, असाच त्याचा अर्थ होईल..!रोहित पवार, राष्ट्रवादी आमदार
कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर
गुंड गजानन मारणे ला पुण्यातील अभियंता याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती
शिव जयंती रोजी मारहाण आणि त्याच्या इतर सदस्यांनी कोथरूड मध्ये एका अभियंता याला मारहाण केली होती
याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गजानन मारणे आणि इतर सदस्यांवर मोक्का लावला होता
रायगडच्या अलिबागमध्ये नगर पालिका निवडणुच्या प्रचार सभेत बोलताता आमदार महेंद्र दळवी यांनी सुनिल तटकरे यांच नाव न घेता टिका केली आहे. रायगडमध्ये महायुती होईल अशी खात्री होतीपण आपल्यातील धृतराष्ट्रांनी मिठाचा खडा टाकला अस बोलताना राष्ट्रवादीच्या बडया नेत्याने महायुती तोडण्यासाठी सुपारी दिली अशी टिका महेंद्र दळवी यांनी केली आहे. दळवी यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता असा उल्लेख केला आणि नाव घेण टाळल. यामुळेच रायगडचं वातावरण बिघडलं, कोण कुणा बरोबर चाललंय हेच समजत नाही. युती आघाडीचा धर्म कुणीच पाळला नाही त्यामुळे आम्हालाही ट्रॅक बदलावा लागला, असं महेंद्र दळवी म्हणाले.
पुण्यात एका पी एम पी बस चालकाने काही नागरिकांवर अरेरावी करत धमकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किरकोळ कारणावरून पी एम पी बस चालक आणि काही स्थानिकांमध्ये वादावादी झाली. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात एका पी एम पी बस आणि दुचाकीस्वार यांच्यात कट मारल्याने वाद सुरू झाले.
यात नागरिकांनी पी एम पी बस चालकावर आरोप करत चुकीच्या पद्धतीने बस चालवणाऱ्या या चालकाला जाब विचारला. काही जणं थेट बस मध्ये शिरले आणि त्यांनी या चालकाला चांगलेच खडसावले. रागाने लाल झालेल्या पी एम पी चालकाने "माझं डोकं गरम करू नका जा तुला कोणाला जायचं ते सांग माझा भाऊ पोलिस खात्यात आहे असा मुजोरपणा दाखवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
संजय राऊत सोमवारी सकाळी प्रसार माध्यमांशी साधणार संवाद
गेले दीड महिने तब्येत ठीक नसल्यामुळे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी साधला होता दुरावा
अखेर सोमवार संजय राऊत बोलणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तोफ धडाडणार
नगर पालिका निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून आता कॉर्नर सभांना सुरुवात झाली आहे. महाडमधील पहिल्याच कॉर्नर सभेत विकास गोगावले यांनी राष्ट्रवादीच्या स्नेहल जगताप यांच्यावर जोरदार टिका केली आहे. विकास गोगावले यांनी मागील नगर पालिका निवडणुकीच्या वेळी जाहिर स्नेहल जगताप यांनी महाडकरांना दिलेल्या अश्वासनांची आठवण करून देत अश्वासन पूर्ण झाली का असा सवाल महाडकरांना केला. यावेळी महाडची सत्ता भरत गोगावले यांच्या हातात द्या महाड शहराचा कायापालट करु असा शब्द विकास गोगावले यांनी या वेळी दिला.
- राज्य निवडणूक आयोगाने वाढवली मुदत
- 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना आता करता येणार प्रचार
- यापूर्वी 30 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस ठरला असता
- मात्र अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचाराचा वेळ मिळाला होता, चिन्ह वाटप सुद्धा उशिरा झाले होते
- त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे,
नगरपालिका व नगरपंचायतीं च्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ दरम्यान न्यायालयीन प्रलंबित अपिलांवर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा थेट परिणाम मंगळवेढा नगरपालिकेवर झाला आहे. न्यायालयात अपील प्रलंबित असल्याने मंगळवेढा नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली असून, केवळ नगरसेवकांच्या निवडणुका पूर्ववत होतील
नामांकन छाननीनंतर घेतलेल्या निर्णयांविरुद्ध उमेदवारांनी दाखल केलेल्या अपिलांमुळे काही जागांवरील प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून ठरली आहे. त्यामुळे त्या विशिष्ट पदांवरील निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत रद्दबातल राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा नगरध्यक्ष पद निवडणूक वर स्थगिती लागू झाली
अंबरनाथच्या भवानी चौकात झालेल्या जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाने भाजपवर प्रखर हल्लाबोल केला.शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योतीताई वाघमारे आणि प्रवक्ते किरण सोनवणे यांनी आपल्या भाषणातून भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली.यावेळी शिंदे गटाचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी देखील आपले सप्तरंग उधळत भाजपच्या नेत्यांची खरपूस खबर घेतली. सभेत या सर्व वक्त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर निशाणा साधत विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले.
मंचर नगरपंचायत काबीज करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालीये, त्यांचा सामना हा शिंदेंच्या शिवसेनेशी आहे. त्यामुळं आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या विरोधात काय भाष्य करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.लाडकी बहिणींसह विकास कामांच्या जोरावर आम्ही पुढे जात असुन उधारीवरच्या विकास कामांच्या आश्वासनांना जनता भुलणार नसुन मला ट्रोल करुन निवडणूका जिंकता येत नाही अशा शब्दात शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना आढळरावपाटीलांनी लक्ष केलय
१२ वाजता वडार वस्ती, चित्रा चौक परिसरात एका कुख्यात गुन्हेगार लाल्या गुंजाळ आणि आकाश गुंजाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात येरवडा भागातील तडीपार आरोपी मयूर गुंजाळ देखील उपस्थित होता. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली रस्त्याच्या मधोमध केक कापला. मोठ्या संख्येने गुंजाळ चे कार्यकर्ते वाढदिवसासाठी उपस्थित होते. मागील आठवड्यात खुनातील गुन्हेगार जावेद शेख यांनीही अशाच पद्धतीने वाढदिवस साजरा केला होता. त्याच्यावर येरवडा पोलिसांनी कारवाई केली होती. गुंजाळ वर कारवाई करणार का प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत
आज सकाळी 6.30 वाजता दीर्घ आजाराने घेतला अखेरचा श्वास वयाच्या 68 वर्षी मिर्झा एक्सप्रेसचा प्रवास झाला थांबला
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन कन्या असा परिवार अंत्यसंस्कार दुपारी दोन नंतर ईदगा कब्रस्तान, अमरावती येथे होणार.
६ हजारांवर काव्यमैफिलींचे सादरीकरण करून महाराष्ट्र जिंकले
५० वर्षे विदर्भ मराठवाड्यातील कवी संमेलनांचे ते केंद्रबिंदू राहीले
२० काव्यसंग्रह मिर्झाजी कहिन हा स्तंभ प्रचंड लोकप्रिय आहे.वऱ्हाडी भाषेला देशभर ओळख देणारे लोककवी म्हणून ख्याती होती.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी येथे आज पहाटे दाट धुक्यामुळे विचित्र अपघात घडला.या अपघातात सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुरुवातीला चार चाकी कारचा व ऑटो चा अपघात झाला त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ऑटोने धडक दिल्याने हा विचित्र अपघात घडला आहे. मात्र जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल. करण्यात आले तेव्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसण्याची माहिती समोर येत आहे.
- ६ महिन्यांपासून कांद्याचे दर कोलमडलेलेच, परकीय चलन ४५०० कोटींवरून ३१०० कोटी रुपयांवर
- केंद्राच्या कांदा निर्यातीच्या धरसोड धोरणाचा कांद्याला मोठा फटका
- आंतरराष्ट्रीय कांदा बाजारात भारतीय कांद्याची पकड सैल
- २०२२ - २३ वर्षात कांदा निर्यातीतून ४५०० कोटींचं परकीय चलन
- तर २०२४-२५ मध्ये कांदा निर्यातीतून मिळालं ३१०० कोटी रुपयांचा परकीय चलन
- देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कधी निर्यात बंदी, तर कधी निर्यात शुल्क लादण्यात येत असल्याने कांदा निर्यातीवर परिणाम
- आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासाहर्ता झाली कमी
-
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा
- वर्धेच्या हिंगणघाट येथे जाहीर सभा
- हिंगणघाट नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री हिंगणघाट येथे
- दुपारी दीड वाजता हिंगणघाटच्या गोकुल धाम मैदानात सभा
- मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
- हिंगणघाट येथे भाजपा आणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणी राष्ट्रवादी अजित पवार गटात तिरंगी लढत
- इगतपुरी, भगूर आणि येवल्यात एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार
- भगूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( AP ) आले आहेत एकत्र
- त्यामुळे भगूरमध्ये एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष
- नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्यात प्रचाराला वेग
- त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भगूर, येवला, सिन्नर, नांदगाव या ठिकाणी चुरशीच्या लढती
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकतींचा पाऊस
सर्वाधिक २ हजार ८८३ हरकती पुण्यातील सिंहगड रोड भागातून
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग न्याय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे
या निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या 35 लाख एक हजार 469 आहे
प्रारूप मतदार यादीवर आता हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर
३ डिसेंबर: प्रारूप मतदार यादींवर हरकती सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख
१० डिसेंबर: हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
१५ डिसेंबर: मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार जाहीर होणार
२२ डिसेंबर: मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
अजित पवार यांच्याकडून महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिनानिमित्त फुले वाड्यात भेट
अजित पवार यांच्याकडून महात्मा ज्योतिराव फुले यांना आदरांजली
अजित पवार यांनी केली महात्मा फुले वाड्याची पाहणी
निवडणुकीच्या प्रचारासाठी शिरूर मध्ये सभा असल्याने अजित पवार यांनी पहाटेच लावली फुले वाड्यात हजेरी
मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा
पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचा निर्णय
येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने काढण्यात येणार मोर्चा
या मागण्यांसाठी असणार संप
राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये
१५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावं
शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी
धाराशिव नगरपरिषदेसाठी भाजप व शिंदेसेनेतील युती अखेरच्या क्षणी जागावाटपावरुन फिसकटली त्यामुळे भाजप व शिंदेसेना या निवडणुकीत स्वतंत्र लढत आहेत माञ शिंदे सेनेकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसल्याने पाठिंबा कोणाला द्यायचा यावर अजुनही निर्णय झालेला नाही.यातच आता अखेरच्या क्षणी पालकमंत्री प्रताप सरनाईक हे प्रचारात उतरत असुन ते कोणती भुमीका मांडतात याकडे भाजप व शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.सरनाईक यांची उमरगा व धाराशिव येथे आज सभा होणार आहे.
पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशातील उमरटी गावात मोठी कारवाई करून पिस्तूल कारखाने उध्वस्त केले होते
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहेआंदेकर टोळीने 15 पिस्तुल आणल्याची माहिती आहे
गेल्या वर्षभरात पुण्यात झालेल्या आयुष कामकर खून गणेश काळे खून वनराज आंदेकर खून शरद मोहोळ खून या सर्व प्रकरणात इथल्या पिस्तुलाचा वापर करण्यात आला आहे
पुणे पोलिसांकडून राज्यात किती पिस्तुले आले हे कुणाकुणाला कुणा मार्फत दिले याचा तपास लावण्यात जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे
आंदेकर टोळीतील गुंडाना पिस्तूल विक्री प्रकरणात आरोपी केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे
येरवडा येथील गोल्फ क्लब उड्डाण पुलावर अपघात झाला. आठ ते दहा गाड्यानी एकमेकांना धडक दिली. या अपघातात गाड्यांचा मोठा नुकसान झालं. काही काळ या उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवण्यात आले. काही लोक किरकोळ जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी अपघातातील गाड्या बाजूला केल्या सगळ्यांना मदत केली.
छत्रपती संभाजीनगर :
शासकीय वसतिगृह सोबत खाजगी वसतिगृह आणि अभ्यासिकेत विद्यार्थ्यांची हेळसांड
अभ्यासिकेच्या पिण्याच्या पाण्यात निघाल्या आळ्या
छत्रपती संभाजी नगरातील समर्थ नगर येथील खाजगी शिकवणी ठिकाणी निघाल्या पाण्यात अळ्या
विद्यार्थ्यांनी पाणी पिल्यामुळे आजारी पडल्याचा केला आरोप
दूषित पाणी मिळाल्यामुळे विद्यार्थी अभ्यासिके बाहेर झाले आक्रमक
संबंधित अभ्यासिकेकडून नवीन पाण्याचे फिल्टर बसवले जाईल असे आश्वासन
बाहेरून टँकर मागावे लागले, त्या टँकर मुळे दूषित पाणी आल्याचा अभ्यासिका चालकांचा दावा
आम्हाला नगरपालिका खुर्च्या तोडण्यासाठी नाही तर परिवर्तन करण्यासाठी हवी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेला टोला लगावलाय. बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरमध्ये आले होते. यावेळेस कुळगांव बदलापूर शहराच्या विकासासाठी पाठवलेला निधी मधल्या मध्ये कुठेही झिरपू नये म्हणून भाजपला साथ द्या आपल्या विकासाची जबाबदारी आमची असेल असं आश्वासन जाहीर सभेत दिलं. त्यांनी यावेळी MMRDAमधील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिका क्षेत्रासाठी गेल्या 10 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच प्रत्येक घरात 24 तास पाणी देण्याचा मानसही बोलून दाखवला.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीस अवघे चार दिवस बाकी असताना प्रचारयुद्ध चांगलेच तापले आहे. सेना आणि भाजप यांच्यातील आरोप–प्रत्यारोपांची मालिका गुरुवारी आणखी तीव्र झाली.
गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांच्या सासऱ्यांनी आणि भाजपाचे राज्य उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी एक वक्तव्य केले.त्यांनी म्हटलं की, “तेजश्री करंजुले उच्चशिक्षित CA आहेत,त्यांची शैक्षणिक पात्रता पाहूनच देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली. सातवी–आठवी शिकलेल्या महिला उमेदवाराकडे जर नगरपालिका दिली तर ती कारभार कसा पाहणार?”
राम खाडे हल्ला प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे, सुरेश धस यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी महबूब शेख यांनी केली आहे, राम खाडे यांच्यावर यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा हल्ले झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिल्यानंतर देखील आष्टी येथील पीआयने राम खाडे यांना सुरक्षेची गरज नसल्याचा रिपोर्ट कोणाच्या आदेशावरून दिला असा देखील प्रश्न महबूब शेख यांनी उपस्थित केला आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची असलेली डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात केली आहे. डहाणू नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी दोनच उमेदवार रिंगणात असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची थेट लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र माच्छी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भरत राजपूत हे मागील काळात देखील नगराध्यक्ष राहिले असून त्यांच्या काळात डहाणूचा विकास खुंटला असून डहाणूत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने डहाणूची जनता आमच्या पाठीशी राहील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माछी यांनी व्यक्त केला आहे. तर मागील काळात आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर डहाणूची जनता आपल्या पाठीशी राहील असा विश्वास भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांच्याकडून व्यक्त करण्यात येतोय. डहाणू नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी ही चुरशीची झाली असून भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने भाजपची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळतंय
निलेश राणे यांनी भाजप उमेदवारातर्फे पैसे वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर मेहबूब शेख यांनी भाजपवर व राणे कुटुंबियांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पार्टी पैशांचा किती माज करते हे राणेंनाच कळलं हे सर्वात मोठं समाधानकारक आहे, भाजपची निवडणूक पैसा आणि सत्तेच्या बळावर असल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे, तर उमेदवारांकडे पैसा द्यायचा आणि तो पैसा वाटायचा आणि हे राणेंच्या घरी कळलं, महाराष्ट्राला हे माहित आहे परंतु राणेंना हे कळलं हे जास्त सोयीची गोष्ट असल्याचं म्हणत महबूब शेख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिल्यामुळे मावळच्या तळेगाव दाभाडे मध्ये आमदार सुनील शेळके यांची प्रचार रॅली. या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सुरेश धोत्रे यासह अनेक नेते उपस्थित होते. या प्रचार रॅली गणपती चौकातून सुरू झाली असून स्टेशन चौक मार्गे राधाकृष्ण मंदिराजवळ संपन्न झाले. तळेगाव दाभाडे मध्ये 27 नगरसेवकांपैकी 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. फक्त नव उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने घड्याळ चिन्हावर आणि अपक्ष अशा नगरसेवकांच्या प्रचारासाठी सायंकाळी ही प्रचार रॅली काढण्यात आली. या रेलला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिसून आलाय. राहिल्या तीन दिवसात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे. दरम्यान जागोजागी महिलांनी औक्षण करून उमेदवारांना आणि आमदार सुनील शेळके यांना शुभेच्छा दिल्या...
भाजपा प्रदेश अध्यक्ष यांनी सध्या महायुतीच्या घटक पक्षांच्या मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या वादा वरून दोन तारखेपर्यंत महायुती टिकवायची आहे असे वक्तव्य केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी भाजपाला या दोन पक्षाच्या कुबड्या नको असल्याचं म्हणत महायुतीतील इतर दोन पक्ष सत्तेला गोचीड प्रमाणे चिकटून असल्याच म्हणत शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे,
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.