Chandrakant Patil News, Vidhan Parishad election news
Chandrakant Patil News, Vidhan Parishad election news Saam TV
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

संभाजी थोरात

कोल्हापूर: राज्यसभा निवडणुकीत भाजपने(BJP) जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. २० जून रोजी विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. तिनही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन मोठं विधान केलं आहे. (Chandrakant Patil News)

कोल्हापुरचे धनंजय महाडिक यांनी राज्यसभेवर विजय मिळवला. काल कोल्हापुरात धनंजय महाडिक यांच्यासह चंद्रकांत पाटील यांचेही जल्लोषात स्वागत केले. आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषदेची निवडणूक (Election) संदर्भात बोलताना, विधान परिषद बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद आला तर प्रयत्न करु, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. (Maharashtra Legislative Council Election 2022)

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीमध्ये आलेल्या अनुभवावरुन आता विधान परिषदेसाठी ते योग्य निर्णय घेतील, अशी आशा आहे. माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोन कायम सुरू आहे, त्यांनी आमच्याशी कधीही संवाद साधावा.

राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका बिनविरोध होणार आहेत का, हे पाहण आता महत्वाच ठरणार आहे. २० जून रोजी विधानपरिषदेसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेसाठी भाजपने प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांची नावे जाहीर केली आहेत.

तर विधान परिषदेला पंकजा मुंडे यांना डावलल्याचा आरोप मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी काल विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी मुंडे समर्थकांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात १२ मुंडे समर्थकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Maharashtra Legislative Council Election 2022)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

SCROLL FOR NEXT