Marathi Breaking Live Headlines Updates 
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: शहापूर 80 वा स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून भातसा धरणाला तिरंगी विद्युत रोषणाईने सौंदर्य खुलून निघाले

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबईसह अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, सुप्रीम कोर्टात शिवसेनेवर सुनावणी, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

नागपूर जिल्ह्याच्या कुहीच्या विद्यार्थिनीच्या सोशल मीडिया पोस्टची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ दखल

- कुही तालुक्यातील खेतापूरच्या विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणासाठी ७ किलोमीटर दूर डोंगरगावला जावं लागत होतं.... एसटी बससेवा नसल्याने अडचणी सोशल मीडियावर मांडल्या होत्या..

- इयत्ता नववीतील टीना वैकुंठे हिने सोशल मीडियावर मांडली होती व्यथा....जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली तत्पर दखल

- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील विधान भवन परिसर रोषणाईने फुलले...

- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील विधान भवन परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने करण्यात आलीय....

- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली... तिरंग्याच्या रंगांनी परिसर सजविण्यात आला आहे.

- या मनमोहक रोषणाईमुळे विधान भवन परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

- विधान भवनासह नागपुरातील विविध प्रशासकीय इमारतींवरही तिरंग्याच्या रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

- सायंकाळ होताच या इमारती रंगीबेरंगी दिव्यांनी झगमगून उठत असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.....

पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त उजनी धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

दिव्यांच्या रोषणाईने धरण परिसर उधळून निघाला आहे तिरंग्यामध्ये करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.

- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपकडून संघटनात्मक नवी जबाबदारी

- आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या भाजप संघटनात्मक सहप्रभारी पदी बावनकुळे यांची नियुक्ती

- बावनकुळे यांना पक्षाकडून पुन्हा एकदा राष्ट्रीय जबाबदारी

- राज्यात बावनकुळेंवर जरांगे पाटील टीकास्त्र सोडत असताना दुसऱ्या बाजूने भाजपकडून बावनकुळे यांना राष्ट्रीय जबाबदारी

KDMC रुक्मीणीबाई रुग्णालय प्लास्टर प्रकरणी सफाई कामगार निलंबित

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णाच्या फ्रॅक्चर पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठ्याचा आधार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला. या प्रकरणी रुग्णालयातील सफाई कामगार मुकेश पंडीत याला महापालिका सेवेतून निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.

साईबाबांसंबंधी बदनामीकारक आणि दिशाभूल करणारे मजकूर 24 तासात हटवा. GAC चे युट्यूबसह विविध सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मला आदेश

साईबाबांसंबंधी दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधात साई संस्थानच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश आले आहे.. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर GAC ( ग्रीव्हन्स अपिलेट कमिटी ) ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.. युट्यूबसह इतर सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मला, संबंधित व्हिडीओ आणि लेख 24 तासांत हटविण्याचे आदेश दिले आहेत..

सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला ११ दिवसांची पोलीस कोठडी

पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी जसपाल सिंह याला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला आज पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने जसपाल सिंह याला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मालेगावातील वन विभागाच्या कार्यालयाच्या समोरील मेंढपाळांचे आंदोलन चिघळले

- मालेगावातील वन विभागाच्या कार्यालयाच्या समोरील मेंढपाळांचे आंदोलन चिघळले..

- मेंढ्यांसहित वनपरिक्षेत्राधिकार्‍याच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न..

- आंदोलन करते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची..

- महिला आंदोलन आणि महिला पोलिसांमध्ये धक्काबुक्की..

- सुमारे चार तासापासून जास्त सुरू असलेले आंदोलन तोडगा न निघालेले आंदोलन चिघळले..

- शहरातील कॅम्प रोड पूर्णपणे बंद..

- वाहनांच्या रांगाच रांगा..

चाकण एमआयडीसीत उद्योगांचे साम्राज्य, मात्र सर्वत्र कचऱ्याचे ढीग

चाकण औद्योगिक वसाहतीत उद्योग वाढत असताना परिसरातील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि आता सर्वत्र साचलेला कचरा यामुळे एमआयडीसीची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यांच्या कडेला आणि विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. यामुळे कामगारांसह स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, कचरा व्यवस्थापनाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बीडमध्ये शासकीय कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाचे उद्घाटन

बीडमध्ये शासकीय कामगारांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाठ, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार विजयसिंह पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या वसतिगृहाची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याला संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

११ महिन्यांच्या बालिकेने गिळले क्रीम ट्यूबचे टोपण; डॉक्टरांनी वाचवले प्राण

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील साखरा येथे ११ महिन्यांच्या अधिरा प्रफुल्ल सरोदे या बालिकेने खेळताना क्रीम ट्यूबचे टोपण गिळले. प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने चंद्रपूर येथे उपचारासाठी आणले. अन्ननलिका आणि श्वासनलिकेच्या मध्ये टोपण अडकल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. ईएनटी तज्ज्ञ डॉ. मनीष मुंदडा यांनी अवघ्या दोन तासांत शर्थीचे प्रयत्न करून टोपण बाहेर काढत बालिकेचे प्राण वाचवले. लहान मुलांच्या आसपास सहज तोंडात जाऊ शकतील अशा वस्तू ठेवू नयेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

Pune: पुण्यातील गोडाऊनवर एफडीएची धाड, झेपटो कंपनीचा परवाना रद्द

पुणे -

पुण्यातील झेपटो कंपनीच्या गोडाऊनवर एफडीएची धाड

पुण्यातील झेपटो कंपनीचा परवाना रद्द

पुण्यातील लोहगाव परीसरात असणाऱ्या झेपटो कंपनीच्या स्टोअर वर छापेमारी

रेफ्रिजरेटेड आणि फ्रोझन केलेल्या पदार्थ साठवणुकीमध्ये अनेक त्रुटी

तापमान नियंत्रणाचे गंभीर उल्लंघन, 'यूज बाय' मुदत संपल्यानंतरही अन्नपदार्थांचा साठा, अस्वच्छ साठवण व्यवस्था, कीड नियंत्रणाच्या अपुऱ्या उपाययोजना आल्या आढळून

कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेचे पालन न करणे अशा गंभीर अन्नसुरक्षा त्रुटी आल्या मिळून

Sambhajinagar: जीनगरमध्ये तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसाद, संभाजीनगरच्या रस्त्या - रस्त्यावर देशप्रेमी तरुणाईचा जल्लोष

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसाद, संभाजीनगरच्या रस्त्या - रस्त्यावर देशप्रेमी तरुणाईचा जल्लोष

थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅली च्या ठिकाणी पोहोचतील, आणि रॅलीला होईल सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीसह भाजपचे मंत्री महत्वाच्या नेत्यांची रॅलीत राहणार उपस्थिती

संभाजीनगरच्या संभाजीपेठेतील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला होईल सुरुवात

भाजप चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री अतुल सावे, मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ.भागवत कराड, आमदार जगजित सिंह राणा राहणार उपस्थित

Bhandara: भंडारा जिल्ह्यातील 41 शाळकरी मुलांनी इस्रोची सफर घडविण्यात आली

भंडारा जिल्ह्यातील 41 शाळकरी मुलांनी इस्रोची सफर घडविण्यात आली.

यावेळी त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा त्यांना वेगवेगळ्या बाबी समजावया तसेच.

विज्ञान या विषयात गोडी वाढावी या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Chakan: चाकण तळेगाव महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर दोन कामगारांचा मृत्यू, दोघे गंभीर

चाकण तळेगाव महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर दोन कामगारांचा मृत्यू, दोघे गंभीर

सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा

चाकण तळेगाव महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका गंभीर बनला आहे.

दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

त्यामुळे कामावरून घरी निघालेला कामगार सुखरूप घरी पोहोचेल का, अशी भीतीच आता कामगार व्यक्त करत आहेत.

Bhandara: आदिवासी विद्यार्थ्यांचं भंडारा प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

भंडारा -

आदिवासी विद्यार्थ्यांचं भंडारा प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

आदिवासी विभागाच्या जाचक अटीशर्तीच्या आदेशाचा निषेध

पुण्यात काँग्रेसची बैठक सुरू,छात्रों की गुंज कार्यक्रमाचे आयोजन

हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती

राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्यात

छात्रों की गुंज कार्यक्रमाचे आयोजन

हर्षवर्धन सपकाळ पुर्वतयारी बैठक घेत आहेत

Pune: ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुण्यात ओबीसी समाजाची बैठक

पुणे -

पुण्यात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक

ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुण्यात ओबीसी समाजाची बैठक

लक्ष्मण हाके, मंगेश ससाने इतर ओबीसी नेते बैठकीसाठी उपस्थित

मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानंतर आणि जरांगे यांनी केलेल्या विरोधानंतर ओबीसी समाज पुण्यात बैठक घेत मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

बैठकीनंतर ओबीसी नेते पत्रकार परिषद घेत निर्णय करणार जाहीर

Dharashiv: सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील, अभिनेते सयाजी शिंदे यांचं मोठं विधान

धाराशिव -

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य

सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील; अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

अजित पवारांच्या नेतृत्वाप्रमाणेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी वक्तव्य करत व्यक्त केला विश्वास

धाराशिवमध्ये कॉलेजवयीन तरुणींमध्ये भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी

धाराशिवमध्ये कॉलेजवयीन तरुणींमध्ये भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. धाराशिवच्या कळंब शहरातील एका कॉलेज मधील तरुणी भर रस्त्यात आपसात भिडल्या.

मोशीतील महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर चौघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक छळ आणि पैशांच्या वाटपावरून वाद झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हिंजवडीत रस्त्यांवरील खड्ड्यांची पूजा आणि आरती करत अनोखे आंदोलन

हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा आणि आरती करत अनोखे आंदोलन केले.

अखंड भारत दिना निमित्त भाजपाचे रक्तदान शिबीराचे आयोजन 

नाशिकच्या मनमाड येथे अखंड भारत दिना निमित्ताने भाजप कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आले होते.गेल्या २२ वर्षा पासून हा उपक्रम राबविण्यात येत असून स्वातंत्र लढ्यातील सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांना रक्तदान करुन आदरांजली देण्यासाठी या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येऊन देशभक्तीच्या परंपरेला अखंडपणे सुरु ठेवत सलग २२ वर्षा पासून या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असते,रक्तदान शिबीरासाठी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरीक उत्सफुर्त सहभागी होत असतात.

डोमा आदिवासी आश्रमशाळेतील ‘भूतबाधे’ची भीती कायम, कथित भूतबाधा झालेल्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ साम टीव्ही च्या हाती 

मेळघाटातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.ज्या दिवशी काही मुली अचानक ओरडू लागल्या, जमिनीवर लोळू लागल्या, त्या घटनेचे व्हिडिओ आता समोर आले आहेत.

आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी वडेट्टीवारांनी अशोक उईके यांना सुनावले

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूंवरून काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी विकासमंत्र्यांना चांगलेच सुनावले. शाळांना मिळणाऱ्या अनुदानावरून पालकमंत्री अशोक उईके यांनी पत्रकारांसमोर सवाल उपस्थित केला. आम्ही देत असलेले अनुदान नेमके जाते कुठे, असा सवाल करीत वडेट्टीवरांकडेही आश्रमशाळा आहे, असे उईके म्हणाले. त्याला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील आश्रमशाळांच्या व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सांगलीत बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग गावात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मल्लेवाडी रोडवरील कॅनॉलजवळ बिबट्या आढळून आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

दिल्ली हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी

दिल्ली हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याचा मेल आला. त्यामुळे तातडीने हायकोर्ट खाली करण्यात आले.

बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार, मंत्री भरत गोगावलेंचा थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगरनंतर आता बीडमधील इमामपूरचंही नाव बदलणार असा सवाल उपस्थित झालाय. हा सवाल खुद्द मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालाय.

सावंतवाडीच्या आमसभेत आरोग्याच्या विषयावरून प्रचंड गोंधळ

सावंतवाडीच्या आमसभेत आज आरोग्याच्या प्रश्नावरून प्रचंड गोंधळ झाला. सावंतवाडीत आरोग्याचा प्रश्न गंभीर असून यासंदर्भात भीक मागो आंदोलन करण्यासाठी मंजूर द्यावी अशा पद्धतीची मागणी सावंतवाडीतील एका नागरिकाने केली. यावरून हा शब्द मागे घ्यावा अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

फलटणमध्ये मोठी कारवाई गोडाऊनमध्ये सापडल्या तब्बल २० चोरीच्या बुलेट

बारामती शहर आणि तालुक्यातून चोरीला गेलेल्या तब्बल २० हून अधिक दुचाकी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बारामती पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे,यात सर्वाधिक 'रॉयल एनफिल्ड बुलेट' (Bullet) गाड्यांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

मृत दिलीप काळे यांना प्रशासनाने मदत करावी नगरसेविका सविता काळे यांची मागणी

नाशिकच्या सातपूर परिसरात दिलीप काळे रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराचा धक्का लागला यामुळे दिलीप काळे खड्ड्यात पडले आणि खड्ड्यात असलेल्या दगडाचा मार लागल्याने गेले होते कोमात

कोमात असलेले दिलीप काळे यांचा 24 दिवसांनंतर झाला मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणमध्ये वाहतूक कोंडी पाच ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा

पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा कायम आहे. पाच ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असून खड्ड्यांतून कामगारांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. रात्री चाकण परिसरात झालेल्या अपघातांत दोन कामगारांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Gen Z वर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा- राज ठाकरे

  • विधानसभा विभाग प्रमुख यांच्याशी संवाद साधताना राज ठाकरेंनी विविध सूचनाही केल्यात

  • यात gen Z वर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा

  • मनसेच राजकारण यापुढे Gen Z ला सोबत घेऊन सुरु होणार

  • Gen z सोबत समरस व्हा आणि त्यांचे विचार समजून घ्या

  • तरुणांना काय वाटते ते बघा तुम्हाला काय वाटते ते बघू नका.

  • राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

नांदेडमध्ये निर्मिती होणाऱ्या राष्ट्रध्वजाला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मागणी

स्वतंत्र सेनानी स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविदभाई श्राफ यांनी 1967 साली नांदेडमध्ये मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. खादी कपड्याबरोबरच येथे राष्ट्रध्वज तेव्हापासून तर आजतागायेत तयार केले जातात. नांदेड मध्ये बनवलेले राष्ट्रध्वज काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या सरकारी कार्यालयावर फडकवला जातो.

नंदूरबार- नवापूर तालुक्यातील डोकरे आदिवासी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकरे तातडीने सुरू करावा, या मागणीसाठी आदिवासी टाईगर सेना, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने कारखाना आवारात जोरदार आंदोलन करण्यात आले. कारखाना बंद असल्याने शेतकरी आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीमुळे हा कारखाना सील केला आहे.

पुण्याच्या भोरमधील आंबवडे ते पोळवाडी शिव कावड यात्रा उत्साहात

- आंबवडेच्या प्राचिन नागेश्वर मंदिरात विधीवत पूजाअर्चा करुन कावड यात्रेचे प्रस्थान

- पोळवाडीच्या रिया नवनाथ पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती सेवा समितीकडून गेल्या पाच वर्षांपासून यात्रेचे आयोजन

- हर हर महादेवच्या जयघोषाने संपुर्ण मार्गावर शिवभक्तीचा जागर

- श्रावण महिन्याच्या सुरुवातीला केली जाते यात्रा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पुण्यातील एस टी स्टँड ची पाहणी

पुणे रेल्वे स्थानकाच्या एस टी स्टँड ची सरनाईक यांच्याकडून पाहणी

एस टी स्टँड भागातील स्वच्छता, सुरक्षा आणि कामकाजाबाबत सरनाईक यांच्याकडून आढावा

बीडमध्ये २४ कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्याचा पर्दाफाश; चार अनोळखी खातेदारांवर गुन्हा

बीड जिल्ह्यात विविध बँकांमधील मनी म्युल खात्यांचा वापर करून तब्बल २४ कोटी रुपयांच्या ऑनलाइन सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.

राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील तपासातून सायबर गुन्हेगारांचे मोठे सिंडिकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील ब्रम्हांड परिसरात सदनिकेचा काही भाग कोसळला

ठाण्यातील ब्रम्हांड परिसरात सदनिकेचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जणांना किरकोळ दुखापत झाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने तीन सदनिका तात्पुरत्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. पहाटे २ वाजून ४८ मिनिटांनी या घटनेची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

आदिवासी वसतिगृहाबाबतच्या नव्या शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थी संघटनांचे ठिय्या आंदोलन

- आदिवासी वसतिगृहा बाबतच्या नव्या शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थी संघटनांचे ठिय्या आंदोलन

- नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचे रात्रभर ठिय्या आंदोलन

- आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणींचा समावेश,रात्रभर कार्यालयाबाहेर ठिय्या

खासदार हरसिमरत कौर यांनी गुरुद्वारात केला अखंडपाठ

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल कुटुंबासोबत नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते.काल माता साहिब गुरुद्वारा येथून दर्शन घेऊन परतताना त्यांच्यावर हल्ला झाला.सध्या सुखबीरसिंघ बादल रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान बादल कुटुंबीयांनी नांदेडच्या गुरुद्वारात अखंडपाठ आयोजित केला होता.आज अखंडपाठची समाप्ती आहे. त्यासाठी स्वतः सुखबीरसिंघ बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर उपस्थित आहेत. हरसिमरत कौर बादल आणि त्यांची मुलगी गुरुद्वारात अखंडपाठ मध्ये उपस्थित झाल्या.

गांजा विक्रीवर एलसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

गांजा विक्रीवर एलसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

कणकवलीत 1.798 किलो गांजासह तिघेजण ताब्यात

नाशिकमध्ये अपघातात जखमी झालेल्या दिलीप काळे यांचा 24 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू

- नाशिकमध्ये अपघातात जखमी झालेल्या दिलीप काळे यांचा 24 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू

- 20 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर मार्गावर काळे यांना दुचाकी वाहनाने दिली होती धडक

- अपघातात दिलीप काळे यांच्या डोक्याला व छातीला झाली होती गंभीर दुखापत

पुढचे तीन दिवस पुण्यात रिमझिम पाऊस

पुढचे तीन दिवस पुण्यात रिमझिम पाऊस

घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडणार आहेत.

राज्यातील शिक्षकेत्तर भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षकेत्तर भरती बंदी उठली

राज्यातील शिक्षकेत्तर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाकडुन शिक्षकेत्तर भरती बंदी उठवण्यात आली आहे

अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे..

Pune : येरवडा येथील राज चौक परिसरात दोन गटांमध्ये जोरदार मारामारी

येरवडा येथील राज चौक परिसरात दोन गटांमध्ये जोरदार मारामारी

मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनाही अंधाधुंद मारहाणीत दुखापत झाली.

घटनेनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.

Jalna : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्हा दौऱ्यावर,

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल जालन्यात मुख्यमंत्र्यांचा सत्कार...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेशीम कोष बाजारपेठेचे उद्घाटन आणि भाजप कार्यालयाचे भूमिपूजन होणार...

हिंगोलीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वस्येला शासकीय कार्यालय तिरंगा ध्वजाच्या रंगाने प्रकाशाने नटली

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हिंगोलीत शासकीय कार्यालयांना विशेष सजावट करण्यात आली आहे,

जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका इमारतीवर तिरंगा ध्वजाचे रंग असलेले प्रकाश दिवे लावण्यात आले

या रोषणाईने हा परिसर लख्ख झाला आहे

Nagpur : जुन्या वादातून तीन तरुणांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली

- जुन्या वादातून तीन आरोपींनी एका तरुणाची शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना नागपुरात घडली

- या हल्ल्यात मध्यस्थी करायला गेलेला त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला

मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

पुण्यातील मनसे शहराध्यक्ष अनेक पदाधिकारी यांच्या जबाबदारीमध्ये बदल करण्याची बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

Pune : ऐतिहासिक शनिवारवाडा देशभक्तीपर गीतांनी दुमदुमला

ऐतिहासिक शनिवारवाडा देशभक्तीपर गीतांनी दुमदुमला

स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त सीआरपीएफ बँडची शानदार प्रस्तुती

सीआरपीएफच्या सुमधुर धुनांनी शनिवारवाडा परिसरात देशभक्तीचा जागर

देशभक्तीपर गीतांनी नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, देशभक्तीपर गीतांचा घेतला आनंद

Pune : कोंढव्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

कोंढव्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अवैध देहविक्रीचा पर्दाफाश

कारवाई दरम्यान मॅनेजरला पोलिसांनी घेतले ताब्यात

स्पा सेंटरमधून तीन महिलांची सुटका

प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गणेश नाईक यांनी केली टीका, युनिफाइड डीसीआरवरून टोला

युनिफाइड डीसीआर (तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणला होता, असे सांगत नाईक म्हणाले की, फडणवीस यांनी चांगल्या उद्देशाने धोरण तयार केले, परंतु काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा भलताच वापर केला.

एकनाथ शिंदे यांच्यावर गणेश नाईक यांनी केली टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निशूच्या वडिलांचा हल्लेखोर मोकाटच, गुन्ह्याची जाहीर कबुली, पोलिसांची लक्तरं वेशीला

नर्सेस बनल्या चिमुकल्यांसाठी 'देवदूत', रुग्णालयातील भीषण आगीतून 9 बालकं बचावली

राज्यात रिक्षा-टॅक्सींचा मीटर घोटाळा, इलेक्ट्रॉनिक चिपच्या मदतीनं प्रवाशांची लूट

CJP च्या आंदोलनानंतर काही तासांतच स्वतंत्र भारद्वाजला पकडले; त्या दिवशी काय घडलं होतं?

Crime: काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, ७ जणांना बेड्या; विश्वास नांगरे पाटलांची कारवाई, ४६ गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT