Maharashtra Live News Update:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पेट्रोल-डिझेल अन् सोन्यावर मोदींचं मोठं वक्तव्य, विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

नालासोपारातील जिजाई नगर परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या तुटलेल्या गटारात महिलेचा पाय अडकल्याची धक्कादायक घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गटारावर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी तुटलेल्या अवस्थेत असल्याने महिलेला त्याचा अंदाज आला नाही त्यामध्ये आणि तिचा पाय खोलवर अडकला. या दुर्घटनेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वापराबाबत केलेल्या आवाहनानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याच्या शक्यतेने नागरिक पेट्रोल पंपांवर

शहरातील सिडको भागात आप आपल्या वाहनात पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी लावल्या रांगा

Akola: सराफा दुकानात घुसून चोरी, एका आरोपीला अटक

अकोला -

अकोल्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत रोख आणि दागिने लंपास केल्याचं प्रकरण.

घटनेचा CCTV साम'च्या हाती.

अकोला शहरातील आदर्श कॉलनी भागात घडली होती घटना. सप्तशृंगी ज्वेलर्स या दुकानात बंदुकीचा धाक दाखवत एकाने दरोडा टाकत 25 लाख 58 दागिने केले होते लंपास.

अगदी गजबजलेल्या वस्तीत भर दिवसा पडला होता दरोडा. अकोला पोलिसांच्या स्थानिक शाखेकडून बंदुकीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या व्यक्तीला अखेर अटक झाली.

रोहनसिंग बावरा असं या अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचं नाव.

ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकत तब्बल 25 लाखांवर मुद्देमाल नेला होता पळवून. अखेर चोरी गेलेला मुद्देमाल जप्त.

Solapur: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

सोलापूर -

सोलापूर शहरातील मध्यवर्ती भाग समजला जाणाऱ्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

सहारा गन हाऊस मधून कामगार शरीराच्या गोळ्या घेऊन कारमध्ये असताना झाला स्फोट

या स्फोटामध्ये कामगाराला गंभीर इजा झाली असून दोन्ही पाय गमवावे लागले आहेत

तर कारची छिन्नविच्छिन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल झालेले असून नेमका स्पोर्ट कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे

Pune: आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

आळंदी बस स्थानकावर घडली घटना

देहू आळंदी बस स्थानकात बस दाखल होत असताना ही घटना घडली

मागच्या चाकाखाली एक जण अचानक चिरडला गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला

Ahilyanagar: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

अहिल्यानगर -

श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी....

पीडित महिलेची लाखोंची लूट आणि जबरदस्ती केल्या प्रकरणी भोंदू विरोधात गुन्हा दाखल....

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये भोंदू आढाव विरोधात गुन्हा दाखल...

श्रीरामपूर न्यायालयात भोंदू अशोक आढाव यास हजर केले असता न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी...

दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर भोंदू अशोक आढावला सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी...

जालना पोलिसांची मोठी कारवाई, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांसह औषधांचा साठा जप्त

जालन्यात कदिम जालना पोलिसांनी कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांसह औषधांचा मोठा साठा जप्त केला आहे. कारवाईत अकराशेहून अधिक नशेसाठी वापरत असलेल्या बटन गोळ्याचा साठा आणि नशेसाठी वापरत असलेल्या औषधाच्या 76 बॉटल देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील एका मेडिकल स्टोअरमधून हा बटन गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.दरम्यान याप्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या मेडिकल स्टोअरमधून कुठे कुठे या

बटनगोळ्यांची विक्री होत होती याचा तपास आता पोलीस करत आहे.

सोनं खरेदीबाबत पंतप्रधानांच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांची अनोखी प्रतिक्रिया

आता आहे त्यात वाढ होणार नाही, वाढ झालीतर तुम्ही विचार अस पत्रकारांना गोगावले यांचे सांगणे

० घराच्या मंडळींना सांगितल सद्या आता खरेदी करू नका, देणी पूर्ण करा

० महिलांना आकर्षक असत आम्हाला असायच कारण नाही

० हातात कड, बोटात आंगठया आहेत, आता वाढ होणार, इतरां सारख दाखवायची सवय नाही

० पंतप्रधांनांनी अवाहन केलतर अंगावरच घरी काढून ठेवण्याची तयारी आहे, त्यात मोठ काही नाही

परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाणी टंचाई

जसा जसा उन्हाळा पुढे सरकतोय तस ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत.परभणीच्या जिंतूर तालुक्याला याचा जास्त फटका बसतोय,३ गावांना सध्या ५ टँकर्स द्वारे पाणी पुरवठा केला जातोय..जिंतूर तालुक्यातील कौसडी गावात ३,शेवडी व वाघी धानोरा गावात प्रत्येकी १-१ असे ५ टँकर्स सध्या सुरू करण्यात आले आहेत

नाशिक-मालेगावात उन्हाचा तडाखा, तापमान ४३ अंशांच्या पार

नाशिकच्या मालेगाव सह ग्रामीण भागात सूर्य सकाळ पासूनच आग ओकत असून तापमानाचा पारा 41 अंशाच्या पुढे गेलाय,काही दिवसांपूर्वी तापमानात घट झालेली असताना आज मालेगाव मध्ये 43.2 तर मनमाड मध्ये तापमान 41 अशांवर पोहचल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावर ची वर्दळ कमी झाल्याचे पहावयास मिळाले

11.05.2026

कमाल तापमान--43.2

किमान तापमान -24.4

कार पार्क करायला मनाई केली म्हणून कल्याणच्या रुक्मणी बाई हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

कल्याण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ चारचाकी उभी केल्याने रुग्णवाहिकेसह इतर वाहनाचा मार्ग अडवला जात असल्याने पार्किंग करू नको असे सांगणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मुजोर चालकाने ठोशाबुक्क्याने आणि रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे संपूर्ण घटना आहे या प्रकरणात कार चालकाच्या शोध घेऊन पोलिसांनी ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे.

ग. दि.माडगूळकरांच्या घरावरून आई आणि मुलामध्ये वाद 

ग. दि.माडगूळकरांच्या घरावरून आई आणि मुलाच्यात वाद

ग. दि.माडगूळकरांच्या घरचा वाद पोलीस स्टेशनपर्यंत

घरातील जवळच्या विरोधात केली खडकी पोलिसात तक्रार

सुमित्र माडूगूळकर आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता माडगूळकर यांनी आजच दिली तक्रार

माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याबाबत सुमित्र माडगूळकर यांनी केला पोलिसात अर्ज

केंद्र सरकारने gas वरील सबसिडी बंद करण्याचा घेतला निर्णय परभणीतील महिलांची दिल्या संपत प्रतिक्रिया

केंद्र सरकारने गॅस वरील सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने परभणीतील गृहीणी असलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता यावर संपत प्रतिक्रिया देत अगोदर हाताला काम नाही किराणा सामानाचे दर वाढले. पेट्रोल डिझेल भाव वाढले असताना गॅस वरील सबसिडी बंद करण सामन्यावर आर्थिक संकट असल्याचे आहे असे म्हंटले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच अनिकेत तटकरे यांनी केल पुन्हा सारत्य 

सुनेत्रा पवार रोहा येथील कार्यक्रम स्थळावरून निघताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या वाहनातून स्वतः ड्रायव्हिंग करत सुनेत्रा पवार यांना हेलिपॅड पर्यंत नेले.

चिपळूण येथे अनिकेत तटकरे यांनी सारथ्य केल्याने वाद निर्माण झाला होता.

कल्याण मधील आचार्य प्रल्हाद अत्रे नाट्य ग्रहाच्या दुरवस्थेवर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकाराने तयार केला व्हिडिओ 

कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि अव्यवस्थेविरोधात अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचे कलाकारांनी म्हटले आहे.

धुळ्यामध्ये 44.8° डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा प्रचंड वाढला असून, आज धुळ्यामध्ये 44.8° डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाच्या झळा धुळेकर नागरिकांना चांगल्याच सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे धुळेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात तापमान वाढीच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे धुळेकर नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळत असल्याचे दिसून येत आहे.

निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

निदा खानला नाशिक रोड न्यायालयात केले हजर

न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात

चार दिवसांची पहिली पोलीस कोठडी संपल्याने आज निदाला न्यायालयात हजर केले जाते आहे

आज देखील इन कॅमेरा सुनावणी पार पडण्याची शक्यता

पिंपरी चिंचवड शहरात आज पारा पुन्हा ४० अंशावर

पिंपरी चिंचवड शहरात आज पारा पुन्हा ४० अंश सेल्सिएसच्या पुढे

वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रासाला सामोर जावं लागत आहे.

नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडावे अस आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केलं आहे.

हुंड्यासाठी अवघ्या 18 वर्ष्याच्या विवाहिते छळ, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

हुंड्यासाठी अवघ्या 18 वर्ष्याच्या विवाहिते छळ तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

सोळा वर्षाची असताना लग्न, सासरच्यांकडून छळ अत्याचार केल्याचा आरोप.

अल्पवयीन असताना देखील मुलीच्या आई-वडिलांनी बदनामीला निघून लग्न लावून दिलं.

नगरपालिकेत दादागिरी, मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी

बीड नगरपालिकेत धक्कादायक प्रकार समोर आलाय... थेट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून दोन जणांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

हिबानाम्यावरून सुरू असलेल्या मालमत्ता वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येतंय.

जळगावात उष्णतेच्या तीव्र झळा, नागरिक हैराण

जळगाव काही दिवस तापमानाचा पारा खाली गेल्यानंतर मागील तीन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली. या दिलाशानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला आहे. आज जळगावात ४४.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दुसऱ्यांदा पारा ४४ अंशावर गेला आहे. यामुळे उष्णतेची तीव्रता वाढली असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे.

जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

निवासी क्षेत्रात ऑक्टोबर २०२४ पूर्वी झालेले जमिनीचे तुकडे सरकारने मान्य केले आहेत. मात्र, त्यानंतर कोणताही तुकडा अधिकृत लेआऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही. महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील. अन्यथा कठोर गुन्हे दाखल केले जातील," असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.

बैलगाडा शर्यती घाटातला थरारक अपघात

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या बैलगाडा शर्यतींच्या घाटात तरुणीला बैलानी थेट पाण्याखाली घेतलाय त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या घाटात काळजाचा ठोका चुकवणारा अपघाताचा थरार समोर आलाय

नंदुरबारच्या नावापुरमध्ये भीषण स्फोट

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पाचव्या मजल्यावर जाळीवर जाऊन बसला होता

आपण केलेली मागणी पूर्ण होत नाही म्हणून केला आत्महत्या प्रयत्न

पोलिसांनी त्याला जाळीवरून काढले आहे.

जालना शहरात महापालिकेचा बुलडोजर गरजला

जालना शहरात महापालिकेचा बुलडोजर गरजला

गरिबशहा बाजार आणि बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर हातोडा

जालना शहरातील चाळीस अतिक्रमण काढले

दुसऱ्या दिवशी अतिक्रमण मोहीम पोलिस बंदोबस्त अभावी रखडली

जळगाव शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्यांत अडकलेल्या हरणाला जीवदान

जामनेर पाळधी परिसरातील शेतशिवारातील माळप्रिंपी रस्त्याने अमजद अब्बास पठाण यांचे शेतामध्ये ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये हरणाची शिंगे अडकून ते बराच वेळ तडफडत होते.

शिंगे नळ्यांमध्ये घट्ट अडकल्यामुळे हरणाला बाहेर पडणे शक्य होत नव्हते.

शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्यांत अडकलेल्या हरणाला जीवदान

Dhule : वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

धुळे शहरासह ग्रामीण भागात उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे,

43 ते 44 अंशांपर्यंत तापमानाचा पारा पोहोचला असून याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे,

पोटदुखी त्याचबरोबर ताप, डायरिया अशा प्रकारचे लक्षण असलेले लहान मुलं रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे प्रमाण वाढले आहे,

सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

- शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

- महापालिकेच्या बाहेर एकत्रित येत शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

- शहरातील अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शिवसैनिक आक्रमक

- महापालिका अधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी

- शहराला लवकरच नियमित पाणीपुरवठा करा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा शिवसेनेचा इशारा

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्यात 800 रुपयांची तर चांदी 1000 ची घसरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर पहिल्या दिवशी सोन्याच्या दारात आठशे रुपयांनी तर चांदीच्या दरात हजार रुपयांनी घसरण झाली आहे पंतप्रधानांच्या घोषणेनंतर पुढे सोन्याची स्थिती कशी राहील याकडे ग्राहकांचा लक्ष

बोईसरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून तणाव; ग्रामपंचायतीची मुख्य बाजारपेठेत धडक कारवाई

बोईसर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी तणावाचं वातावरण . मुख्य बाजारपेठेत फूटपाथवर असलेल्या अतिक्रमणांवर बोईसर ग्रामपंचायतची धडक कारवाई . फुटपाथ वरील अनेक अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त . अतिक्रमण हटवताना फेरीवाल्यांची मुजोरी . घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात . बोईसर शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बोईसर ग्रामपंचायत कडून अतिक्रमण हटाव मोहीम . मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या असलेल्या मागणीनंतर ग्रामपंचायतला उशिरा शहाणपण .

ग. दि. माडगूळकर यांची पुण्यातील वास्तू पाडण्याचा प्रयत्न? नातेवाईकांच्या विरोधात न्यायालयात जाणार

गदिमांची पवित्र वास्तू "पंचवटी" पाडण्यास विरोध करीत आल्यामुळे मी व माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे माझी खोटी बदनामी करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी केला आहे. गदिमांची पवित्र वास्तू पंचवटी पाडावी बिल्डरला विकावी असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून होतोय. ज्या पवित्र वास्तूमध्ये गीतरामायण लिहिले गेले जी अनेक साहित्यिक कलाकृतींची साक्षी आहे.गदिमांचा अनेक वर्षांचा सहवास ज्या वास्तूला लाभला ती पाडावी म्हणून हे लोक प्रयत्न करत आहेत व त्याला मी विरोध केल्यामुळे आता माझ्या जीवावर उठले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

वर्धा - आर्वी मार्गावरील पहाटेच्या सुमारास मोठा अपघात, पायदळ जाणारा व्यक्ती गंभीर जखमी

- आंबे घेऊन जाणारा ट्रक उलटला

- वर्धा - आर्वी मार्गावरील खरांगणा (मोरांगणा) शिवारात पहाटेच्या सुमारास घडला अपघात

- अपघातात ट्रकची धडक लागल्याने पायदळ जाणारा व्यक्ती गंभीर जखमी

- जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले

- मध्यप्रदेशकडे आंबे घेऊन जाताना घडला अपघात

- अपघातात ट्रकसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

- खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे

चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णणावर नागरिक संतप्त, शिंदेसेनेचा आंदोलनाचा इशारा

नाशिकच्या येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा,अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल, असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

० रोहा धाराव MIDC तील क्रिडा संकूल येथे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केल सुनेत्रा पवार यांच स्वागत

० ठिकठिकाणी औक्षण करून महिलांनी तर JCB तुन पुष्पवृष्टी करीत सुनेत्रा पवार यांच रोहा शहरात स्वागत

मुंबई गोवा महामार्गवरील कासार्डे ब्रिजच्या स्लॅबचा भाग कोसळला

मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे ब्रिजच्या स्लॅबचा काही भाग तुटून खाली पडला आहे. ज्या ठिकाणी हा भाग कोसळला त्या ठीकाणी बॅरीगेट् लावून हा भाग बंद करण्यात आला आहे. मात्र ब्रिजचे काम निकृष्ट झाल्यामुळेच हा स्लॅब कोसळला असल्याचा आरोप होत आहे. सध्या पावसाळा तोंडावर असून या ब्रिजची लवकरात लवकर दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड जिल्ह्याच्या पहिल्यांदाच दौऱ्यावर

राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार पहिल्यांदाच रायगड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील कुंडलिका नदीकिनारी पूर संरक्षण भिंत, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन, खाऊ गल्ली विकसित करणे, जे जे स्कूल ऑफ आर्ट ने तयार केलेल्या शिवसृष्टी शिल्प लोकार्पण अशी अनेक कामांचे भूमिपूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे

मोदींच्या सूचनेनुसार कुंभमेळ्याच्या कामाला स्थगिती द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार, नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या कामांना तातडीने स्थगिती देऊन काटकसर करावी. कोविडपेक्षा वाईट स्थिती येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लगेचच काटकसरीने काम करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी ही काटकसर मोठमोठ्या कंत्राटांपासून आणि आपल्या मंत्री व आमदारांपासून करावी आणि खरा आदर्श घालून द्यावा, अशी आमची मागणी आहे.

म्हाडा फसवणूक प्रकरण, काजळे आणि पाटील यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार

- म्हाडा फसवणूक प्रकरण, काजळे आणि पाटील यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार

- महसूलचे आणखी काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर

- आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २० टक्के कोट्यात बनावट कागदपत्रांचा वापर

- नाशिक शहरातील ४१ गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मोठा घोटाळा उघड

एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांच्याविरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल

नाशिकच्या मालेगावातील माजी महापौर एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांच्याविरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या पवारवाडी व किल्ला पोलिसांनी स्वतंतपणे कारवाई करीत सवंदगाव येथील फॉर्महाऊस व इस्लामबादच्या राहत्या घराजवळील गोदामातून तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 18 गोवंश जनावरे ताब्यात घेतली.दरम्यान घराजवळ कारवाई सुरू असताना मलिक याने शासकीय कामात अडथळा आणत गोवंश जनावरे पळवून लावत फरार झाला आहे.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही जनावरे विक्रीसाठी आणल्याचा पोलिसांना संशय आहे..

नसरापूर अत्याचार प्रकरणी अजय मिसर सरकारी वकील

नसरापूर अत्याचारप्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती

नसरापूर प्रकरणाची सुनावणी प्रभावीपणे आणि जलदगतीने पार पाडण्यासाठी शासनाचा निर्णय

पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास वेगाने पूर्ण करून न्यायालयात पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू

या आरोपीला १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात १ मे रोजी चिमुकलीवर अत्याचार तसेच त्यानंतर तिचा खून करण्यात आला होता.

अमरावती जिल्ह्यात महिनाभरात उष्माघाताचे 12 रुग्ण....

अमरावती जिल्ह्यात महिनाभरा पासून उन्हाची तीव्रता कायम आहे, अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हामुळे अमरावतीत आतापर्यंत 12 रुग्ण उष्माघाताचे आढळून आले आहे, वाढत्या उन्हाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे, अमरावतीत पारा अलीकडे 46.8 च्या वर गेला होता.. काल अमरावतीचा पारा 42.8 अंशावर गेला होता.... तर उद्या पासून पुन्हा पारा वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अस आवाहन करण्यात आला आहे

ED आज अशोक खरातचा ताबा घेणार, सूत्रांची माहिती

- खरातचा ताबा मिळवण्यासाठी ED कडून न्यायालयात अर्ज

- न्यायालयाने ED अर्ज मंजूर केल्याची माहिती

- अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातने उभे केलेले साम्राज्य नेमके कशाच्या जोरावर? ED कडून केला जाणार तपास

बीड : माजलगाव अत्याचार प्रकरणी मुलीचा गर्भपात; वडिलांना न्यायालयीन कोठडी

बीडच्या माजलगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय... अल्पवयीन चुलत भावाच्या अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या भोळसर मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केलीय... मुलीला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या तिच्या वडिलांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. तर गर्भपात करणाऱ्या फुलेनगर येथील महिला डॉक्टर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटकेपूर्वी डॉक्टर महिलेची अचानक रक्तदाब वाढल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कोणत्याही या महिला डॉक्टरला अटक केली जाऊ शकते... या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. त्या रायगडच्या रोहा शहरात येत असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांचा रोहा हा बालेकिल्ला आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने राजकिय आणि भावनिक दृष्ट्या या दौऱ्याला वेगळ महत्व आहे. सुनेत्रा पावर यांच्या हस्ते रोहा शहरात 16 कोटी 32 लाख रूपयांच्या विकास कामांच भुमीपुजन या दौऱ्यादरम्यान केल जाणार आहे.

देव्हाडी उड्डाणपुलावर भीषण अपघात... ट्रेलरच्या धडकेत तरुण जागीच ठार

रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर एक हृदयद्रावक घटना घडली.भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकांना जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे

नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण,   ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण

पुढील ३ ते ४ दिवसाच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

घटनेपासून १५ दिवसांच्या आत चार्जशीट दाखल केले जाणार असल्याची पोलिसांकडून देण्यात आली आहे ग्वाही

पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोषारोपपत्र सादर केल्यानंतर सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार

लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट सादर व्हावं यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून देखील प्रयत्न सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT