Manasvi Choudhary
चहासोबत आपण सर्वजण बिस्किटे खातो. पण बिस्किटे खाताना तुम्ही कधी बघितलय का? काही बिस्कीटांवर लहान लहान छिद्र असतात.
पण बिस्किटांवर लहान लहान छिद्र असण्यामागील नेमके कारण काय आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
बिस्किटांवरील छिद्र ही केवळ डिझाईन नाही तर त्यामागील देखील वैज्ञानिक कारण दडलं आहे.
बिस्किट बनवताना पिठात बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा मिसळलेला असतो. जेव्हा बिस्किट्स भट्टीमध्ये बेक करण्यासाठी पाठवली जातात, तेव्हा त्यातील उष्णतेमुळे वाफ तयार होते. जर बिस्किटांवर छिद्रे नसतील, तर ही वाफ आतच अडकून राहते.
बिस्किटांमध्ये जर वाफ आतच राहिली, तर बिस्किट चपटे आणि कुरकुरीत होण्याऐवजी पावासारखे फुगेल किंवा त्याचा आकार पूर्णपणे बिघडू शकतो.
बिस्किटांना हवा मिळून ते सर्व बाजूंनी एकसारखे कुरकुरी व्हावे, यासाठी छिद्रे अत्यंत महत्त्वाची असतात.
फॅक्टरीमध्ये बिस्किटे तयार करताना बेक करण्यापूर्वी मशीनच्या साहाय्याने त्यावर विशिष्ट अंतरावर लहान छिद्रे पाडली जातात. या संपूर्ण प्रक्रियेला 'डॉकिंग' असे म्हटले जाते.