Aajchya Marathi Batmya Live - 10 April 2024 | Latest Updates on PM Narendra Modi, Lok Sabha Election 2024, NDA, Maratha Aarakshan and overall Maharashtra Saam Digital
महाराष्ट्र

Today's Marathi News Live: धुळे, जालना मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

PM Narendra Modi Sabha Live From Nagpur | Maharashtra Live News and Update in Marathi (10 april 2024): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर, अहमदनगर अपघात, राज ठाकरे भूमिका , लोकसभा निवडणूक घडामोडी दिवसभरातील बातम्यांचे लाईव्ह अपडेट इथे वाचा

Vishal Gangurde

धुळे, जालना मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. दरम्यान आज काँग्रेसने धुळे आणि जालना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.  धुळ्यातून शोभा बाच्छाव तर जलण्यातून कल्याण काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

NDA सरकार आल्यानंतर आदिवासी महिला राष्ट्रपती झाली; PM नरेंद्र मोदी

लोकांनी विसरू नये राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमंत्रण नाकारले

हे सनातन विरोधी आहे, हिंदू संस्कृती ला संपवण्याचा प्रयत्न करत आहे

काय यांना एकही जागा जिंकू द्याल का

इंडिया आघाडीला यांच्या पापाची शिक्षा द्या,

तुमचे वोट हे विरोधकांना पराभूत करण्यासाठी म्हत्वाचे आहे

काँग्रेस ने डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न पासून दूर ठेवले..

NDA सरकार आल्यावर आदिवासी बेटी राष्ट्रपती झाली..

ओबीसीना संविधानिक दर्जा दिला.

10 वर्षात आदिवासी कल्याण विभागाचे बजेट 10 पटीने वाढले

Congress News: काँग्रेसने ८० वेळा संविधान बदललं; नितीन गडकरींचा दावा

विदर्भातील जनता 10 पैकी 10 जागा निवडून देईल असा विश्वास व्यक्त करतो..

कन्हान नदीवर मेट्रो पूल बांधून कन्हान पर्यंत मेट्रो आणणार आहे,

जात पंथ धर्माचा आधारावर आमचं सरकार निर्णय घेत नाही..

सबका साथ सबका विकास समोर ठेवून काम।केलं,

60 वर्षात नाही झालं, ते 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं.

कामाचा आधारावर जेव्हा टीका टिपणी करतात तेव्हा तेव्हा लोक

कन्फ्युज करण्याचं काम करतात.

संविधान बदलू शकत नाही हे सुप्रीम कोर्टान सांगितले

80 वेळा संविधान बदलण्याचे काम कॉंग्रेसने केले.

इंदिरा गांधीच्या काळात अनेक निर्णय हे संविधान विरोधी होते,

नरेंद्र मोदी यांचं नागपूरमधील सभेत आगमन, सभेच्या ठिकाणी एकच जल्लोष

धनुष्यबानचं बटन दाबा नाहीतर कमळ दाबा, मतदान मोदींनाच; देवेंद्र फडणवीस

नो बर्वे ओन्ली पारवे हा नारा आहे,

यावेळी सर्व रेकॉर्ड तोडून नितीन गडकरी निवडणून येणार आहे

देशाचा नेता निवडायचा आहे,

धनुष्यबाण घडी असो की कमळ यातील कुठलीही बटन दाबले तर वोट मोदीजी ना जाणार आहे,

दुसऱ्या कोणाला दिलं राहुल गांधी यांना वोट जाणार आहे,

त्यामुळे वोट कोणाला द्यायचं आहे ते ठरवून घ्या.

आज मोदीनजीच्या नेतृत्वात केलेला चमत्कार आपण पाहत आहे,

तृतीयपंथींना आता सिग्नलवर मागता येणार नाहीत पैसे, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

तृतीयपंथीयांवर पुणे पोलिसांकडून निर्बंध

तृतीयपंथींना आता सिग्नलवर मागता येणार नाहीत पैसे, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे शहरातील अनेक सिग्नलवर तृतीयपंथी नागरिकांकडून पैसे मागतात

या तृतीयपंथी यांच्यावर पुणे पोलिसांनी जाहीर केले आदेश

नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारींवर पुणे पोलिसांनी घेतला निर्णय

सिग्नलवर उभे असलेल्या वाहनांना जर त्रास दिला तर या तृतीयपंथीवर होणार कारवाई

घरगुती समारंभ मध्ये देखील आमंत्रणशिवाय हजेरी लावण्यास प्रतिबंध

पुणे पोलिसांनी जाहीर केला आदेश

Maratha Aarakshan News: मराठा आरक्षणाविरोधातील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब

मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब

सोमवारी युक्तिवाद संपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व याचिकाकर्त्यांना निर्देश

याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद आटोपताच मंगळवारी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता करणार युक्तिवाद

सुनावणी लवकरात लवकर संपवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आग्रही

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपिठाकडे एकत्रित सुनावणी आहे सूरु

राज्य सरकारने मुदतवाढीची केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती

नरेंद्र मोदींमुळे  ५.९१ लाख लोकांना आरोग्य विमा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

नरेंद्र मोदी यांची आज नागरपूरमध्ये सभा होत आहे. काही वेळात नरेंद्र मोदी सभेतून संबोधित करणार आहेत. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं. लोकांना घरकुल देण्याच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एकमताने विकासाच काम झालं. किसान सन्मान योजनेत 2 लाख शेतकऱ्यांना मदत केली आहे. 5 लाख 91 हजार लोकांना आरोग्य विमा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं

कोराडी कामठी दरम्यान कारचा अपघात, महिला सरकारी वकील गंभीर जखमी

कोराडी कामठी दरम्यान अपघात,

अपघातात महिला गंभीर जखमी

धडक बसल्याने रोडच्या कडेल जाऊन अपघात

अपघातात गंभीर महिला सरकारी वकील असल्याची माहिती

महिलेची खाजगी रुगणालायत उपचार सुरू.

मुंढव्यात फर्निचरच्या गोडाऊनला आग, आतापर्यंतची पाचवी घटना

मुंढव्यात जुन्या फर्निचरच्या गोडाऊनला आग लागून मोठा आर्थिक नुकसान झालं आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या त्यांना तब्बल 45 मिनिटत आग आटोक्यात आणली आली. याआधी या ठिकाणी पाच वेळा त्याच्या दुकानाला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत मुंढवा येथील नदीपुला पुढे मुंढवा हद्दीमध्ये हे घटना घडली.

सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने गांभीर्याने विचार करावा; विश्वजित कदम यांचा इशारा

सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र,

जिल्ह्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती जाणून घेऊन महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा.

याच्या काही दिवसात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बरोबर बैठक घेणार

काँग्रेस कार्यकर्त्यांची देखील भावना जाणून घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल..

आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हा काँग्रेसने जाहीर केली भूमिका..

दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा

दिल्ली सरकारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. मद्यघोटाळा प्रकरणात आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांंच्यासर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि नेत्यांना अटक झाली आहे. दरम्यान समाज कल्याणमंत्री

समाज कल्याण मंत्री राज कुमार आंनद यांचा राजीनामा

राजकुमार आनंद यांच्या घरी काही दिवसांपुर्वी ED ने रेड टाकली होती

लग्नपत्रिका देण्यासाठी जाणाऱ्या नवरदेवाचा आणि चुलत भावाचा अपघाती मृत्यू

लातूर-उदगीर महामार्गावरच्या लोहारा या ठिकाणी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे दरम्यान या अपघातात दुचाकी वरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे, दुचाकी वरील विशाल निलेवाड वय 22 व आकाश निलेवाड वय 23 अशी या मयत भावंडांची नाव आहेत. तर या अपघातातील मयत विशाल निलेवाड या युवकाचं येत्या 18 एप्रिल रोजी विवाह सोहळा येऊन ठेपला होता, त्या लग्नाकार्याच्या लग्नपत्रिका घेऊन नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात व निलेवाड कुटुंबीयांवर मोठी शोक कळा पसरली आहे.

उत्तर मुंबईची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली वर्षा गायकवाड यांची भेट

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं असा प्रस्ताव नाना पटोले यांनी घोसाळकर यांना दिला आहे

मात्र आपण शिवसेनेकडूनच आपण निवडणूक उमेदवार असेल तर लढू अस स्पष्ट मत घोसाळकर यांनी व्यक्त केलं

मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर एकत्रित सुनावणीला सुरुवात

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर एकत्रित सुनावणीला सूरवात

मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाकडे सुनावणी सुरू

राज्य सरकारने मुदतवाढीची केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

मराठा समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणा विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर नियमित सुनावणीला सूरवात

१ मे पासून सुरू होणार पुणे-गोवा विमानसेवा, आठवड्यातून ६ दिवस सेवा

आठवड्यातून ६ दिवस पुणे ते गोवा विमनेवा उपलब्ध होणार

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांची गोव्याला पसंती

शनिवार सोडून इतर ६ दिवस पुणे ते गोवा विमान सेवा प्रवाशांना मिळणार

पुण्यातून दुपारी २.२५ वाजता विमानाचे उड्डाण होऊन ३.२५ वाजता ते गोव्यात पोहचेल

दुसऱ्या बाजूला, गोव्याहून दुपारी १ वाजता विमान उड्डाण घेईल आणि १.५५ पुण्यात दाखल होईल

डॉ. अजित गोपछडे आणि मिलिंद देवरा यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ

डॉ. अजित गोपछडे (भाजप) आणि मिलिंद देवरा (शिवसेना) यांनी घेतली राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ

राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांनी डॉ. अजित गोपछडे (भाजप) आणि मिलिंद देवरा (शिवसेना) यांना दिली पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

डॉ. अजित गोपछडे यांनी हिंदीत तर मिलिंद देवरा यांनी घेतली मराठीत शपथ

नांदेडमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल - अशोक चव्हाण

अशोक चव्हाण काय म्हणाले?

नांदेडमध्ये भाजपची जागा निवडून येईल, माझं लक्ष आहे.

जेव्हा युतीत असते, तेव्हा सगळ्यांना मदत करावी लागते. पारवे आमचे जुने मित्र आहेत.

सगळ्या उमेदवारांना मदत करावी लागते.

ग्राउंड रियालिटी माहीत नसल्यामुळे काँग्रेसला 17 जागेवर लढावं लागत आहे.

ज्या वेळेस जागेच्या संदर्भात प्रभाव पाडला पाहिजे..त्या जागेसंदर्भात माहिती असली पाहिजे..त्या ठिकाणीच्या राजकारण माहिती असावी.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोलवली बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोलवली बैठक

या बैठकीत मनसे नेते ,सरचिटणीस असणार उपस्थित

महायुतीचा प्रचाराबाबत मनसे भूमिका शनिवारच्या बैठकीत घेणार निर्णय

राज ठाकरे यांनी काल मोदींना दिला बिनशर्त पाठिंबा

भाजपची लोकसभा उमेदवारांची १०वी यादी जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांचे नावे नाहीत

भाजपची लोकसभा उमेदवारांची १० वी यादी जाहीर

मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांची नाव नाहीत

आज ९ उमेदवारांची यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगालच्या उमेदवारांची यात नाव आहेत.

मिलिंद देवरा यांनी घेतली राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ

शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी आज राज्यसभेचे खासदार म्हणून घेतली शपथ

भारताचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली

मिलिंद देवरा यांनी मराठीतून खासदार म्हणून घेतली शपथ

मिलिंद देवरा दोनदा दक्षिण मुंबईचे खासदार होते.

तसेच ते केंद्र सरकारमध्ये २०११ मध्ये संचार आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री होते.

जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण : रश्मी बर्वे यांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच

सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाने समितीच्या निर्णयाला स्थगती दिली होती

मात्र निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता

बाबा रामदेव यांचा बिनशर्त माफीनामा कोर्टाने नाकारला

सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

कोर्टाने बाबा रामदेव यांचा बिनशर्त माफीनामा नाकारला

तुम्ही सादर केलेला माफीनामा पब्लिक डोमेनमध्ये द्या, त्याशिवाय त्या माफीनाम्याचा काही उपयोग नाही - कोर्ट

दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक

दिल्ली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक २६ एप्रिलला होणार

दिल्ली महानगरपालिकेत सध्या आम आदमी पक्षाची सत्ता

अरविंद केजरीवाल अटकेत असताना महत्वाची निवडणूक

सोलापुरात एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

- सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याने पदाधिकारी नाराज

- पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात नघेता उमेदवार देण्याच्या हालचालीमुळे पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

- भाजपच्या विरोधात उमेदवार देऊन धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळावे म्हणून काही पदाधिकारी उमेदवारी देण्यास करत होते नकार

- औरंगाबादला महाविकास आघाडीकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार देऊ नये म्हणून काँग्रेसला ब्लॅकमेल करण्यासाठी एमआयएम सोलापुरात उमेदवार देत असल्याचा आरोप

- इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी सोलापुरात प्रेशर पॉलिटिक्स करण्यासाठी उमेदवार दिल्याचा आरोप

- पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारोव्ह सय्यद यांनी केला आरोप

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्यावर पलटवार

आमदार अतुल बेनके यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती त्यावर प्रतिउत्तर देताना डॉ. अमोल कोल्हे यांनी बेनके यांचा चांगलाच समाचार घेतला. घरात चार टर्म आमदारकी नव्हती, तरी शेतकऱ्यांचं पोरगं खासदार झालं. या खासदार शेतकऱ्याच्या पोराचं पंतप्रधान कौतुक करतात म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला का ? असा सवालही त्यांनी केला.

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कांद्याची माती झाली आणि त्यासाठी संसदेत मी आवाज उठवतो, शेतकऱ्यांनाचे प्रश्न मांडतो म्हणून पश्चाताप झाला?, शेतकऱ्याच्या पोराला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो म्हणून पश्चाताप झाला ? तुमच्या खासदाराचा देशात तिसरा नंबर लागला म्हणून तुम्हाला पश्चताप झाला? ज्यांच्यामुळे तुमची लॉटरी लागली त्यांचा तुम्हाला पश्चताप झाला ? असे अनेक सवाल उपस्थित करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा चांगलाच समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विदर्भात दुसरी सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील आणि विदर्भातील दुसरी सभा आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे होत आहे.

आता सभेला काहीच तास राहिले असल्यानं उद्धव ठाकरेंवर कमिशनिखोरीच्या आरोपानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात विरोधकांवर निशाणा साधतात का याकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे.

आज होऊ घातलेल्या या सभेसाठी महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघांमध्ये खरं तर सभा होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री नागपूरला दाखल

ठाणे-बेलापूर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

ठाणे बेलापूर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

घणसोली स्टेशन समोरील उड्डाणपुलावर कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

ठाण्याच्या दिशेने जाताना वाहनांच्या लांबच लांब रांगा

वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल असून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम सुरु.

कंटेनरला बाजूला काढण्यासाठी जेसीबीची घेणार मदत.

ठाकरे गटाने पुण्यात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार थांबवला

ठाकरे गटाने पुण्यात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार थांबवला. संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्या सुचनेनुसार शहरप्रमुखांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचं काम थांबवण्याच्या सूचना.. मावळमध्ये शिवसेना उमेदवाराचं काम काँग्रेस करत नसल्याने निर्णय.. महाविकास आघाडीतील बिघाडी धंगेकरांना अडचणीची ठरणार .. ठाकरे गट आक्रमक

भाजपची कवितेतून उद्धव ठाकरेंवर टीका

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका

कवितेतून उद्धव ठाकरेंवर केली टीका

राज ठाकरेंनी भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन शेलारांनी ठाकरे गटाला डिवचले

यांच बिनशर्त असत (राज ठाकरे) आणि त्यांच मुख्यमंत्रिपद मागत

ट्विट करत उद्धव ठाकरेंवर केली टीका

शरद पवार गटाचे आणखी दोन उमदेवार जाहीर

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणखी दोन उमेदवार जाहीर

सातारा - शशिकांत शिंदे

रावेर - श्रीराम पाटील

भाजपकडून उमेदवारांची आज नववी यादी जाहीर होणार; साताऱ्याचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर होणार

सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील २ ते ३ मतदार संघाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल सह महाराष्ट्रातील उमेदवारांची नाव आज जाहीर होण्याची शक्यता

सूत्रांची माहिती

'आप'कडून अरविंद केजरीवाल यांच्या जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'कडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

प्रकरण मेंशन केल्यानंतर या प्रकरणी सुनावणी कधी होईल, याची माहिती समजणार आहे.

आजच प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्रात

नांदेडमध्ये धडाडणार उद्या अमित शहांची तोफ

नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी गावात संध्याकाळी ५ वाजता सभेचं आयोजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाणांसह महायुतीचे नेते राहणार सभेला उपस्थित

नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार

- १ मे पासून नाशिक दिल्ली विमानसेवा

- १८० आसन क्षमतेचं विमान, किमान भाडे ३ हजार रुपये

- आठवड्यातील सातही दिवस मिळणार नाशिक-दिल्ली विमानसेवा

- दोन तासात कापता येणार नाशिक, दिल्ली अंतर, उद्योग, पर्यटन व्यवसायाला होणार फायदा

- तब्बल १० महिन्यांनंतर पुन्हा सुरू होणार नाशिक दिल्ली विमानसेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT