Uddhav Thackeray Group South Mumbai Candidate Declared for Election Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Election 2024: ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईतून कोणाला मिळाली उमेदवारी? शिंदेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी नावच केलं जाहीर

South Mumbai Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray Group Candidate Declared: उद्धव ठाकरे यांनी आज उरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवत अरविंद सावंत यांना निवडून आणणारच्या निर्धार केला.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

उद्धव ठाकरे यांनी आज उरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे ग्रुपवर जोरदार हल्ला चढवला. अरविंद सावंत इथून पुन्हा खासदार होणारच. या लोकांनी आपलं सरकार पाडलं. आता उद्या निवडणुका जाहीर होतील तेंव्हा त्यांना विचारा की शिवसेना कुणाची हे आधी सांगा? मी अरविंद सावंत यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करतोय. त्यांना त्यांची जागा दाखवणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

विजयाचा भास व्हावा अशा सभा होत आहेत. कोस्टल रोडचं स्वप्नं आपण पाहीलं ते आज पूर्ण झालंय. त्यासाठी आपण अनेक बैठका घेतल्या. आदित्य ठाकरेंनी या मार्गासाठी जो बोगदा खोदणारे मशिन आणलं होतं, त्याला मावळा नाव दिलं त्याच मार्गाने मी आज आलो. आपण पाहिलेलं एक स्वप्नं पूर्ण झालेलं पाहीलं या ठिकाणी बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे त्यांची मागणी आहे, सेवालाल महाराजांचे मंदिर व्हावं, ते आम्ही निवडुन आलो सत्तेत आलो की पूर्ण करणार, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काल निवडणूक रोख्यांचं भांडं फुटलं. त्या पक्षाच्या खात्यात ८ ते ९ हजार कोटी कुठून आले आणि कॉंग्रेसच्या खात्यात कीती आहेत ते देखील जाहीर झाले. आता सांगा कोणी कुणाला लुटले ज्या भाजपला ज्या कंपन्यांनी पैसे दिले, त्यांच्यावर धाडी टाकून त्यांच्याकडून किती लूट केलीय हे आता उघड झालंय. त्यांना आता आणखी लूट करण्यासाठी पुन्हा सत्ता हवीय.

त्यांच्या आवास योजना नाही आहेत तर आभास योजना आहेत कुणालाच घरं मिळाले नाहीये. हा फक्त लुटारूपणा आहे. मी गुजराती समाजाच्या विरोधात नाहीये, पण त्यांनी गुजरात विरूद्ध संपूर्ण भारत असं वास्तव उभं केलंय. उद्या आम्ही सत्तेत आलो तर गुजरातला वेगळा न्याय देणार नाही. गुजरात आणि आपण दुधात साखर मिसळावे तसे राहणार आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT