Lok Sabha Election 2024 : Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : मोदींचे महाराष्ट्रातील विश्वासू शिलेदार पिछाडीवर; उद्धव ठाकरे- शरद पवारांचे उमेदवार सुसाट

Maharashtra Lok Sabha Election latest update : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राज्यातील तीन केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत. यामुळे तिन्ही केंद्रीय मंत्र्यांचं टेन्शन वाढलं आहे. कपिल पाटील २० हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. राज्यातील भाजपचे ३ केंद्रीय मंत्री मतमोजणीत पिछाडीवर असल्याची माहिती समजत आहे. मतमोजणीत पिछाडीवर असलेल्या राज्यातील केंद्रीय मंत्र्यांचं टेन्शन वाढलं आहे. या केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे- शरद पवारांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

महाविकास आघाडीने राज्यातील केंद्रीय मंत्र्यांचे टेन्शन वाढवलं आहे. राज्यातील भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, केंद्रीय रावसाहेब दानवे आणि केंद्रीय भारती पवार हे मतमोजणीत पिछाडीवर आहेत. या केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही अतितटीची लढत सुरु आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील उभे होते. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. कपिल पाटील यांच्या विरोधात सुरेश म्हात्रे यांनी ३० हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. दिंडोरीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार या ८१ हजारांहून मतांनी पिछाडीवर आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातही भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे ११ व्या फेरीत १६०८० मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ३ केंद्रीय मंत्री पिछाडीवर असल्याचे समजत आहे.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे हे विजयी झाले आहेत. नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना धूळ चारली. विजयानंतर राणे कुटुंब आणि समर्थकांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT