विरार इमारत दुर्घटनेत प्रचंड नुकसान झाले. या अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सरकारने मृत कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली.
मंत्री गिरीश महाजन लोकलने विरारच्या दिशेनं रवाना झाले आहे. विरारमध्ये बिल्डींग दुर्घटना झाली. यात काही रहिवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन रवाना झाले आहेत.
गणेश उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी एक दिवसीय आंदोलन करावे- नियमांचे पालन करावं- पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचा जरांगे यांना सल्ला
अँकर - मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरु आहे. देश विदेशातून भाविक येतात त्यांची गैरसोय नको म्हणून मनोज जरांगे यांनी एक दिवसीय आंदोलन करावे असा सल्ला पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी तासगाव येथे बोलताना दिला. गणेश उत्सवात कोणतीही गैरसोय भाविकांची होऊ नये यामुळे त्यांनी एक दिवशी आंदोलन करावं याचबरोबर नियमांचाही पालन करावे असेही शंभुराजे म्हणाले
जुन्नरवरून मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक मुंबईकडे निघाले.
आता माझ्या कॅमेऱ्यांची फ्रेम सुरू होईल. ती जरांगे यांना follow करेल. मी समोर असेल. Live लागले तर फोन करा.
वाशिम जिल्ह्याचा महागणपती म्हणून ओळख असलेल्या मालेगाव येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या शिबिरात 400 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केलं. विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. यात महारोग निदान शिबिर, विविध आजारांबाबत शिबिर तसेच सामाजिक प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन सुधा या ठिकाणी करण्यात आले आहे.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ अमरावतीच्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडले
अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 3 दरवाजे 10 सेंटीमीटर उघडले
सध्या अप्पर वर्धा धरणात 92 टक्के जलसाठा
अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने त्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात
अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा या चार जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे,या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. अंतरवली सराटी येथून मुंबईकडे आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी मुस्लिम बांधव आणि दलित बांधव यांनीही सक्रीय सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ताफा मुंबईकडे प्रस्थान झाला. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून माघार नाही, अशा गगनभेदी घोषणा देत समाज बांधवांनी लढ्याचा निर्धार व्यक्त केला.
नांदेडमध्ये अनेक नदी नाल्यांना पूर.
कंधार,नायगाव,बिलोली, देगलूर, धर्माबाद मध्ये पूर्व परिस्थिती.
अनेक गावांचा संपर्क तुटला.
अनेक गावांना पुराचा वेढा, घरात शिरले पाणी.
नांदेड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत.
मागील दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज भंडाऱ्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार हजेरी लावली. पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही असे भात पीक उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले होते. काही भागात पावसाने अल्प हजेरी लावल्याने भातपीक करपायला लागले होते. तर प्रचंड उखड्याने नागरिकही बेजार झाले होते. गणरायाच्या आगमनानंतर पावसाने लावलेल्या हजेरीन सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
पुणे बेंगलोर हायवे वरील कोल्हापूर ते पुणे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. असे असून देखील टोल नाक्यावर वाहनधारकांकडून टोल वसुली सुरू आहे. जोपर्यंत महामार्गावरील खड्डे दुरुस्त होऊन रस्ता पूर्व होत नाही तोपर्यंत वाहनधारकांनी टोल देऊ नये अशी मागणी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्यातील किनी टोलनाका इथं आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक शिवसैनिक टोलनाक्यावर उतरले आहेत. वाहन चालकांना टोल न भरण्याचा आवाहन करत टोल नाक्यावर वाहन सोडून दिली जात आहेत.
अकोला जिल्ह्यातील बळीराजा संकटात आलाय. अकोट तालुक्यात काही गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालंये. पुंडा, सावरगावं, रोहनखेड, अकोलखेड, अंबोडा या गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे.. या परिसरात शेतकऱ्याचे कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले.. शेतशिवार परिसरात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेलेय.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन उभारण्यात आले आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंढरपूर तालुक्यातून सुमारे 2000 वाहनांतून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. या आंदोलनामध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज पंढरपुरात दिली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा केला निर्धार ही गायकवाड यांनी केला आहे. प्रसाद लाड हा मंत्र्यांना काय काय पुरवतो हे सगळ्या राज्याला माहिती आहे तर नितेश राणे अडीच फुटी नेपाळी आहे. लक्ष्मण हाके हा सरकारचा श्वान आहे.
तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली असून याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना बसलाय नागपूर- हैदराबाद मागावरील पांढरकवडा,पाटणबोरी परिसरात मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहे.
अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचा मरण यातनेचा व्हिडिओ पुन्हा एकदा आलासमोर....
रस्ता नसल्याने तब्बल सात किलोमीटर बांबूचा झोळीतून गर्भवती महिलेचा प्रवास....
अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेहगी, बारीपाडा गावातील दुर्दैवी चित्र....
अनिता वसावे असं तीस वर्षीय गर्भवती महिलेच नाव...
रेंज असल्याने रुग्णवाहिकेला फोन लागेना तर गावाकडे जायला रस्ताच नसल्याने तब्बल सात किलोमीटर ची करावी लागली पायपीट....
बांबूची झोळी करत गर्भवती महिलेला पोहोचवलं मुख्य रस्त्यापर्यंत...
अखेर खाजगी वाहनाने गर्भवती महिलेला पोहोचवलं रुग्णालयात...
महिला आणि नंतर बालकाची प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांनी दिली माहिती....
चिखली, कुदळवाडी, जाधव वाडी आणि मोशी भागातील मुस्लिम समाज बांधव आज हजारोच्या संख्येने जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी जय्यत तयारी केली आहे. चाकण येथे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मुस्लिम समाज बांधव मराठा समाज बांधवांना फळ, बिस्किट, फरसाण आणि पाणी वाटणार आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईतील आझाद मैदानापर्यंत जाऊन आंदोलनात सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी अतिशय रास्त असून सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे
* गणेशोत्सव आणि आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय संत संमेलनाचे आयोजन
* नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा कामांचा घेणार आढावा
* बैठकीला अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेन्द्रनंद सरस्वती उपस्थित
- नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत देखील संत संमेलनाला उपस्थित
* नाशिकरोडच्या बालाजी मंदिरात संमेलनाला सुरुवात
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात शिरलं पाणी
पाण्यात बुडणारी म्हैस ग्रामस्थांनी दिली सोडून
धो धो पावसात माणिकराव ठाकरे व खादर रवींद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा सुरू
- उद्या सकाळी हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार
- तर काही मराठा बांधव आजच मुंबईला रवाना
- नाशिकचा ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचरणी चलो मुंबई आंदोलनाचे स्टिकर ठेवून चलो मुंबईचा नारा
- शेकडो वाहनं, बसेस आणि रेल्वेच्या माध्यमातून मराठा बांधव मुंबईला निघणार
- आंदोलनाला रसद पुरवण्यासाठी अन्न, धान्य आणि आर्थिक मदत देखील जिल्ह्यातील मराठा बांधव करणार
मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन पुकारले असून आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे कूच करू लागले असून मनमाड, येवला, नांदगाव, लासलगाव येथून कार्यकर्ते मुंबई कडे जाण्यास निघाले आहे, जनशताब्दी एक्सप्रेस ने हे कार्यकर्ते जाणार असून मनमाड रेल्वे स्थानकात कार्यकर्ते जमण्यास सुरवात झाली आहे, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे.
नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसानं थैमान घातला आहे.
रात्रीपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना मोठा पूर आलाय.
नायगाव मुखेड धर्माबाद देगलूर बिलोली या तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे.
शेतीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.
पुराचे पाणी नांदेड हैदराबाद महामार्गावर आल्याने या महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे.
भांडे संच वेळेवर मिळत नसल्याने महिला रस्त्यावर...
अक्कलकुवा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचा रास्ता रोको आंदोलन ....
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी लांबच लांब लागल्या वाहनांचा रांगा.....
भांडे संच वेळेवर मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरच ठिया आंदोलन करणार असल्याचा महिलांचा पवित्रा....
घटनास्थळी अक्कलकुवा पोलीस दाखल.....
उपोषण, मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, सभा घेण्यास बंदी, पाच पेक्षा जास्त लोकांना परवानगीशिवाय एकत्र येत येणार नाही
अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आंदोलनाची ही सरकारला धास्ती
गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाचा निर्णय
धार्मिक कार्यक्रमांना सरकारचा आदेश लागू नसणार
- २०१८ मधील आदेशांचे पालन झाले नाही, त्यामुळे दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश
- नाशिक महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारला जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश
- न्यायालयाने नदीतील प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे केले होते नमूद
- पुढील सुनावणीसाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली असून, योग्य पावले न उचलल्यास कठोर कारवाईचा इशारा.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्वधर्म समभावाची जपणूक झाली.
त्याच भावनेतून आजच्या संविधानिक भारतातही सर्व धर्मीयांना समान अधिकार मिळावेत, या उद्देशाने मुस्लिम समाजाकडून सांगली शहरात एक अनोखी परंपरा जपली जात आहे.
सांगलीतील गणेश नगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
ही परंपरा सलग २५ वर्षांपासून सुरु असून, यंदाही उत्साहात मूर्ती स्थापना करण्यात आली.
या मूर्ती आगमनाच्या वेळी सर्वांनी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले.
सिंधुदुर्गात रात्रभर पाऊस, बांदा बाजारपेठत पाणी घुसले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली.
सावंतवाडी, कुडाळ सह कणकवली तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वाचीच तारांबळ उडाली.
लातूर -
लातूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस.
उदगीर तालुक्यातील बोरगाव धडकनाळ गावाला पुन्हा पुराच्या पाण्याचा फटका.
लेंडी नदीच्या उपनदीला पूर आल्याने गावात पाणी.
उदगीर देगलूर रस्ता पाण्याखाली. वाहतूक बंद.
सांगलीच्या पुराचे पाणी मराठवाड्यात आणण्यास हिरवा कंदील
जागतिक सल्लागार समितीकडून सकारात्मक व्यवहार्यता अहवाल
कोल्हापूर सांगलीच्या पुराचे पाणी मराठवाड्यात आणण्याचा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे.
जागतिक सल्लागार समितीकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे.
प्रकल्पासाठीचा व्यवहार्यता अहवाल सकारात्मक आहे.
2 सप्टेंबरला प्रकल्प बाबतची पुढील बैठक होणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा पाण्यासाठीचा बोगदा असणार आहे.
त्याची लांबी जवळपास 93 किलोमीटर आहे.मित्राचे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
भाजपकडून खारघरमध्ये बॅनरबाजी
मनोज जरांगे पाटील यांचा आगमन मुंबईत होणार आहे
त्यादृष्टीने भाजपने खारघर मध्ये बॅनर लावण्यात आलेला आहे
हा बॅनर प्रवीण दरेकर प्रसाद लाड निरंजन डावखरे नरेंद्र पाटील यांनी लावलेला आहे
इतिहास हा कर्तुत्वाला लक्षात ठेवतो इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाहीये
मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडवणीस
अशा प्रकारचा बॅनर मजकूर आपल्याला दिसून येत आहेत
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू
धरणगावला ७६५३ तर करमाडला ७४०० रुपये प्रतिक्विंटल भाव
जळगाव धरणगाव कापूस खरेदीस प्रारंभ झाला.
धरणगावात पहिल्याच दिवशी कापसाला ७६५३ तर करमाड येथे ७४०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
नाशिक -
- ऋषिपंचमीनिमित्त नाशिकच्या गोदा घाटावर भाविकांची गर्दी
- पवित्र गोदावरीत स्नानाचे आज महत्व
- गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढलेली
- पोलीस आणि प्रशासनाकडून भाविकांना पाण्याजवळ न जाण्याचा सूचना
- गंगापूर धरणातून 3025 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
- धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने विसर्ग सुरू
नाशिक -
- नाशिकमध्ये यंदा गणेशोत्सवावर पावसाचे सावट
- उद्या आणि परवा नाशिकमध्ये पावसाचा यलो अलर्ट
- नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 98% टक्के भरले
- जिल्ह्यातील 12 धरणं 100 ओवर फ्लो
- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8 दिवसांपासून पाऊस सुरूच
- गंगापूर धरणातून 3025 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
लातूर -
लातूर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस
घरणी नदीला पूर आल्याने, शिरूर अनंतपाळ ते धामणगाव जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी
अनेक गावांचा संपर्क तुटला.
जुन्नर -
मनोज जरांगे पाटील जाहीर सभा घेतील
जुन्नरमधील मराठा समाज बांधव उपस्थित
जुन्नरमधून जरांगे पाटील मुंबईकडे निघणार
पुणे-
पुण्यात वाहनांसाठी लागणाऱ्या साहित्याला आग
पत्र्याच्या शेड मध्ये ठेवण्यात आलेल्या साहित्याला आग
पुण्यातील खराडी रस्त्यावर महालक्ष्मी लॉन्स समोर एका पत्र्याचे शेडमध्ये आग
पहाटे पाच वाजता या शेडमध्ये असणारे चारचाकी वाहनांसाठी लागणारे साहित्य तसेच यंत्रसामुग्री, प्लास्टिक, कागद, पुठ्ठे या सामानास आग लागली
अग्निशमन दलाच्या तीन वाहंनासह जवानांनी आग आटोक्यात आणत धोका टाळला
घटनेत जखमी कोणी नाही मात्र आग कशी लागली हे समजू शकलेले नाही
रत्नागिरी - आम्ही ओरीजनल अशा आशयाचे मंत्री नितेश राणे यांचे रत्नागिरीत बॅनर्स
शहरातल्या मुख्य ठिकाणी अशा आशयाचे बँनर्स
भगव्या रंगात ओरिजनल हा शब्द, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदार संघात हे बॅनर्स
गेल्या आठवड्यात भगव्या शालीवरून उदय सामंत आणि नितेश राणे यांच्याच शाब्दीत चकमक
मी सुद्धा भगव्या शाली मागवल्या आहेत, काही लोक या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात असं सामंत यांचे विधान
त्यावर आम्ही ओरीजनल असा नितेश राणे यांनी वापरला होता शब्द प्रयोग
त्यानंतर रत्नागिरीत या शब्दाचा आधार घेत लागले नितेश राणे यांचे गणपतीच्या शुभेच्छा देणारे बॅनस्र
जालना -
जालन्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा
मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करणार आहेत
त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहे
लातूर -
रेणा मध्यम प्रकल्पाचे २ दरवाजे उघडले, रेणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
लातूरच्या रेणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढती आहे
तर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा लक्षात घेऊन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू
पुढील काही तास लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला
पिंपरी-चिंचवड -
मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18 मोटरसायकल आणि 2 आटो रिक्षा पोलिसांनी केले जप्त
नाशिक -
- देशासह परदेशात अतिरिक्त कांदा उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा वांदा
-मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने कांद्याला दर नाही
- भारतासह स्पर्धक देश बांगलादेश श्रीलंका, हॉलंड, पाकिस्तानमध्ये कांद्याचे अतिरिक्त उत्पादन
- कांद्याला मागणी कमी झाल्याने राज्यातील कांदा शेतकऱ्यांना फटका
- आगामी काळात दक्षिण भारतात कांद्याला मागणी न वाढल्यास भाव आणखी कोसळण्याची शक्यता
अमरावती -
अमरावती जिल्ह्यात सीसीआयच्या कापूस खरेदीसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी
नोंदणीसाठी प्रथमच "कपास किसान" अँपचा वापर, 30 सप्टेंबर पर्यंत करता येणार शेतकऱ्यांना नोंदणी
शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात दहा केंद्रांची सुरुवात
मागील वर्षी पेक्षा कापसाला सीसीआय मध्ये 589 रुपये ज्यादा दर
नागपूर -
- नागपूर जिल्ह्या परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू
- कॉंग्रेसचे उमेदवारही आपापल्या सर्कलमध्ये सज्ज
- गेली 2 टर्म सत्तेने हुलकावणी दिल्याने यंदा भाजप जिल्हा परिषदेसाठी जोरदार तयारीला लागली आहे...
- भाजपने 57 सर्कल मध्ये उमेदवारीसाठी सर्व्हे केल्याची चर्चा आहे..
- सर्वेच्या आधारे मेरिटवर असलेल्या उमेदवारांना मिळणार तिकीट मिळणार असल्याचं बोललं जातं आहे..
- सर्व्हेमुळे इच्छुकांची धाकधूक वाढली, तेव्ह आरक्षण काही सर्कलमध्ये काय असणार याकडेही लक्ष ठेवून आहे...
अमरावती -
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील 74 गावांमध्ये उभारले जाणार स्वयंचलित हवामान केंद्र
हवामान केंद्रामुळे नैसर्गिक आपत्ती झालेल नुकसान व हवामान विषयक अचूक माहिती मिळणार
केंद्र सरकारच्या विडस या योजनेतून ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार
आपत्ती, भूकंप ,पूर गारपीट, ढगफुटी याची पूर्व माहिती मिळणार.
नागपूर -
- नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांनी फसवणूक
- पेठे यांच्या खात्यातील परस्पर शेअर अन्य खात्यात वळते करून केली फसवणूक
- याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी नंदन ओमप्रकाश गोस्वामीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय
- ठकबाजाचे मध्यप्रदेशच्या थार जिल्ह्यातील सरदारपूर येथील रहिवासी आहे
मनोज जरांगे पाटील जुन्नर शहरात दाखल झालेत
जुन्नरमधील वनविभागाच्या गेस्ट हाऊसला पोहोचले
काही वेळ गेस्ट हाऊसला विश्रांती घेणार
त्यानंतर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन माती कपाळी लावणार
मराठा आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प करणार आहेत.
यानंतर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.