Viral Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाताय? आताच सावध व्हा, फसवणुकीचा धक्कादायक व्हिडिओ समोर

Mumbai-Pune Old Highway Viral Video: मुंबई पुणे जुन्या हायवेवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक बाईकस्वार दुसऱ्या बाईकस्वाराची फसवणूक करताना दिसत आहे.
Viral Video
Viral VideoSaam tv
Published On

मुंबई पुणे हायवेवरुन हजारो वाहने रोज प्रवास करत असतात. मुंबई पुणे जुन्या हायवेवरुन बाईकस्वारदेखील प्रवास करतात. दरम्यान, आता या हायवेवर अनेकांनी फसवणूक झाल्याची घटना आहेत. दरम्यान, आता या फसवणूकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही बाईकस्वार इतर दुचाकीस्वारांकडून पैसे लुबाडण्याचे काम करत आहेत.

Viral Video
Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

मुंबई पुणे हायवेवर पळस्पे फाटा ते चौकदरम्यान काही अज्ञात व्यक्ती असतात. हे व्यक्ती टायर पंक्चर करुन प्रवाशांना लुबाडण्याचे काम करतात. हे चोर मोटारसायकलवरुन येऊन सांगतात की, तुमच्या टायरमधील हवा कमी झाली आहे.यानंतर त्यांना पंक्चरच्या दुकानात घेऊ जातात आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडतात.

सोशल मीडियावर एका प्रवाशाने व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने सांगितलंय की, जेव्हा तुम्ही हायवेवर कमी वेगाने गाडी चालवता तेव्हा मागून बाईकस्वार येतात आणि तुमच्या गाडीतील टायरमधील हवा कमी झाल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच दुसरा बाईकस्वारदेखील तेच सांगतो आणि त्यांना जवळच्या पंक्चरच्या दुकानात घेऊन जाता.

पंक्चरच्या दुकानात गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे दाखवत १०-१५ पंक्चर काढले जातात. यातील पंक्चरसाठी सांगून १००० रुपयांपेक्षा जास्त पैसे उकळळे जातात. अशा पद्धतीने अनेक दुचाकीस्वारांकडून पैसे उकळतात.

Viral Video
Viral Video: एकमेकांची कॉलर पकडली अन् बेंचवर धरून आपटलं, भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची तुफान हाणामारी

@alert_by_ride या इन्स्टाग्राम आयडीवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सदेखील केल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे हायवेवरुन प्रवास करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. त्यांनी पंक्चर आहे सांगितले तर त्यावर विश्वास ठेवू नका, असं सांगितलं आहे.

Viral Video
Operation Sindoor: भारतीय हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं अख्ख कुटुंब खल्लास, Video viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com