Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुण्यातील शिरूरमध्ये एटीएसकडून चौकशी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पेट्रोल-डिझेलची बचत करा, राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

pune : पुण्यातील शिरूरमध्ये एटीएसकडून चौकशी

पुण्यातील शिरूर वारजे चाकण या भागातही एटीएसकडून चौकशी

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित ५७ जणांची महाराष्ट्र एटीएसकडून चौकशी सुरू

AKOLA : एटीएसची कारवाई; अकोल्यातून एक जण ताब्यात 

महाराष्ट्र ATS ची राज्यात मोठी कारवाई

पाकिस्तानी टोळीशी संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाताहेत

एकाला ताब्यात घेतल्याची माहिती

Pune: अखेर पुण्यात व्हिआयपी कल्चरला लागणार ब्रेक

पुणे -

अखेर पुण्यात व्हिआयपी कल्चरला लागणार ब्रेक

पुण्यातील महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा 50 टक्क्यांवर

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे प्रशासनाला निर्देश

आजपासूनच निर्णयाची अंमलबजावणी होणार

केंद्र सरकारच्या मार्गदर्शकानुसार पोलिसांचे निर्देश

कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री खासदार यांच्या ताफ्यातील गाड्या सुद्धा कमी होणार

Pune: येत्या शुक्रवारी पुणे जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक

पुणे -

येत्या शुक्रवारी पुणे जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक

जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये पुण्यातील पाणी समस्या यावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून ही बैठक झाली नसल्याने अनेक मुद्दे आणि विषय या बैठकीत चर्चिले जाणार

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला राहणार उपस्थित

बैठकीला पुणे शहरातील सर्व आमदार, प्रशासकीय अधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार

Nashik: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या घराची CBI कडून झाडाझडती

नाशिक -

- नीट परीक्षा गैरप्रकाराबाबत CBI अॅक्शन मोडवर

- आरोपी शुभम खैरनार भाड्याने राहत असलेल्या सुधा अपार्टमेंटमध्ये CBI आणि नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती

- शुभमच्या रूम पार्टनर्सची चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती

Nashik: महिला अत्याचाराच्या दाखल २ गुन्ह्यात अशोक खरातविरोधात न्यायालयात चार्जशीट

नाशिक -

- भोंदू अशोक खरात महिलांचं लैंगिक अत्याचार प्रकरण

- महिला अत्याचाराच्या दाखल २ गुन्ह्यात अशोक खरातविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल

- खरात प्रकरणात एसटी कडून लवकरच चार्जशीट न्यायालयास सादर केले जाणार

- अशोक खरात प्रकरणात SIT चा तपास अधिक व्यापक

- डीजीपींच्या आदेशानंतर ११ गुन्ह्यांचा तपास होता SIT कडे

- २४ अधिकाऱ्यांचे विशेष पथक २० मार्चपासून होते सक्रिय

- खरातविरोधात नाशिक-नगरमध्ये तब्बल १७ गुन्हे आहे दाखल

- ८ लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, फसवणूक प्रकरणांचं मोठं जाळं

- SIT कडून १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी, धक्कादायक पुरावे हाती

- सायबर पोलिसांच्या मदतीने SIT ने १३ हजारांहून अधिक आक्षेपार्ह लिंक्स हटवल्या, ४५१ अकाउंट बंद

- श्रद्धा, भीती आणि ब्लॅकमेलच्या जाळ्याचा SIT कडून पर्दाफाश

Pune: नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून आणखी एकाला ताब्यात घेतलं

पुणे -

नीट पेपर फुटी प्रकरण

याप्रकरणात आणखी एका संशयित तरुणाला पुण्यातील मांजरी येथून ताब्यात घेण्यात आले

सबंधित विद्यार्थी हा रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत आहे

पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

शेषराव सोळुंके असे नाव आहे

चौकशीसाठी ताब्यात घेतली

Pune: उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणसाठ्यात झपाट्याने घट, मावळात पाणीटंचाईची चिन्हे

मावळ तालुक्यात वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पावसाच्या अभावामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत असून, येत्या काळात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे मावळ तसेच पिंपरी चिंचवड करांनी आतापासूनच पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे ठरत आहे.

Nashik: भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक

नाशिक -

- भोंदू अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

- भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक

- सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला केली अटक

- सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातने उघडलेल्या ३२ खात्यांना आवारे याची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न

- खरातच्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी केली नामकर्ण आवारेला अटक

- नामकर्ण आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक

Navi Mumbai: नवी मुंबईतील सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.. 

सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना २२ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

रामदास जगताप याला सिडको कार्यालयात रंगेहाथ अटक करण्यात आली

नवी मुंबई एसीबी कडून करण्यात आली कारवाई..

मंत्री नितेश राणे घेणार EV कार 

० मंत्री नितेश राणे घेणार EV कार

० दोन दिवसात गाडी येणार

० नितेश राणेंची महेंद्राच्या EV ला पसंती

० पहिल्या राऊंडला पत्रकारांना दिल निमंत्रण

Bhandara : अवकाळी पावसानं शेकडो क्विंटल धान झालं ओलं

दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका भंडाऱ्याच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना बसलाय. सकाळपासून निरभ्र आणि प्रचंड उखडा असल्यानं उघड्यावर धानपिक ठेवण्यात आलं होतं.

राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाणे न्यायालयात हजर झाल्यानंतर पुढील सुनावणी आता 18 मे रोजी होणार आहे. परंतु तेव्हा राज ठाकरे यांना येण्याची गरज नसल्याचे नसल्याचे ठाकरे यांचे वकील प्रविण नागरे यांनी सांगितले आहे. तसेच घटनेच्या दिवशी राज ठाकरे नाशिक येथे असल्याचे देखील न्यायालयात सांगण्यात आले आहे

वाशिम बाजार समितीत सोयाबीनला 7450 रुपयांचा विक्रमी दर, चार वर्षानंतर मिळतोय अधिकचा दर.. 

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला विक्रमी दर मिळाला आहे...सोयाबीनला 7हजार 450 रुपयांचा क्विंटल दर मिळाला असून,हा दर गेल्या चार वर्षातील उच्चांक दर आहे.

DHULE: धुळ्यात शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत सव्वाशे क्विंटल पीक जळून खाक

धुळे तालुक्यातील नगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी रावण पाटील यांची पाच एकर क्षेत्रातील ज्वारी जळून खाक झाली आहे, या आगीत सुमारे सव्वाशे क्विंटल ज्वारी व चारा भस्मसात झाल्याने पाच लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे.

Nandurbar: दुर्गम भागातील आरोग्यसेवेला बळ देण्यासाठी आमदार पाडवींकडून 5 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील कुपोषण आणि माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव तालुक्यातील पाच अतिदुर्गम ग्रामपंचायतींसाठी मंजूर करण्यात आलेल्या पाच नवीन रुग्णवाहिकांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

Sangli: आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा 

शक्तीपीठ महामार्गावरून देवेंद्र फडणवीस यांची टिंगल टवाळकी केली जाते, पण आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल,असा गर्भित इशारा भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांना,नाव न घेता दिला आहे. वर्षानुवर्ष मंत्री राहून तुम्ही ईश्वरपूर ते पेठ रस्ता का केला नाही,अशी टीका देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांवर केली आहे.तसेच शेतकऱ्यांवर अन्याय करणारं,हे सरकार नाही,पण शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्यांनी त्या-त्या काळात विमाना,रस्ते, धरणे,आकाशात बांधली का ? असा खोचक सवाल देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना केलाय, शक्तिपीठ महामार्गाला सुरू असलेल्या विरोधावरून ते सांगलीमध्ये बोलत होते.

पुण्यात NEET पेपर फुटी प्रकरणी पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक

  • पुण्यातील गुडलक चौकात युवक काँग्रेस करणार आंदोलन

  • केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस करणार आंदोलन

  • देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची युवक काँग्रेसची मागणी

छत्रपती संभाजीनगरच्या मनपाआयुक्तांच्या सोबत माजी खासदार इम्तियाज जलील यांची बैठक

  • मनपाआयुक्तांच्या सोबत माजी खासदार इम्तियाज जलील यांची महानगरपालिकेत बैठक

  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक

  • बैठकीला MIM चे नगरसेवक उपस्थित

  • सत्तेतील पक्षातील नगरसेवकांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची इम्तियाज जलील यांची मागणी

  • इम्तियाज जलील अतिक्रमण केलेल्या नगरसेवकांची यादी आयुक्तांना देणार आहेत

अमरावतीत हनी ट्रॅप; शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 69 लाख

बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 69 लाख रुपये

शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पती पत्नी विरुद्ध नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल

मोबाईल रिचार्ज दुकानातून सुरू झाला होता हनी ट्रॅपचा खेळ

NEET : अहिल्यानगरमधून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं

NEET पेपरफुटी प्रकरणी मुंबई सीबीआयच्या (CBI) पथकाने अहिल्यानगरमधून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या या तिघांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये मुख्य संशयित धनंजय लोखंडे याचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Satara Rain News : साताऱ्यात जोरदार पावसाला सुरूवात

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाला, म्हणजेच दुष्काळी पट्ट्याला वळवाच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. माण तालुक्यातील दहिवडी परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या ८-१० दिवसांपासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत होती. हवेतील उष्म्यामुळे तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने नागरिक हैराण झाले होते. वाढत्या उष्णतेमुळे, लग्नसराई असूनही नेहमी गर्दीने फुलून जाणाऱ्या बाजारपेठेत दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत होता. मात्र, आज दुपारी दहिवडी परिसरात झालेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसह पाळीव प्राण्यांनाही या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सबका साथ सबका विकास आवाहन केले. नगरसेवकाच्या निधी वाटपावरून सर्व नगरसेवकांना पत्राद्वारे समान निधी देण्याची मागणी केली.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप न दिल्याने पत्राद्वारे समान निधी देण्याची मागणी केली. सबका साथ सबका विकास आवहान करत शहरातील कोणत्याही एका भागाला गटाला झुकते माप न देता सर्व प्रभागांना समान विकास निधी मिळावा अशी मागणी केली.

Solapur : सोलापूर जलसंपदा विभागाच्या पाठबंधारे विभागाचा ढिसाळ कारभार

सोलापूर जलसंपदा विभागाच्या पाठबंधारे विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला आहे. मागील चार महिन्यात चारवेळा इरिगेशन विभागाचा कॅनॉल मधून गळती झाली. कॅनॉल गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने पिकांचे नुकसान होत आहे.

NEET Student Protest : NTA मुख्यालयासमोर अभाविपाचं आंदोलन

NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि व्यवस्थेतील त्रुटींविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने नवी दिल्लीतील NTA मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षेतील पारदर्शकता, पेपर व्यवस्थापनातील सुधारणा आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. NTA विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचा आग्रह धरला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.

भोंदू खरातला 5 दिवसांची पोलिस कोठडी | Ashok Kharat News

‘भोंदू खरात’ प्रकरणात अशोक खरात याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि इतर संभाव्य लिंक तपासल्या जात आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

भोंदू खरात प्रकरण तापलं! अशोक खरातला पोलिस कोठडी

काकडी-मिरचीच्या दरात घट,भाव कमालीचे  घसरले

सध्या नाशिक जिल्ह्यात भाजीपाला दरात कमालीची घट झाली असून,नाशिकच्या कळवण तालूक्यात अनेक शेतकरी उन्हाळ्यात मिरचीची लागवड करत असतात,मात्र सध्या मिरचीला बाजार समितीत केवळ २५ रुपये किलोचा दर मिळत आहे.तर काकडीच्या २० किलोच्या क्रेटला ५०० रुपये म्हणजेच दोन ते अडीच रुपये दर मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे,खरे तर उन्हाळ्याच्या दिवसात काकडीला मागणी असते तसेच मिरचीला सुध्दा मागणी असते.मात्र मिळणारा दर पाहता शेतक-यांचा खर्च वसूल होत नसल्याच शेतकरी सांगताय.

विरार खदान हत्याकांडाने खळबळ; दोन आरोपी अटकेत, अन्य संशयितांचा शोध सुरू

विरार पूर्वेतील शिरगावजवळील गडगापाडा येथे बेकायदेशीर दगडखाणीविरोधात आवाज उठवणारे ग्रामस्थ आत्माराम पाटील यांची खदान माफियांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावरही लाकडी दांडक्यांनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून १० ते १२ आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. घटनास्थळी रक्ताचे डाग आणि फुटलेल्या काचा पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिल्लीत NEET च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

पेपर फुटीप्रकरणात दिल्लीत NEET च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

ठाण्यात महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

ठाणे महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर शारमिंग डिंगा यांनी राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा परिसरात घडली. त्या हकीम अजमल खान रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. ग्रेस स्कोअर इमारतीतून उडी घेत त्यांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात ATS ची कारवाई

जिल्ह्यात दहशतवादविरोधी पथकाने काही ठिकाणी धाडी टाकून संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोंडपिंपरी तालुक्यात ही कारवाई करण्यात आली असून, पाकिस्तान समर्थनार्थ काही गोष्टी डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात आल्यामुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जाते.

पंढरपुरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट

वाखरी ते पंढरपूर दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीने सुरू असतानाच हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. आठ किलोमीटर महामार्गासाठी सुमारे 84 कोटी रुपये खर्च करण्यात आले‌ आहेत. उद्या या महामार्गाची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात येणार आहेत.

कल्याणमध्ये अल्पवयीन मामाने केली भाच्याची हत्या

कल्याणमध्ये अल्पवयीन मामाने केली भाच्याची हत्या

मोबाईलवर लुडो खेळण्यावरून झाला होता वाद

रात्री भाचा गोकुळ नेपाली झोपला असता मामाने चाकूने केली हत्या

खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती

अमरावतीत हनी ट्रॅप; बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 70 लाख

शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पती पत्नी विरुद्ध नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल

मोबाईल रिचार्ज दुकानातून सुरू झाला होता हनी ट्रॅप चा खेळ

आधी शेतकऱ्यांनी दिली होती दहा हजार उसनवारीवर त्यानंतर संबंधित महिलेच्या संपर्कात आला होता शेतकरी

महिलेने आपल्या मायाजालामध्ये या शेतकऱ्याला ओढले आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू केली

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून इलेक्ट्रिक गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून इलेक्ट्रिक गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

एरव्ही 15 हून अधिक गाड्या शिंदे यांच्या ताफ्यात असताना आज केवळ आठ गाड्या दिसून आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर शिंदे यांनी देखील त्यांचा ताफा कमी केला आहे.

शिंदे थोड्याच वेळात मुंबईला पोहोचणार आहेत

Nashik Nida Khan Case : निदा खानला लपवण्यामध्ये इम्तियाज जलील याचा हात - संजय शिरसाठ

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा, मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी चार लाख मदतीची

गलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी येथे वादळी वाऱ्याने भिंत पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मोटेवाडी येथे मंगळवारी मरगुबाई देवीच्या यात्रे दरम्यान वादळी वाऱ्याने चिरा-विटांची भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाला होता,तर 12 जण जखमी झाले होते

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची अहिल्यानगरमध्ये कारवाई

अहिल्यानगर मधील संशयित सीबीआयच्या ताब्यात

सी बी आय ची अहिल्यानगर मध्ये सकाळी छापेमारी

नाशिकच्या शुभम खैरनार याच्याशी संशयित तरुणाचा संबंध असल्याचा यंत्रणांना संशय

Solapur: भोंदूबाबा प्रकरणात तक्रारी दिल्यास गुन्हे दाखल करू, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी याचं आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील दोन भोंदूबाबांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जर नागरिकांनी तक्रारी दिल्यास यापुढेही भोंदूबाबांवर आम्ही गुन्हे दाखल करू. भोंदूबाबाबाबत नागरिकांच्या तक्रारी असतील तर लोकांनी न घाबरता पुढे यावे.अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,अशी भूमिका कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत मांडली. फुलारी हे जिल्ह्यातील पोलिसांच्या वार्षिक तपासणीसाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते.अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.आतापर्यंत दोन ठिकाणी भोंदूबाबा विरोधात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.त्याचा सखोल तपास सुरू आहे.तपास पूर्ण झाल्यानंतर याची पूर्ण माहिती देऊ,असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Pune: पुणे शहरातील सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू

पुणे शहरातील सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू, पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती

पुणे शहरातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मुबलक साठा

शहरातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोलचा सुरळीत पुरवठा

मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्हा दौऱ्यावर

मुरूड मधील जंजिरा किल्ला परिसरातील जेट्टी चे आज त्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मिळणार आता सुरक्षित प्रवास

समुद्रातील उंच लाटा आणि खराब हवामानापासून मिळणार सुरक्षा

Sangli: मोटेवाडी गावातील मरगुबाई देवस्थान मंदिराशेजारील भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू; देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस

सांगली जिल्ह्यातील मोटेवाडी गावातील मरगुबाई देवस्थान मंदिराशेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांपैकी तिघे हे जत तालुक्यातील असून तिघे हे कर्नाटकातील आहेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

या घटनेत 13 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज, जत, संख आणि विजापूर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

NEET: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे तीन पथके

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे तीन पथके

पुणे पोलिसांच्या तीन पथकांकडून घेण्यात येतोय संशयिताचा शोध

नाशिकच्या शुभम खैरनार याच्याशी संशयित तरुणाचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय

संबंधित तरुण अहिल्यानगरचा असून पुण्यातील अनेकांना महाविद्यालयात प्रवेश दिल्याचा संशय

Maharashtra Weather: पुढील चार ते पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट

पुढील चार ते पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट

राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यात पारा 40 ते 42 अंशावर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा

कोकणात उष्णतेची लाट नसली तरी तापमान अधिक राहणार असल्याची हवामन विभागाकडून माहिती

नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांवर पोषक वातावरण

Dharashiv:धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना दिलासा ,336 कोटींचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा

धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना दिलासा,336 कोटींचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा

विमा कंपनीने घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने फेटाळले,आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची माहिती

जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 44 शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयाचा पिक विमा वितरित करण्याचे आदेश

खरीप 2025 हंगामातील पिक विम्या बाबत मागील अनेक दिवसापासून सुरू होता वाद

668 पीक कापणी प्रयोगावर विमा कंपनीने नोंदवला होता आक्षेप

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा ठाणे न्यायालयात जाणार

राज ठाकरे हे आज पुन्हा एकदा ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. रेल्वे पोलीस भरती प्रक्रिये संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ही सुनावणी पार पडत असूनl याआधी देखील राज ठाकरे यांना ११ मनसे कार्यकर्त्यांसह न्यायालयात उपस्थित राहावे लागले होते. दरम्यान, मागील सुनावणीवेळी वकिलांकडून न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला होता की, राज ठाकरे यांना वारंवार न्यायालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर संबंधित १० मनसे कार्यकर्त्यांसोबत आणखी एक सुनावणी पार पडली होती. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी होत असल्याने राज ठाकरे यांना स्वतः न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

Nashik: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोध चिन्हाचं आज अनावरण

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोध चिन्हाचं आज अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अधिकृत बोधचिन्हाचं अनावरण करण्यात येणार

मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर सकाळी ११.३० वाजता बोध चिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जागतिक ओळखीचे प्रतीक ठरणाऱ्या या बोध चिन्हाचं अनावरण साधू, महंत, आखाड्यांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार

कार्यक्रमासाठी साधू, महंत आणि आखाड्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण

अनावरण सोहळ्यानंतर बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांना धनादेशाचे वितरण करण्यात येणार

NEET: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत?

नाशिक मधून अटक केलेल्या तरुणाचा एक साथीदार पुण्यात असल्याची शक्यता

पुणे पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू

संबंधित तरुण हा मूळचा अहिल्यानगर येथील असल्याची माहिती

मंगळवार दुपारपासून संबंधित तरुणाचा मोबाईल बंद असल्याची पोलिस सूत्रांची माहिती

नाशिक मधील आरोपी खैरनार याच्यासोबत असलेला आणखी एक तरुण हा पुण्याचा असण्याची शक्यता

पुणे पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध सुरू

Nasrapur: नसरापूर प्रकरणात येत्या १ ते २ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणार

नसरापूर प्रकरणात येत्या १ ते २ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणार

नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाची नियुक्ती करण्यात येणार

खटल्याची सुनावणी तात्काळ सुरू करून याप्रकरणी न्याय निवाडा लवकर करण्यासाठी सरकारचा प्रयत्न

पुणे ग्रामीण पोलिसांकडून संबंधित तपास जवळपास पूर्ण

नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे ची १४ दिवसांची पोलिस कोठडी उद्या संपणार

याप्रकरणात राज्य सरकारने नुकतीच अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे

NEET पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनार CBI च्या अटकेत

NEET पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनार CBI च्या अटकेत

नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना

रात्री उशिरापर्यंत CBI कडून आरोपीची कसून चौकशी

आरोपीच्या पेपरफुटी रॅकेटमधील भूमिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचा फोकस

स्थानिक तपासानंतर आता CBI कडून देशव्यापी लिंकचा शोध सुरू

शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता

Dharashiv: धाराशिवमध्ये आंबा उत्पादनात 80% घट,उत्पादकांना आर्थिक फटका

धाराशिव तालुक्यातील आंबेहोळ येथील शेतकरी आणि एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या विजय कांबळे यांनी गेल्यावर्षी चार एकरवरील केसर आंब्याच्या बागेतील आंबा परदेशात ओमान मध्ये एक्सपोर्ट केला त्यातून त्यांना चार लाखाचे उत्पादन मिळाले होते.मात्र यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका या आंबा उत्पादक शेतकऱ्याला बसल्याने आंब्याच्या उत्पादनात 80 टक्के घट झाली.त्यामुळे आंबा एक्सपोर्ट करता आला नाही.शेतात निघालेला आंबा घरोघरी जाऊन विकण्याची वेळ या आंबा उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.

Shegaon: सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्र शेगावात लाखो भाविकांची गर्दी.

आखाती देशात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन वाचवण्यासाठी केलेल आवाहन याचा कुठेतरी नागरिकांना विसर पडत असल्याचे दिसतय.. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे नागरिकांनी पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांवर धाव घेतली आहे. आणि अशा ठिकाणी जाताना नागरिक स्वतःची कार किंवा स्वतःच्या वाहनाने पोहोचत आहे त्यामुळे पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळी आपल्याला हजारो वाहने बघायला मिळत आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भावी घेत आहेत

Yavatmal: यवतमाळमध्ये सहा महत्त्वाच्या समित्यांवर महायुतीत खलबतं

यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाच्या समित्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीत राजकीय हालचालींना वेग आलाय जागा वाटपासाठी ५०-३०-२० चा फार्मूला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा नियोजन समिती,अभ्यागत समितीसह तब्बल सहा महत्त्वाच्या समित्या वरील नियुक्तीसाठी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली असून जागा वाटपाचे प्राथमिक गणित निश्चित झाले आहे.

Yavatmal: यवतमाळात पीकविम्यावरून भाजप-शिंदे गट आमने सामने

यवतमाळ जिल्ह्यात खरिप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले,यावरून भाजप आणि शिवसेना शिंदेगट आमने सामने आले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 134 कोटी रूपयांचा पीकविमा उतरविला.तरी देखील पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले यवतमाळात सोयाबीन पीकविम्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात संघर्ष पेटला असून पालकमंत्र्यांविरोधात भाजप आक्रमक झाली असून तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार.या मुद्द्यावर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे.

अकोल्याला उष्ण लाटेचा इशारा, तापमान ४५ पार

अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाटेचा इशारा. नागपूर हवामान विभागाचा वर्तविला इशारा. नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे 13 ते 16 मे दरम्यान अकोला जिल्ह्यात तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता. काल (मंगळवारी) अकोल्यात 45.6° अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर सोमवारी नोंदवल्या गेलंये 45.1 अंश सेल्सिअस तापमान. दरम्यान, अकोलेकरांना दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, प्रशासनाकडून आवाहन. दरम्यान, अकोला जिल्ह्यात

नवी मुंबई पालिकेच्या भ्रष्टाचाराची भरत जाधव यांच्याकडून पोलखोल

नवी मुंबई महापालिकेच्या कामाची माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष यांनी पोलखोल केली आहे. सिवूडसमध्ये गरज नसताना देखील चुकीच्या पद्धतीने गटाराची कामं केली आहेत. तसेच उद्यान विभागात टाकण्यात आलेल्या मातीची रॉयलिटी भरली नाही तसेच शहरात बसवणायत आलेल्या कचरा कुंड्या यात कागदावरील व प्रत्यक्षात बसवण्यात आलेल्या कुंड्या यात जवळपास 34 ते 35 कुंड्यांची तफावत असल्याच भरत जाधव शासन दरबारी मांडलं आहे. .. तसेंच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून नुकसान भरपाई देखील घ्यायची मागणी जाधव यांनी केलीय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG च्या नियमात पुन्हा बदल; आता ग्राहकांना आणखी पैसे मोजावे लागणार

Beed : बीडमध्ये धक्कादायक प्रकार! कराडच्या गुंडांकडून महिलेला अमानुष मारहाण, प्रायव्हेट पार्टवर बेल्टने हल्ला

Maharashtra News Live Update: धाराशिव-बीड-लातूर विधान परिषदेसाठी सर्वांचे सर्व 14 अर्ज वैध

भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल! अश्या पद्धतीने बनवा कोकणी स्टाईल फणसाची झणझणीत भाजी

Silver Chain Designs: रोजच्या वापरासाठी बेस्ट आहे चांदीची चेन; कमी बजेटच्या या ७ ट्रेंडी डिझाईन्स नक्की पाहा

SCROLL FOR NEXT