Pankaja Munde Net Worth: पंकजा मुंडे यांच्याकडे एकही कार नाही, डोक्यावर तब्बल पावणेतीन कोटींचं कर्ज; पाहा एकूण संपत्ती
Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde Net Worth : पंकजा मुंडे यांच्याकडे एकही कार नाही, डोक्यावर तब्बल पावणेतीन कोटींचं कर्ज; वाचा संपत्ती किती

Priya More

विनोद जिरे, बीड

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election 2024) पराभव झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने विधान परिषदेची (Vidhan Parishad) उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पंकजा मुंडेंनी आपल्या एकूण संपत्तीचा (Pankaja Munde Networth) तपशील दिला. अशामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावावर एकूण संपत्ती किती याची सर्व माहिती समोर आली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावावर एकही कार नाही. तर त्यांच्या डोक्यावर तब्बल पावणेतीन कोटींचे कर्ज आहे.

पंकजा मुंडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या नावावर विविध बँक अकाऊंटमध्ये ठेवी आहेत. यामध्ये 91 लाख 23 हजार 861 रुपये आहेत. पंकजा मुंडे यांच्या नावावर 1 कोटी 28 लाख 75 हजार 694 रुपयांचे विविध शेअर आणि म्यूचलफंड आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या नावावर एकही कार नसल्याचे लिहिले आहे. शेती आणि समाजसेवा हा व्यवसाय असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पंकजा मुंडे यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती, माजी विधानसभा सदस्य निवृत्तीवेतन आणि भाडे उत्पन्न आहे.

पंकजा मुंडे यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत 96 लाख 73 हजार 490 रुपये इतकी आहे. त्यांच्या नावावर जंगम मालमत्ता 6 कोटी 8 लाख 15 हजार 709 रुपये इतकी आहे. पंकजा मुंडे यांच्या नावावर 2 कोटी 74 लाख 89 हजार 518 रुपयांचे कर्ज आहे. तर पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावावर 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयांचे बँक कर्ज आहे. पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावे 24 कोटी 77 लाख 75 हजार 918 रुपयांचे वैयक्तीक कर्ज आहे.

पंकजा मुंडे यांच्याकडे 2 लाख 84 हजार 530 रुपयांची रोख रक्कम आहे. पंकजा मुंडेंकडे 450 ग्रॅम म्हणजेच 32 लाख 85 हजार रुपयांचे सोने आहे. तर चार किलो म्हणजेच 3 लाख 28 हजार रुपयांची चांदी आहे. तर 2 लाख 30 हजार रुपयांचे इतर दागिने आहेत. पंकजा मुंडेंच्या पतीच्या नावावर 200 ग्रॅम म्हणजेच 13 लाख रुपयांचे सोने आहे. तर चांदी 2 किलो म्हणजेच 1 लाख 38 हजार रुपयांची आहे. तर त्यांच्याकडे इतर दागिने 2 लाख 15 हजार रुपयांचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri Sub Way News: मुंबईतील सब-वे पावसामुळे पाण्याखाली...

Marathi Live News Updates: उद्या नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Terrorist Attack: कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चकमक सुरू

Pm Modi Russia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियात भव्य स्वागत, विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मान

Supriya Sule News: तुतारी चिन्हावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

SCROLL FOR NEXT