Shreya Maskar
वाघोबा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील मनोर-पालघर मार्गावरील 'चहाडे' येथे स्थित आहे. हा धबधबा पालघर रेल्वे स्थानकापासून साधारण ७ किलोमीटर अंतरावर आहे.
पाण्याचे जोरदार प्रवाह, हिरवीगार पर्वतरांगांची दृश्ये आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण यामुळे वाघोबा धबधबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
दाट हिरवी झाडी, डोंगर आणि नैसर्गिक पाण्याचे झरे यांनी हे ठिकाण वेढलेले आहे. मुसळधार पावसात या झऱ्यांचा प्रवाह अधिक तीव्र होतो.
पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि पालघर येथील स्थानिक पर्यटक, कुटुंबे आणि निसर्गप्रेमींची येथे मोठी गर्दी असते.
तुम्हाला सुंदर फोटोशूट करायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम राहील. येथे धुक्याची चादर, सुंदर इंद्रधनुष्याचा नजारा पाहायला मिळतो.
पालघरमध्ये केळवा बीच, डहाणू-बोर्डी बीच असे सुंदर समुद्रकिनारे आहेत. पावसाळ्यात येथे संध्याकाळी निवांत फेरफटका मारा.
तुम्ही मुंबईहून पालघरसाठी ट्रेनने प्रवास करा. पुढे पालघर स्टेशनला उतरून रिक्षाने धबधब्यापर्यंत जा. पावसाळ्यात येथे नक्कीच फॅमिली ट्रिप प्लान करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.