प्रमोद जगताप साम टीव्ही, नवी दिल्ली
कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरण (Liquor Scam Case) आम आदमी पक्ष आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. काल दिल्ली उच्च न्यायालयाने आपची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आता आपचं ( Aam Aadmi Party) पुढचं पाऊल, काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. (Latest Marathi News)
अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejariwal) यांची अटक योग्य असल्याचं काल दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आप सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आजच याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात अटक झालेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंगळवारी उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. हायकोर्टाने केजरीवाल यांची अटकच नव्हे तर त्यांची कोठडीही योग्य (Delhi Politics) ठरवली आहे. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, ईडीकडे पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळे केजरीवाल करण्यात आलेली अटक योग्य आहे.
ईडीने गोळा केलेले पुराव्यांवरू या कथित प्रकरणात केजरीवाल यांचा सहभाग असल्याचं दिसून येतं, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी (Liquor Scam Case CM Arvind Kejariwal) मुख्यमंत्री केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. या अटकेला केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.
अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. दिल्ल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, ईडीच्या पुराव्यांवरून केजरीवाल यांनी लाचखोरी (Arvind Kejariwal News) प्रकरणात सक्रिय भूमिका बजावल्याचे पुराव्यावरून दिसून येते.
मागणीला सुनावणीत अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाकडे अंतरिम जामीन मागितला होता. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने 3 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये निर्णय राखून ठेवला होता. त्यावर काल निर्णय देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.