युती होवो अथवा न होवो ,याल तर तुमच्यासह
नाही आलात तर आडवे करू..शिवसेना जिल्हा
प्रमुख अरविंद मोरे भाजपला आव्हान ,व्हिडियो व्हायरल
- रॅप सॉंग तयार करत सोशल मिडीयात व्हायरल करून समाजात माजवली दहशत
- पवन पवार फरार, पोलीसांकडून शोध सुरू
- पवन पवार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अनेक गंभीर गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद
चारचाकी वाहनामध्ये डांबून एका तरुणाला अमानुषपणे बेदम मारहाण करून भाईगिरी करीत दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित असलेल्या दादा लोकांची शेगाव शहर पोलिसांनी रात्री शेगावात धिंड काढली. ताडी परिसरात काही युवक भाईगिरी करून दहशत पसरवीत होते. त्यांच्याकडून गुन्हे देखील घडलेले आहेत. हा प्रकार थांबून भाईगिरी संपुष्टात आली पाहिजे. तसेच दहशत पसरविणाऱ्या युवकांवर अंकुश लागला पाहिजे. यासाठी शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन पाटील यांनी नुकत्याच गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींची शहरातून दिंड काढली आहे. आरोपीने एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवली होती. यासंदर्भात पिडीत युवकाच्या पत्नीने शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्या पतीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवुन लाकडी काठी व पट्टयाने बेदम मारहाण केल्याची घटना जगदंबा चौक परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जाधव, प्रमोद जाधव, रोहन चौके, अक्षय चौके व ईतर ३ ते ४ लोक सर्व रा. शेगाव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सर्व आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या चौघांची त्याच परिसरातून पायी धिंड काढली आहे. एव्हडेच नव्हे तर भर चौकात कान् पकडून माफी शुद्ध मागायला लावली.
आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणानिमित्त लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. नक्षीदार पणत्या आणि गृह सजावटीचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहेत. शंभर रुपयापासून ते हजार रुपये पर्यंत दिवाळीच्या पणत्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. मातीच्या पणत्या रंगबेरंगी डिझाईन्स, हस्तनिर्मित, आकर्षक नक्षीकाम असलेल्या विविध पणत्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश अशा विविध भागातून नांदेड शहरात पणत्या दाखल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पण त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या प्रभाग निहाय मतदार याद्यामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. अनेक मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभागाऐवजी इतरत्र गेल्याने मतदार त्रस्त झाले आहे. भोकरदन नगरपरिषदेचा प्रारूप मतदार यादीमध्ये ही माहिती समोर आली असून आतापर्यंत 650 पेक्षा अधिक मतदारांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहे.दरम्यान ही चूक नगरपरिषद प्रशासनाची नसून याला संबंधित बीएलओ जबाबदार आहे. ज्या नागरिकांची नावे त्यांच्या प्रभागा व्यतिरिक्त नोंदवली आहेत त्यांच्या तक्रारी बघून घटनास्थळी जाऊन पंचनामा करून कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे..
- नागपूर जिल्ह्याचा हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ...
- वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकाच घरात तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार,
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध यादीत घोळ आला समोर...य
- या तपासणीत वानाडोंगरी शहरातील राजीव नगर (सरोदीपुरा) प्रभाग क्रमांक ५ मध्ये एकाच घर क्रमांक १ मध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार राहात असल्याचे दाखविण्यात आले आहे.
- यासोबतच एकाच आडनावाचे तब्बल २७ व्यक्ती सुद्धा एकाच घरात राहात असल्याचे यादीमुळे समोर आले आहे.
- राज्य निवडणूक आयोगाने आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मुंबई येथील लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाकडून शालेय साहित्य वाटप करण्यात आलय.पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे हे प्रचंड नुकसान झाल्याने सामाजिक बांधिलकीची जपणूक करत लालबागचा राजा कडून वह्या,स्कुल बॅग,पाणी बॉटल,टी शर्ट,कंपासपेटी ह्या साहित्याचे 1800 कीट्स चे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
सावंतवाडी वेत्ये गावातील कलेश्वर मंदिरलगत असलेल्या ओढ्यात तब्बल 12 फुट लांब महाकाय मगरीला जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टीमने या मगरीला जेरबंद केले. गेले काही दिवस अत्यंत धोकादायक बनलेली ही मगर वेत्ये परिसरात फिरताना दिसून येत होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली होती.
- नाशिकच्या ओझरमधील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये स्वदेशी तेजस लढाऊ विमानांच्या बांधणीच काम अंतिम टप्प्यात आलं असून शुक्रवारी स्वदेशी तेजस लढाऊ विमान वायुदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. याआधी HAL मध्येच सुखोई एमकेआय ३० या ३०० लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात आलीय. सध्या याच सुखोई
विमानांच्या देखभाल दुरुस्तीचं काम HAL मध्ये केलं जात असून संरक्षण खात्याने तेजस या लढाऊ विमानांच्या बांधणीचं काम देखील HAL ला दिलं होतं. त्यासाठी स्वतंत्र प्रोडक्शन लाईन देखील HAL मध्ये टाकण्यात आली होती. मागील दीड वर्षांपासून तेजसच्या निर्मितीचे काम या ठिकाणी सुरू होतं. आता शुक्रवारी स्वदेशी तेजस वायुदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार पक्षाची बैठक
सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व आमदार आणि खासदार यांच्यासह जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार
निवडणुकीच्या तोंडावर पक्षात महत्वाचे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता
आमदार रोहित पाटलांच्या नावाची युवक अध्यक्षपदासाठी चर्चा, सध्या ही जबाबदारी मेहबूब शेख यांच्याकडे
अंबरनाथच्या खुंटवली परिसरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या पुढाकारातून ४ हजार नागरिकांना अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्याचं वाटप करण्यात आलं. या कीटमध्ये रवा, मैदा, साखर, पोहे, डाळ, तेल, शेंगदाणे, दलिया आणि चिवडा मसाला असा ४२८ रुपयांचा फराळ संच दिला गेला. मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून नागरिकांची दिवाळी गोड करण्याचं काम शिवसेना करत आहे. “नागरिकांचा आनंद हाच आमचा आनंद,” असं मनीषा वाळेकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बहुप्रतीक्षित ५२ गट व १०४ गणांच्या आरक्षण सोडतीमुळे कोणत्या गट-गणात कोण राहणार आणि कोण विस्थापित होणार याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. या आरक्षणानंतर ग्रामीण भागात राजकीय धुरळा उडणार आहे. यात जिल्हा परिषदेचे एकूण ५२ गट आहेत. नामाप्र (ओबीसी) साठी १४, एससी ११ व एसटी प्रवर्गासाठी ४ गट राखीव राहिल्यानंतर २३ गट खुले (सर्वसाधारण) राहतील. प्रमुख पक्षांत इच्छुकांची मोठी यादी असल्याने तिकीट कोणाला द्यावयाचे आणि वेटिंगवर कोणाचे ठेवायचे, याचा निर्णय घेताना पक्ष नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव या दोन समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यु फ्लॅग नामांकन मिळाले आहे. ISO नामांकना प्रमाणे हि प्रणाली आसून राज्यातील 12 समुद्र किनाऱ्यांचे ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी अर्ज गेले होते त्यापैकी या पाच किनाऱ्यांना पायलट म्हणून संधी मिळाली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्र किनांऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. डेन्मार्क येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थेमार्फत हे मानांकन दिले जाते. निकषपूर्तीनंतर हे किनारे जागतिक पातळीवरील आदर्श समुद्र किनारे म्हणून समोर येतील. जागतील दर्जाचे हे नामांकन मिळाल्याने पर्यटन वृध्दीच्या आशा पल्लवीत झाल्या असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याच्या दीड एकर शेतात लागवड केलेले मका पीक अतिवृष्टीने हातचे गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास आत्महत्या लावून केल्याची घटना घडली.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तयार केलेली महसूल विभागाची कार्यपद्धती आता राज्यभरात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. १५ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील पारदर्शकता, आणि उत्तरदायित्व समन्वय वाढविण्यासाठी एक परिपत्रक काढून सर्वांना प्रशिक्षित केले. ती कार्यपद्धती शासनाने अवलंबविल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कार्यपद्धतीमुळे संचिकांचा प्रवास वेगवान झाला, तक्रारींचे निवारण जलद झाले. लोकाभिमुख प्रशासन असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. मंडळ अधिकारी कार्यालय बळकटीकरणाचा अध्यादेश शासनाने १० ऑक्टोबर रोजी काढला. त्यानुसार सजा चावडीमध्ये ग्राम महसूल अधिकारी व मंडळ कार्यालयातील उपस्थिती व कामकाजाच्या वेळेबाबत मंडळ अधिकारी कडक पर्यवेक्षण करावे लागणार आहे. ६ महिन्यांत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी अध्यादेशातील सूचनेनुसार आढावा घेतील. तसेच प्रत्येक मंडळ कार्यालयाला आपले सरकार केंद्र मंजूर करतील. मंडळ कार्यालयातील उपस्थितीचे दिवस निश्चित करावे लागतील असे सांगण्यात आले आहे.
भाजप नेते, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या प्रचारसभेतून निलेश घायवळ यांचे रोहित पवार यांच्यावर टीका करणारे भाषण समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. आपल्या भाषणात निलेश घायवळ यांनी, रोहित पवार दादा म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, असे स्पष्टपणे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निलेश घायवळ यांनी रोहित पवारांवर वडीलधाऱ्यांची आणि शेतकरी बांधवांची काळजी न घेतल्याचा तसेच त्यांचा मान-सन्मान न राखल्याचा आरोप केला.
“जो आपल्या वडीलधाऱ्यांची किंमत करत नाही, त्याला दादा म्हणू नये,” असे घायवळ यांनी म्हटले. घायवळ यांच्या मते, दादा ही संज्ञा घरातल्या कर्त्या पुरुषासाठी किंवा मोठ्या भावासाठी वापरली जाते, जो सर्वांची काळजी घेतो. रोहित पवार हे या व्याख्येत बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या व्हायरल भाषणासोबतच, राम शिंदेंच्या पाया पडताना निलेश घायवळ यांचा एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निलेश घायवळ आणि रोहित पवार यांच्यातील शाब्दिक वाद चर्चेचा विषय बनला आहे. हे प्रकरण महाराष्ट्र राजकारणातील ताज्या घडामोडींचा भाग असून, यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेतकऱ्यांना कापूस विक्रीपूर्वी कपास किसान ॲपवर नोंद करण्याचे आदेश सीसीआय ने काढले असून शेतकऱ्यांनी या अॅपवर नोंद केल्यानंतर कापूस विक्रीपूर्वी बाजार समित्यांना त्याचे अप्रुव्हल द्यावे लागणार आहे हे अप्रुव्हल देण्यासाठी पणन विभागाने बाजार समितींना युजर आयडी दिला आहे ही प्रक्रिया राबविल्यानंतर कापूस विक्रीला आणल्यानंतर उलट तपासणी होणार आहे.
आगामी पैठण नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवाराचेच नाव नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीतून वगळण्यात आले आहे. नाव वगळणे किंवा स्थलांतरासाठी आपण कोणताही अर्ज केलेला नसतानाही नाव वगळण्यात आल्याचा आरोप तक्रारदार तथा इच्छुक उमेदवार अजय नाथप्रसाद पोरवाल यांनी केला आहे. अजय पोरवाल आणि त्यांची पत्नी प्रिया पोरवाल यांचे नावे यादीतुन गायब झाल्याबाबात त्यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले. मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला आसता ज्यांची नावे गहाळ झाली असतील त्यांनी नगरपालिकेकडे संपर्क साधावा असं आवाहन मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी केले आहे.
कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याची औषध घेतल्या नंतर मृत्यू
खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक प्रकृती बिघडली, यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रेफर केल्यानंतर झाला मृत्यू , तपासणी अहवालाची प्रतीक्षा
मेडिकलच्या औषधांची तपासणी, मध्यप्रदेशच्या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कप सिरपचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले
संवेदनशील प्रकरण असल्याने त्या बाळाची शवचिकित्सा करण्यात आली, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मेडिकल प्रशासनाने याची माहिती सहाय्यक आयुक्त औषधी यांना दिली
अन्न व औषध विभागाकडून मेडिकल मधून पाच औषधाचे घेतले नमुने, अहवालाची प्रतीक्षा
रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकांच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वपूर्ण मानला जात आहे. रायगड जिल्हा परीषदेच्या 59 आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या 118 सदस्यपदांची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे. या निवडणूका लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांचे भवितव्य या आरक्षण सोडतीतून ठरणार असल्यामुळे आजच्या सोडतीकडे राजकीय पक्षांबरोबरच इच्छुक उमेदवारांचे लक्ष देखील आजच्या या सोडतीकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका घेण्याच्या कामाला निवडणूक आयोग लागले आहे. सर्वात आधी जिल्हा परीषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले त्यानंतर पंचायत समिती सभापतीपदांची सोडत काढण्यात आली होती. जिल्हापरीषदेची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीची सोडत त्या त्या तालुक्यात काढण्यात येईल.
सांगलीच्या चांदोली परिसरातील बफर झोन परिसरातील मानवी वस्तीत अजगाराचे मोठ साम्राज बनले आहे.. परिसारातील मणदूर येथील वारणावती वसाहती मध्ये मोठ्या प्रणामात अजगाराचे साम्राज्य दिसुन येत आहे. गेल्या वर्षभरात पाच ते सहा वेळा वेगवेगळ्या प्रकारे रेस्क्यू करण्यात आले आहे. तर रात्री वारणावती येथील बस स्थानाकाजवळील एका टेलर्सच्या दुकानाजवळ भला मोठा अजगर रेसक्यु करण्यात आले.. साधरणाता २५ ते ३० किलो वजनाचा अजगर होता. तर त्याच ठिकाणी दुसरा एक घोणस जातीचा सर्पही होता. मात्र घोणस सर्प अंधारात गायब झाला.. त्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण आहे. मात्र अजगरावरा लक्ष ठेऊन असलेल्या नागरिकांनी येथील स्थानिक नागरिक व प्लॅनेट अर्थ फाउंडेशन शिराळा यांचे संयोगी स्थानिक कार्यकर्ते यांच्या मदतीने त्याचे रेस्क्यू करण्यात आले. यामध्ये बघ्याची तोबा गर्दी जमली होती. अजगराला सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले.
खासगी बसचालकांनी मनमानी पद्धतीने तिकीट दर आकारले तर प्रवाशांना करता येणार तक्रार
नागरिकांना ८२७५३३०१०१ क्रमांकावर अथवा rto.12-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार करता येणार
नागरिकांनी तक्रार करताना आपले नाव, मोबाईल क्रमांक, तिकिटाचे फोटो अशी माहिती पाठवावी, आरटीओकडून आवाहन
जादा तिकीट दर आकारले तर बसचालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे
दिवाळीच्या काळात खासगी बसचालकांनी तिकिटामध्ये मोठी वाढ केल्याचे चित्र आहे. याबाबत आरटीओकडे तक्रारीदेखील येत आहेत
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील टाकळी येथे भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरल्याची गावकऱ्यांची माहिती.
भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर मात्र आवाजाची किंवा धक्क्याची कुठलीही नोंद आढळली नाही.
अफवावर विश्वास ठेवू नये परत आवाज आला तर घराजवळ मोकळ्या जागेत थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन.
इजिप्तच्या शर्म-एल शेख येथे सोमवारी होणाऱ्या ‘गाझा शांतता शिखर परिषदे’त परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले. मात्र परराष्ट्र राज्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
इजिप्तच्या अध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘शांतता शिखर परिषद सोमवारी शर्म अल शेख येथे होणार आहे. या शिखर परिषदेचे अध्यक्ष अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष सिसी असतील. या परिषदेला २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गाझा पट्ट्यातील युद्ध संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट या परिषदेचे आहे. पश्चिम आशियात दीर्घ काळ शांतता राहण्यासाठी परिषदेत मंथन होईल. प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेच्या नव्या संधी या परिषदेमुळे खुल्या होतील.’
मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गावोगावी कार्यकर्ता संवाद यात्रेच्या निमित्ताने मावळचे आमदार सुनील शेळके आणि तालुक्याचे अध्यक्ष गणेश खांडगे सर्व तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर मावळातील एकही जागा महायुतीला देणार नाही. असे ठणकावून त्यांनी नाणे मावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संवाद यात्रेत सांगितले आहे... दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कसा असावा यावरही त्यांनी प्रकाश टाकला. आपल्या भागातील सर्व माहिती जर त्या उमेदवाराला नसेल तर मीच त्याची तिकीट कापेल असा सज्जन दम त्यांनी कार्यकर्त्यांना भरला.... भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तळेगाव नगरपरिषद मध्ये पाच वर्ष फिरकले नाही. ते आता म्हणायाला लागले लागा तयारीला. आता थांबायचं नाही . आमचा दहा नंबर वार्ड फिक्स आहे 12 नंबर 13 नंबर फिक्स आहे. एवढ्या जर तुमच्या जागा फिक्स झाल्या आणि काम मात्र काहीच नाही. मी नगरपरिषद मध्ये जाऊन सांगणार आहे. जाच काम असेल तर याला निवडून द्या अन्यथा घरी बसवा. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी तळेगाव, वडगाव, लोणावळा, या मधली उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार. विरोधकांना आमदार शेळके यांनी ठणकावून सांगितले पाडव्यापर्यंत तुमचा आणि आमचा संबंध, नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने जावे आम्ही आमच्या मार्गाने जाणार.. मात्र नाणे मावळतील जनतेला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसची एकही जागा मी दुसऱ्या पक्षाला देणार नाही. युती झाली नाही तरीही चालेल. आणि पंचायत समितीला ही एकही जागा मी दुसऱ्या पक्षाला देणार नाही. आणि मी छाती ठोकून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचा पहिला सभापती नानेमावळचाच होईल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.