Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladali Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे कपात करू नका, सरकारकडून बँकांना निर्देश

Maharashtra Government: राज्यातील काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आला खरा पण कर्ज थकीत असल्यामुळे बँकेकडून त्यांचे पैसे कपात करण्यात आले. त्यामुळे या महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Priya More

रूपाली बडवे, मुंबई

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा होत आहे. या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बँकेच्या खात्यात ३००० रुपये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी महिलांना देण्यात आला.

काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आला खरा पण कर्ज थकीत असल्यामुळे बँकेकडून त्यांचे पैसे कपात करण्यात आले. त्यामुळे या महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशामध्ये सरकारने या लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे कपात करू नका, असे निर्देश सरकारने बँकांना दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये, अशा सूचना महिला व बालविकास विभागाकडून बँकांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेत दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी महिलांना देण्यात आलाय. यानुसार महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. पण हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये पाठवून देखील अनेकांना मिळाले नाहीत. त्यामुळे बँकांमध्ये महिलांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे बँकेच्या कामामध्ये अडचणी येत आहेत.

या महिलांनी बँकांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. पण या महिलांच्या बँक खात्यात कर्ज थकीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसे कट झाले. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे या महिलांना परत मिळावे यासाठी सरकारनेच बँकांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे परत मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT