Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५, राज्यातील थंडीला ब्रेक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला

२९ नोव्हेंबरला एकनाथ शिंदे चिपळूण दौऱ्यावर

शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेणार रोड शो

एकनाथ शिंदे जिल्ह्यातील इतर ठिकाणी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी सुद्धा घेणार सभा

प्रचाराच्या शेवटच्या टप्याकडे शिवसेनेनी केलं लक्ष्य केंद्रीत

Akola: अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ अजित पवारांची तोफ धडाडणार'

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये येतायेत. अकोटमधील प्रचारसभेत ते अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि एका नगररंचायतीसाठी प्रचार करणारायेत. अकोट, तेल्हारा आणि हिवरखेड नगरपालिकांसाठी राष्ट्रवादी उमेदवारांना या सभेचा मोठा फायदा होण्याच्या उद्देशाने अजित पवार अकोटात योतायेत. अकोटमधील बस स्थानकासमोरील नेहरू मैदानावर सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होणारेय. जिल्ह्यातील पक्षाचे सर्वच उमेदवार या सभेला उपस्थित असणारायेत. अकोटमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजम्मा यांच्या पत्नी गाजीयाबानो बद्रूजम्मा या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेयेत. या सभेला अजित पवार यांच्या समवेत पक्षाचे आमदार आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरीही उपस्थित असणार आहेत. अकोटची सभा आटोपून अजित पवार बुलडाणा जिल्ह्यातील खामगावला पक्षाच्या सभेसाठी जाणारायेत. अकोटमधील सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केलीये.

Amravati: लग्नानंतर अर्ध्या तासातच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; अमरावतीतील घटना

अमरावतीत वरुड तालुक्यातील पुसला मध्ये लग्नसोहळ्यात हृदयद्रावक घटना.लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

अमोल गोड असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव;चक्कर येताच मंडपात खळबळ, पाहुण्यांची झाली धावपळ.

तातडीने रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं

लग्नाचा आनंद क्षणात दुःखदायक शोकांतिका ठरला

वर आणीबवधूच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; वरुड तालुक्यातील पुसला गावात शोककळा पसरली.

कोतवाल म्हणून कार्यरत असलेल्या अमोल गोड यांचा दुर्दैवी अंत.

भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक धक्कादायक विधान केला आहे सिद्धार्थ नगर परिसरात आमदार संतोष बांगर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले होते यावेळी त्यांनी जाहीर सभेत भाजपच्या आमदाराने माझ्या घरात शंभर पोलीस पाठवून तपासणी केली असा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला आहे, मध्यरात्री मुलं बाळ झोपले असताना पोलीस सर्च वॉरंट घेऊन आल्याचे बांगर म्हणाले आहेत, हिंगोली भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हे पोलीस पाठवले असल्याचा थेट आरोप आमदार बांगर यांनी केला आहे माझ्या घरातील फ्रिज कपडे देखील पोलिसांनी उचकाटून पाहिल्याचं बांगर म्हणाले आहेत , विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस 28 तारखेला हिंगोलीत जाहीर सभा घेत आहेत त्या आधीच संतोष बांगरांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

तळेगावात  उमेदवार संतोष दाभाडे यांच्या प्रचाराला आला वेग

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहयाला सुरुवात झाली आहे. तळेगाव मध्ये महायुती च्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी संतोष दाभाडे हे कमळ घेऊन उभे आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपचेच बंडखोर अपक्ष उमेदवार किशोर भेगडे आपलं नशीब आजमावत आहे. दरम्यान तळेगाव दाभाडे मध्ये लोकशाही जिवंत ठेवायची आहे. इथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे ती संपवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभं असल्याचं मत अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऍड. रंजना भोसले यांनी मत व्यक्त केला आहे.

दोघांच्या वादामुळे माझा सॅंडविच नक्कीच होतो, असे रक्षा खडसे

एकीकडे नाथाभाऊ सासरे आहेत, तर दुसरीकडे मंत्री गिरीष काका वडिलांसारखे आहेत, दोघांच्या वादामुळे माझा सॅंडविच नक्कीच होतो, असे रक्षा खडसे यांनी म्हटल आहे.

एकनाथ खडसे व मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्व राज्याला परिचित आहेत...

मुक्ताईनगर भाजपचा एक गट शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मदत करत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर रक्षा खडसे बोलत होत्या.

माझा विषय सोडा भाजपची ताकद होती म्हणून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आले

भाजपच्या मतांवरतीच मुक्ताईनगर मध्ये शिवसेना शिंदे आमदार निवडून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT