shinde-Fadnavis Government  saam tv
महाराष्ट्र

Adv Rahul Narvekar : शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? विधानसभा अध्यक्ष म्हणाले...

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं.

साम टिव्ही ब्युरो

विनायक वंजारे

Adv rahul narvekar News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाकीत वर्तवल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं.

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे एक दिवसाच्या खासगी दौऱ्यासाठी सावंतवाडीत आले आहेत.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ॲड.राहुल नार्वेकर म्हणाले, 'आमदारांचं निलंबन करायचं की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. सुप्रीम कोर्ट त्यावर निर्णय घेण्यात सुचित करू शकत नाही. परंतु निलंबन करायचं की नाही हा निर्णय अध्यक्षांचा आहे. तर सरकार स्थापन करणं की पाडणं हे विधानसभा ठरवते. त्यामुळे सरकार पडणार असं कुणी विधानसभेच्या बाहेर बोलत असेल, चर्चा करत असेल तर त्याला मी महत्व देत नाही'.

राज्यात शिंदे सरकारला खोके सरकार अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे खोक्याच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. याच खोक्याच्या आरोप-प्रत्यारोप याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता, मला फक्त आंब्याचे खोके माहीत आहेत,अशी टिपण्णी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Cleaning Tricks : बाथरूममधील गोष्टी एक्सपायर्ड डेट संपली म्हणून फेकून देता? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 5 दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

Karjat - Lonavala : कर्जत -लोणावळा घाटात २६ किलोमीटरचा नवा रस्ता, 'या' कारणामुळं मध्य रेल्वेनं घेतला निर्णय

Sachin Ahir : सचिन अहिर यांच्या घरी भयंकर दरोडा! तब्बल ३.५ कोटींचा ऐवज गायब; मुंबईत खळबळ

Child health: वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दमा-टीबी अन् न्यूमोनियाचे उपचार, ७ वर्षानंतर सत्य आलं समोर, डॉक्टरही हादरले

SCROLL FOR NEXT