Mumbai-Pune : धुकं, डोंगर अन् ३५० फूट उंच धबधबा! लोणावळ्याच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण दिसते स्वर्गाहून सुंदर

Shreya Maskar

पुणे-लोणावळा

पुण्यात लोणावळा परिसरात 'कातळधार' धबधबा वसलेला आहे. हा राजमाची गावाजवळील घनदाट जंगलातील ३५० फूट उंचीचा धबधबा आहे.

Pune-Lonavala | google

कातळधार धबधबा

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये खोलवर वसलेला हा धबधबा लोणावळ्यापासून साधारणपणे ६ ते ११ किमी अंतरावर आहे. लोणावळ्याला गेल्यावर येथे नक्की भेट द्या.

Kataldhar Falls | google

नाव कसं पडलं?

कातळधार धबधबा हा लोणावळ्याजवळील उल्हास खोऱ्यातील घनदाट जंगलात लपलेला आहे. याचे नाव 'कातळ' (खडक/भिंत) आणि 'धार' (धबधबा) या शब्दांपासून बनले आहे.

How did you get the name? | google

आकार

कातळधार धबधबा घोड्याच्या नालच्या आकाराची खडकांची रचना, जवळच असलेली डोळ्याच्या आकाराची गुहा आणि आव्हानात्मक जंगल ट्रेकसाठी ओळखला जातो.

shape | google

प्रभावी उंची

३५० फुटांवरून कोसळणारा धबधबा, ज्यामध्ये १०० फुटांचा एक भव्य 'ओव्हरहँग' आहे.

Effective height | google

डोळ्याच्या आकाराची गुहा

डोळ्याच्या आकाराची गुहा ही तळाशी असलेली एक अद्वितीय आणि मोठी नैसर्गिक गुहा आहे. जिथे १०० लोक मावू शकतात आणि जिथून श्रीवर्धन (राजमाची) किल्ल्याचे दृश्य दिसते.

An eye-shaped cavity | google

पावसाळी ट्रेकिंग

मुंबई आणि पुण्यापासून दूर, गर्दी नसलेल्या ठिकाणी ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर कातळधार धबधब्याला नक्की भेट द्या.

Rainy Trekking | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत हरवून जायचंय, मग कल्याणजवळील 'हा' धबधबा तुम्ही पाहायलाच हवा

Kalyan Waterfall | AI PHOTO
येथे क्लिक करा...