जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्कीसह अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस
कर्की येथे साखरपुड्यासाठी आलेली खासगी बस नाल्यावरून पाणी आल्याने अडकली
चालकानं तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला
अनेकांच्या घरात पाणी घुसून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान
काही दुकानांत घुसले पाणी, मोठे नुकसान
पंचनामे करून मदतीची मागणी
लातूर -
कोयता हातात घेऊन दहशत
पोलिसांनी उतरवला माज
दोन आरोपींची पोलिसांकडून धिंड
महाड MIDC तील प्रदुषणाचा फटका पुन्हा एकदा बसला आहे. महाड MIDC तुन वाहणाऱ्या काळ नदीत आज मोठ्या प्रमाणात मासे मेल्याचे दिसून आले. दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा गैर फायदा घेत प्रदुषणकारी कारखान्यांनी कंपनीतील घातक रासायनीक सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे जल प्रदुषण होऊन हे मासे मेल्याचा आरोप होत आहे. नदी पात्रात मेलेले मासे काही ग्रामस्थ पिशवीमध्ये भरून नेत आहेत. प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभियांने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सांगली-मिरज शहरासह परिसरामध्ये दुपारी जोरदार पाऊस पडला आहे.काल सायंकाळ पासून रिमझिम स्वरूपात पाऊस पडायला सुरुवात झाली होती,मात्र आज सकाळपासून पुन्हा उन्हाचा कडाका वाढला होता,पण दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन, सांगली आणि मिरज शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.तर मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून पेरणीच्या कामाला आता वेग येणार आहे.
सोयगावातील जरंडी परिसरात आज दीडतास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने परिसरातील सर्व नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती. जरंडी जवळील ग्रामपंचायतीची घंटा गाडी पुराच्या पाण्यात वाहून जातांना ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी वाचवली तर एका इसमाची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली सुदैवाने ग्रामस्थांनी मोटरसायकलस्वाराचे प्राण वाचविले.
मान्सूनच्या पहिल्या पावसातच रस्त्यावर झाड कोसळून पडली
अमरावती शहरातील एसबीआय बियाणी चौकात रस्त्यावर झाड कोसळून पडल्याने वाहतूक खोळंबली
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने भिवंडी शहर शिधावाटप अधिकारी व तालुका पुरवठा निरीक्षक यांच्या संयुक्त कारवाई मध्ये शहरा लगतच्या खोणी गावच्या हद्दीत केलेल्या कारवाई मध्ये एच पी, भारत गॅस, इंडन या गॅस कंपनीचे ५ किलो वजनाचे घरगुती वापराचे ६९२ भरलेले ८० रिकामे असे ७७२ गॅस सिलेंडर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद,दिग्रस,महागाव आदी परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली असून अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील जांभळा परिसरात जोरदार पाऊस.
या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला.
नांदेड जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण कायम.
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक भागात पाऊस पडला असून नाले दुथडी भरून वाहत आहे जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत होता मात्र दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचा वातावरण
शिरपूर शहरातील काझी नगर परिसरात भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे, चोरी करतानाच्या चोरट्याच्या हालचाली घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
उल्हासनगर महापालिकेकडून शुभम कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला नालेसफाईचं काम देण्यात आलंय. मात्र या ठेकेदाराकडून नाले सफाई करताना लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय.
रायगडमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा अलिबाग तालुक्याला फटका बसलाय. देहेन गावाजवळच्या बंधाऱ्याला भागदाड पडलेय. देहेनगावाचा इतर गावांशी संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे. बंधारा वाहून गेल्याने गावातील नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय झाली.
पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हिंजवडीतील प्रसिद्ध 'मेगापोलिस' सोसायटीमध्ये आज सकाळी अचानक भीषण आग लागली. हिंजवडी फेज ३ मधील मेगापोलिस सोसायटीच्या 'A-४' विंगमधील आठव्या मजल्यावर सकाळी ११ च्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली
अमेरिका-रशिया-चीनच्या बलाढ्य नेत्यांना मोदींनी टाकले मागे
भारताच्या वाढत्या ताकदीवर जगाने उमटवली विश्वासाची मोहोर – एकनाथ शिंदे
लोवी इन्स्टिट्यूटच्या जागतिक सर्वेक्षणात मोदी अव्वल
ट्रम्प, पुतिन आणि जिनपिंग यांच्यापेक्षाही मोदींच्या प्रभावी नेतृत्वाची नोंद
कोल्हापूर जिल्ह्यात अखेर पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील विविध भागांसह शहरातील काही परिसरांमध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा आपली हजेरी लावलीय
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार सरी कोसळताहेत
रत्नागिरी जिल्ह्याला आज आँरेंज अलर्ट तर
28 जून पर्यंत यलो अलर्ट
रत्नागिरी , लांजा , राजापूर आदी भागांत पावसाच्या सरी
पावसामुळे बळीराजा सुखावला
अन्न औषध प्रशासनाचे शिर्डीत पुन्हा धाडसत्र...
निकृष्ट दर्जाचा 500 किलोहून अधिक पेढा केला जप्त...
आज सकाळपासूनच FDA ची शिर्डीत धडक कारवाई...
साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांच्या दुकानातून शेकडो किलो पेढा जप्त...
साम टिव्हीने काही दिवसांपूर्वी केला होता शिर्डीतील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा पर्दाफाश...
पेढा प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी सुरू होता खेळ...
जालना जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21 मिलिमीटर पाऊस,जिल्ह्यातील चार महसूल मंडळात अतिवृष्टी....
जिल्ह्यात वीज पडल्याने चार पशुधन दगावले, अनेक भागात घराची पडझड
जालन्यातील रामनगर महसूल मंडळात सर्वाधिक 109 मिलीमीटर पावसाची नोंद...
हिंगोलीत अर्ध्या तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची अखेर प्रतिक्षा संपली आहे. मागच्या वीस दिवसांपासून पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तसेच उद्यापासून पेरणीची कामे सुरू होणार आहेत.
कल्याणजवळील टिटवाळा परिसरातील दहिवली येथे 70 वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- सिटी लिंक बसचालकावर थेट उगारला कोयता
- हातातील कोयता उगारून बस थांबवण्याचा केला प्रयत्न
- मात्र मद्यपी तरुणाच्या हातातील कोयता बघून बस चालकांना बस न थांबवल्याने बसच्या खिडकीवरील काचेवर तरुणाने मारला कोयता
- त्यानंतर बस स्थानकात जाऊन देखील मद्यपी तरुणाने कोयत्याने वार करण्याचा केला प्रयत्न
- काल संध्याकाळी घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
- मद्यपी तरुणावर कारवाईची मागणी
महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान मार्गावर कोसळल्या मोठमोठ्या दगडी
० पायरी मार्गावरील वाहतूक बंद
० दगड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
० पायरी मार्गाने प्रवास न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
० 26 आणि 27 जून रोजी रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक
० रायगडच्या पायरी मार्गावर दरड मार्गावर आल्याने धोकादायक स्थिती
318 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचे आज पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने प्रस्थान होत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई समाधी स्थळावरून या प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ ,आज! होणार असून मुक्ताई नगरात मोठी जय्यत तयारी या पालखी सोहळ्यानिमित्त करण्यात आली आहे . यावेळी वारकरी यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर फेर धरला
कार्यकारी बरखास्त करणार असल्याची जिल्हाप्रमुखांना कल्पना नव्हती
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांची माहीती
आमदार,खासदार व पदाधिकारी व सामान्य शिवसैनिक यांच्याकडे लक्ष न दिल्याने उबाठा गटात फुट
सामान्य कार्यकर्त्यांना ही एकनाथ शिंदे वेळ देतात आणि बाळासाहेबांची भुमीका पुढे घेवुन जात असल्याने त्यामुळे अनेकजन पक्षात येत आहेत
:उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात आज जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं,जालना शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या प्रवाशांकडून आणि सामान्य नागरिकांकडून जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांनी एक एक रुपयांची भीक मागत हे अनोख आंदोलन करण्यात आलंय.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सोलापूर मनसे कार्यकर्त्यांनी टपालाद्वारे पाठवली मराठी शुद्धीकरण - व्याकरणाची पुस्तकं
जेष्ठ गायिका अशा भोसले यांच्या शोक प्रस्तावादरम्यान विधानसभा अध्यक्षाकडून उच्चरण्यात आलेल्या चुकीच्या मराठी बद्दल मनसेकडून नोंदवण्यात आला निषेध
सोलापूर शहरातील मुख्य टपाल केंद्रवरून राहुल नार्वेकर यांना मराठीतील जेष्ठ लेखक,कवी,साहित्यिक यांची पुस्तके मनसेकडून पाठवण्यात आली.
त्यासोबतच राहुल नार्वेकर यांच्या विरोधात टपाल परिसरात जोरदार घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
- अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
- आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
- मात्र आग कशामुळे लागली, याच कारण अद्याप अस्पष्ट
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता शेतात मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. दमदार पावसानंतर जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने सरी वरंबा पद्धतीवर कपाशी तूर लागवडीला सुरुवात झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील शहापूर येथे एका तरुण शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राकेश पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव असून आई समोरच ही घटना घडल्याने यावेळी ही घटना बघून आई जागीच कोसळली
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची हत्या झाली. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गेले तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. काल विलास घुले यांचा मृतदेह नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला.
रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतल्याची माहिती हाके यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आवळी गावाजवळची घटना
गाडी स्लीप होऊन साईड कठड्याला धडक होऊन झालेल्या अपघातानंतर शॉर्टसर्किटमुळे लागली आग
आगीत गाडीसह साहित्याचे मोठं नुकसान
आंबा महामार्ग पोलिसांनी तात्काळ केली मदत
अग्निशामन दलाच्या गाड्यांनी आगीवर मिळवण्याचं काम सुरू
गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी पुणे पोलिसांनी केली जप्त
पुण्यातील मंतरवाडी भागात असलेल्या गोडाऊन पासून काही अंतरावर उभी केली होती दुचाकी
गोळीबार केलेल्या तरुणांनी दुचाकी चा नंबर, इंजिन आणि चासी नंबर केला नष्ट
पुण्यातील स्टील व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला बिश्नोई गँग कडून धमकी
शेतकऱ्यांचे अनेक दिवसाची प्रतीक्षा संपली...
दमदार पावसामुळे वातावरणात गारवा नागरिकांची उकाड्यापासून सुटका
पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे कृषी विभागाचे आव्हान
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
विष्णू चाटे चा मुक्काम जिल्हा कारागृहात वाढला
मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका आता शासकीय कार्यालयांनाही बसू लागला आहे.
तक्रार नोंदवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत पोलीस ठाणे गाठावे लागत आहे.
र्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत तब्बल ९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा मान्सून वेळेवर न दाखल झाल्याने पर्यटकांनी लोणावळ्याकडे काही प्रमाणात पाठ फिरवली होती, त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे हॉटेल व्यावसायिक, चिक्की व्यापारी आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून येत्या आठवड्यांत पर्यटकांची गर्दी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या अधूनमधून दमदार सरी कोसळत असून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर गेले 15 दिवस पावसाने दडी मारली होती मात्र गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 61 मी.मी पाऊस झाला असून वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 85 मी.मी नोंद झाली आहे.
साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
एका दिवसात 171 मिलिमीटर पाऊस
ओझर्डे धबधबा वाहू लागला
धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई
तुळजापूर तालुक्यातील १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाला तपासणी वेळी आढळून आल्या त्रुटी
तीन केंद्रांचा बियाणे व खते विक्रीचा तर नऊ केंद्रांचा खते व कीटकनाशके विक्रीचे परवाने निलंबित
पहिल्याच पडलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन लोकल मंदावली
तब्बल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने लोकल मुंबईच्या दिशेने धावत आहे
वसई विरार नालासोपारा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमानांची गर्दी झाली आहे
विलास घुले हत्या प्रकरणात पुरवणी जबाब नोंदवला
जबाब नोंदवल्यानंतर आंदोलन घेतले मागे.
मृतदेह ताब्यात घेत अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि गावकरी टाकळी गावाकडे रवाना.
पुणे शहरात रात्रभर रिमझिम पावसाची हजेरी
रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळं शहराच्या तापमानात घट
घाटमाथा व जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज
पुणे शहरासह मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस वातावरण ढगाळ असणार
पुणे जिल्ह्याला ३ दिवस येलो अलर्ट
पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती
ठाणे ते पनवेल लोकल सेवा सुरू
तब्बल १ तासाने पहिलीच गाडी ठाण्याला रवाना झाली आहे
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठे नुकसान
प्रशासनाने पंचनामे करूनही विमा कंपनीच्या हवामान केंद्रात वादळी वाऱ्याची नोंद नसल्याचे कारण देत विमा कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई चे क्लेम नाकारले
शेतकऱ्यांवर असमानी संकटाबरोबरच विमा कंपनीचे सुलतानी संकट आले आहे
शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत
गरीब-मजुरांच्या बँक खात्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर
अमरावती ग्रामीण पोलिसांकडून गोव्यात छापा
१२ आरोपींना अटक
मोबाईल, सिम कार्ड, लॅपटॉप टॅबसह सहा कोटींचा बुद्धिमान जप्त
पहिल्याच पावसाचा फटका हार्बर रेल्वेला बसला आहे. कोपरखैरणे या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात वाशी अणि पनवेल या ठिकाणी जाणार्या प्लॅटफॉर्म वर प्रवाश्यांना गर्दी केली आहे
महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कालपासून पावसाने जोर धरला आहे
पुढील काही तास महत्त्वाचे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.