Maharashtra Legislative Council Election 2026 Saam Tv
महाराष्ट्र

Election: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक- पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले, मतदान अन् निकाल कधी?

Maharashtra Legislative Council Election 2026: राज्यातील शिक्षक- पदवीधर निवडणुकांच्या तारखांची आज अखेर घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाने आज अमरावती, पुणे, नागपूर, संभाजीनगर या ठिकाणच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

Priya More
  • शिक्षक पदवीधर विधान परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट

  • महाराष्ट्र शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या तारखांची घोषणा

  • महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

  • २७ ऑक्टोबरला होणार मतमोजणी निकाल कधी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचं बिगुल वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. अमरावती, पुणे, नागपूर, संभाजीनगर या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २७ तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांची घोषणा करण्यात आल्याने आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागतील.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसाठी २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. ६ ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुका महायुतीत होणार की स्वतंत्र लढवण्यात येणार हे पाहणं महत्वाचे राहिल. कारण महायुतीमधील घटक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे. या निवडणुकांच्या घोषणांमुळे आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

राज्यातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाल ६ डिसेंबर रोजी संपत आहे. यामध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार चव्हाण सतीश भानुदासराव, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण गणपती लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत गोविंदराव वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सरनाईक किरण रामराव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत दिनकर आसगावकर याचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे या पाचही जागांवर निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदार संघात भाजपकडून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत काळमेघ, खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांची नावं चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांची कन्या आदिती पोहरे यांचं नाव चर्चेत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT