नालासोपाराच्या प्रगती नगरातील दारूच्या दुकानावर मद्यप्रेमींची गर्दी
नालासोपाराच्या प्रगती नगरातील दारू विक्री करणाऱ्या दुकानावर मद्यप्रेमींनी दारू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
रविवारी सायंकाळपासूनच दुकानाबाहेर गर्दी करून दारू खरेदी करण्यासाठी मद्यप्रेमींनी रांगा लावल्या आहेत.
गटारी सणाला अजून दोन दिवस असताना मद्यप्रेमींनी दारू खरेदीची सुरुवात केली आहे.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष L, मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तक्रार देण्यासाठी विवेकानंद पोलीस ठाण्यात दाखल... पोलिसांकडून माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न..
पुणे जिल्ह्यातील ६३ धोकादायक पूल पाडणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण ६३ पैकी अनेक छोटे आणि मोठ्या पुलंचा समावेश
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय
पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात अनेक पूल धोकादायक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाने केलं जिल्ह्यातील सर्व पुलांचे ऑडिट
पूल अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय
लातूरमधील घटनेचा विरोधकांकडून निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे.
बीड शहरातील एकनाथ नगर भागात पाण्याच्या टाकीजवळ चोरी झाल्याचं सीसीटीव्हीत कैद झाले आहे यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे. या भागात आता नागरिकांकडून पोलीस गस्त घालण्याची मागणी केली जात आहे. बीड शहरात गेले काही दिवसापासून चोरांचा सूत्र वाढतच आहे अनेक वेळा पोलिसांना सांगून देखील चोऱ्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही.
उल्हासनगर फर्निचर मार्केटजवळील माया हॉटेल शेजारील जुनी आणि जर्जर झालेल्या इमारतीचा सज्जा कोसळल्याची घटना घडली. प्लास्टर व लादी लावण्याचे काम सुरू असताना अचानक सज्जा कोसळला आणि त्याखाली एक कामगार अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव रावसाहेब ननावरे असे असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून अधिक तपास सुरु आहे.
बारामती शहरातील तीन हत्ती चौकात दुचाकी ला अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या आगीत दुचाकी जळून खाक झाले आहे
पुण्यातील भवानी पेठ परिसरात पुन्हा एकदा कोयताधारी युवकांनी दहशत निर्माण केली आहे. किरकोळ भांडणाच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी हातात कोयते व तलवारी घेऊन जवळपास 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली.
- वसई पश्चिमेकडील बाभोला या ठिकाणी वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.
- या शिबिराला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती लागली होती. मात्र दरेकर मार्गदर्शन शिबिराकडे लिफ्टने जात असताना अचानक लिफ्ट मध्येच बंद पडली तब्बल 15 ते 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडल्यामुळे सुक्षेतच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे
माणगाव बाजार पेठ ते मुगवली फाट्या दरम्यान वाहनांच्या रांगा
० कोकणातुन मुंबईकडे निघालेले पर्यटक माणगावमध्ये वाहतुक कोंडीत आडकले
० मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तीन ते चार किलोमिटर वाहनांच्या रांगा
भाजप आमदार प्रविण दरेकर वसई दौऱ्यावर होते त्याठिकाणी एका बिल्डिंगमध्ये गेले असता एका लिफ्टमध्ये अडकले होते.
शहाबाज ते धरमतर दरम्यान आणि तीन वीराधरण परिसर अशा दोन ठिकाणी वाहनांची रांग
० अलिबागकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 2 ते 3 किलोमीटर वाहनांची रांग
० धरमतर पुलाजवळील खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकामुळे लागल्या आहेत वाहनांची रांग
० केवळ 10 किलो मिटर अंतर पार करायला लागत आहे दिड तास
- भाजपा आमदार राजेश बकाने यांच्या मध्यस्तीने सुटले उपोषण
- पुलगावातील विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी अंकुश कोचे व गजानन पचारे यांचे सूरू होते आंदोलन
- आंदोलकांच्या मागण्यावर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा करत काढला आमदाराने तोडगा
- आंदोलनादरम्यान शनिवारी ठेवण्यात आले होते पुलगाव शहर बंद
- आमदार राजेश बकाने, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी स्थानिक स्तराच्या समस्या तातडीने तर अन्य समस्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करून प्रश्न सोडवणार असल्याची आंदोलकांना ग्वाही
- मी पुलगावकर या नावाखाली सुरु होते आंदोलन
महायुती सरकारच्या मंत्र्यांची आणि आमदारांची कारकीर्द सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता काँग्रेसचे नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर थेट अधिवेशनादरम्यान रमी खेळल्याप्रकरणी जोरदार टीका केली आहे. चव्हाणांच्या मते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी जर मंत्री रमी खेळत असतील, तर हे अत्यंत निंदनीय आहे. यातून सरकारला जनतेची, विशेषतः शेतकऱ्यांची, काळजी नसल्याचं दिसून येतं, असा आरोपही त्यांनी केला. आमदारांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, अधिवेशनातच हाणामारी असे प्रकार घडत असताना, हे सरकार लोकांचं केवळ 'एंटरटेनमेंट' करत असल्याचं चित्र आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
आष्टी येथील बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीने अन्नामध्ये विषारी पदार्थ टाकून तब्बल १६ भटक्या श्वानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली होती. घटना पीपल फॉर अॅनिमल संस्थेचे सदस्य आणि प्राणीमित्र हिरामण भोयर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ मृत्यूशी झुंज देत असलेल्या काही श्वानांवर औषधोपचार करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय.
हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड संपला. भाजपला सोडून शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली तेव्हाही ठाकरे ब्रँड संपला. अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.
कल्याणमधील एका नामांकित कपड्यांच्या शोरूममध्ये एका युवतीने लेहंगा घागरा खरेदी केला होता. मात्र काही वेळानंतर तिच्या मित्राने लेहंगा परत देत पैसे मागितले. यावेळी शोरूममधील कर्मचाऱ्यांनी "लेहंगा परत न घेता, त्याऐवजी इतर कपडे घ्या," अशी सूचना केली.
दुकानदाराने पैसे परत देण्यास नकार दिल्यानंतर, संबंधित तरुण – सुमित सयानी – संतापून गेला. त्याने शोरूममध्येच चाकू काढून आधी लेहंगा फाडला आणि नंतर दुकानदाराला धमकी दिली की, "तुला सुद्धा असंच फाडून टाकेन, माझे पैसे परत दे!"
ही संपूर्ण घटना शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याने त्वरीत कारवाई करत सुमित सयानीला अटक केली.
सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, कल्याण परिसरात या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
देशात स्वच्छ सर्वेक्षणात सलग सहावेळा बक्षीस मिळवणाऱ्या कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गेल्या महिनाभरात तब्बल 7 ते 8 साप सापडल्याची बाब समोर आले आहे . या जलशुद्धीकरण केंद्रातील तुरटी गोडाऊनमध्ये हे साप आढळत असताना पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप येथे काम करणाऱ्या कामगारांनी केला आहे. पाणी योजनेच्या तुरटी गोडाऊनमध्ये कामगारांची ऊठबस तसेच झोन बंद झाल्यानंतर कामगार या ठिकाणी झोपतात. आत्तापर्यंत महिनाभरात सात ते आठ साप सापडले असून यामध्ये पाच ते सहा फुटाची धामण आणि तीन फुटाचा घोणस जातीचा साप आढळून आला होता.
तीन राज्यांच्या सीमावर असलेल्या तीनसमाळ गावचे नैसर्गिक सौंदर्य....
रविवारच्या सुट्टीनिमित्त वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सातपुड्यात दाखल....
समुद्रसपाटीपासून 848 मीटर उंचीवर असलेल्या तीनसमाळ चा उंचीवरून दिसते तीन राज्यांची सीमा....
थ्री स्टेट व्ह्यू पॉईंट ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू....
सातपुड्यातील उंच उंच डोंगर धोक्याची चादर आणि समोर पसरलेली अथांग नर्मदा नदी पर्यटकांना करते आकर्षित.....
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संत तुकाराम महाराज नगर येथील भारतीय जैन संघटना स्कूलच्या प्रागनात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास 40 हून अधिक नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या असून जवळपास 1500 उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात आपली नाव नोंदणी केली आहे. काही उमेदवारांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलं आहे. तर ज्या उमेदवारांना नोकरी मिळाली नाही. अशा लोकांना जॉब कार्ड पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देण्यात आलय
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा यावेळेस 375 वैकुंठ गमन सोहळा आहे तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा 750 वा जन्म उत्सव सोहळा आहे.
त्या निमित्ताने दोन्ही संस्थानाच्या प्रयत्नाने एक अनोखा योग जोडून आला आहे.
यंदा तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवड वरून सरळ देहू गावा कडे न जाता भोसरी वरून आळंदी कडे मार्गस्थ होणार आहे.
तरुणीला एकांतात बोलावून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा प्रयत्न
पुण्यातील संतापजनक घटनेनंतर ज्योतिषाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणार्या एका भोंदू ज्योतिषाने हे कृत्य केलं आहे
पुण्यातील धनकवडी भागातील घटनेने संताप
नाणेघाट,दा-याघाटाकडे जाणारे पर्यटक मद्यप्राशन करुन जाणारे आणि मद्य सोबत घेऊन जाऊन पर्यटनस्थळावर होणारे गैरप्रवृत्ती रोखण्यासाठी जुन्नर पोलिसांकडून कडक तपासणी सुरू आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गाड्यांची तपासणी करून मद्यपी पर्यटकांवर कारवाई केली जात असून आतापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पर्यटनस्थळी शिस्त व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत नामदेवमहाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रथम “संतशिरोमणी श्रीनामदेवमहाराज पुरस्कार जाहीर झाला आहे.
येत्या २४ जुलै रोजी पंढरपुरात एका कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटी दरम्यान संत नामदेव महाराज फड तथा संत नामदेवमहाराजांच्या वंशजांकडून निमंत्रण देण्यात आले आहे.
वसईच्या राजोडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीर पणे भरत असल्याचा प्रकार पुरवठा विभागाने उघड केला आहे.
यात ५२ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपी अटक असल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे.
या कारवाईत ५२ सिलेंडर, इलेक्ट्रीक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार व रबरी पाईप तसेच पिकप टेम्पो असा ६ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणेकरांचा काही नेम नाही! आखाडचा शेवटचा रविवार निमित्त चिकन मटणच्या दुकानाबाहेर रांग आहेच
पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून सुद्धा घेतला जातोय.
याचं कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दांपत्याने तब्बल ५००० किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवला आहे.
मतदार यांच्यापर्यंत पोहचता यावं आणि जनसंपर्क वाढावा म्हणून ही शक्कल पुण्यात पाहायला मिळते आहे.
चिकन घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्र घेतलं जातं आहे आणि मगच चिकन फ्री मिळतंय.
विकेंडच्या सुट्टी निमित्त पर्यटकांनी सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर गर्दी केली आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणाहून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्गातील आंबोली कावळेसाद व हिरण्यकेशी भागात हे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
आंबोलीत सध्या आल्हाददायक वातावरण असून घाट परीसरात धुके व रिमझिम पाऊस अस वातावरण पाहायला मिळत आहे.
याचा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात स्वतः ट्रक पेटवून इन्शुरन्स कंपनी आणि फायनान्स कंपनीला फसवण्याचा डाव राजूर पोलीसांनी हाणून पाडला आहे..
सागर नवले या ट्रक मालकाने पोलीसांना खबर दिली की ट्रकला अचानक आग लागून जळाला आहे..
मात्र पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करत असताना हा ट्रक पेटला नाही तर पेटवला गेल्याचं निष्पन्न झालं आहे..
राजूर पोलीसांनी ट्रक मालकासह साथीदारांवर गुन्हा नोंदवला असून अधीक तपास सुरू आहे..
जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीवर देखील मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईकांकडून पोलिसांना अल्टिमेटम
15 ऑगस्टला ड्रग्जबाबत बैठक त्यापूर्वी सर्व आरोपींना अटक करा, पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या सूचना
पालकमंत्री येतात म्हणून त्यांना दाखवण्यासाठीच आरोपींना अटक असेल तर ते चुकीचं , गेले काही दिवसात पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अगोदरच आरोपी होतात अटक
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अजूनही 14 आरोपी फरार, आरोपी देशा बाहेर गेले का ?, पालकमंत्र्यांचा सवाल
प्रसिद्ध सीताखाई पॉईंटजवळ तरुणाची हुल्लडबाजी...
महिला आणि तरुणींना बघून टवाळखोर तरुणाचा धिंगाणा घालत अश्लील चाळे....
अमली पदार्थ आणि दारूंच्या नशेत असलेल्या तरुणाच्या या कृत्यामुळे उपस्थित पर्यटकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण..
तोरणमाळला पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर...
भंडारा जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा असून,दर वर्षी पावसाची सुरुवात होताच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते.
यंदा पण पावसाने जोरदार हजेरी लावली,नदी नाले ही ओसांडून वाहत होते,शेतकऱ्यांनी धानाची रोहणी केली,मात्र पावसाने उसंती घेतल्याने धानाची रोपे सुकू लागली जमीनीला भेगा पडल्या.
यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.रोवनी थांबली त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे.
शासनाने लवकर बावनथडी धरणाचा पाणी पुरवठा करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे .
कडेकपारीतून कोसळणारे धबधबे खुणावत आहेत पर्यटकांना
रत्नागिरी जवळच्या पानवळ येथे एकाच धबधब्यातून प्रवाहित झाले तीन धबधबे
याच नयनरम्य वातावरणात दिवशी पर्यटकांची फुल टू एन्जॉयमेंट
फेसाळत कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्याची मजा वेगळीच
पाण्याच्या प्रवाहा खाली चिंब भिजण्याचा आनंद वेगळाच
रविवारच्या मौजमजेसाठी पर्यटकांची धबधब्यांना पसंती
100 ते 125 फुटांवरून वरून कोसळणाऱ्या पानवल धबधबा अत्यंत सुरक्षित
त्रंबकमध्ये संपूर्ण हॉटेल फुल तर नाशिक शाहेरात देखील हॉटेल मध्ये भाविकांना मिळत नही रूम.
उत्तर भारतीयांचा श्रावण ला सुरवात झालाने त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांनी केली दर्शनात गर्दी..
शुक्रवार पासून सुरु होत आहे श्रावण महा.त्यामुळे अनेक जण आज करणार गटारी साजरी.
पुण्यातील फ्लेक्स वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि थेट गृहमंत्री अमित शहा यांचे व्यंगचित्र
एकनाथ शिंदे यांना बॅनर मधून शिवसेनेने डिवचलं
पुण्यातील गांजवे चौकात व्यंगचित्राची जोरदार चर्चा
"काली दाढीवाला मेरा लकी कबूतर" असा या फ्लेक्स वर मजकूर
अक्कलकुवा तालुक्यात महत्त्वाचा मार्ग ठप्प झाला.असून अस्तंबा, जमाना, ओरपा, नेंदवण ते खुर्चीमाळ हा अतिदुर्गम भागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग पावसाळ्यामुळे पूर्णत. बंद पडला आहे....
वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांचे हाल होत आहे सुमारे अर्धा ते एक किलोमीटरचा घाटरस्ता वाहून गेल्याने आणि मोठ्या दरडी कोसळल्याने जमाना ते नंदुरबार या जवळच्या मार्गावरील वाहतूक थांबली असून, नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
रस्ता बंद असल्यामुळे अद्याप एकही वाहन या मार्गाने जाऊ शकलेले नाही...
सरनाईक यांनी तुळजाभवानी मातेची केली अभिषेक पुजा,आषाढ महिन्यातील देवीच्या अभिषेक पुजेला असते महत्त्व
तुळजाभवानी मातेची मंदीरातील कामाची सरनाईक यांनी केली पाहणी
सरनाईक काल पासुन धाराशिव जिल्हा दौऱ्यावर
तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या कार्यालयात सरनाईक घेणार ड्रग्स प्रकरणाची आढावा बैठक
येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज पुण्यातल्या मटन आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे..
त्यात आज रविवारचा मुहूर्त साधत मटन खाण्यासाठी आजचा शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी पहाटेपासून मोठी गर्दी या मटणाच्या दुकानाच्या बाहेर गेलेली पाहायला मिळत आहे..
पहाटे सहा पासून लोकांनी भली मोठी रांग पुण्यातील मटन दुकानांच्या बाहेर लावलेली आहे.
अवघ्या तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यानंतर या नॉनव्हेज प्रेमींना मटन आणि चिकन खाता येणार नाही म्हणून आजच हे सगळे आपल्या आवडत्या नॉनव्हेज पदार्थावर ताव मारणार आहेत
भिमाशंकरच्या घनदाट जंगलामधून निघालेलं पांढरंशुभ्र धुकं, डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे, आणि निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेलं सौंदर्य... हे सारं डोळ्यांचं पारणं फेडणारं असलं तरी सध्या या सौंदर्याचा आस्वाद घेणं पर्यटकांसाठी धोकादायक ठरतंय...
भिमाशंकर अभयारण्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली असून, धोकादायक ठिकाणी जाण्यास वनविभागाकडून स्पष्ट मनाई करण्यात आली असुन सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आलेय मात्र तुमच्यासाठी भिमाशंकर अभारण्यातल्या निसर्गाचं बहरलेलं निसर्ग सौदर्य आम्ही घेऊन आलोय
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दृष्टीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मॅरेथॉन बैठका घ्यायला सुरुवात केली अशाच प्रकारे माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून स्वबळावरची तयारी गणेश नाईक यांच्याकडून केली जात आहे
गल्लीबोळात, चौकात आणि रस्त्यावर होणाऱ्या भांडणांना विधिमंडळात नेऊन त्याला कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचे जाहीर अभिनंदन अशा आशयाचे फलक परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात लावण्यात आले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या या बॅनरची चर्चा होत आहे. बीड जिल्ह्यात दररोज मारहाणीच्या घटना वाढत आहेत आणि ह्या महाराणी नंतर व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत या अनुषंगाने उद्देशून हे बॅनर लावले आहे का अशी देखील चर्चा आता बीड जिल्ह्यात होत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून शेती पिकांना पूरक असा पाऊस पडलेला नाही. गेल्या आठ दिवसात झालेल्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.
दुबार पेरणीचे संकट जवळपास यामुळे टळल्याचं चित्र दिसत आहे मात्र असं असलं तरी पुरेसा पाऊस नसल्याने उत्पन्न घटण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
तर पुढील पंधरा दिवसात मोठा पाऊस न झाल्यास पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.
देवळाली - नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली
नाशिक- मध्यरात्री वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत
ओव्हरहेड वायर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे
नाशिक- मध्य रेल्वेची अप मार्गाची वाहतूक कोलमडली
अनेक एक्स्प्रेस गाड्या ५-६ तास उशिराने
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणेकरांसोबत घेतली बैठक
नदीत सुधारणा आणि नदी पुनर्जीवन या दोन्ही प्रकल्पावर बैठकीत पुणेकरांसोबत खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली चर्चा
नदीप्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञांचे, शासकीय अधिकाऱ्यांचे आणि नागरिक प्रतिनिधींचे दोन्ही प्रकल्पांसंदर्भात सादरीकरण झाले सादरीकरण
अनेक संघटनांनी आणि संस्थांनी या दोन्ही प्रकल्पाला केला आहे विरोध
या प्रवेश फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करून अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवीत अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार
राज्यातील नऊ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एकूण २१ लाख ३७ हजार ५५० जागांकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय ?
धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये वाढती जवळीक
आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फटाक्यांच्या आतषबाजीत उमरगा येथील निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वागत
भेटीचा कारण गुलदस्त्यात,मात्र भेटीने चर्चांना उधाण
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि उमरगा मतदारसंघातही शिवसेनेचे पराभूत उमेदवार ज्ञानराज चौगुले हेही भेटी वेळी उपस्थित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची वार्षिक प्रांत समन्वय बैठक आज पार पडणार
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये RSS ची महत्वाची बैठक
या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रांतातील विविध संघप्रेरित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, एकूण ५० संघटनांमधून सुमारे ४३४ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत
RSS च्याय आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर,
नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा व महिला कार्यकर्तींचा सहभाग असणार आहे.
पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विमानतळ परिसरात केली पाहणी
याआधी विमानतळ प्राधिकरणाने पालिकेला कचरा समस्या असलेल्या ठिकाणांची यादी दिली होती
यासाठी पुणे महापालिकेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली होती बैठक
मोहोळ यांच्या बैठकीनंतर आयुक्त ऑन ग्राउंड
विमानतळ प्राधिकरण व महापालिकेच्या अधिकाऱयांची विविध विषयांवर एकत्र पाहणी शनिवार रोजी करण्यात आली
पाहणी दरम्यान आयुक्तांनी विमानतळालगतच्या परिसरामध्ये खाजगी मोकळ्या जागांवर असलेला कचरा व राडाराडा काढण्याच्या दिल्या सूचना
चालकाच नियंत्रण सुटल्याने इको कार पलटी.
इको कार मधील एका तरुणीचा मृत्यू तर आठ महिला जखमी.
ओव्हर सीट भरून वाहतूक करणाऱ्या अनधिकृत वाहतुकीकडे आरटीओ आणि पोलिसांच दुर्लक्ष.
जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि वेदांत मेडिकल हॉस्पिटल धुंदलवाडी येथे उपचार सुरू.
पर्वती येथून एस एन डी टी कडे जाणारी पाईप लाईन फुटल्यामुळे, पुणे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत
पुणे शहरातील उपनगरांना बसणार फटका
ऐन रविवार सुट्टीचा दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत
पाणीपुरवठा विस्कळीत होणारे पुणे शहरातील कोणते भाग
यवतमाळ परिवहन विभागातून तब्बल 250 एसटी बसेस आषाढी एकादशी करिता 250 बसेस नऊ दिवस चालवण्यात आल्या
या माध्यमातून यवतमाळ विभागातील नऊही आगाराला तब्बल सवलतीसह दोन कोटी 43 लाख 58 हजार 353 रुपयाचे उत्पन्न मिळाले.
त्यामुळे यवतमाळ परिवहन विभागाला पंढरपूरचा विठ्ठल पावला.
नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील खुदबई नगर येथे खुनाची घटना घडली आहे.
शेख अजीम असं या 55 वर्षीय खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख अजीम हे मजुरीचे काम करतात.
कामासाठी घराबाहेर पडले असता देगलूर नाका परिसरातील खुदबई नगर येथे त्यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला.
शेख अजीम यांचा खून करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस मारेकर्याचा शोध घेत आहे.
या खुणाच्या घटनेमुळे नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात खळबळ उडाली.
यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूलच्या बैठकीत दिग्रस आणि उमरखेड येथील मंडळाधिकाऱ्यांची कानउघडणी करून निलंबनाचे आदेश दिले होते.
त्यानुसार दोन्ही मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दिग्रसचे यु.एच. ठाकरे आणि उमरखेडचे पी.एम माने या दोघांवर निलंबन करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हा प्रशासन व लोकसहभागातून धाराशिव जिल्ह्यात हरीत धाराशिव अभियानांतर्गत वृक्षलागवडीचा उपक्रम घेण्यात आलाय.
जिल्ह्यात एकाच दिवशी १५ लाख वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता.
एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आल्याने या उपक्रमाची वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक, अभिनेता स्वप्निल जोशी यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला.जिल्हाभरातील २९४ ठिकाणी घनवन पध्दतीने ही वृक्ष लागवड करण्यात आली
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्यात येणार आहे.
याचा अंतिम आराखडा तयार झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांची मुंबईत बैठकीत झाली.
यामध्ये काॅरिडाॅरचे काम वेगाने पुढे नेण्यासाठी स्वतंत्र तीन उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे अधिकारी 25 जुलै ते 5 आॅगष्ट दरम्यान मंदिर परिसरातील बाधित होणार्या मालमत्ताधारकांबरोबर चर्चा करणार आहेत.
यामध्ये भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख,सीमा होळकर आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील प्रस्तावित वाटद एमआयडीसी विरोधात आज खंडाळा येथे जन संवाद सभा पार पडली..
ऍड असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा झाली. वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीने या सभेचं आयोजन केलं होतं.
मोठ्या संख्येने यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. वाटद एमआयडीसीची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली..
दरम्यान या सुपीक प्रदेशात एखादा शस्त्रास्त्रांचा कारखाना सुरू करणे मूर्ख पणाचं ठरेल, असं मत यावेळी ऍड सरोदे यांनी व्यक्त केलं..
तसेच इथली शेती वाचली पाहिजे त्यासाठी मी इथल्या लोकांसोबत असल्याचंही सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.