Marathi Breaking Live Marathi Headlines Updates  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: हिंगोलीतील 40 पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस. राज्यातील राजकीय घडामोडी, आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Bharat Jadhav

कॉकरोच जनता पार्टीच्या घराला पोलीस सुरक्षा 

वरिष्ठांच्या सूचनेनुसार कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांच्या घरासमोर पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिली आहे.

hingoli : हिंगोलीतील 40 पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपला

हिंगोली जिल्ह्यातील 80 पैकी 40 पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपला

आज उद्या पेट्रोलियम कंपन्या हिंगोलीत डिझेल पुरवठा करणार नाहीत

सुट्ट्याच्या दिवस असल्याने डिझेल पुरवठा होणार नसल्याची माहिती

दोन दिवस डिझेल पुरवठा बंद होणार नसल्याने डिझेलचा जिल्ह्यात मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

शेतकरी व वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर शांतता ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

Parbhani: परभणीच्या मानवत येथे डिझेल भरण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी

परभणी -

परभणीच्या मानवत येथे डिझेल भरण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी

परभणीच्या मानवत शहरासह परिसरात सुरू असलेल्या डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

आज मानवत तालुक्यातील रूढी पाटी परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल साठी रांगेत लागलेल्या लाईन वरून वाहनधारकांमध्ये वाद झाला.

हा वाद पुढे वाढत जाऊन दोन गटात जोरदार हाणामारी झाली.

NEET Exam: भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नमंजुषा असलेल्या नोट्स मनिषा हवालदार यांनी जाळून केल्या नष्ट

पुणे -

भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नमंजुषा असलेल्या "नोट्स" हवालदार यांनी जाळून केल्या नष्ट

सी बी आय तपासातून धक्कादायक माहिती समोर

तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा हाती काही लागू नये म्हणून नोट्स टाकल्या जाळून

मनीषा मांढरे सोबत केलेले चॅटिंग सुद्धा हवालदार यांनी केले डिलिट

मनिषा हवालदार आणि मनिषा मांढरे मध्ये व्हॉट्सॲप मेसेज डिलीट

हवालदार ने पतीच्या फोन वरून सुद्धा पाठवल्या मनिषा मांढरे ला प्रश्नमालिका

Beed: बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे 2 गटात राडा

बीड -

बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे दोन गटात राडा

हाणामारीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती

परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

Yevala:  शेतकऱ्यांच्या प्रश्नी रस्त्यावर उतरण्याचा काँग्रेसचा इशारा

येवला येथे काँग्रेसचा शेतकरी मेळावा संपन्न

शेतकऱ्यांच्या प्रश्नी रस्त्यावर उतरण्याचा काँग्रेसचा इशारा.

कांद्यासह शेतीमालाला बाजार भाव मिळत नसल्याने तीन हजार रुपये कांद्याला बाजार भाव मिळाला पाहिजे

यासाठी नाशिकच्या येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले

आळंदीत माऊली मंदिरात दानावर सेवकाचा डल्ला

- संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातील दानपेटीतील रक्कम लंपास

- मंदिरातील सेवेकऱ्यानेच १५ हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा आरोप

- ⁠१२, १३ आणि १६ मे रोजी सायंकाळी घडला प्रकार

- ⁠दानपेटीतील पैसे जमा करताना नजर चुकवून रक्कम पिशवीत टाकल्याचा आरोप

- ⁠विशाल बाळू वारूळे या सेवेकऱ्यावर आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल

- ⁠भाविकांमधून संताप; संस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

थकीत ऊस बिलासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक...

थकीत ऊस बिलासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक...

समशेरपूर आयन शुगर कारखान्यावर संतप्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा...

आंदोलनादरम्यान शेतकरी आणि कारखान्यांच्या प्रतिनिधी मध्ये शाब्दिक वाद....

पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा...

नंदुरबार जिल्ह्यातील आयन शुगर आणि ओंकार शुगर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक पेमेंट अद्याप थकीत...

मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यासोबतच साखर आयुक्तांना या संदर्भात ईमेलवर पत्र देऊनही वेळेवर थकीत बिले मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक..

कारखानदारांनी वारंवार तारखा देऊनही पैसे न मिळाल्याने शेतकरी, वाहतूकदार आणि कामगार रस्त्यावर...

समशेरपूर येथे कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी...

छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक जोराचे वादळी वारे

वादळी वाऱ्यांमुळे शहरवासीयांची धावपळ

रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य; मोटार सायकल चालवणे रस्त्यांवर अवघड

अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची उडाली धावपळ

ढग दाटून आल्याने दिवस असतात अंधार झाल्याचे चित्र

११ वी प्रवेश प्रक्रिया शासनाने स्वतःचे सॉफ्टवेअर विकसित केल्यास विनामूल्य प्रवेश शक्य

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत सुरू असलेल्या ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षीप्रमाणे यंदाही तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षण सुधारणा मोहिमेवर काम करणाऱ्या 'सिस्कॉम' संस्थेच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी शासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बाफना यांच्या मते, खाजगी कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्याऐवजी शासनाने स्वतःचे अधिकृत सॉफ्टवेअर विकसित केल्यास विद्यार्थ्यांकडून एकही रुपया न घेता ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि विनामूल्य राबवता येणे शक्य आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याचा बदल्यात हवालदार यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट

नीट संबंधित प्रश्नांची हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्याचे तपासात उघड

संबंधित प्रश्न व्हॉट्सअँप आणि प्रिंटआउट काढून वापरले

मनिषा हवालदार यांना २५ तारखेला दिल्ली न्यायालयात हजर करण्याची शक्यता

पुण्याच्या विशेष न्यायालयात रात्री १२ वाजता सी बी आय ने हवालदार यांना केलं हजर

एन टी ए कडून हवालदार नीट परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाचे अधिकृत अनुवादक म्हणून कार्यरत होत्या

आर्थिक मोबदल्यासाठी मनिषा मांढरे शी संगनमत करून काही विद्यार्थ्यांना पुरवले प्रश्न

औंढा नागनाथ शहरासह परिसरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली च्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कुसळला आहे हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे तर औंढा शहरात देखील मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलं होतं या पावसामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शहरातील व्यापाऱ्यांची मात्र मोठी तारांबळ उडाली होती

डोंबिवलीत संथ गतीने काँक्रिटकरण सुरू, मनसे आक्रमक

डोंबिवलीतील संथ गतीच्या काँक्रिट रस्ते कामांवरून आता नागरिकांचा संताप उफाळून आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. सुभाष रोडवरील रखडलेल्या काँक्रिटकरणाच्या कामाविरोधात मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रस्त्यावर बसून आंदोलन छेडले. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नंदूरबारमध्ये थकीत ऊस बिलासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

समशेरपूर आयन शुगर कारखान्यावर संतप्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

आंदोलनादरम्यान शेतकरी आणि कारखान्यांच्या प्रतिनिधी मध्ये शाब्दिक वाद

पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा

नंदुरबार जिल्ह्यातील आयन शुगर आणि ओंकार शुगर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक पेमेंट अद्याप थकीत

मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यासोबतच साखर आयुक्तांना या संदर्भात ईमेलवर पत्र देऊनही वेळेवर थकीत बिले मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक

पिंपरी चिंचवडमध्ये रक्षक चौकच्या नव्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनापूर्वीच अपघात

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील नव्याने उभारण्यात आलेल्या उडान पुलावर एका चारचाकी वाहनांला अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाचा त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेने रक्षक चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवा उडान पुला उभारला आहे.

लाल बहादूर शास्त्रींच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाच्या नावाखाली स्थलांतर करण्याचे प्रयत्न, काँग्रेसचं आंदोलन

पुणे महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांनी पुण्यातील मांगीरबाबा चौक येथे असलेल्या भारताचे माजी पंतप्रधान आणि स्वातंत्र्य सेनानी स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाच्या नावाखाली स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. या स्थलांतराला स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला असून, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शेतजमिनीच्या वादातून दोन जेसीबीच्या सहाय्याने शेतातील उभ्या उसाचे पीक जमीनदोस्त

शेतजमिनीच्या वादातून दोन जेसीबीच्या सहाय्याने शेतातील उभ्या उसाचे पीक जमीनदोस्त

सुमारे २०० सिताफळाची झाडे आणि आंब्याची झाडे तोडून नष्ट केली

शेतातील ठिबक सिंचनाची पाइपलाइन आणि विजेचे कनेक्शनही तोडण्यात आले.

या तोडफोडीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नागपूर पुणे मुंबई महामार्ग रोखला

बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे अक्षरशः वाहनधारक व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्रीपासून रांग लावूनही डिझेल मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी चिखली तालुक्यातील मेरा फाटा येथे ट्रॅक्टर आडवे लावून नागपूर पुणे - मुंबई महामार्ग गेल्या दीड तासांपासून रोखून धरला आहे

अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगाय गंभीर जखमी समृद्धी महामार्गावर निलगाय ला दिली धडक

समृद्धी महामार्गावर एका अज्ञात वाहनाने निलगाय ला जोरदार धडक दिल्याने निलगाय गंभीर जखमी झाली आहे.

1 वाजेच्या सुमारास शहापूर तालुक्यातील खर्डी जवळ मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या निलगायला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने निलगाय गंभीर जखमी झाली आहे . जो पर्यंत वनविभागाचे कर्मचारी येत नाही तोपर्यंत निलगाय वर उपचार करता येणार नाही.

जळगावात डिझेल टंचाईमुळे टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय आर्थिक संकटात

ऐन सुट्यांमध्ये डिझेलच्या टंचाईचा फटका बसल्याने अनेक ट्रिप रद्द करण्याची वेळ टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायिकांवर आली आहे

टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायावर अवलंबून असलेल्या वाहन चालकांची देखील रोजंदारी बुडत असल्याने उपासमारीची वेळ आली

*उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळामध्ये अनेक जण बाहेर फिरायला जात असतात त्यामुळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय तेजीत असतो..

याच हंगामात की डिझेलच्या टंचाईमुळे टूर्स अँड ट्रॅव्हल व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे*

डिझेल नसल्यामुळे टूर्स अँड ट्रॅव्हल साठी वापरला जाणाऱ्या अनेक गाड्या जास्त जागेवर उभ्या असून आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे

पुणे जिल्ह्यातील 1,023 पेट्रोल पंपांवर सेवा सुरळीत

पुणे जिल्ह्यात 1 हजार 23

पुणे शहरात 250 पेट्रोल पंप

पिंपरी चिंचवड मध्ये 300 पेट्रोल

सध्या तरी पेट्रोल पंप सर्व सुरू असल्याची पेट्रोल डिझेल असोसिएशनची माहिती

Dombivli: डोंबिवलीमध्ये 21 नायझेरियन ताब्यात

डोंबिवलीमध्ये⁠ खोणी पलावा येथून सुमारे 21 नायझेरियनना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती

नवी मुंबई आणि डोंबिवली मानपाडा पोलिसांनी मिळून

डोंबिवलीतील पलावा येथे कोम्बिंग ॲापरेशन

नायजेरियन ड्रग्स तस्कराविरोधात कारवाई

हिंजवडीतील फलाहार रेस्टॉरंटमध्ये काकडीत आढळली जिवंत अळी 

आयटी हब हिंजवडीतील सुप्रसिद फलाहार रेस्टॉरंटमध्ये अन्न स्वच्छतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाला पावभाजी सोबत दिलेल्या काकडीच्या स्लाइसमध्ये जिवंत अळी आढळून आली आहे.

Yavatmal: अरुणावती प्रकल्पातून तीन गेटद्वारे नदीपात्रात सोडले पाणी 

अरुणावती प्रकल्पातून तीन गेटद्वारे नदीपात्रात सोडले पाणी

नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर खळखळून वाहू लागली अरुणावती नदी

पाणीटंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा,एक दशलक्ष घनमीटर सोडले अरुणावती नदीत पाणी

आठ तास सुरू असणार प्रकल्पाचे गेट

बातमी आहे यवतमाळमधून दिलासा देणारी

विदर्भात उन्हाचा हाहाकार, तापमान ४७ अंशांवर 

महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळत आहे. एका बाजूला विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर दुसऱ्या बाजूला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हे विषम हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.

अल्पवयीन भाचीची छेड काढली, पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मानलेल्या मामाची हत्या 

टिटवाळा परिसरातील म्हारळ गावात एका तरुणीची छेड काढल्याच्या प्रकरणातून संतापजनक हत्याकांड उघडकीस आले आहे. दीपक डांगे या तरुणाने मुलीची छेड काढली याच प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून रविंद्र उर्फ पिंटया उर्फ डोक्या अहिरे याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांना अटक केली आहे.

Hingoli: स्मशानभूमितून महिलेच्या अस्थि चोरीला, कुटुंबाची पोलिसात तक्रार 

हिंगोलीच्या पुसेगाव मध्ये एक विचित्र प्रकार पुढे आलेला आहे एका महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत तिच्या अस्थींची चोरी झाली आहे या संदर्भात कुटुंबीयांनी नरसी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करत स्मशानभूमी मधून अस्थि चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणी कपात 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येत्या सोमवारपासून (२५ मे) अधिकृतपणे १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. वाढते तापमान, वेगाने होणारे बाष्पीभवन आणि 'एल-निनो' व 'आयओडी'च्या प्रभावामुळे मुख्य जलस्रोत असलेल्या मोरबे धरण जलाशयातील पाणीसाठ्यात चिंताजनक घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील संभाव्य तीव्र पाणीटंचाई टाळण्यासाठी पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

भोंदूबाबाच्या वेशात चोरी ; रांजणगावातील चोरटा सीसीटीव्हीत कैद

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात भोंदूबाबाच्या वेशात आलेल्या चोरट्याने कामगारांच्या रुमवर चोरी केली. कामगार झोपेत असताना मोबाईल आणि रोख रक्कम चोरून चोरटा पसार झाला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबत निर्णय अंतिम टप्प्यात - चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती जिल्ह्यात 24 वर्षीय युवकाचा 11 केव्ही लाईन चा शॉक लागून मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील सावंगी संगम येथील घटना

24 वर्षीय युवकाचा 11 केव्ही लाईन चा शॉक लागून विद्युत खांबावरच मृत्यू

Ahilyanagar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीत दाखल

वादळी पावसाने मेंढपाळांचे कंबरडे मोडले ; लाखणगावात पशुधनासह संसार उघड्यावर

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मेंढपाळांचे मोठे नुकसान झालंय शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, वाड्यांचे नुकसान आणि उघड्यावर आलेला संसार यामुळे मेंढपाळ हवालदिल झालेत

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

* विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

* चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी घेतली समर्थकांसह मंत्री गिरीश महाजन यांची भेट

* नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी भूषण कासलीवाल यांनी घेतली भेट

* भाजपकडून विधान परिषदेसाठी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा, गणेश गीते, भूषण कासलीवाल यांची नावे चर्चेत

Pune Metro : पुण्यात गळती मेट्रो धावली

पुण्यात काल झालेल्या पावसामुळे मेट्रोमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाली

यामुळे मेट्रो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला

सरकारी अनधिकृत क्लासेस, जिल्हा उद्योग केंद्राचा क्लासेस चालकांना दणका

नीट पेपर फुटी प्रकरणानंतर सर्वाधिक चर्चेत आलेला परिसर म्हणजे लातूरचा खाजगी कोचिंग क्लासेस परिसर, दरम्यान या परिसरात उभारण्यात आलेल्या इमारती, तसेच खाजगी कोचिंग क्लासेस, वस्तीग्रह, खानावळी, इत्यादी अवैद्य व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने देण्यात आले आहे, तर लातूरच्या "उद्योग भवन" परिसरात नवनिर्मिती करणाऱ्या व्यवसायाला चालना मिळावी , याकरिता जवळपास 26 एकर 32 गुंठे जागा ही सरकारने औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेला भाडेतत्त्वावर दिली आहे,

Kokan : कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकाची गर्दी

वीकेंड आणि उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक दाखल झाले आहेत.

मुंबईकर कोकणवासीयां बरोबरच पर्यटकही मोठ्याप्रमाणात कोकणात दाखल झाले आहेत.

त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत.

Bhandara : 'तलावांचा भंडारा जिल्हा' कोरडा ठाक!

'तलावांचा भंडारा जिल्हा' कोरडा ठाक!

नद्या - नाले कोरडे पडल्यानं जलसंकट होतंय गडद

Devendra Fadnvis : शिर्डी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वंदे भारतमधून प्रवास

- शिर्डी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वंदे भारतमधून प्रवास

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांचा रेल्वेने शिर्डी दौरा

- आज शिर्डीत डिफेन्स मॅन्युफॅक्चर क्लस्टरचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना डिझेल टंचाईचा फटका

- ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना डिझेल टंचाईचा फटका.

- अंबादास दानवे यांचे फॉर्च्युनर घेऊन चालक तीन तास रांगेत उभा.

- मध्यरात्री एक वाजता छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकातील एसपी पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी.

- चार चाकी व दुचाकी वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा.

गुलाबराव पाटील यांनी मुलासाठी मागितली उमेदवारी

जळगाव विधान परिषदेसाठी माझा चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी मी उमेदवारीची मागणी केली आहे

*वरच्या पातळीवर चर्चा होऊन ही जागा शिवसेनेला सुटेल..

जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपने देखील दावा केला आहे.

बुलढाणा ते चिखली रस्त्यावर डिझेलसाठी वाहनाच्या रात्रभर रांगा

डिझेल साठी आपला नंबर लागेल, या आशेपोटी शेतकरी आपल्या ट्रॅक्टर सह बुलढाणा ते चिखली रस्त्यावरील दांडगे यांच्या पंपावर रांगेत लागले आहेत. रात्री दीड वाजता पंप बंद आहे, मात्र सकाळी टँकर येणार आणि आपला नंबर लागून आपल्याला डिझेल मिळणार, अशी आशा त्यांना आहे . शेती मशागतीच्या काम त्यांना करायचे आहे , म्हणून डिझेल मिळावे ते सुद्धा कॅन मध्ये मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनि केलीय.

शेगावात पेट्रोल पंपावर फ्रीस्टाईल; बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्याने चालक आणि ग्राहकात हाणामारी

शेगाव येथील भारत पेट्रोलियम पंपावर बाटलीत पेट्रोल मागण्याच्या कारणावरून दुचाकी चालक आणि पंप कर्मचाऱ्यामध्ये जोरदार फ्रीस्टाईल झाल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भोंदू खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, खरातच्या साथीदाराकडून ED ने एकाच दिवसात जप्त केले १३.५० कोटी रुपये

- मनी लाँड्रिंग प्रकरणी अशोक खरात ED च्या ताब्यात, चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर

खरातच्या साथीदारांची देखील ED कडून चौकशी

बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन महागलं

त्र्यंबकेश्वरमध्ये आता प्रति व्यक्ती 2500 रुपयात व्हीआयपी दर्शन

- दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर ट्रस्टचा प्रस्ताव

- याआधी व्हीआयपीसाठी दर्शनासाठी होते 200 रुपये तिकीट

कोकणातील महामार्ग सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, अनेक घाटांवर दरडी कोसळण्याचा गंभीर धोका

कोकणातील घाटरस्ते धोक्याच्या छायेत; केंद्राच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण!

कुंभार्ली आणि तुळशी घाटासह अनेक घाटांवर दरडी कोसळण्याचा गंभीर धोका

मंत्र्यांच्या बैठकीनंतर THDCIL च्या अभियंत्यांना तातडीने पाहणीचे आदेश

सीईटी परीक्षेत कमी मार्क मिळाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या

दुर्वा दत्तात्रय खांदवे (वय १८) असे या मुलीचे नाव असून तिच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोहगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षेत अपयश आल्यानंतर आत्महत्येचा मार्ग पत्करू नये

नागपुरात उष्णतेचा वाढता कहर, वेगवेगळ्या कारणाने ७ दिवसांत १८० मृत्यूंची नोंद, काहींचा उष्माघाताने मृत्यू

उन्हाच्या तडाख्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण, उष्माघात, डिहायड्रेशन आणि हृदयविकाराच्या घटना वाढल्या, वयोवृद्ध किंवा दीर्घ आजार असनाऱ्यानी विशेष काळजी घेण्याचं आवाहन..

तापमान वाढीचा वृद्ध, लहान मुले आणि मजुरांना सर्वाधिक धोका संभवतो, तापमान वाढीने धोका अधिक वाढतो. उन्हाळ्यात किडनी फेल्युअर आणि स्ट्रोकचे प्रमाण वाढते, दूषित पाणी-अन्नामुळे संसर्गजन्य आजारांचे संकट वाढत असल्याने काळीज घेण्याचा सल्ला.

यवतमाळ जिल्ह्यातील 107 गावामध्ये पाणीटंचाई

यवतमाळ जिल्ह्यात कडाक्याचे ऊन तापत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक विहिरी, तलाव, प्रकल्पांनी तळ गाठलाय परिणामी बारा तालुक्यातील 107 गावांना पाणीटंचाईचा झळा बसत आहे जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ या गावांसाठी 100 विहिरीचे तर 11 बोरवेलचे अधिग्रहण केले आहे तसेच 21 गावातील 30 हजार 343 लोकांसाठी 21 टँकर्सने पाणीपुरवठा करून तहान भागवली जात आहे.

जालन्यात किराणा दुकानातून अवैध पेट्रोल विक्री, दुकानातून 25 लिटर पेट्रोल जप्त

जालन्यात किराणा दुकानातून अवैध पेट्रोल विक्री होत असल्याचे समोर आले आहे. जालन्यातील खरपुडी येथे तहसीलदारांनी छापा टाकून दोन दुकानातून 25 लिटर पेट्रोल जप्त केलं आहे. नागरिकांनी पेट्रोलचा आणि डिझेलचा काळाबाजार करू नये आवश्यक इंधनच खरेदी करावे असा आवाहन तहसीलदारांनी केला आहे तर इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यामार्फत तपासण्या करणार असल्याची माहिती जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे.

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग, १३ दिवसांत ३०० कोटींचे वाटप

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सध्या भूसंपादन वेगाने सुरू झाले आहे. तेरा दिवसांत ३०० कोटी रुपयांचे वाटप केले असून, मोबदल्यासाठी आणखी दोन हजार कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे.

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, राज्य सरकारकडे 2 कोटी 84 लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी

धाराशिव जिल्ह्यात एप्रिल महीन्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन महसुल प्रशासनाने नुकसानीचा सवीस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या 2 हजार 204 शेतकऱ्यांना मदत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल 2 कोटी 84 लाख 15 हजार 275 रुपयांची मागणी राज्यशासनाकडे केली आहे.या अहवालानुसार जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 1 हजार 510 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामध्ये सर्वांधीक फटका फळपिकांना बसला आहे तब्बल 772 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे.

भाजीपाला फेकण्याच्या घटनेवरून आमदार सदाभाऊ खोत यांचा सरकारवर घणाघात

बीडमध्ये शेतकऱ्याचा भाजीपाला कचऱ्यात फेकल्याच्या घटनेवरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शेतकऱ्यांच्या जीवावरती तुम्ही दोन वेळचं खाता. आणि त्याचाच भाजीपाला कचऱ्यात फेकता? अशांना नोकरीतून काढून भागणार नाही, जेलमध्ये टाका. शेतकऱ्याला संपवायचं आहे का सरकारला?" आ. सदाभाऊ खोतांनी सरकारवर हल्लाबोल करत घरचा आहेर दिला आहे. तर "शेतकऱ्याला देशातून हाकलायचंय का? – हाही सदाभाऊंनी सवाल" केला आहे. ते सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये बोलत होते.

पालकमंत्री संजय शिरसाठ यांची तत्परता; अपघातग्रस्त तरुणांना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात केले दाखल

छत्रपती संभाजीनगर शहरातील गांधेली परिसरातून आज पालकमंत्री संजय शिरसाठ रस्त्याने जात असताना त्यांच्या समोरच मोटारसायकलवरील तीन तरुणांचा अपघात झाला. अपघात होताच पालकमंत्र्यांनी तात्काळ घटनास्थळी थांबून जखमी तरुणांची विचारपूस करून, वेळ न दवडता जखमींना आपल्या स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचवून उपचारासाठी दाखल केले. पालकमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता १८ वर्षावरील व्यक्तीला आधार कार्ड नाहीच; 'या' राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी उसळली, मनालीत 13 दिवसांत 3 लाख पर्यटक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Dheeraj Seth : धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर,कार, दुचाकीची एकमेकांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Sunday Horoscope : व्यवसायात लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT