Maharashtra Political News : विधानभवनात पुन्हा एकदा गद्दारीवरून राडा झालाय. शिंदेंच्या मंत्र्यांनं खालच्या पातळीत जात टीका केलीय. एककीकडे शिंदेसेनेचे आमदार संजय़ गायकवाड यांनी आमदार निवासातील जेवणाच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असताना शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांची जीभ घसरली आहे. ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून बोलताना शंभूराज देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख केला. त्यामुळे देसाईंचा पार चढला आणि देसाई- परब यांच्या जोरदार खडाजंगी झाली...
या खडाजंगीत एकमेकांना धमकी देण्यापर्यंत प्रकरण पोहचलं. तर देसाईंनी परब यांना तुम्ही काय चाटत होतात, असा प्रहार केल्यानं विधानपरिषदेत सलग दुसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या वर्तनावरून सत्ताधारी पक्षाला मान खाली घालावी लागलीय. मात्र देसाईंना कुठलाच पश्चाताप नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेनंतर निदर्शनास आलं. दरम्यान देसाईंच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केलीय...
अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात हमरी-तुमरी झाल्यानं सभापतींनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. इतकचं काय तर देसाईंचे आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डवरून हटवण्यात आले. त्यामुळे सभागृहाचा अमुल्य वेळ जर वादग्रस्त विधानात जात असले... तर जनतेचे प्रश्नांवर चर्चा कधी होणार ? हाच खरा प्रश्न आहे. दुसरीकडे सभागृहाची प्रतिष्ठा टिकवण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही आहे. एव्हढं मात्र निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.