Marathi Breaking Live Marathi Headlines Updates :  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: श्री अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचे काम सुरू

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात मान्सूनची प्रगती अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, महागाईचा भडका, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.

Bharat Jadhav

wardha : वर्ध्यात नीट पेपरफुटीवरून युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी घोटाळ्याच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा

ठाकरे मार्केटपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा

मोर्चातून नोंदवला पेपरफुटीच्या घोटाळ्याचा निषेध

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी

काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग

Kolhapur : श्री अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचे काम सुरू

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचे काम सुरू झालं आहे.

गोव्यातील एका भक्ताने दिला आहे कळस

दीड किलो वजनाचा आहे सोन्याचा कळस

मध्यरात्री 3 वाजे पर्यंत कळस बसवण्याचे काम सुरू राहणार

मंदिरावर कळस बसवायला सुरुवात झाली आहे अंदाजे 3 वाजतील असा अंदाज आहे

Pune : अजय सिंहला अखेर पुणे पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्रात तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या अजयसिंहला अखेर पुणे पोलिसांनी केली अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

३ गावठी पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, कोयते आणि इतर धारधार शस्त्रसाठा जप्त

Amravati : अमरावती विधान परिषद निवडणूक; 'वंचित'ला  पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही

अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठी अपडेट

अमरावतीत काँग्रेस नेत्यांची बैठक संपली

वंचितच्या पाठिंबा बाबत अद्याप निर्णय झाला नाही

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना स्थानिक निर्णय कळवला जाईल -काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची माहिती

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या पाठिंब्याबाबत तूर्तास निर्णय नाही.

काँग्रेस नेत्या निवडणूक प्रभारी यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विरोधी पक्षनेते विलास इंगोले या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्या बाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

नवापूरमध्ये २ किलो गांजा जप्त; पोलिसांच्या कारवाईत एक जण ताब्यात

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संयुक्त कारवाई करत २ किलो गांजा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे संशयिताच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी सचिन फलले याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त गांजा कुठून आणला आणि तो कोणाला विकला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. जिल्ह्यात वाढत्या गांजा तस्करीच्या घटनांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

गोकुळ गीते यांच्या माघारी नंतर रेश्मा काळे उमेदवारीवर ठाम

नाशिक मधील बंडखोर गोकुळ गीते यांच्या माघारी बाबत जळगाव मधील बंडखोर उमेदवार रेशमा काळे यांना विचारले असता,त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की,आपण आपल्या प्रचारात व्यस्त आहोत,आपण ही निवडणूक लढावी अशी आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, गीते नि चार दिवस घेतले आपल्याला चार तास तास तर घेऊ द्या,आपल्या उमेदवारीवर ठाम आहोत,बाकी सगळ वरिष्ठांशी चर्चा करून आपण निर्णय घेणार आहे,

अशा प्रकारची प्रतिक्रिया जळगाव मधील महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेशमा काळे यांनी दिली आहे

शरद पवारांचे 3 आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला

सोलापुरात पवारांचे 3 आमदार रवींद्र चव्हाण यांना भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

यामध्ये शरद पवार यांचे निकटवर्ती आमदार उत्तम जानकर यांचा समावेश आहे

नाशिकच्या गंगापूर धरणात बुडून चार मुलांचा मृत्यू

- मृत्यू झालेल्यांमध्ये तीन मुलं आणि एका मुलीचा समावेश

- मृत मुलं गंगापूर धरणाच्या जवळ असलेल्या सावरगावमधील रहिवाशी असल्याची माहिती

- पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू

- मयुरी जाधव, गणेश गौतरणे, निखिल गौतरणे, साहिल मनोहर गौतरणे अशी मयत मुलांची नावे

भिवंडीत पेपर पुठ्ठा असलेल्या गोदामाला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील वाहोली येथे असलेल्या गोदामाला भीषण आग

गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात पेपर पुठ्ठा असल्याची माहिती मिळाली आहे

जय भगवान कॉम्प्लेक्समधील असलेल्या नऊ गोदामाला भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल

बोईसरमध्ये भुयारी मार्गासाठी नागरिकांचे आंदोलन

पश्चिम रेल्वेच्या बोईसर वंजारवाडा येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा फाटक बंद करून त्वरितच भुयारी मार्ग करावा यासाठी बोईसर वंजारवाडा फाटक येथील रेल्वे रुळांजवळ आज बोईसरकरांनी आंदोलन केलं . मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीमुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय . त्यातच फाटक क्रॉस करताना वेळ वाया जात असून यावेळी दुर्घटना होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे याच विरोधात स्थानिकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली . बोईसर वंजारवाडा फाटक येथे तातडीने भुयारी मार्ग तयार करून पूर्व आणि पश्चिमेच्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली . यावेळी पश्चिम रेल्वे सह सार्वजनिक बांधकाम विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .

वाळू माफियासोबतच्या झालेल्या वादातून हृदय विकाराच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यु; वेरूळ गावात घडली घटना,

ॲम्बुलन्स मधील मृतदेहासह वेरूळचे गावकरी उतरले रस्त्यावर

वेरूळच्या भोसले चौक ते लेणी गेट पर्यंत रस्ता जाम

वाळू माफियाच्या वादात विचारपूस केल्याने शिक्षकाचा केला खून केल्याचा गावकरी आणि नातेवाईकांचा आरोप

वेरूळ रस्ता गावात अडवला, संतप्त गावकरी एकत्र येऊन गुन्हेगारांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही आणि रास्ता रोकोही मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे

washim: वाशिम शहरालगत एकबुर्जी पर्यटन स्थळाची दुरावस्था; पर्यटकांकडून सुविधांच्या पुनर्बांधणीची मागणी

वाशिम शहरालगत असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावरील पाटबंधारे विभागाच्या पर्यटन स्थळाची सध्या दुरावस्था झाली आहे. लहान मुलांसाठी उभारलेले उद्यान, खेळणी तसेच बोटिंगची व्यवस्था बंद अवस्थेत असून साहित्य धूळ खात पडले आहे. पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. मात्र, पर्यटन स्थळावरील सुविधा बंद असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हे पर्यटन केंद्र पुन्हा सुरू करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांसह पर्यटकांकडून होत आहे.

पक्षाच्या हिताला सर्वाोच्च प्राधान्य देईन - सुनेत्रा पवार

पक्षाच्या हिताला सर्वाोच्च प्राधान्य देईन - सुनेत्रा पवार

पक्षात कोणताही अनावश्यक हस्तक्षेप नसेल

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सुनेत्रा पवार भावूक; दादांच्या आठवणींना उजाळा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमात अजित दादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. भाषणादरम्यान त्यांनी दादांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. दादांशिवाय हा पहिला वर्धापनदिन. यावेळी त्यांनी पक्षाची वाटचाल शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित असल्याचे सांगितले.

Nagpur: नागपूर रेल्वे स्थानक परिसरात ट्रॅव्हल्स बसला आग

- नागपूर रेल्वे स्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्स बसला आग, बस जळून खाक

- नागपूर रेल्वे स्थानकाजवळ मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या अमिना ट्रॅव्हल्सच्या आज अचानक आग लागली.

- प्रवासासाठी बसची तयारी सुरू असताना चालकाने वाहन सुरू करताच इंजिनमधून धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.

- आग लागल्याचे लक्षात येताच वाहनतळावरील इतर सुमारे १२ बस तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्यात. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

- स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आग वेगाने पसरल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली.

- घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते. प्राथमिक माहितीनुसार,

- इंजिनमधील बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दादांच्या हातून खूप मोठा इतिहास घडत होता - भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना मोठे वक्तव्य केले. 'दादांच्या हातून खूप मोठा इतिहास घडत होता,' असे भुजबळ म्हणाले. कोणतेही मोठे यश मिळवण्यासाठी आधी संघर्ष करावा लागतो आणि त्यानंतर समर्पणाची भावना ठेवावी लागते, असेही त्यांनी सांगितले.

विठ्ठल मुर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यास महाराज मंडळींचा विरोध

पंढरपूर येथील पुरातन विठ्ठल मूर्तीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुरातन विभागाने रासायनिक प्रक्रिया करण्याची सूचना केली आहे. परंतु या प्रक्रियेला वारकरी महाराज मंडळींनी विरोध केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा पुणे विद्यापीठात आंदोलन

कॉकरोच जनता पार्टीचा पुणे विद्यापीठात आंदोलन

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

विद्यापीठातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होणार कोकरोच आंदोलन

गोकुळ गीतेंवर कोणताही दबाव टाकलेला नाही- गिरीष महाजन

गडचिरोलीत सात वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी चामोर्शी कडकडीत बंद

चामोर्शी शहरातील सात वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज चामोर्शी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना व नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली. गुरुवारचा आठवडी बाजारही बंद राहिल्याने व्यवहारांवर परिणाम झाला.

महाड मनसे आक्रमक, स्थानिकांना रोजगार, मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना धरले धारेवर

महाड MIDC मध्ये मनसे आक्रमक झाली असून जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली आज मनसेने महाड MIDC मध्ये आंदोलन केल. स्थानिकांना रोजगार, कंपन्यांबाहेर मराठी पाट्या आणि प्रदुषणाच्या मुद्द्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी MIDC च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 25 जुन पर्यंत कार्यवाही झाली नाहीतर मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

तुळजाभवानी मंदिरात भाविकांकडून दर्शनाच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या त्या दोन पुजाऱ्यांना 5 वर्षे मंदिर प्रवेशबंदी

पुजारी अभिषेक अशोकराव साळुंखे व हर्षल विनोद चव्हाण यांना करण्यात आली 5 वर्षे प्रवेशबंदी

तुळजाभवानी मंदीरात बोगस पुजारी व एजंटाकडून भाविकांच्या लूटीचा साम टिव्हीने केला होता पर्दाफाश

साम टिव्हीच्या स्टिंग ऑपरेशनंतर मध्ये कैद झालेल्या त्या दोन पुजाऱ्यांवर 5 वर्षांची मंदीरात प्रवेशबंदी तर पोलिसात देखील गुन्हा दाखल होणार

साम टिव्हीच्या बातमीनंतर मंदीर संस्थानच्या वतीने बोगस पुजारी व एजंटावर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथक देखील केल आहे नियुक्त

गोकुळ गीते माघार घेणार का?

गोकुळ गीते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात बैठक सुरु

कर्जमाफी जीआरची होळी; मंचरमध्ये शेतकरी संघटनांचा सरकारविरोधात एल्गार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीने मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कर्जमाफी जीआरची होळी करत कोणत्याही अटी-शर्तीविना सरसकट कर्जमाफीची मागणी केली.

अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकी-वणी रस्त्यासाठी शिवसेनेचा एल्गार; चक्काजाम आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकी-वणी रस्त्याच्या रखडलेल्या डांबरीकरणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने घाटलाडकी फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले. रस्त्यावरील गिट्टीमुळे वाढलेले अपघात, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय यावर संतप्त शिवसैनिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.

जळगाव विधान परिषद निवडणूकीत रेश्मा काळे यांच्या बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली!

जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी अखेर कायम राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

​गेल्या काही दिवसांपासून रेश्मा काळे या शेवटच्या क्षणी माघार घेतील, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, "नाशिकची उमेदवारी मागे घेतली गेली, तरच आपण माघार घेण्याचा विचार करू," अशी आक्रमक अट ठेवली होती. अखेर नाशिकचा तिढा न सुटल्याने काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली.

बुलढाणा जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. थॅलेसेमिया रुग्ण, अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण तसेच प्रसूतीदरम्यान महिलांना रक्ताची गरज भासत असताना उपलब्ध रक्तसाठा अत्यंत कमी झाला आहे.

खून, दरोडा आणि चोरी! महाराष्ट्रात तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या अजयसिंह ला अखेर पुणे पोलिसांनी केळी अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

३ गावठी पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, कोयते आणि इतर धारधार शस्त्रसाठा जप्त

पळून जात असलेल्या आरोपीला पाठलाग करून पोलिसांनी घेतलं ताब्यात

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सैन्यदलाकडून भीम' रणगाडा भेट

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सैन्यदलाकडून भीम' रणगाडा भेट

राळेगण सिद्धीत दाखल होताच अण्णा भावुक

आज कॉकरोच जनता पार्टीचा जाहीरनामा जाहीर होणार - अभिजित दिपके

पुण्यात आज आंदोलन होणार आहे - अभिजित दिपके

आज आम्ही कॉकरोच जनता पार्टी चा जाहीरनामा जाहीर करणार आहोत - अभिजित दिपके

आमच्या जाहीरनामा मध्ये तरुणांसाठी अनेक गोष्टी असणार आहेत - अभिजित दिपके

Yavtmal : खंडाळा घाटात लूटमार करणाऱ्या दोघांना अटक

यवतमाळच्या पुसद वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात भाजी विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून जबरीने पैसे हिसकावून पसार झालेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली.

ही कारवाई पुसद ग्रामीण पोलिस व एलसीबी पथकाने केली.शेख समीर उर्फ सोनू शेख जमील, तौफीक उर्फ भैयू शेख हाफीज अशी आरोपींची नावे आहेत.

Kankavali : असलदे गावाची एकजूट;गावात दारू विक्री करणाऱ्याने मागीतली माफी

कणकवली तालुक्यातील असलदे गावात दारुबंदी असताना गावातीलच एक व्यक्ती गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करत होता.

ग्रामस्थांना याची कुणकुण लागताच ग्रामस्थांनी एकत्र जमत त्या दारू विक्रेत्याला जाब विचारत धारेवर धरल.

ग्रामस्थांचा पवित्रा पाहत अखेर त्या दारू विक्रेत्याने शरणागती पत्करत ग्रामस्थांची माफी मागत पुन्हा गावात दारू विक्री करणार नसल्याचे जाहीर केले.

Hingoli : हिंगणी गावातील शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांनी साधला सर्वांगीण विकास

हिंगोलीच्या हिंगणी गावातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा पॅटर्न राबवत शेतीपूरक व्यवसायातून कुटुंबाचा व गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे

या गावातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून एचएफ गाय पालन व्यवसाय सुरू केला आहे, या गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी पशुपालक झाले आहे

शिर्डीच्या साई संस्थानचा कारभार सात वर्षांपासून विश्वस्त मंडळाविना

शिर्डीतील साईबाबा मंदिराचा कारभार गेल्या सात वर्षांपासून विश्वस्त मंडळाशिवाय सुरू आहे..

त्यामुळे प्रशासनाला मोठे निर्णय घेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय..

हायकोर्टाच्या आदेशाने सात वर्षांपासून जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची त्रिसदस्यीय कमिट साईमंदिराचा कारभार सांभाळत आहेत..

कुंभमेळ्याच्या तोंडावर शिर्डीत अनेक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी विश्वस्त मंडळ असणे गरजेचे आहे..

त्यामुळे राज्यसरकार विश्वस्त मंडळाची स्थापना कधी करणार हा प्रश्न आहे..

Hingoli : हिंगोलीमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी घातला गोंधळ

हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

शिवशाही इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

डीएससी नंबर वरून ग्राहक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे

संतप्त झालेल्या ग्राहकांनी गॅस वितरण करणाऱ्या गाड्या देखील रोखून धरले आहेत

गॅस एजन्सी व्यवस्थापन योग्य नियोजन करत नसल्याने ग्राहकांची हेळसांड होत असल्याचा आरोप या ग्राहकाने केला आहे

बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेणार?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशकात महत्वाची पत्रकार परिषद

भाजप नेते गणेश गीतेंच्या निवासस्थानी होते आहे पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेला मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत उपस्थित राहण्याची शक्यता

बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचं बंड थंड होणार ?

वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ

वाशिमच्या तोंडगाव फाट्याजवळ शिवशाही बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली वरून अकोला कडे ही शिवशाही बस जात होती. बस मधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचाराकरिता वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रेनच्या साह्याने ही बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मुंबईत गगनचुंबी टॉवर, झोपडपट्टीसाठी स्वतंत्र रेडी रेकनर

मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.

नाशिकमध्ये गोकुळ गिते माघार घेण्याची शक्यता

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला हटकले म्हणून पारधी वस्तीवर गावकऱ्यांचा हल्ला

आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली..

रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल

जिल्ह्यातील अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वायुवेग पथकाने वर्षभरात धडक कारवाई केली आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षात या पथकाने एकूण ५,८१४ दोषी वाहनांवर कायदेशीर कारवाई करत ३ कोटी ३३ लक्ष ४३ हजार रुपये दंड आणि १८.४४ लाख रुपये कर असा एकूण कोट्यवधी रुपयांचा महसूल वसूल केला.

शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं संत गजानन महाराजांचे शेगाव येथे देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची खेळ केला जात असल्याचा समोर येत आहे. मंदिर परिसरात चक्क उघड्यावर भेसळ युक्त खाद्यपदार्थ विकल्या जात आहेत आणि हजारो भाविक ते विकत घेऊन खात असल्याने त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचा समोर आला आहे. यावर अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करेल का असा सवाल उपस्थित राहत आहे.

सुवर्णपदक विजेत्या तन्वी रेडीजचे चिपळुणात जल्लोषात स्वागत

गुजरात येथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत चिपळूणच्या तन्वी रेडीज हिने उल्लेखनीय कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. ५५ हून अधिक देश सहभागी झालेल्या या स्पर्धेत तन्वीने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत भारताची मान उंचावली. स्पर्धेनंतर रेल्वेने चिपळूणात आगमन होताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तन्वीची महाविद्यालयाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल

तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ,सुंदर आणि पवित्र राखण्यासाठी मंदिर प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत मंदिर परिसरात थुंकणाऱ्यावर आणि कचरा टाकणार कारवाई केली जात आहे.मंदिर परिसरात थुंकतांना आढळलेल्या १८ जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याबाबत वारंवार सूचना व आवाहन करूनही काही व्यक्तींकडून थुंकण्याचे प्रकार सुरू असल्याने मंदिर संस्थानने याची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला

मान्सूनने कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रवेश केला असला, तरी संपूर्ण राज्यात अद्याप तो सक्रिय झालेला नाही.

पुणे महापालिकेच्या शाळांचे होणार खाजगीकरण?

या शाळांमधील सर्व शालेय साहित्य महापालिकेकडून पुरविण्यात येत असतानाही प्रत्येक विद्यार्थ्यामागे 25 हजार रुपये या संस्थेला देण्यात येणार असल्याची माहिती

महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून पुणे शहरात बॅनरबाजी

गॅस वाढल्याने सरकार विरोधात रोष

महँगाई डायन खाये जात हे अशा आशयाचा बॅनर

युवक काँग्रेसच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत

ना. सी. फडके चौक, निलायम टॉकीज परिसरातील चौकात लागला बॅनर

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 15 जुलैपासून बाणेर स्टेशनपर्यंत सुरू होणार

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पहिला टप्पा तातडीने पूर्ण करण्यात येत असून 15 जुलैपासून सुरू होईल

पुणेकरांना शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा म्हणजेच बाणेर पर्यंत प्रवास करता येणार

हिंजवडी मेट्रो पूर्ण क्षमतेने डिसेंबर पर्यंत धावणार आहे पहिल्या टप्प्यात बारा स्थानके सुरू केले जाणार आहेत

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आज कॉकरोच जनता पार्टीचे आज आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुपारी ४ वाजता आंदोलन

कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिली माहिती

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर लखनऊ, जयपूर आणि बंगळुरू येथे तीव्र देशव्यापी आंदोलन छेडले जाणार

२० जून रोजी पुन्हा दिल्लीत आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात दोन गटात राडा

कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात दोन गटात झालेल्या वादात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे .या घटनेत राहुल वर्मा नावाच्या तरुण जखमी झाला आहे. जवळपास दोन ते तीन राउंड गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. प

ठाण्यातील वृद्धाला मारहाण प्रकरणी परप्रांतीय कॅब चालकावर गुन्हा दाखल

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कॅब चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात शेतकरी दिनाच्या दिवशीचं शेतकऱ्यांचा प्रशासना विरोधात रोष

Mumbai rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा धुमाकूळ; रस्ते पाण्याखाली- नागरिकांचे हाल, पुढचे २ दिवस सतर्कतेचे

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, रेल्वे उशिराने; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Famous Actress : २ दिवस सहन केलं, तिसऱ्या दिवशी दगड उचलला अन् डोकं फोडलं; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला छेडछाडीचा थरारक अनुभव

पावसाळ्यात ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी कॉटन-जॉर्जेटच्या 'या' 5 साड्या ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT