Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक १२ जून २०२५, छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत, महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

पुण्यातील संन्यस्त खडग या नाटकाच्या वेळी वंचितच्या कार्यकर्त्यांच्या गोंधळ

गौतम बुद्धांच्या अपमान केल्याचा आरोप

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू होत नाटक

शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

किल्ले रायगडासह स्वराज्यातील 12 किल्ल्यांना युनिस्कोच्या यादीत स्थान मिळाल्याने आज किल्ले रायगडावर शासकिय अधिकारी आणि शिवप्रेमींनी जल्लोश सजरा केला. लिझिम खेळत विद्यार्थ्यांनी मिरवणुक काढली. नगारखान्याचे पुजन करीत मान्यवरांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्प आर्पण करीत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

साळेगाव जवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

बीड केज कळंब रस्त्यावर साळेगाव जवळ कार तीन- चार वेळा पलटी होवून झालेल्या अपघातात चालकासह त्यांचे वृद्ध वडील जखमी झाला आहे.

खा. निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे...

खा.निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे...

नगर मनमाड रोड चे काम सुरू करावे या मागणी करिता दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू होते उपोषण..

या रस्त्याचा कार्यरंभ एप्रिल मध्ये जाहीर होऊनही काम सुरू होत नव्हते म्हणून सुरू होते उपोषण..

राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू झाले असल्याचे लेखी पत्र दिल्या नंतर उपोषण सुटले ..

माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन सोडले उपोषण..

Yavatmal : यवतमाळमध्ये शिंदेसेनेचे हजारो कार्यकर्ते भाजपात

राळेगांव विधानसभा मतदार संघातील शिंदे सेनेतील नाराज हजारो पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या नेतृत्वात हजारो शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळच्या शासकीय विश्रामगृहात भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.यामुळे राळेगांव विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेला खिंडार पडल्याचं बोलल्या जात आहे.

Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

खासदार निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे घेतलं आहे.

नगर मनमाड रोडचे काम सुरू करावे, या मागणी करिता दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू होते उपोषण..

या रस्त्याचा कार्यरंभ एप्रिल मध्ये जाहीर होऊनही काम सुरू होत नव्हते म्हणून सुरू होते उपोषण..

राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू झाले असल्याचे लेखी पत्र दिल्या नंतर उपोषण सुटले ..

माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन सोडले उपोषण..

नवी मुंबई विमानतळ ३० सप्टेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार - देवेंद्र फडणवीस

शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

किल्ले रायगडासह स्वराज्यातील 12 किल्ल्यांना युनिस्कोच्या यादीत स्थान मिळाल्याने आज किल्ले रायगडावर शासकिय अधिकारी आणि शिवप्रेमींनी जल्लोष साजरा केला. लिमझिम खेळत विद्यार्थ्यांनी मिरवणुक काढली. नगारखान्याचे पुजन करत मान्यवरांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्प आर्पण करीत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

Pune : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ उपस्थितीत

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या कार्यालयाजवळ भाजप च्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

खासदार मोहोळ यांचे २४*७ कार्यालय पुण्यातील जंगली महाराज रस्त्याजवळ कार्यान्वित

भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ वन मंत्री गणेश नाईक बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते, करण्यात आले

ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्या दोन्ही बाजूस जीने बनवून मध्यभागी उंच चबुत-यावर भगवान गौतम बुद्ध यांचा 2.80 मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडलेली असून त्यासोबत सामाजिक शांती व मानवतेच्या संदेशाचेही प्रसारण होत आहे

मुदखेड सीआरपीएफ केंद्रात दीक्षांत समारंभ उत्साहात.

मुदखेड येथे सिआरपीएफचे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात देशभरातील प्रत्येक राज्यातुन नियुक्त झालेला सरळसेवा भरतीतील अधिकारी व जवानांना प्रशिक्षण दिले जाते. येथील सीआरपीएफ केंद्रात 148 जवानांच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. देशसेवेसाठी सज्ज झालेल्या या जवानांनी यावेळी धडकी भरवणारे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

कठडे नसलेल्या बंधाऱ्यावरून चारचाकी कोसळली स्थानिकांनी चालकाला वाचवले..

पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या बंधाऱ्यावरून वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने चार चाकी बंधाऱ्यात कोसळल्याची घटना घडली आहे..यावेळी स्थानिक मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत गाडी चालाकाचे प्राण वाचवले..या पुलाला कठडे नसल्याने सातत्याने या ठिकाणी अपघात घडत आहेत..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रथम वर्ष कार्य अहवाल प्रकाशन बालगंधर्व येथे होणार

साडे चार वाजता कार्यक्रम सुरू होईल

कार्य अहवाल प्रकाशनानंतर खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

नव्याने बांधलेल्या धडगाव बसस्थानकात घाणीचे साम्राज्य मनसे आक्रमक

धडगाव शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची तर अत्यंत दुरवस्था झाली असून, त्यांची नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र आहे.

या गंभीर प्रकारामुळे धडगाव मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बसस्थानकातील अस्वच्छतेवरून मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर येत्या काही दिवसांत बसस्थानकाची स्वच्छता करण्यात आली नाही आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था सुधारण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. यामुळे प्रशासनावर तात्काळ उपाययोजना करण्याचा दबाव वाढला आहे.

Maharashtra Live News Update : रोहित पवार यांची पत्रकार परिषद

इडीने माझ्या नावाचं आरोपपत्र दाखल केलं आहे. एमएसी बँककडून २०१२ मध्ये कर्ज घेतलेले होते. त्यासाठी हे आरोपपत्र दखल केलं होते. २००९ ला कन्नड सहकारी साखर कारखान्यासाठी कर्ज घेतले होते, पाहिल्यादा टेंडर काढले. एम ए सी बँकने आर्थिक तफावत असल्याचा रिपोर्ट नाबार्ड ला २०११ ला दिला. तिसऱ्यांदा कन्नड कारखान्याचे टेंडर निघाल्यानंतर आम्ही बारामती ॲग्रोने हा कारखाना घेतला. १०० लोकाची नावे नाबार्ड ने घेतली होती.
रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार (शरद पवार गट)

राज्यातील सरकार अतिशय असंवेदनशील - खासदार अमर काळे

सरकार अतिशय असंवेदनशील असं सरकार आहे. संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही लाज वाटते. दुसरीकडे राज्याचे मंत्री संजय सिरसाट यांच्या घरातील व्हिडीओ जो व्हायरल झाला त्यात बॅगेत नोटाचे बंडल दिसत आहे.एवढया नोटा त्यांच्याकडे आल्या कुठून, कोणाच्या होत्या याचा तपास करण्यात यावा. एखाद्या सामान्य थोडीफार अधिकची संपत्ती सापडल्यास त्याच्यावर कारवाई केली जातं मग हाच न्याय मंत्र्याला का नाहीय असा प्रश्न वर्धेचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी उपस्थित केला. ते वर्धेच्या नियोजन भवन येथे दिशा समितीच्या बैठकीसाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूरचा पन्हाळगड जागतिक वारसा यादीत, मात्र पन्हाळगडवासिय चिंतेत

जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा गडाचा समावेश झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ऐतिहासिक वारसा असणारा हा पन्हाळगड आता जगाच्या पाठीवर आपला ठसा उमटवणार आहे. पन्हाळगडाची जागतिक वारसा स्थळात नोंद झाल्याची माहिती समजतात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात अभिवादन केलं. तर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला ही त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. देशभरातील 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाल्याचा आनंद सगळ्यांनाच आहे. आता आपली जबाबदारी वाढली असून येणाऱ्या पर्यटकांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा विचार करून त्या पद्धतीने पन्हाळगडावर लवकरच नियोजन केले जाईल असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे पन्हाळगड वासियांच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पन्हाळगडाचा समावेश केल्यानंतर काही नियम आणि अटी लादण्याची भीती पन्हाळगड वासियांना वाटते. तसेच पन्हाळगडाचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पन्हाळगडवासिया सध्या चिंतेत आहेत.

आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सांगलीत आंदोलन

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बद्दल बदनामीकारक विधान केल्या प्रकरणी सांगलीमध्ये भाकपा व पडळकर समर्थकांकडुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आला आहे.संतप्त पडळकर समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळाला जोडे मारत, बांगड्यांचा आहेर करत निषेध नोंदवला आहे.शहरातल्या कॉलेज कॉर्नर या ठिकाणी भाजपा व पडळकर समर्थकांच्याकडून निदर्शने करत आमदार जितेंद्र आव्हाडांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर, अशी टीका करण्यात आली होती.तसेच पडळकर यांच्या बाबतीत आव्हाडांकडून पुन्हा बदनामीकारक विधान झाल्यास,त्यांना जशास तसे उत्तर देऊ,असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वैभव या बारा किल्ल्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आज अनुभवलं आहे. - या सर्व गड किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाला ही भारतीयांकरिता, महाराष्ट्राच्या जनतेकरीता, शिवप्रेमीकरिता मोठा यश भारताला मिळालं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र

धक्कादायक, अमरावतीच्या मेळघाटात अजूनही 2206 बालके कुपोषित

वर्धा  पालकमंत्र्यांनी केली पडझड झालेल्या घरांची पाहणी

वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलेच नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या आठ तालुक्याच्या 54 मंडळपैकी 50 मंडळमध्ये अतिवृष्टी झालीय. यशोदा, वर्धा व वणा नदीसह नाल्याना पूर आला यात मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे. आज वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर दौऱ्यावर आहे त्यांनी वर्धा तालुक्याच्या पवनार येथे पावसामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केलीय. यावेळी पालकमंत्री यांनी नुकसानग्रस्ताना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच सांगितलंय.

विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत मोठा अनर्थ टळला

विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील मोठा अनर्थ टळला आहे‌ . गर्दी कमी झाली आणि वायर तुटल्याने रांगेतील लोखंडी उड्डाण पुलालमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने तीन श्वानाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांगेत वायर तुटल्याने पंचमुखी मारुती मंदिराजवळ विद्युत प्रवाह सुरू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन श्वानाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अवघ्या काही वेळ आधी त्या भागातून दर्शन रांग पुढे गेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठाणे बेलापूर रोडवर कंटेनरचा अपघात

ठाणे बेलापूर रोडवर कंटेनरचा अपघात झाला आहे . जेएनपीटीहून ठाण्याचे दिशेने जाताना घणसोली जिओ नॉलेज सेंटर बाहेरील उड्डाणपूला जवळ हा अपघात झाला आहे.

उड्डाणपूला खालून जाण्याऐवजी करून जाताना दुभाजकाला आढळून कंटेनर पलटी झाल्यानंतर हा अपघात झाला असून या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये .

या अपघातामुळे ठाणे बेलापूर रोडवर बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुक कोंडी झाली असून वाहने धीम्या गतीने सुरू आहेत. सध्या वाहतूक विभाग वाहतूक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात आहे.

- जीएसटी अधिकाऱ्याने केली फसवणूक, तरुणांच्या वडिलांनी केली आत्महत्या

मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून व्हाट्सएप केले आहे. हे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये...' अशी चिठ्ठी लिहून ठेवत शासकीय नोकरीच्या आमिषाने फसलेल्या एक तरुणाच्या वडिलांनी सिडकोत मामेभावाच्या घरी आत्महत्या केलीये. या घटनेने हळहळ व्यक्त होत असतानाच तरुणांना नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या जीएसटीचे निरीक्षक सचिन बबनराव चिखले याची ठगेगिरीही उघडकीस आली आहे. त्याच्यावर अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण सोनवणे यांना त्यांच्या ओळखीचे सचिन चिखले याने मुलास आणि इतर नातेवाइकांच्या मुलांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यापोटी वेळोवेळी सव्वा कोटी रुपयेही घेतले, मात्र नोकरीस लावून दिलेले नाही. चिखले याच्याकडे पैसे मागितले असता त्याने परतही दिले नाही. सोनवणे यांनी ज्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते. ते लोक पैशांसाठी तगादा लावत असल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते. त्यातून त्यांनी नाशिकच्या सिडकोत गळफास घेत जीवन संपविले आहेत. त्यावरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल.
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

सोशल मिडीयावर मेसेज टाकून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सोशल मीडियावर मेसेज टाकून तसेच फेसबुकवर आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून आत्महत्येच्या विचारत असलेल्या एका परप्रांतीय युवकाचा जीव दापोली पोलिसांच्या पथकाने वाचवला आहे. जंग बहादूर रणवीर सिंग असं या युवकाचं नाव आहे. दापोली शहरातील काळकाई कोंड येथे ही घटना घडली. रत्नागिरी सायबर सेल सजगता व दापोली पोलिसांची तत्परता यामुळे युवकाला आत्महत्येपासून परावृत्त करत त्याचा जीव वाचवण्याचं मोठं काम पोलिसांनी केलं आहे. आई-वडिलांशी झालेल्या वादातून आई-वडिलांना घाबरवण्यासाठीच त्याने हा प्रकार केला होता. मात्र त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार सुरू होते अशी ही माहिती या सगळ्या धक्कादायक प्रकारात समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलून राजमाता जिजाऊ नगर करा : उमा खापरे भाजप विधान परिषद आमदार

पिंपरी चिंचवड शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक असा मोठा वारसा लाभला आहे. तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट देखील पिंपरी चिंचवड शहरातील मंगलमूर्ती वाड्यात झाली होती. आणि पिंपरी चिंचवड हा शहर भोसरी आणि चिंचवड अशी इतर महत्त्वाची गाव मिळून बनल असल्याने, या शहराला राजमाता जिजाऊ च नाव देण्यात यावं अशी मागणी उमा खापरे यांनी विधान परिषदेत केली आहे. त्यासोबतच उमा खापरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन पिंपरी चिंचवड शहराचे नाव राजमाता जिजाऊ नगर करण्याची मागणी केली आहे

संजय शिरसाट याना काय मान आहे? ज्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. स्वताच्या घरात कपडे उघडे ठेवतात का? मानहानी दावा करायला हवे. तुम्ही कुठल्या पातळीवर गेले होते, गेलेले आहात हे कुठल्या राजकारणात, तत्त्वात बसते.
अंबादास दानवे

Maharashtra Live News Update : नगर-शिर्डी रस्त्याच्या कामासाठी खासदार निलेश लंके यांचे उपोषण

नगर-शिर्डी महामार्गाच्या रखडलेला काम सुरु व्हावे यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी पुकारलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. जोपर्यंत 75 किलोमीटर रस्त्याचे प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका लंके यांनी घेतली आहे.

दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या रस्त्यासंदर्भात गुरुवारी मुबंई येथे बैठक घेतली मात्र लंके यांनी नगर-शिर्डी मार्ग राज्याच्या नव्हे, तर केंद्राच्या अख्त्यारीत येतो. पालकमंत्र्यांनी बैठक घेतली ती या रस्त्याबाबत नव्हतीच. त्यांना बैठक घ्यायचीच होती, तर थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीच चर्चा करायला हवी होती. कदाचित कामाच्या व्यापात ते विसरले असतील.असा टोला लागवला आहे.

युनोस्कोच्या यादीत सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश

मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्याचा व देवगड मधील विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे. हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे समुद्राच्या मध्ये उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला अजस्र लाटांचा मारा झेलत आजही दिमाखात उभा आहे. या किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे ही अभिमानाची गोष्ट मानली जातेय.

तळोदा प्रकल्पांतर्गत रानभाज्या महोत्सव आयोजन

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक रानभाज्यांची ओळख निर्माण व्हावी शहराच्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध व्हावी शहरी भागात लोकांना रानभाज्यांची आयुर्वेदिक तसेच त्यात असलेले पौष्टिक मूल्य यांचे महत्व पटवून देने म्हणून तळोदा प्रकल्पा योजनेअंतर्गत रानभाज्या महोत्सव आयोजन केले.डोंगरदऱ्या, माळराने, जंगलांच्या कुशीत नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांचाएकआगळावेगळा महोत्सव तळोदा शहरातरंगला.अंबाडी,तांदळा,कडीपत्ता, हरभरा भाजी,खाट गुला,गोंदिना,गूरानी, सेल्टा मोहर आदीसह अनेक दुर्मीळ रानभाज्यांनी बाजारपेठ फुलून गेली.

मराठा साम्राज्यातील 12 गडकिल्यांचा युनेस्को यादीत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या १२ गडकोट किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आलाय. हे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे. या यादीत शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, तोरणा, लोहगड, राजगड, हरिहरगड, राजमाची, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी अशा ऐतिहासिक गडांचा समावेश आहे.

शेगाव तालुक्यातील माटरगावात दूषित पाण्यामुळे ८७ जणांना डायरिया लागण

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे दूषित पिण्याच्या पाण्यामुळे ८७ नागरिकांना डायरियाची लागण झाली आहे. या सर्वांवर जवळच्याच विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात अचानक सुरू झालेल्या डायरीच्या त्रासामुळे व वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात हजर नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला व गावातील महिलांनी जलंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. या उलट अकार्यक्षम व गैरहजर असतानाही सदर मुजोर महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णांवर उपचार करण्याऐवजी गावातील नागरिकांना पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली होती. सध्या गावात जिल्हास्तरीय वैद्यकीय पथक पोहोचल असून वरिष्ठ आरोग्य अधिकारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशीरा महाबळेश्वर मध्ये दाखल

दिल्ली वारी नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री महाबळेश्वर मध्ये दाखल..

कुटुंबाच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर मध्ये ब्राईट लँड हॉटेलमध्ये मुक्कामी...

10.30 वाजता मुंबई कडे रवाना होणार..

पन्हाळगड आनंदोत्सव

किल्ले पन्हाळगडाला ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे. काल रात्री ही यादी जाहीर होताच पन्हाळगडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडके यांनी रात्री उशिरा पन्हाळ्यात जाऊन या आनंदोत्सवात सहभाग घेतला. आकाशात फुगे सोडून आणि पन्हाळगडावर रॅलीकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती असलेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.. वार्ड क्रमांक पाच मध्ये एक महिला रुग्ण उपचार घेत आहे, या महिलेचे पती आणि भावांमध्ये वाद होऊन वार्डातच हाणामारीला सुरुवात झाली, या प्रकारानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली होती तर रुग्णांमध्ये देखील भीतीच वातावरण पाहायला मिळाल, काही वेळानंतर सुरक्षा रक्षकांना बोलवून दोन्ही तरुणांना बाहेर काढण्यात आले.. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय...

तोरणमाळात होम स्टे क्रांती पर्यटनवाढीसह आदिवासींना मिळणार मोठा रोजगार

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला आता फक्त निसर्गाचे वरदान लाभले नाही, तर स्थानिक आदिवासी बांधवांसाठी रोजगाराचे नवे दालनही उघडले आहे. जिल्हा प्रशासनाच्या एका अभिनव उपक्रमाने तोरणमाळात 'होम स्टे' प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे, ज्यामुळे या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला नवसंजीवनी मिळणार आहे.

लातूरला ड्रग्सचा विळखा

शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातूर जिल्ह्याला एमडी ड्रग्सचा विळखा दिसतो आहे. तीन महिन्याखाली चाकूर तालुक्यातल्या रोहीना गावात पोलीस कर्मचाऱ्याकडूनच एमडी ड्रग्सची निर्मिती करत असल्याच उघड झालं होत, मात्र हे प्रकरण ताज असतानाच पुन्हा लातूर शहरात ड्रग्स विक्री होत असल्याच उघडकीस आले आहे. शहरातील एलआयसी कॉलनी परिसरातून आठ लाख रुपयांची ड्रग्स पोलिसांनी जप्त केल आहे., तर या कारवाईत गावठी पिस्तुलासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे., तर या दोन्ही आरोपींना न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय. दिवसेंदिवस लातूर पॅटर्न सारख्या शैक्षणिक शहरात ड्रग्स सापडत असल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत..

सांगली एसटी आगारासाठी 200 बसेसची मागणी

सांगली जिल्ह्यातल्या एसटी आगाराला एसटी बसेसची मोठी कमतरता जाणवू लागली आहे.जिल्ह्यातल्या 10 आगारांसाठी 697 एसटी बसेस उपलब्ध आहेत.यापैकी 109 एसटी बसेस डिसेंबर अखेर कालबाह्य होऊन भंगारात जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे 200 एसटी बसेसची मागणी एसटी प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती.यापैकी राज्य सरकारने केवळ 65 बसेस सांगली आगारासाठी दिल्या आहेत. एका बाजूला गेल्या काही वर्षात राज्य सरकारने विविध सवलती,त्याच बरोबर महिलांसाठी अर्धे तिकीट,यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे.मात्र तुलनेने एसटी बसेस उपलब्ध नसल्याने एसटी प्रशासनाला एसटी सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक मार्गांवर एसटी सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची देखील मोठी गैरसोई होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सांगली एसटी आगारासाठी नव्या बसेस तातडीने उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी होत आहे.

सिंदखेडराजा शहरातील रस्त्याची दुरावस्था..

सिंदखेडराजा शहरातील विविध मागण्यासाठी युवा संघर्ष समितीचे युवा नेते कैलास मेहत्रे यांच्या नेतृत्वात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले..सिंदखेडराजा शहरात नवीन पाईप लाईनचे काम उन्हाळ्यात करायला पाहिजे होते त्या ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात सुरु केले आहे .. शहरातील सर्व रस्ते मधोमध खड्डे खोदून ठेवले आहेत... त्यामुळे संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली आहे...त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत ..याकडे नगरपालिकेने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने प्रशास्नाचे लक्ष वेधन्यासाठी युवा संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण शहरात साष्टांग दंडवंत आंदोलन करण्यात आले. जर 15 दिवसात सिंदखेडराजा शहरातील रस्ते दुरस्ती केली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय..

मुंबई विमानसेवेचा मुहूर्त लांबणार

सोलापूर - गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर एक ऑगस्ट पासून मुंबई विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती. मात्र अद्यापही या मार्गावरील विमानसेवेच्या व्हायबिलिटी फंडिंगला राज्य सरकारने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे विमानसेवा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापूरकरांची मूळ मागणी सोलापूर - मुंबई व सोलापूर - तिरुपती या मार्गावरील हवाई सेवेची आहे. सोलापूर - मुंबई मार्गावर एक ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा झाली. मात्र या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपनीला हिरवा कंदील न मिळाल्यामुळे ही सेवा आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शिरगाव येथे पिकअप अडकल्याने तासभर वाहतूकीचा खोळंबा

भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता .भोर) हद्दीत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या मोरी ठिकाणी भोर कडून महाडकडे जाणारी पिकअप गाडी चिखलात रुतल्याने दोन्ही बाजूंच्या वाहतूकीचा खोळंबा झाला होता. वाहतुकीत अडकलेल्या इतर वाहनांतील प्रवाशांनी अडकलेली पिक अप ढकलून बाजूला केल्याने तासभरानंतर वाहतूक सुरळीत झाली. ही घटना शुक्रवारी (ता.११) दुपारी एकच्या सुमारास घडली.

मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर, 53 ग्रामपंचायतीवर असणार महिलाराज

मावळतील 103 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये 103 पैकी 53 ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे... मावळ तालुक्यात एकूण 103 ग्रामपंचायती असून त्यांच्या कालावधी पाच वर्षाचा असणार आह.. मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायत पैकी दहा ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रातील जमातीसाठी आरक्षित आहे. अनुसूचित जमातीसाठी सहा ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीसाठी 25 ग्रामपंचायती नामांकित करण्यात आलेल्या आहेत तर 53 ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यान 23 एप्रिल रोजी सरपंच पदाची सोडत काढण्यात आली होती परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा नव्याने सोडत काढण्यात आली आहे..

जगतिक वारसा यादित रायगडचा समावेश

जागतीक वारसा स्थळांमध्ये स्वराज्यातील 12 किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या बद्दल शिवप्रेमींमध्ये आनंदाची आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

कल्याण पश्चिम वसंत व्हॅलीतील भीषण आग,   डी मार्ट शेजारील नवीन इमारतीच्या गोडाऊनला लागली आ

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात मध्य रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डी मार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते. त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे एक तास युद्धपातळीवर काम करत या आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊनमधील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

पश्चिम विदर्भात 88.8 टक्के पेरण्या पूर्ण

पश्चिम विदर्भात सर्वाधिक सोयाबीन आणि कापसाची लागवड केल्या जातं, मात्र मागील वर्षी सोयाबीन पिकाला कमी भाव मिळाल्याने यावर्षी सर्वाधिक कापसाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे, पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ,वाशिम, बुलढाणा आणी अकोला या पाच जिल्ह्यात आतापर्यंत 88.8 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत, पश्चिम विदर्भात एकूण 31 लाख सात हजार हेक्टर पैकी आतापर्यंत 28 लाख 158 हजार हेक्टर वर पेरणी पूर्ण झाली आहे, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात 93.7 टक्के पेरणी झाली असून 6 लाख 9 हजार हेक्टरवर पेरणी झाली,अकोला जिल्ह्यात 81.8 टक्के म्हणजे 3 लाख 536 हजार हेक्टर पेरणी,वाशिम जिल्ह्यात 90 टक्के पेरणी आटोपली यामध्ये 3 लाख 999 हजार हेक्टर पेरण्या झाल्या, अमरावती जिल्ह्यात 93.4 टक्के पेरणी यामध्ये 6 लाख 379 हेक्टर पेरणी आणि यवतमाळ जिल्ह्यात 83.8 टक्के पेरणी म्हणजे 7 लाख 705 हजार हेक्टरवर पेरणी झाली, परंतु मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तब्बल 84 हजार हेक्टर वर खरीप हंगामात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल अमरावती विभागीय आयुक्त कडून आलेला आहे,

अमरावती, बडनेराचा शहरातील काही भागातील पाणी पुरवठा आज बंद

-महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमरावती व बडनेरा शहराला केला जाणारा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. पाणी पुरवठा योजनेच्या सिंभोरा हेडवर्क्स येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत १३२ केव्ही व ३३ केव्ही मोर्शी सबस्टेशन येथे देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित केले आहे. या कामामुळे सिंभोरा येथील विद्युत पुरवठा व पंपिंग बंद ठेवले जाईल. परिणामी उद्या अमरावती व बडनेरा शहरातील नागपुरी गेट, सातुर्णा, साई नगर, राठी नगर, पार्वती नगर, म्हाडा कॉलनी, बडनेरा (नवी वस्ती), लालखेडी, मालटेकडी या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहील त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मजीप्रामार्फत करण्यात आले.

दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा युनेस्को यादीत समावेश

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झालाय. युनेस्कोनं याबाबतचा निर्णय घेतलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याचा देखील यामध्ये समावेश आहे. अर्थात या किल्ल्याची पाहणी युनेस्कोच्या टीमनं काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये हा निर्णय झाल्यानं कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या, शिवप्रेमी, इतिहासप्रेमींच्या आंनंदाला आता पारावार उरला नाहीय.

जूनमध्ये पावसाचा खंड आणि जुलै मध्ये अतिवृष्टी

वाशिम जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दिलेला खंड आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच पेरलेले पीक वाया गेलीत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर 13 हजार 152 हेक्टर वर दुबार पेरणीच संकट ओढावल आहे. ही बाब शासकीय आकडेवारीतून समोर आली आहे.

वाशिम जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 लाख 62 हजार 832 हेक्टरवर खरिपाची पीक पेरणी झाली आहे. यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली. मात्र त्यानंतर पावसाने खंड दिला 25 जून आणि 26 जूनला वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने मालेगाव आणि रिसोड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यात अनेक ठिकाणी शेतातील पेरलेली पिकं आणि शेतातील सुपीक गाळ सुद्धा वाहून गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं होतं.

कुत्र्याच्या तावडीतून लांडोर पक्ष्याला सोडविले

बुलढाणा जिल्ह्यात तीन अभ्यारण्य असून बुलढाणा शहराला जंगलाने वेढले आहे.. नेहमी वन्य प्राणी शहराकडे कुच करीत असतात .. अशीच एक लांडोर जंगलातून भटकली व बुलढाणा शहरातील जुना गाव परिसरात आली .. तेव्हा काही भटक्या कुत्र्यांनी लांडोरचा पाठलाग केला व तिला जखमी केले वन्यजीव सोयरे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लांडोर ला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून वन विभागाच्या स्वाधीन केले लांडोरवर उपचार करून नजिकच्या ज्ञानगंगा अभ्यारण्यात सोडण्यात आले...

-अमरावतीकरांनो सावधान.... आठवडाभरात डेंग्यू व चिकनगुनियाचे १५ रुग्ण

पावसाळ्याचे दिवस असल्याने डास उत्पत्ती वाढून डेंग्यू व चिकनगुनियासारख्या आजारांचीही साथ पसरत असून आठवडाभरात अमरावती जिल्ह्यात आठ डेंग्यू, तर सात चिकनगुनियाचे अशे १५ रूग्ण आढळून आले आहे. साचलेल्या पाण्यात एडीस डासांची उत्पत्ती होऊन त्याच्यामुळे डेंग्यू पसरतो. त्यामुळे घरात किंवा घराच्या परिसरात साचलेल्या पाण्यात डास, अळ्या तयार होत असल्यास तातडीने ते पाणी फेकून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात ६६१ रूग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५२ रूग्णांना डेंग्यूची, तर ४३ रूग्णांना चिकनगुनियाची लागण झाल्याचे आढळून आले.त्यामुळे नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये,असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT