Saam Tv Breaking News Live Updates In Marathi Maharashtra SAAM TV
महाराष्ट्र

Marathi News Live Updates : राज्यात दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता लागेल - शरद पवार

Namdeo Kumbhar

राज्यात दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता लागेल - शरद पवार

महाराष्ट्र राज्याचा वेगळा लौकिक होता. उत्तम प्रशासन म्हणून लोक महाराष्ट्राकडे बघत होते. आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांची लोकांनी टिंगल करावी अशी स्थिती केली. सरकारने किती निर्णय घेतले… त्यामधील किती निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता लागेल, असे शरद पवार म्हणाले.

गद्दारांना आणि त्याच्या कुटुंबियांना दिलेली सुरक्षा काढा - ठाकरे

ही गद्दारी फक्त सेना आणि राष्ट्रवादीसोबत झाली नाही, तर जनतेसोबत झाली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणावर ठाकरे संतापले. ते म्हणाले, मुंबईला २ पोलीस कमिशनर आगेत, आणखी ५ वाढवा … हरकत नाही पण कारभाराचे काय ?

गद्दारांना आणि त्याच्या कुटुंबियांना दिलेली सुरक्षा काढा आणि जनतेला द्या. हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाही.

काही महिन्यांपूर्वी घोसाळेपण यांची हत्या झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.. कुत्रा गाडीखाली आला तर राजीनामा मागणार का? तुम्ही म्हणता कुत्र्याचा मृत्यू झाला तरी राजीनामा मागणार … तुम्हाला जीवाची किंमत नाही का?

तुम्ही जाहिरातबाजीवर पैसा उधळता तेवढा जनतेच्या सुरक्षेवर लावा. शाहू फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी शहांचा होऊ देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

राज्यातील सुरक्षेचे तीन तेरा वाजलेत - नाना पटोले

राज्यातील सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहचली नाही. पीक विमा हे विशिष्ट उद्योगपतींसाठी सुरू केलं. काही शेतक्यांना विम्याने ३ रुपये मिळाले. केंद्रातील चमू येथे येत नाही. लोकसभेत राज्यातील जनता मविआ सोबत राहीली… तशी विधानसभा निवडणुकीत देखील जनता आमच्यासोबत राहील, असे नाना पटोले म्हणाले.

फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही - नाना पटोले 

शाहू फुलेंच्या महाराष्ट्राला काळिमा फासण्याचं काम या सरकारचं सुरु आहे. महायुतीने जे पाप केलं ते उघड करण्यासाठी आम्ही जनतेसमोर आलो आहोत. मालवण येथील महाराजांचा पुतळा केवळ ८ महिन्यात त्याची विडंबना झाली. हे पाप महायुतीने केलं, अद्याप फडणवीस यांनी या घटनेची माफी मागितली नाही. माजी मंत्री आणि नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली… महाराष्ट्र हादरला. शाळेत शिकणाऱ्या ५ वर्यांच्या मुली सुरक्षित नाहीत. राजीनामा अनेकांनी मागितला आहे… पण आता जनता यांना दाखवेल.

प्रिया दत्त या सिद्दीकींच्या निवासस्थानी

माझी खासदार काँग्रेस नेत्या प्रिया दत्त या देखील आता बाबा सिद्दिकी यांच्या मकबा हाईट्स निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. सिद्दिकी आणि दत्त कुटुंबीयांचे नाते फार जुने आहे. दत्त कुटुंबीय आणि सिद्दिकी कुटुंबीय नेहमीच एकमेकांच्या दुःखात सहभागी होत असतात जीशान सिद्दिकी यांचे सांत्वन करण्यासाठी प्रिया दत्त या आता बाबा सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत

Indapur News: बापासाठी लेक उतरली मैदानात, अंकिता पाटील ठाकरेंची जनसंवाद यात्रा

पुण्याच्या इंदापूरात बापासाठी लेक मैदानात उतरलीय…हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी पवार गटाच्या नेत्या मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांनी आजपासून तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरु केलीय. इंदापूर तालुक्यातील व्याहळी गावात भैरवनाथाला श्रीफळ वाढवून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: हितेंद्र ठाकूर यांना धक्का! माजी महापौर राजीव पाटील करणार भाजपात प्रवेश

बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना धक्का

वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील करणार भाजपात प्रवेश

आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजीव पाटील यांचा पक्षप्रवेश

राजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू

नालासोपारा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर राजीव पाटील यांना उमेदवारी देणार

राजीव पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात भाजप कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची होती चर्चा

Baba Siddique: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: तिसऱ्या आरोपीची ओळख पटली

शिवकुमार ऊर्फ शिव गौतम उत्तर प्रदेशच्या बेहराईच च्या गंधारा गावचा राहणार

शिवकुमार गँगचा म्होरक्या असल्याचा इतर दोन्ही अटक आरोपींचा चौकशीत दावा

हत्येनंतर शिवकुमार पळून जाण्यात यशस्वी

शिवकुमारच्या शोधात मुंबई गुन्हे शाखेच्या टीम परराज्यात रवाना

शिवकुमार पुण्यात एका स्क्रॅप डीलरकडे कामाला असल्याची सूत्रांची माहिती

Latur News: 

बाभळगाव इथल्या दसरा मेळाव्यात आमदार देशमुख बंधूंनी लाडकी बहिणी योजने वर सरकून टीका केली आहे.. लाडकी बहीण योजना ही कुठल्याही एका पक्षाची नाही...,तर ती सरकारची आणि सर्वच लोकप्रतिनिधीची योजना आहे.. त्यामुळे या योजनेचा लाभ पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांनी घेतला पाहिजे.. लोकसभेत पराभव झाल्यामुळे, विधानसभेच्या तोंडावर आणलेली योजना आहे... अशी सडकून टीका काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी काल झालेल्या बाबळगाव येथील दसरा मेळाव्यात केली आहे...

Congress Meeting: 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक

राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्याशी करणार चर्चा

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार बैठकीसाठी उपस्थित असणार

हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा आढावा घेणार

विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार

महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याने तो दिल्लीत तरी सुटणार का हे पाहणं महत्वाच

Jejuri News: जेजुरीत मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात, हजारो भाविकांची गर्दी

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू आहे आज सकाळी मोठ्या उत्साहात मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे 40 किलो ची देवाची जी तलवार आहे त्या तलवारीलाच खंडा असे म्हटले जाते या खंडाच्या विविध कसरती केल्या जातात याला मर्दानी दसरा असे म्हटले जाते यामध्ये विजेत्यांना बक्षीस आणि पारितोषिक मार्तंड देवस्थानच्या वतीने दिले जाते या उत्सवाला आता सुरुवात झाली असून राज्यभरातून हजारो भाविकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे रात्री देवाची पालखी गडावरून गावामध्ये आली होती ही पालखी गडावर सकाळी परत आल्यानंतर मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे

Kolhapur News: कोल्हापुरात मोठी कारवाई! 24 लाखांचा गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त

सणासुदीच्या काळात गोवा बनावट दारूचा मोठा साठा कोल्हापूर पोलिसांनी केला जप्त

24 लाखांच्या गोवा बनावट दारूसह 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

शाहुवाडी तालुक्यातील आंबा येथे कोल्हापूर पोलिसांची कारवाई

चौघांना अटक;शाहुवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

दसऱ्याच्या मध्यरात्री पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाची कारवाई

Akola Accident News: अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटला...

अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक पलटी झालाय.. इंदौर वरून बेंगलोरला साबण बनवण्याचे केमिकल घेऊन जात असताना ड्रायव्हर साईडचे चाक निखळल्यामुळे हा ट्रक पलटी झाला आहेय. राष्ट्रीय महामार्गावरील भोसला इंजिनिअरिंग महाविद्यालय रस्त्यावरील डिवायडरवर हा ट्रक उलटलाऐ. त्यामुळे डिझलची टाकी पुर्ण फुटली असुन डिझेल व केमिकल रस्त्यावर प्रमाणात पडलेले होते. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. चालकाला किरकोळ मुक्कामार लागला असून तो सुखरूप आहे.

अजित पवार कुपर रुग्णालयात

सणासुदीच्या काळात गोवा बनावट दारूचा मोठा साठा कोल्हापूर पोलिसांनी केला जप्त

गृहमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे असं सांगितलं पाहिजे
छगन भुजबळ
सूरतला पाळणे सूरतवरून गुहावाटीवरून गोवा आणि पोलीस बंदोबस्त मुंबईला आले. तुम्हाला अमित शहा हंटर घेऊन पळवत आहेत आणि तुम्ही पळत आहात ते काय आम्हाला पळवणार आम्ही त्यांना पळवणार
संजय राऊत

Baba Siddique death News : बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. २००४ ते २००८ या काळात ते विविध खात्यांचे राज्यमंत्री तसेच म्हाडाचेही अध्यक्ष होते.

गोदावरी नदीत चारजण बुडाल्याची घटना, एकाला वाचवण्यात यश, एका महिलेचा मृतदेह सापडला. दोघांचे शोधकार्य अद्यापही सुरूच

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप निवडणूक समितीची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप निवडणूक समितीची बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बैठक पार पडेल.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह समितीचे इतर नेते राहणार उपस्थित आहेत. भाजपची पहिली यादी येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने या बैठकीत अंतिम नावावर अंतिम चर्चा होणार आहे.

भंडाऱ्यातील माजी आमदार चरण वाघमारे घेणार शरद पवारांची भेट

भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार चरण वाघमारे हे सध्या अपक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील व शरद पवार यांच्याशी संपर्कात असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. चर्चेसाठी मिळालेल्या निमंत्रणानुसार ते आज शरद पवारांची भेट घेत चर्चा करून पक्षप्रवेश व तुमसर - मोहाडी विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात निर्णय घेणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना बाप लेक बुडाले

देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बाप लेक बुडाण्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या वांजोळा परिसरात घडली.

Baba Siddique death News :  ४ जणांनी घेतली होती बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी

२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते.

४ जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले.

Baba Siddique death News : बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बडा कब्रस्तान मारिन लाईन येथे होणार दफन

बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बडा कब्रस्तान मारिन लाईन येथे होणार दफन

मुस्लिम समाजाच्या नुसार होणार दफनविधी

संध्याकाळी 8.30 वाजता होणार दफनविधी

यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आह

बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी राजकीय नेते येण्याची शक्यता आहे

मुस्लिम धर्मानुसार नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार

7 वाजता हि प्रार्थना त्यांच्या राहत्या घरी मकबा हाईट येथे होणार

यानंतर त्यांचा दफनविधी रात्री साडेआठ वाजता मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे होणार

Baba Siddique death News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यांचे पीए अनिल डिकले आणि प्रमोद हिंदूराव हे कूपर रुग्णालयात पोहचले आहे

Baba Siddique death News : अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द

- अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द

- अजित पवार यांच्या हस्ते आज देवळाली विधानसभा मतदारसंघात होता विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा

- बाबा सिद्दिकी हत्येच्या घटनेमुळे अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav: सूर्याने इतिहास रचला! T20I क्रिकेटमध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Gajkesari Rajyog 2024: 19 ऑक्टोबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; मिळणार भरपूर पैसा अन् समृद्धी!

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी उद्यानातील ही प्रमुख आकर्षणे तुम्हाला माहिती आहेत का ?

Ulhasnagar News : चोरीला गेलेले ४ लाख २५ हजार रुपयांचे मोबाईल सापडले; सीईआयआर पोर्टलवरून शोध

Raj Thackeray: ना युती, ना आघाडी.. विधानसभेला मनसे स्वबळावर लढणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT