Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावर दगडफेक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५, राज्यात कडाक्याची थंडी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे अपडेट्स, नगरपरिषद-नगरपंचायत निकाल अपडेट्स, महायुती, महाविकासआघाडी आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Chalisgaon Election: चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावर दगडफेक

पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक

दगडफेक करून घटनास्थळावरून अज्ञात तरुण पसार झाले.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

संबंधित अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे

Bhimashankar Mandir: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद रहाणार

१ जानेवारी पासुन पुढील तीन महिने भिमाशंकर मंदिर बंद रहाणार

पुढील वर्षी होत असलेल्या पार्श्वभूमीवर भिमाशंकरला विकास आराखड्यातुन नव्याने विकास कामे होत आहेत

भिमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम होणार असल्याने दुर्घटना घडु नये यासाठी मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद रहाणार आहे

भिमाशंकरला येणा-या भाविकांची संख्या गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात येणार असुन पुढील आठ दिवसात यासाठी प्रशासकिय पातळीवर पहाणी करुन नियोजन केलं जाणार आहे

Akola: अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन गटात वाद

अकोल्यात मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन गटात वाद. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. काल रात्री मंत्री संजय राठोड अकोल्यातल्या आरजे हॉटेलला मुक्कामी होते. याच ठिकाणी मंत्री राठोड यांच्या उपस्थित हा संपूर्ण वाद झाला होता. शिंदे सेनेतीलच काही पदाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे. अकोला जिल्ह्यात सहा नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाला मोठ अपयश आलंये. केवळ 8 नगरसेवक शिंदे गटाचे निवडून आले. नगरपालिका निवडणूक माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली होती. त्यामुळे आता अकोला महापालिका निवडणूक बाजोरिया यांच्या हाती न द्यावी, असा प्रस्ताव मंत्री राठोड यांच्यासमोर नवले गटाने ठेवलाये. याच दरम्यान जिल्हाप्रमुख अश्विन नवले आणि शिंदे गटाचे नेते बाजोरिया यांच्या समर्थक एकमेकांवर धावून गेले. याच वेळी काहींनी खुर्च्या देखील एकमेकांवर उचलल्या होत्या.. मात्र मंत्री राठोड यांनी हा वाद थोड्यावेळातचं मिटवलाये.. महापालिकेच्या जागा वाटपावरून हा संपूर्ण वाद झाल्याचे बोलल्या जाते.. या वातानंतर मंत्री संजय राठोड अकोल्यातील पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांवर नाराज झाले होते.

Sillod: सिल्लोडमधील विजयानंतर अब्दुल सत्तारांची रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल

नगरपरिषदेचे निकाल येताच पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिल्लोडमध्ये प्रचार करणाऱ्यांचा आम्ही भोकरदनमध्ये सुपडासाफ केल्याचं सत्तार म्हणाले आहे. स्वतःचं गाव वाचवू शकत नाही, ते सिल्लोडमध्ये प्रचार करत होते असा खोचक टोलाही सत्तार यांनी दानवेंना लगावला आहे. तसेच फुलंब्री आणि कन्नडमध्ये देखील आम्ही गणित बिघडवले असा सत्तारांनी टोला लगावला. विशेष म्हणजे भोकरदन हे रावसाहेब दानवेंचे होम ग्राउंड असून, कन्नडमध्ये त्यांची मुलगी संजना जाधव भाजपचे आमदार आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा राजकीय वाद पाहायला मिळतोय.

Chiplun: भाजप प्रवेशानंतर चिपळूणमध्ये प्रशांत यादव यांचा करिश्मा...

राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपात प्रवेश केलेल्या प्रशांत यादव यांनी चिपळूण पालिकेच्या निवडणूकीत आपला करिश्मा दाखवला. नगराध्यक्षपदी शिवसेना-भाजपा युतीचे उमेश सकपाळ विराजमान झाले. तर युतीने १६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. भाजपतर्फे प्रशांत यादव यांनी चिपळूण पालिकेच्या निवडणूकीची जबाबदारी स्विकारली होती. शिवसेनेचे १६ तर भाजपचे ११ उमेदवार रिंगणात होते. रविवारी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेला ९ तर भाजपला ७ जागा मिळाल्या. गत निवडणूकीत भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी प्रशांत यादवांच्या नियोजनात भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला इथे चांगल्या जागा मिळण्याचा विश्वास भाजपमध्ये निर्माण झाला आहे..

Nagpur: नागपुरसह विदर्भात थंडीचा कडाका वाढला

-, नागपूरचा पारा 8.2 अंशावर तर गोंदिया 8 अंशावर

- विदर्भात थंडीची लाट दिवसेंदिवस तीव्र, सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरला

- उत्तर भारतात बर्फवृष्टीचा जोर वाढल्यास त्याचा परिणाम विदर्भातील तापमानावर होऊन पारा आणखी घसरण्याची शक्यता

- दुपारी थंड वारा तर संध्याकाळ होता होता हाड गोठवणारी थंडी असल्याने नागपूरकर थंडी मुळे त्रस्त

Pune: नवी मुंबईचे भाजपचे माजी नगरसेवक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे -

नवी मुंबईचे भाजप चे माजी नगरसेवक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप चे भरत जाधव यांनी आज केला राष्ट्रवादीत प्रवेश

अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये जाधव यांनी केला प्रवेश

Amravati: अमरावतीमध्ये चिखलदरा आणि दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता

अमरावती -

अमरावतीमध्ये चिखलदरा आणि दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता

खासदार बळवंत वानखडे यांचा आनंद गगनात मावेना; बळवंत वानखडे यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल..

दर्यापूर मध्ये बळवंत वानखडे यांच्या उमेदवाराने विद्यमान आमदारांच्या पत्नीच्या केला पराभव..

तर चिखलदरामध्ये भाजपाने प्रतिष्ठेची निवडणूक करूनही काँग्रेसने आणली सत्ता...

Nashik: नगरपरिषद निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता महायुतीचं मिशन महापालिका

नाशिक -

- नगरपरिषद निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता महायुतीचं मिशन महापालिका

- नाशिक महापालिकेसाठी महायुतीत जागा वाटपाचा पेच कायम

- तिन्ही पक्षाच्या शहराध्यक्षाच्या चर्चेनंतरही जागा वाटपाचं भिजत घोंगडे

- मंत्री गिरीश महाजन आज पुन्हा जागा वाटपाबाबत करणार चर्चा

- उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास होणारय सुरुवात

- जागा वाटपाचा तिढा कायम असल्यानं ऐनवेळी युती न झाल्यास स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याची देखील स्थानिक नेत्यांची तयारी

Parbhani: परभणी शहरात ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक नजर

परभणी -

परभणी शहरात नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक नजर

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळीच्या व महत्त्वाच्या चौकांमध्ये कॅमेरे

चोरी, घरफोडी तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लोकसहभागातून एकूण ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय

Amravati: अमरावतीत थंडीची लाट कायम, तुर पिकावर थंडीचा परिणाम

अमरावती -

अमरावतीत थंडीची लाट कायम, तुर पिकावर थंडीचा परिणाम

तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता..

थंडीमुळे तुरीच्या शेंगा भरत नसल्याचे शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत..

थंडी मुळे उत्पादन कमी होणार अशी शंका व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण

Pune: पुणे शहरात गेल्या ८ दिवसात हवेतील प्रदूषणात लक्षणीय वाढ

पुणे -

बसल्यावरही लागतोय दम, हवेची गुणवत्ता धोकादायक

राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुणे शहरात गेल्या आठ दिवसात हवेतील प्रदूषणात लक्षणीय वाढ

हिवाळा सुरू होताच राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

विशेषता पुण्यासारख्या वेगाने विस्तारत असलेल्या शहरात गेल्या आठ दिवसात हवेतील प्रदूषण लक्षणीय वाढ झालीय

नागरिकांना श्वास घेणे ही जड जात असून सकाळ संध्याकाळी धुरके आणि धुक्याची चादर शहरावर पसरलेली दिसत आहे

पुणे शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम श्रेणीत पोहोचला आहे

Pune: अजित पवार यांच्या आज सुद्धा पुण्यात विविध बैठका

पुणे -

अजित पवार यांच्या आज सुद्धा पुण्यात विविध बैठका

बारामती हॉस्टेल मध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत शहर पातळीवर तसेच पिंपरी चिंचवड विषयी संदर्भात बैठक

पुणे शहरातील इच्छुक उमेदवार तसेच पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी अजित पवार यांची घेणार भेट

Nagpur: नागपुरात महानगर पालिकेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, बड्या नेत्या भाजपमध्ये 

नागपूर

नागपुरात महानगर पालिकेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला आहे..

काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय

Palghar: भाजपने जव्हार नगर परिषदेवर इतिहास रचला, एकहाती सत्ता घेत महाविकास आघाडीला धुळ चारली

शंभर वर्षात भाजपने जव्हार नगर परिषदेवर इतिहास रचला आहे एकहाती सत्ता घेत महाविकास आघाडीला धुळ चारली असून जव्हार नगरपरिषदेत ऐकून 20 नगरसेवक पैकी 14 नगरसेवक निवडून आले असून नगराध्यक्षाची खुर्ची देखील खेचून आणली आहे.

तर मित्र पक्ष राष्ट्रवादी अजित पवार यांचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे 2 नगरसेवक निवडून आले या जव्हार नगरपरिषदेत शरद पवार गटाला एक नगरसेवकावर समाधान मानावे लागले आहे.

Nagpur:  नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेत इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा विजय

नागपूर -

- नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेत इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा विजय

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील कामठी नगर परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष विजयी..

- उमेदवार अजय अग्रवाल विजयानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विजयी जल्लोष रॅली,

- ढोल ताशाच गजरात भव्य मिरवणूक काढत रॅली..

- अटीतटीच्या लढतीत कामठीत भाजपचे अजय अग्रवाल यांचा विजय

- कॅाग्रेस आणि स्थानिक आघाडीचा पराभव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast growth stages: स्तनांची वाढ नेमकी कधी थांबते?; प्रत्येक महिलेला माहिती असायलाच हवं, जाणून घ्या तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Rahul Shewale : राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून मतदारांना साडी वाटप? संतप्त महिलांनी जाळून टाकल्या; पाहा VIDEO

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्यामागे ११,००० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Samantha Ruth Prabhu : पाय लटपटले, पदर ओढला; समांथा रुथ प्रभू चाहत्यांच्या गर्दीत अडकली, पाहा व्हायरल VIDEO

Ravindra Chavan : KDMC साठी भाजपचा स्वबळाचा नारा? १२२ जागांसाठी हजारो कार्यकर्त्यांची तयारी

SCROLL FOR NEXT