पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी केलं जिल्हा कोर्टात आरोप पत्र दाखल
अनेक तांत्रिक बाबी या आरोप पत्रामध्ये नमूद
काही महत्त्वाच्या साक्षी यामध्ये आरोपीला शिक्षा करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार
राजगड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोंडे हिरोजी परिसरातील सहा पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार (ता.16) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या परिसरात ठिकठिकाणी छोटी मोठी झाडे कोसळली. राजगड तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी सोंडे हिरोजी गावातील घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व मंडलाधिकारी यांना दिले आहे.
- या बसने धडक दिलेल्या कारसह पुढे उभी असलेल्या दुसऱ्या कारचेही मोठे नुकसान..
- गाडी मालक दुबे यांनी या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात दिली तक्रार..
- प्रेस क्लब येथून गाडी बाहेर काढताना बसने दिलेल्या धडकेत दोन वाहनाचे मोठे नुकसान..
- विशेष म्हणजे घटनेनंतर बसचालक न थांबता भरधाव बस घेऊन पळून गेलात..
हिंगोलीत पोलिसांनी वाळू माफियाचा 72 तासाच्या आत माज उतरवला आहे सेनगाव गोरेगाव रस्त्यावर डेप्युटी कलेक्टर समाधान घुटुकडे व गोरेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वाळू नये भरलेला डंपर पकडला होता.
यवतमाळच्या नागपूर तुळजापूर महामार्गावर माळम्हसोला गावाजवळ दुचाकी स्वाराला अज्ञात ट्रकने दिली धडक
धडकेत माळ म्हसोला गावातील युवक राजेश राठोड हा युवक जागीच ठार
अवैध मद्य विक्रीने अपघात झाला असल्याचे सांगत गावकऱ्यांनी माऊली धाब्यावर तोडफोड केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाला बसणार आहेत, यावरून कधी काळीचे त्यांचे सहकारी आणि सध्याचे विरोधक अजय महाराज बारस्कर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे...मुंबईत करोडो मराठा बांधवांना घेऊन गेल्यानंतर हैद्राबाद गॅजेटचा जीआर मनोज जरांगे घेऊन आले, गुलाल घेतला मग आता उपोषण कशाला करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नसरापूर प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी सदर केलं दोषारोपपत्र
स्वतः पोलिस अधीक्षक
दोषारोपपत्रात पुरावे, प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष, तांत्रिक विश्लेषण याचा समावेश
नसरापूर प्रकरणात अजय मिसर यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती
पालघरच्या डहाणू तालुक्यातील सायवन सह परिसरातील गावपाड्यांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय . पाण्याची गरज भागवण्यासाठी एका कोरड्या पडलेल्या ओढ्यात खड्डे खोदून या परिसरातील नागरिकांना आपली तहान भागवावी लागत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आल आहे . सायवन च्या भावर पाडा आणि परिसरातील गाव पाड्यांना सध्या अशाच पद्धतीने खड्ड्यातील पाण्याचा आसरा घ्यावा लागतोय
यवतमाळपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर माळ-मसोला फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत युवक दारू मद्यप्राशन पिऊन धाब्यावरून निघाल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नागपूर–तुळजापूर महामार्गावर टायर जाळून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. ढाब्यावरील अवैध दारू तात्काळ बंद करावेत तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने घेतला दोघांचा बळी...
साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ
आरोपी ज्युली वाघरी आणि विणु वाघरी यांना न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
मारहाण आणि महिलेची केस काढत धिंड काढल्याप्रकरणी उल्हासनगर सेंट्रल पोलिसांची कारवाई
दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.. यावेत पुढील तपासासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी केली मंजूर
या प्रकरणातील आणखी ८ ते १० आरोपी अद्याप फरार; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर शहरात संताप; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
खताची अनाधिकृत री पॅकिंग करण्यासाठी अनाधिकृत गोदामातून पुरवठा केल्याच समोर ....
अनुदानित रासायनिक खतांची अनाधिकृत गोदामात ज्यादा दराने विक्री करण्याच्या आणि कृत्रिम टंचाई र्निमाण करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याच उघड..
जालना शहरातील नवीन मोंढा भागातील गोदामात आढळले तब्बल 18 लाखांचे 1762 बॅग खत...
नांदेड शहरातील राजेंद्र नगर भागात इलेक्ट्रिक स्कुटी जळून खाक झाली.आज दुपारी ही घटना घडली.माधव संकपाळे यांनी आपल्या घरा समोर स्कुटी उभी केली होती. स्कुटीने अचानक पेट घेतला.
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या वीज पुरवठा खंडित समस्येमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. शिवाय गेल्यावर्षी दीड वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक वीज वितरणाची काम पेंडिंग आहे. वारंवार विनंत्या करूनही ती काम केली जात नाही.
गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात उन्हाचा चटका वाढला होता. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र दुपारनंतर अचानक आभाळ दाटून आलं आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
बदलापूर जवळच्या बारावी डॅम परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये 9 फुट लांबीचा भला मोठा अजगर आढळून आलाय. सर्पमित्र संकेत कर्णिक आणि विकास आढाव यांनी घटनास्थळी जाऊन या अजगराला रेस्क्यू केलंय त्यानंतर वनविभागाच्या मदतीने त्याला नैसर्गिक आधिवासात सोडून देण्यात आलं.
हिंगोली मध्ये कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बोगस खताचा साठा पकडला आहे हिंगोलीच्या मसोड गावात खताचा ट्रक विक्री करण्यासाठी दाखल झाला होता मात्र या खत विक्रेत्याकडे कोणताही परवाना किंवा कृषी विभागाची कोणतीही मान्यता नसलेला हा खताचा ट्रक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.
परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून आज जिल्ह्यातील तापमानाने तब्बल 42.7 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. दिवसाभर कडक उन्हाची तीव्रता जाणवत असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत असून अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना टोपी, रुमाल, गॉगल आणि पाण्याच्या बाटल्यांचा आधार घेत आहेत.
लातूर नांदेड महामार्गावर कार आणि ट्रकच्या भीषण अपघात झाला, महामार्गा वर भरधाव वेगात येणाऱ्या कार ने ट्रकला पाठीमागून धडक दिली या अपघातात कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले आहे, अपघातीतील तीन जण जनगणनेच काम करून लातूरकडे जात असल्याची माहिती आहे, तिघे शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, पुढील उपचारासाठी जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल आहे
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला. “जगाच्या नकाशावर टिकायचं की इतिहासात जमा व्हायचं, हे पाकिस्तानने ठरवावं,” असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं.
प्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील दैत्यसूदन मंदिरात एक 15 मे पासून चार ते पाच दिवस चालणारा दिव्य किरणोत्सव सुरू झाला आहे.. सकाळी 11 ते दुपारी 12:50 या वेळेत सूर्यकिरणें मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून थेट भगवान दैत्यसूदनच्या मूर्तीवर पोहोचतात.. सुमारे एक हजार वर्ष जुने हे मंदिर त्याच्या सूक्ष्म नक्षीकामासाठी प्रसिद्ध असून प्राचीन वास्तुशिल्पींनी सूर्यप्रकाशाचा अचूक विचार करून बांधले आहे, असे संशोधक सांगतात. गेल्या काही वर्षांत या उत्सवाची प्रसिद्धी वाढल्याने श्रद्धाळू, पर्यटक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने लोणारला येऊ लागले आहेत.. ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जातीय जनगणनेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात....
प्रत्येक प्रगणकाकडून सुमारे 800 नागरिकांची माहिती संकलित होणार...
16 मे ते 14 जून दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार...
नंदुरबार जिल्ह्यात साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांची महत्त्वाची भूमिका....
नवी मुंबई येथील एपीएमसी मसाला मार्केट मधील शॉप नंबर 12 आग...
आगीच कारण अस्पष्ट
अग्निशमन दलाला आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश
ड्रायफूट माल जळून खाक
नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका लेक्चररला अटक करण्यात आला आहे.
जीवशास्त्र शिकवणाऱ्या लेक्चरर ची सी बी आय कडून चौकशी आणि अटक
मनिषा मांढरे असे अटक केलेल्या महिला लेक्चरर चे नाव
संबंधित लेक्चरर एन टी ए च्या पेपर सेटिंग कमिटी ची सदस्या
पी व्ही कुलकर्णी प्रमाणे संबंधित लेक्चरर ने सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितल्याचा तपास यंत्रणांना होता संशय
एन टी ए ची संपूर्ण पेपर सेटिंग कमिटी सी बी आय च्या रडार वर
लातूर येथील खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांला गरज पडल्यास पुणे येथे चौकशीसाठी उपस्थित रहाव लागणार आहे. सीबीआयने क्लास चालकाला नोटीस दिल्याची माहिती समोर येत आहे. तर काल दिवसभर लातूरमध्ये सीबीआयने या क्लास चालकाच्या घरी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, बँकिंग व्यवहार, कागदपत्रे आणि लॅपटॉप सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
ई व्हीईकल मधून मंदिरापर्यंत सोडल्याच्या मोबदल्यात भाविकांकडून एका कंत्राटी कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या याप्रकरणी चालक कुणाल घोडके याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल मंदिर समितीकडून चोफाळा ते संत नामदेव पायरी पर्यंत वयोवृद्ध व दिव्यांग भाविकांना ई व्हीईकल च्या माध्यमातून मोफत प्रवास दिला जातो.
बदलापुरातील मच्छी विक्रेत्यांवरील कारवाईचा वाद चांगलाच पेटलाय. उघड्यावर बेकायदेशीरपणे मच्छी विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशी भूमिका नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी घेतलीय. तर शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे मच्छी विक्रेत्यांच्या समर्थनात उतरले आहेत. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांवरून आता थेट सेना-भाजप आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय
कल्याण ग्रामीणमधील वसार गावात घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या शिवम राठोड या चिमुकल्याला केडीएमसीच्या कंत्राटी कचरा वाहतूक गाडीने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात शिवमचा जागीच मृत्यू झाला.
"डेंटल डिझाईन" मनिषा वाघमारेच्या पती चे पुण्यातील क्लिनिक
सी बी आय कडून स्थानिकांची सुद्धा चौकशी
दाताच्या दवाखान्यात मनिषा वाघमारे च्या ब्युटी पार्लर ची जाहिरात
क्लिनिक वर विद्यार्थ्यांना बोलावलं जात होतं का? क्लिनिक वर विद्यार्थ्यांसाठी कौन्सिलिंग होतं का? याचा तपास सी बी आय कडून सुरू
मुक्ताई देवीच्या मंदिरातील साऊंड सिस्टम आणि टाटा 709 टेंपो चोरी करण्यात आला होता चोरी तरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असुन चौकशीत आरोपींनी मंदिरातील चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून एम्प्लिफायर मशीन, मिक्सर, एलईडी टीव्ही, देवीचे मंगळसूत्र असा 3 लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भिवंडी शहरातील प्रभाग समिती क्र.5 अंतर्गत असलेल्या भाजी मार्केट परिसरात भिवंडी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने जुन्या निजामपूरा पोलिस ठाण्या समोरील व आजूबाजूच्या रस्त्यात भाजी विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई केली.यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि दुकानदारांमध्ये काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.त्यानंतर सदरचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
हिंगोलीमध्ये डेप्युटी कलेक्टर सोबत वाळू माफियाने जाम राडा केला आहे. हिंगोली विभागाचे डेप्युटी कलेक्टर समाधान घुटुकडे यांनी मध्यरात्री आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत सेनगाव गोरेगाव मार्गावर वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरला पकडलं. मात्र यावेळी अचानक मद्यधुंद अवस्थेत बोलेरो जीप घेऊन घटनास्थळी दाखल झालेल्या दोन वाळू माफियांनी डेप्युटी कलेक्टर व पोलीस अधिकारी यांच्यासोबत अर्धा तास गोंधळ घातला
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनिषा वाघमारेला सीबीआयने केली आहे अटक
मनिषाचे पती संजय वाघमारे हे डेंटिस्ट आहेत
पुण्यातील बिबवेवाडी मधील त्यांच्या क्लिनिकवर सी बी आय अधिकाऱ्यांनी केली होती छापेमारी
संजय वाघमारे सी बी आय अधिकाऱ्यांना मिळून आले नाहीत
कोल्हापूर जिल्ह्यावर पाणी संकटाच सावट
कोल्हापूरच्या काळमवाडी धरणातील पाण्यात यंदा कमालीची घट
काळमवाडी धरणात सध्या फक्त साडेचार टीएमसी पाणीसाठा शिल्लक
यापुढे धरणातील साडेतीन टीएमसी पाणीसाठाच वापरता येणार
साडेतीन टीएमसी पाणीसाठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरवण्याचं जलसंपदा विभागापुढे आव्हान
शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी लोटली आहे.
दर्शन रांगांसह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले...
उन्हाळी सुट्ट्या, शनिवार, रविवार आणि शनि जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत उसळली गर्दी...
आज भाविक शनी शिंगणापूर येथे शनी दर्शनासह शिर्डीत साई दर्शनाचा घेताय लाभ
दिव्यांगाच्या जीआरवरून शिंदे गटाचे नेते आमदार बच्चू कडू आक्रमक झाले होते. थेट त्यांनी 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली होती. यूटीआय कार्ड मिळत नाही तोपर्यंत पगार देऊ नये. हा चुकीचा निर्णय आहे, तो शासन निर्णय रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे दोन जीआर काढल्यामुळे 50 टक्के दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित राहले होते. मात्र दोन्ही जीआर आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे 19 तारखेचं मंत्रालयामधील आंदोलन रद्द करण्यात आलं.
पुणे अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी चौकातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकातून क्रॉसिंग बंद करण्यात आले असून वाहनचालकांना दोन्ही बाजूंनी पुढे सुमारे ५०० मीटर अंतरावर जाऊन यू-टर्न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या निर्णयामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.वाहनचालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे
कल्याण ग्रामीणमधील वसार गावात दुर्दैवी घटना
२ वर्षीय चिमुकल्याला केडीएमसीच्या
कंत्राटी कचरा गाडीने चिरडले
चिमुकला शिवम राठोड याचा जागीच मृत्यू
केडीएमचा कचरा उचलण्याचे काम एका खासगी कंपनीकडे
घटनेचा हिललाईन पोलिसांकडून तपास सुरू
वीकेंड आणि उन्हाळी सुट्टी मुळे सिंधुदुर्गात सध्या पर्यटक मोठ्या संख्येने दाखल
सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली वेंगुर्ला, देवगड समुद्र किनारे पर्यटकांची गजबज
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल
पर्यटन व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल वाढली
उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी चाकरमानी व पर्यटकांची पसंती कोकणाला
भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथे एका गोठ्याला भीषण आग
लघुदाब वाहिनीची महावितरणची तार तुटून गोठ्यावर पडल्याने लागली आग
भीषण आगीमध्ये २ दुधाळ गाई, २ वासरं आणि ४ शेळ्या अशा एकूण ८ जनावरांचा होरपळून जागीच मृत्यू
या दुर्घटनेत पीडित शेतकरी सुरेश डोरले यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान
शरद पवारांनी बारामतीच्या दौऱ्यावर असताना स्वतःच्या शेतात फेरफटका मारला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून केलेल्या ऊसाची आणि केळी पिकाची पाहणी केली..
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला वर्ध्यात सकारात्मक प्रतिसाद
- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखिले सायकलने पोहोचल्या कार्यालयात
- पुलगाव येथील एसडीपीओ डॉ. वंदना कारखिले यांचा अनोखा पुढाकार
- इंधन बचतीसाठी स्वतःपासूनच सुरुवात करत दिला जनतेला संदेश
- पर्यावरण संरक्षणासोबत इंधन बचतीचाही दिला जागरूकतेचा संदेश
- सरकारी अधिकाऱ्याच्या कृतीमुळे नागरिकांमध्ये कौतुकाची भावना
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आंदोलनाची घोषणा
८ महिने उलटून गेले तरी प्रमाणपत्र मिळाले नाही
पी वी कुलकर्णी ला आज कोर्टात हजर करणार
दिल्लतील सी बी आय विशेष न्यायालयात करणार हजर
कुलकर्णीला सी बी आय कोठडी मिळण्याची शक्यता
सी बी आय ने नीट पेपर फुटी प्रकरणात कुलकर्णी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोपावरून केली अटक
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग घेत नीट परीक्षा पेपर फोडले असल्याचा कुलकर्णींवर आरोप
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
माणगाव, इंदापुरमध्ये मुंबई लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
शनिवार आणि रविवार उन्हाळी सुट्टीकरिता पर्यटक कोकणाच्या दिशेने निघाल्याने झाली आहे वाहतूक कोंडी
मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा
कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी'शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून, आपत्कालीन परिस्थितीत एका फोनवर शिवसैनिक मदतीसाठी धावून जाणार असल्याची माहिती मंदार शिरसाट यांनी दिली.
मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार
मेरीटाइम बोर्डाचे परिपत्रक जारी
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय
रत्नागिरी- जिल्ह्यात cng गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा
पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर भली मोठी लाईन
रत्नागिरी शहरातील माळ नाका परिसरातल्या सीएनजी स्टेशनवर पहाटेपासून रिक्षांची लाईन
रांगेत उभे राहिल्यानंतर पाच तासानं रिक्षामध्ये भरला जातोय गॅस
CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकच्या शुभम खैरनार याला CBI ने घेतले आहे ताब्यात
पेपर फुटीच्या संपूर्ण प्रक्रियेत टेलिग्राम अँपचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड
टेलिग्रामवर मोठ्या फाइल्स सहज पाठवता येत असल्याने वापर
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
आज पुण्यात सदिच्छा भेट घेतली
भेटीचा उल्लेख करताना उबदार भेट असा अंधारे यांच्याकडून उल्लेख
पुण्यातील दिवेघाटात दुचाकीला फटका सायलेन्सर लावून काही तरुणांनी दहशत माजवली होती.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दिवेघाटात बुलेटच्या सायलेन्सरचा आवाज काढणारे आणि कोयते नाचवणाऱ्या विरोधात आता पोलिसांनी कारवाई केली आहे.
बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
१४ वर्षीय मुलीचे भविष्य सुरक्षित
‘डायल ११२’ ठरली देवदूत
चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
आयुक्त वर्षा लड्डा यांचे अतिक्रमणधारकांना कडक निर्देश
यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता नवे पोलीस अधीक्षक म्हणुन नित्यानंद झा यांची वर्णी लागली आहे.
दोन वर्षांच्या कार्यकाळात मावळते पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत समाजोपयोगी उपक्रम राबवत हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला.
त्यांच्या कार्याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. आता त्यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.