जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाली आहे. स्पर्धेत दुसरी नावे असताना नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यावेळी मंत्री महाजन यांनी हा निर्णय दिल्लीतून झाला असे म्हटले होते. त्याबाबत केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांना विचारले असता, त्यांनी हा निर्णय माझा नाही जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील सर्व निर्णय मंत्री गिरीश महाजन हेच घेतात मी लहान कार्यकर्ता आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर रक्षाताई खडसे यांच्या प्रतिक्रियेला गिरीश महाजन यांनी प्रतिउत्तर दिले आहे. "उमेदवार माझा किंवा दुसऱ्याचा नसतो तर उमेदवार पक्षाचा असतो रक्षा खडसे यांचे असे बोलणे चुकीचे आहे" असेही मंत्री महाजन म्हणाले आहेत
आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट परंतु शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
शिरपूर शहरातील भंडारी टॉकीज परिसरातील हिंदुस्तान फ्रुट या फळांच्या गोदामाला लागली आज
अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल
अग्निशमन विभागाच्या पथकातर्फे आग विझविण्याचे अपनात प्रयत्न सुरू
जीवित हानी संदर्भात अद्याप कुठलाही प्रकारची माहिती नाही.
नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी. वादळविवारास पावसाने घातला थैमान. अनेक ठिकाणी वादळवार असं पावसाचं नुकसान. विद्युत पोल आणि झाड विद्युत पुरवठा खंडित
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. यंदाचे वर्ष एल निनोचे असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून, घाईत पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. पुरेसा आणि स्थिर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच कृषी विभाग आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून योग्य पिकांची निवड करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे भव्य मोफत रोगनिदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिबिरात सुमारे १ हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या आयुष्याची शतकी वाटचाल पूर्ण होवो,” अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) इमामी हेल्दी अँड टेस्टी, हेल्थ एड, ट्रूव्ही, द हेल्दी फॅक्टरी, हेल्दी मास्टर, हेल्दी चॉईस, प्लॅन बी आणि न्यूहर्ब्स या आठ खाद्य कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे. सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी ते बुलढाणा येथील निवासस्थानासमोर आंदोलनाला बसणार आहेत. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून, शेतकरी वर्गात या आंदोलनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी मान्सून पूर्व मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, या पावसामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने बळीराजा शेतात धान पेरणीकरिता चिंताग्रस्त आहे.
नांदेड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हळद पिकाचे संरक्षण करण्यासाठी आणि ते जगवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करून पाणी देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, ते तुषारच्या साहाय्याने पिकाची काळजी घेत आहेत. दरम्यान, पाऊस आणखी लांबल्यास खरीप हंगामातील पेरण्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळपासून कडक उन्हाचा तडाखा, दुपारनंतर हवामानात अचानक बदल होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे..
लातूर तुळजापूर महामार्गावरच्या बुधोडापाटी येथे कार आणि क्रूजर गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात झालाय, या अपघातात क्रुझर मधील तीन व्यक्तीचा मृत्यू झाला, 17 व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आहे, जखमींवर सध्या लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लातूरकडे येणाऱ्या क्रुझर गाडीला भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची माहिती आहे
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा गर्भपात माजलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यात आला असून, या प्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे पीडित तरुणीची प्रकृती गंभीररीत्या खालावली.
आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण; आष्टीतील डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील एका डॉक्टरविरुद्ध तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ मध्ये अवैध हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थ साठ्यावर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची कारवाई १ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
एल निनो च्या संकटाचा अंदाज पाहता जलसंपदा विभाग धरणांचा आढावा घेत आहे
राज्यात पाण्याचा साठा किती या पार्श्वभूमी वरती विखे पाटलांची बैठक
उद्यापासून पुणे शहरात सुरू होणार आहे पाणी कपात बैठकीत पाणी कपाती वरती होणार चर्चा
पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित
केळीची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अश्रू अनावर
हातातोंडाशी आलेले केळी पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल
गारपीट आणि वादळी वाऱ्याचा केळी उत्पादकांना मोठा फटका
वरखेडेतील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
केळी बागांच्या नुकसानीनंतर तातडीच्या मदतीची मागणी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट देत मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी भगवान शिवशंकरांची पूजा-अर्चा केली तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिर वास्तूचे विधिवत पूजन केले.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणात कमी पाणीसाठा आहे.यामुळे सोमवारपासून पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.पुणेकर नागरिकांची या पाणी कपातीमधून सुटका व्हावी तसेच राज्यभरात भरभरून पाऊस व्हावा यासाठी पुण्यात पर्जन्ययाग' चे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्या निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे दीड वर्षातून सोमवती अमावस्या साजरी होत असल्याने आज रात्री दोन वाजता गडावरून पालखीचे कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान होणार असून उद्या सकाळी पालखी करा नदी पात्रात पोचल्यानंतर उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीच्या पवित्र जलाने जल अभिषेक होणार आहे.
आजही सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती भरते, वंचित जिथे जिथे आंदोलन करते तिथे तिथे पोलीस पाठवतात...
आरएसएस च्या छातीवर आंदोलन जीवन जाण्याची हिंमत दाखवत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आहे..
महाराष्ट्रातील असा कुठला विषय नाही त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलेलं नाही आहे..
महाराष्ट्र मध्ये मुसलमानांना मोबाईंचिंग केलं जात होतं, टिपू सुलतान औरंगजेब चे फोटो वरून मारहाण केली जात होती त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर गेले होते..
औष्णिक विद्युत केंद्रातील गुत्तेदाराचं पाच कोटी रुपयांसाठी अपहरण.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना ठोकल्या बेड्या.
औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्याचा ड्रायव्हरच अपहरणाचा मुख्य सूत्रधार.
चार आरोपींना मदत करणारा पाचवा कोण त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका तुकाराम मुंढे
रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्याच्या इंदापूर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.
ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल...
भाऊसाहेब वाकचौरे यांचा फोन सकाळपासून बंद...
आज मुंबईत उद्धव ठाकरे घेणार पक्षाच्या खासदारांची बैठक...
सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश...
दुपारी साडेबारा वाजता बैठकीचे आयोजन...
अधिक मास, शनिवार - रविवारच्या सुट्ट्या आणि सोमवती अमावास्येचा पवित्र योग एकत्र आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह देश भरातून हजारो भक्त दाखल होत असून मंदिर परिसर, दर्शन मार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर भक्तांचा ओघ वाढला आहे.
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवू पाहणारे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांच्या अडचणीत कमालीची वाढ होतं आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवल्यानंतर बाजोरिया यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या वकिलांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र, हायकोर्टाने ही विनंती पूर्णपणे धुडकावून लावली आहे.
महावितरणच्या निष्काळजीपणाला कंटाळून शेतकऱ्याने पेटवले उभे धान पीक!...
पाण्यासाठी करपलेले पीक शेतकऱ्याने संतापाच्या भरात स्वतःच पेटवून दिले!..
नवरगाव येथील घटना...
- प्रतापनगर हद्दीतील शेवाळकर अपार्टमेंटमध्ये घटनेमुळे शोककळा
- मल्हार अनमोल रंगारी (वय 11) अस मृतक मुलांचं नाव
अकोला शहरात एका 29 वर्षीय तरुणाची हत्या. दुसरीकडे पातूर तालुक्यातील आलेगाव या ठिकाणी 17 वर्षीय मुलाची हत्या. अंकुश गोपालनंदा गवली असं अकोल्या हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर आलेगाव येथील मृत मुलाचं नाव यश गजानन गिर्है असं आहे. अंकुश याची दोन जणांनी चाकू भोकसून हत्या करण्यात आलीय.. त्यांच्या हत्येला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे बोलल्या जातं.
मावळच्या देहूरोड परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल तीन दुकानांवर डल्ला मारत व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या चोरीच्या घटनांमध्ये लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली असून दुकानांतील साहित्यही अस्ताव्यस्त करण्यात आले आहे. बाजारपेठेतील जगन्नाथ खंडेलवाल यांचे घाऊक किराणा दुकान, देहूरोड रेल्वे स्थानकाजवळील ओम मेडिकल तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावरील बालाजी ट्रेडिंग या दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील व्यापारी वर्गात धास्तीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता यात तीन चोर आढळून आले असून मोठ्या शिताफीने या चोरट्यांनी तीन ठिकाणी धाडसी चोरी केल्याचं दिसून येत आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे उद्यापासून भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले होणार असून त्यापूर्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून विकासकामांचा आढावा घेण्यावर भर दिला जात आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीची वाटप यादी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे यात नामांकित महाविद्यालयांमधील कला आणि विज्ञान शाखेचा कटऑफ लक्षणीयरीत्या घसरला आहे त्यामुळे 90% पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी तसेच विदर्भात काही ठिकाणी रविवारी आणि सोमवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील पौड घाटात शनिवारी सकाळी एका तरुणाने विवस्त्र अवस्थेत गोंधळ घालत वाहतुकीत अडथळा निर्माण केला. धनवेवाडी वळणाजवळ रस्त्याच्या मधोमध उभा राहून तो वाहनांना अडविण्याचा प्रयत्न करत होता. पर्यटकांच्या गर्दीमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर तरुण एका चारचाकी वाहनावर चढून उड्या मारू लागला. यामुळे वाहनाचे सनरूफ फुटले तसेच वाहनाचे नुकसान झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.