Satara Waterfalls : पावसाळ्यात धबधब्यांनी खुलतंय 'हे' सुंदर ठिकाण, निसर्गप्रेमींनी नक्की भेट द्या

Shreya Maskar

सातारा

सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरातील घाटमाथा येथे, कुंभार्ली घाटाजवळ घाटमाथा धबधबा वसलेला आहे. हा धबधबा पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतो.

Satara | google

घाटमाथा धबधबा

घाटमाथा धबधबा हा एक हंगामी धबधबा असून जो हिरव्यागार डोंगरांच्या दृश्यांसाठी, पावसाळ्यातील धुक्याच्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

Ghatmatha Falls | google

फोटोशूट

घाटमाथा धबधबा महाराष्ट्रातील सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कुंभार्ली घाटावर स्थित आहे. तुम्ही येथे फोटोशूटचा देखील भन्नाट आनंद घेऊ शकता.

photo shoot | google

मुसळधार पाऊस

मुसळधार पावसामुळे येथे पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो. दाट धुके, खाली उतरलेले ढग आणि पश्चिम घाटातील हिरव्यागार दऱ्यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

heavy rain | google

कधी भेट द्याल?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे नक्की भेट द्या. येथे आजूबाजूला खाण्यापिण्यासाठी छोटे छोटे स्टॉल आहेत. यात गरमागरम चहा, भाजलेला मका मिळतो.

When will you visit? | google

जवळची ठिकाणे

घाटमाथा धबधब्याजवळ कोयना धरणाचा जलाशय (बॅकवॉटर), नेहरू उद्यान आणि चाळकेवाडी येथील पवनचक्की पठार ही ठिकाणे आहेत.

Nearby places | google

कसं जाल?

मुंबईहून साताऱ्यापर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे स्टेशनपासून रिक्षाने प्रवास करून तुम्ही घाटमाथा धबधब्याला पोहचा.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मुंबईजवळचे 'हे' शांत अन् निसर्गरम्य हिल स्टेशन पाहताच लोणावळा-माथेरान विसराल, पावसाळ्यात वीकेंड करा स्पेशल

Palghar Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...