दासगाव नाका इथं पुलाचा कठडा तोडून टँकर उलटला
अपघातानंतर टँकरमधील रसायनाची गळती
गळती झालेले रसायन सांडपाण्याच्या गटारातून थेट गावात वाहत येतेय
घातक रसायनामुळे नागरिकांना श्र्वसनाचा त्रास, डोळे चुरचुरायला लागले
अपघातानंतर चालक टँकर सोडून पसार
मुंबई येथील फिल्म सिटीच्या बाजूला असलेल्या आंबेवाडी झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे.
अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावाचे कार्य सुरू आहे.
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज राज्य भर आंदोलनं करण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने नागपूरच्या संविधान चौकात देखिल आंदोलनं सुरू आहे. सरकारने यापूर्वी ओबीसी समाजाकरीता 52 शासन निर्णय काढले.
त्यांची अंमलबजावणी सुरू आहे.. मात्र उर्वरित मागण्याचे शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करावी.
हरियाणा आणि दिल्ली राज्यातून विनापरवाना व बेकायदेशीररित्या विदेशी मद्य आणून घरात विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस उल्हासनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे,
त्या व्यक्ती कडून सहा बॉक्स विदेशी मद्य असा एक लाख 92 हजार रुपयांचा माल जप्त केला.
कल्याण मधील कृष्णा उर्फ सोनू कारभारी यांच्या भाजप कार्यालयाचा सीसीटीव्ही फोडून कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली .ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
या प्रकरणी कारभारी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर माझ्या जीव आणि जागा दोन्ही धोक्यात आहे. बिल्डर लॉबी मला त्रास देत आहे. मला वाचवा अशी हाक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.
धाराशिव न्यायालयाकडून आरोपींना पोलिस तपासासाठी वाढीव कोठडी
ड्रग्ज प्रकरणात प्रकरणात आणखी दोन आरोपींचा समावेश,एक तुळजापुरातील तर दुसरा आरोपी मुंबईतील
ड्रग्ज प्रकरणात आरोपींची संख्या पाच वर
ड्रग्ज प्रकरणात 72 तासात लेखी अहवाल देण्याची पालकमंत्र्यांनी दिले आहेत आदेश
शिवाजी असा एकेरी उल्लेख नको
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामांतर करा
हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आंदोलन
शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी
दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सचिवालयात औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सूत्रे स्वीकारली. शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून गुप्ता या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यानंतर त्या अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी संध्याकाळी पहिलीच कॅबिनेट बैठक बोलावली आहे.
२२ टेकड्यांसाठी हा निधी असणार आहे. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत हे सर्व काम पूर्ण करणार..
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील टेकड्यांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला होता.
मिळालेल्या निधीच्या माध्यमातून टेकड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, आय. पी. स्पीकर,पॅनिक बटन, स्मार्ट फ्लडलाइट, इंटरनेट, या सर्वांचा एकत्रित तांत्रिक समन्वय ठेवणारी यंत्रणा ही कामे होणार आहेत.
टेकड्यामध्ये हनुमान टेकडी, जुना बोगदा घाट, तळजाई, सुतारदरा, एआरएआय टेकडी, अरण्येश्वर मंदिर, बाणेर टेकडी, बोलाईमाता मंदिर, जोगेश्वरी मंदिर, वेताळबाबा टेकडी, चतु:शृंगी टेकडी, बोपदेव घाट, पारसी ग्राउंड, पर्वती, कॅनॉल रोड या टेकड्यांसह अन्य ठिकाणांचा समावेश असणार आहे.
- म्हाडा आणि नाशिक उपजिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने दिले आदेश
- 1997 मध्ये कमी उत्पन्न दाखवून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी सरकारच्या 10 टक्के कोट्यातून मिळवल्या होत्या सदनिका
- या प्रकरणात मंत्री असलेले माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षाची न्यायालयाने सुनावलीय
- याच सदनिकांसंदर्भात अपिलाचा कालावधी संपल्यावर कारवाई करण्याचे आदेश
- या प्रकरणात कोकाटे यांना जामीन देखील झालाय मंजूर
पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत 17 सीटर मिनी बसचा अपघात झाल्याची घटना
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यान बस, सेवा रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात गेल्यानं अपघात
सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही, बस मधील प्रवासी किरकोळ जखमी.. बसचं मात्र नुकसान
महामार्गाच्या मुख्य रस्त्याशेजारी चालू असलेल्या पुलाच्याकामासाठी खणलेल्या खड्डयांना बॅरीगेट नसल्यानं बस रस्ता सोडून खड्यात गेल्यानं अपघात..
ही मिनी बस पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना सकाळी 7 च्या सुमारास झाला अपघात..
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर कदम यांनी आज नागपुरातील महानगरपालिकाच्या दालनात संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्याशी बैठक घेत सूचना दिल्यात. शहरात सुरू असलेल्या प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत... यामध्ये नाग नदी सांडपाणी असो घनकचरा असो, सिंगल युज प्लास्टिक, विदर्भात मोठ्या प्रमाणात कारखान्यांमध्ये तयार होणारी राखड यासह अनेक विषयांवर बैठकीत सूचना केल्यात...
पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत १७ सीटर मिनी बसचा अपघात घडला आहे. पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात बस गेली, नंतर खड्डा चुकवत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे अपघात घडला. सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही. पण काही प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकच्या कसमादे पट्ट्यात डाळींबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. सध्या नाशिक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढतोय. उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं त्याचा फटका डाळींबाला बसत असून, फळांवर काळे डाग पडून डाळींब खराब होण्याची शक्यता आहे. उन्हापासून डाळींब बागेचे संरक्षण व्हावे, यासाठी डाळींबावर सफेत कापड्याचे आच्छादन टाकत पिकाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे.
जालन्यातील खरपुडी येथे होत असलेल्या सिडको प्रकल्पाच्या चौकशीला आता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे, मुख्यमंत्र्यांनी चौकशीच्या आदेश रद्द न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. जालन्यातील खरपुडी येथे होत असलेल्या सिडको प्रकल्पाची चौकशीचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने काढले आहेत. दरम्यान 2019 पासून शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत आहे आणि आता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होण्याची वेळ आल्यानंतर सरकारने चौकशी लावलीय. शासनाने आमच्या जमिनी लवकरात लवकर संपादित करून मावेजा द्यावा अशी मागणी आता स्थानिक शेतकरी करत आहे.
- नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज
- अर्जावर सुनावणी सुरू
- थोड्याच वेळात जमिनाबाबत होणार निर्णय
- काही वेळा पूर्वीच कोकाटे आणि त्यांच्या बांधून सुनावण्यात आली आहे शिक्षा
विधीमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ
समित्यांसाठी पात्र नावे पाठवण्यास सत्ताधारी व विरोधी पक्ष उदासीन
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही व्यक्त केली नाराजी
तात्काळ नावे पाठवा, नाहीतर आपल्या अधिकार कक्षेत नियुक्ती करण्याचा दिला इशारा
विधीमंडळ सचिवालयाने नियुक्तीस नावे देण्यासाठी पाठवले पत्र
विधीमंडळ कामकाजासाठी विविध २९ समित्या कार्यरत
सत्ताधारी पक्षाचे तब्बल २३७, तर विरोधी पक्षाचे ५१ सदस्यांना मिळणार संधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सतेज पाटील यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिले आहे की नाही याबाबत शंका उपस्थित केली आहे. तसेच संपूर्ण धमकी प्रकरणाचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी केली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. १९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केली होती याचिका.
बुलढाणा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. वाहनाचा स्फोट झाल्यानंतर यात २ जण जळून खाक झाले आहेत. तर, १ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईवरून अकोलाच्या दिशेने कार जात होती. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट. पोलीस तपास करीत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदेच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. अज्ञात व्यक्तीने गोरेगाव पोलिसांना मेल पाठवला आहे. मंत्रालय ते जेजे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ही धमकी देण्यात आली आहे.
- मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा
- परिचारिकांची अनेक वर्षांपासुन पदोन्नती झालेली नाही. पदोन्नती करण्याची मागणी
- परीचारीकांची रिक्त पदे भरण्याची मागणी
- चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण परीचारीकांवर येत असल्यांची परीचारीकांची तक्रार
- रुग्णांना चांगली सेवा मिळण्यासाठी मागण्या लवकर मान्य करण्याची मागणी
अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाला आता पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील दुजोर दिला आहे.
मंत्रिमंडळाचे ठराव मंजूर करून घेता यापूर्वीही अशा प्रकारे पैसे उचलण्यात आले आहेत असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या बहुचर्चित ॲम्बुलन्स खरेदीसाठी 13 मार्चला ठराव मंजूर करण्यात आला असून 15 मार्चला शासन आदेश मंजूर करण्यात आले. असा दावा विजय कुंभार यांनी केला आहे.
त्यामुळे जे अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेची आणि सरकारची दिशाभूल करून चुकीचे निर्णय घेतात आणि पैसे उचलतात त्या अधिकाऱ्यांवर आणि मंत्र्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्ताने अमरावतीच्या दर्यापूर मधील क्षिती रेवस्कर या तरुणीने साकारली गजानन महाराजांची तब्बल 80 स्क्वेअर फुटाची भव्य दिव्य रांगोळी....
ही रांगोळी काढण्यासाठी तिला 14 तासाचा अवधी लागला.
दरवर्षी गजानन महाराज प्रकटदिनी क्षिती रेवस्कर वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढत असते..
यावर्षी तिने गजानन महाराजांचे विजय ग्रंथ पारायण मधील अध्याय दहावा यातील रांगोळी साकारली.
गजानन महाराजांचे गाईसोबत असलेले चित्र रेखाटन यावेळी तिने केले..
रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची देखील हळूहळू गर्दी होताना दिसते..
अमरावती जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयातील शासकीय परिचारिकांणी आक्रमक पवित्रा घेत आज एक दिवसीय काम बंद आंदोलनावर गेल्या आहेत.
परिचारिकांना मिळणारे भत्ते, पदोन्नती, बक्षी समिती खंड दोन मध्ये परिचर्या संवर्गात झालेला अन्याय दूर करणे, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे.
परीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका वगळावे या मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयातील शासकीय परिचारिका यांनी आक्रमक पवित्रा घेत एक दिवसीय काम बंद आंदोलन करत जिल्हा रुग्णालया बाहेर निदर्शने सुरू केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे शंभर दिवसात पदोन्नतीचे आदेश असूनही यावर कारवाई होत नसल्याचा आरोप परिचारिका संघटनेने केला आहे
तर आजच्या एक दिवशीय कामबंद आंदोलनाची दाखल न घेतल्यास बेमुदत काम बंद करू असा इशारा परिचारकांनी दिला
नंदुरबार जिह्यातील गांजा तस्करांवर सर्वात मोठी कार्यवाही.....
नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात एका घरावर छापा.....
विक्रीसाठी साठवून ठेवलेला 44 किलो सुका गांजा पोलिसांनी केला जप्त....
8 लाख 97 हजारांचा रुपये किमतीचा होता गांजा.....
नंदुरबार जिल्ह्यात गांजा तस्करांच्या संख्येत वाढ.....
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या हॉटेल वेस्टीन या ठिकाणी पश्चिम विभागाच्या परिषदेची सत्ताविसाव्या बैठकीला अमित शहा यांची उपस्थिती. ...
जनसेवा बँकेच्या हीरक जयंती वर्ष समारोह कार्यक्रमास हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृह या ठिकाणी शहा यांची उपस्थिती..
बालेवाडी येथे महाआवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रम
गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, धुळे जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली आज धुळे जिल्हा रुग्णालयात परिचारिकांनी आपल्या प्रलंबित पदोन्नती आणि विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे, साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,
विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका आणि अधिसेविका पदांसाठी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची प्रमुख मागणी या परिचारिका आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे, तसेच प्रलंबित परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पदाचे पुनरुज्जीवन, बंधपत्रित परिचारिकांच्या सेवेचा नियमित कालावधी निश्चित करणे यासह विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या २३ हजारांहून अधिक शाळांनी जय्यत तयारी केलीय. राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसणार आहेत
शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं ही बैठक आयोजित करण्यात आली असून 12 जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींनी या राज्यव्यापी बैठकीत सहभाग घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली असून 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याच्या तयारीत प्रशासन आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याही परिस्थितीत विरोध करण्याची तयारी आता शेतकऱ्यांनी केली असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेवरील स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. ही योजना म्हणजे सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे. करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी या योजनेतून पैशाची उधळपट्टी करण्यात आली. एवढा पैसा खर्च झालाय त्यामुळे सर्व योजना ना कात्री लावण्याची वेळ आलीय. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवालात किती योजनाना कात्री लावावी लागली हे जाहीर करावं असं आवाहन शेट्टी यांनी केलं.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गांभीर्याने हा विषय घेतलाय तुळजापूर सारख्या देवस्थानच्या ठिकाणी ड्रग्सचा व्यापार जर होत असेल तर नेस्तनाबूत करा
कोणी किती मोठा असेल तरी सोडू नका ,प्रताप सरनाईकांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश
तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणाबद्दल पुजाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत प्रकरणाची माहिती देताच पालकमंत्री सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना सुनावले खडे बोल
तुळजापूर सारख्या देवस्थानच्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील पुजाऱ्यांकडून तुम्हाला निवेदन देऊनही तुम्ही कारवाई करत नसाल तर दुर्दैव आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल.
किशोर तिवारी उबाठाचे अधिकृत प्रवक्ते नव्हते. पण ते पक्षाची बाजू वृत्त वहिनीमध्ये मांडायचे. काल त्यांनी एका वृत्त वाहिनीमध्ये पक्षातील नेत्यावर आर्थिक मागणीचे आरोप केले होते. किशोर तिवारी यांनी विदर्भात दौरे करण्यासाठी पक्षाला निधी मागितला होता. तोन दिल्याने त्यांनी पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप केला. त्यांना प्रवक्ते पदावरून हटविण्यात आले आहे..किशोर तिवारी याना प्रवक्ते पदावरून हटविण्यात आले असले तरी ते पक्षाचे प्राथमिक सदस्य असतील.
- नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या पवन पवारच्या अडचणी वाढल्या
- पाच कोटींच्या खंडणीप्रकरणी पवन पवारचा अटकपूर्वक जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
- नाशिकच्या राणेनगर परिसरात असलेला एका जमीन प्रकरणी पवन पवारने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आहे आरोप
- खंडणी प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात झालाय गुन्हा दाखल
- काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पवन पवारने केले होता शिवसेनेत प्रवेश
- एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यात शक्ती प्रदर्शन करत पवन पवार आला होता सभास्थळी
- पवन पवार चा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
जालन्यातील नेर येथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया यांच्या नेतृत्वामध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. नेर परिसरातील जवळपास 35 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी काँग्रेसला नेर सर्कलमध्ये हा फटका बसल्याच मानल जातय...
कोल्हापूर शहरात एमडी ड्रग्स विकणाऱ्या संशयीताना तसेच गोव्याच्या मुख्य पुरवठादाराला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केलीय. तसेच त्याची महिला साथीदार मनीषा गवई या महिला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून ११ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
तर कोल्हापुरातील अनिल नंदीवाले , रोहित व्हसमणी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर शहरात ड्रग्ज पुरवठा करणारे मुंबई - गोवा कनेक्शन असलेली आंतरराज्य टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार असल्याचा दावा, प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. हा मार्ग सुरू झाला तर येथील वाहतूक कोंडी फुटण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी आणखी आठ महिन्यांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी घेणार कोल्हापुरात बैठक
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आयोजित केली कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग विरोधी राज्यव्यापी बैठक
या बैठकीला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह बारा जिल्ह्यातील प्रमुख नेते राहणार उपस्थित
राज्यव्यापी बैठकीत ठरणार शक्तिपीठ महामार्गा संदर्भातील पुढील आंदोलनाची दिशा
परदेशी नोकरी, उच्च अनिवार्य असतो. भंडारा जिल्ह्यातील मुख्य टपाल कार्यालयात असलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रातून 2022 ते 2024 या दोन वर्षाच्या कालावधीत तब्बल 11,021 जणांनी पासपोर्ट बनविले आहेत. ऑनलाइन प्रक्रियेमुळे हा प्रवास सुलभ झाला असून, नागरिकांचा पासपोर्ट काढण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भंडारा येथे 2018 साली पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, अद्यापही गोंदिया जिल्ह्यात असे कार्यालय नसल्याने गोंदिया जिल्ह्यातील नागरिक देखील पासपोर्टसाठी भंडाऱ्यावर अवलंबून आहेत. मागील तीन वर्षांतील आकडेवारी पाहता, 2022 मध्ये 3,365, 2023 मध्ये 3800 तर 2024 पासून आतापर्यंत 4,036 लोकांनी पासपोर्ट बनविले आहे.
- तणनाशक फवारणीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर कंपनीकडून नुकसान भरपाई
- जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई
- एकूण ८४ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळाले ६२ लाख रुपये
- आयपीएल कंपनीच्या तणनाशक फवारणीमुळे संपूर्ण कांदा पीकच जळून नष्ट झाल्यानं शेतकऱ्यांचं झालं होतं मोठं नुकसान
- साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषी विभागाने दखल घेत सुरू केली होती चौकशी
- अखेर कंपनीनं शेतकऱ्यांना दिली नुकसान भरपाई
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दिले नुकसान भरपाईचे धनादेश
शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यानिमित्त भव्य रॅली काढत जल्लोष साजरा केला जातो. भंडाऱ्याच्या तुमसर येथे सुद्धा राजमुद्रा ग्रुपच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये तुमसर -मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनीही हजेरी लावली. दरम्यान शिवभक्तांसह डीजेच्या तालावर थिरकत शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीचा आनंदही त्यांनी लुटला. दरम्यान छत्रपती शिवरायांचा जयघोष करत रॅलीमध्ये शिवभक्तांसह आमदारांचा नाचतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसतोय.
- दोन नर बिबट्यांचे संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ
- नाशिकच्या आडगाव परिसरात उघडकीस आली घटना
- आडगाव परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर आढळून बिबट्यांचे मृतदेह
- बिबट्यांच्या मृतदेहावर जखमा नसल्यानं मृत्यूच कारण अस्पष्ट
- शवविच्छेदन अहवालानंतर कारण होणार स्पष्ट
- घटनेचा वनविभागाकडून अधिक तपास सुरू
जालना जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरी आणि पाझर तलाव त्याचबरोबर शेततळे यांच्यामध्ये मोठा पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती.मात्र मधमाशांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कांदा पीक धोक्यात आले असून उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, वालसावंगी,धावडा आणि आसपासच्या परिसरात हे प्रमाण प्रामुख्याने आहे. लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी चार हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करून लागवड केली होती मात्र, लागवडीचा खर्च निघतो की नाही अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या 'नाफेड' तसेच पणन महासंघाकडून तूर खरेदीसाठी शेतकरी नोदणीचे आवाहन करण्यात आले होते. परंतु अधिकृत वेबसाईट पोर्टलख सुरू नसल्याने तूर खरेदीसाठी नोंदणी खोळंबली असून, हमीभाव खरेदी केंद्रांवरील नोंदणी सुरू होण्याची शेतकन्यांना प्रतीक्षा आहे. मात्र तसे नव्हता शेतकरी मात्र आपल्या तुरीचा माल व्यापाराला विक्री करीत आहे. व्यापाऱ्याकडून या मालाचे फक्त चार ते साडेचार हजार रुपये भाव मिळत असून हे पोर्टल तात्काळ सुरू व्हावे जेणेकरून शेतकऱ्याची पिढवणूक होणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार असल्याचा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. हा मार्ग सुरू झाला, तर येथील वाहतूक कोंडी फुटण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी आणखी आठ महिन्यांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो मार्गिकेवरील ‘डक्ट’ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, लोहमार्गदेखील (रुळ) टाकण्यात आले आहेत. २३ स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल), विद्याुत यंत्रणा आणि इतर किरकोळ दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून, सप्टेंबर महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करून चाचणी घेण्यात येईल. येत्या ऑक्टोबरपर्यंत ही मेट्रो धावणार असल्याचा दावा मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्व शिक्षक घडण्यासाठी सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून, ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीने हा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ७५८ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार असून, त्याबाबतची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण अशी आहे. भरतीची जाहिरात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयासमोर लावण्यात आली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
रेल्वे स्थानकावरून प्रवास करताना निर्धारित वेळेनुसार येणारी गाडी कोणत्या ‘प्लॅटफॉर्म’वर येणार आहे, याची कल्पना आता रेल्वे प्रवाशांना एक तास अगोदर समजणार आहे. मध्य रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे प्रशासनाने अचानक गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊ नये, प्रवाशांची धावपळ होऊ नये, म्हणून व्यवस्थापनासाठी निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी अर्ध्या तासापर्यंत किंवा पंधरा मिनिटे अगोदर अथवा अचानक स्थानक बदलण्यात आल्याची माहिती देण्यात येत होती.
वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीवर बाळखेड,भापुर आणि धोडप बुद्रुक परिसरात कोल्हापुरी बंधारे असून हे सर्व कोल्हापुरी बंधारे पाण्या अभावी कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेली पैनगंगा नदीकाठची शेकडो हेक्टर वरील रब्बीची गहू,हरभरा,बीजवाई कांदा तसेच ऊस ही पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे या पिकांच्या उत्पादनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
वाडा शहरालगत असलेल्या गांधरे गावा जवळील उमा मॅट्रिक्स गादी सोफा कारखान्याला भीषण आग आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गाधरे गावातील गादी व सोफा बनवणाऱ्या उमा मॅट्रिक्स कारखान्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली या
आगीमध्ये कारखान्याचे मोठं नुकसान झाले असून कारखान्यातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाले आहे. या आगीत
कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही संपूर्ण कारखाना जळून नष्ट झाले ही आग
शॉर्टसर्किटने मुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला.मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली या कारवाईत दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल असल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन चालकांसह त्यांच्या टँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी शिवारातील तेरणा नदी पाञातुन परीसरातील तब्बल 15 शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारची चोरी झाल्याची घटना समोर झालीय दरम्यान एकाच दिवशी या शेतकऱ्यांच्या मोटारी चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांसह तेरणा नदी परिसरात पाहणी केली असुन चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केल आहे दरम्यान वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले असुन लवकरात लवकर चोरांना पकडा अशी मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे.
पोलिसांचा गणवेश घालून तरुणाला लुटणाऱ्या तोतयाला पनवेल पोलिसांनी अटक केलेय. तरुणाला बोलण्यात गुंतवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून सदर आरोपी पसार झाला होता. याप्रकरणी तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेची चौकशी केली असता सदर आरोपी हा रायगड येथे होमगार्ड म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी होमगार्डला अटक केली असून त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पुनगाव रोड पाचोरा येथील रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी व सहकलाकार शुभांगी पाटील यांनी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पाचोरा येथील पुनगाव रोड वरील गजानन महाराज मंदिरात ५ बाय ४ फूट आकाराचे तब्बल तीन तास परिश्रमातून श्री. गजानन महाराजांचे रांगोळीतून रेखाटलेली आहे. या कलाकृतीचे परिसरातुन कौतुक व अभिनंदन केले जात आहेश्री. गजानन महाराजांचे रांगोळीतून रेखाटलेली कलाकृती पाहण्यासाठी काॅलनी परिसरातील भाविक दर्शन घेत आहे या कलाकृती चे सर्वञ कौतुक होत आहे
ऑपरेशन टायगरची जबाबदारी बारा मंत्र्यांची, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन टायगर मोहीम सुरू असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं
धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक ऑपरेशन टायगर मोहीम राबवतील असं तुळजापूर दौऱ्यावर असताना मंत्री भरत गोगावले यांनी केला होत वक्तव्य
भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर बोलताना, ऑपरेशन टायगरची मोहीम एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असल्याचे सांगत धाराशिव मध्ये हे त्यांचे लक्ष असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले.
जळगाव ऑनलाइन मालमत्ता कर भरून जळगावकर स्मार्ट झालेले आहेत. तीन वर्षांत शहरातील ५० हजार ४०५ ग्राहकांनी ६४ कोटी २५ लाखांचा कर ऑनलाइन भरला आहे. सध्या सर्वत्र ऑनलाइन व्यवहार वाढले असून कपडे, खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूसह खाद्य पदार्थार्थांच्या स्टॉलवर देखील ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केले जात आहे. याच पद्धतीने मनपाचा कर भरताना देखील मालमत्ता धारकांकडून ऑनलाइन प्रणाली वापरली जात आहे. हजार ग्राहका वर्षात मनपा ऑनलाईन महानगरपालिकेने मालमत्ताधारकांना घरी बसल्या कर भरता यावा, यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील जांब बाजार शाखेने शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम चक्का संचालकांच्या वडिलांच्या वाहन कर्जात वळती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या बैठकीत यावर काही संचालकांनी आवाजही उठवला त्यानंतर ही बाब प्रोसेडिंगवर घेण्यात आली एकूणच या सर्व प्रकारामुळे जिल्हा बँकेचा कारभार नियंत्रणा बाहेर गेल्याची चर्चा सुरू असून एडिट रिपोर्ट प्राप्त होताच दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळून सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री ठरवता येत नाही, हे या सरकारचे दुर्दैव आहे. हे बहुमत बेगडी असून सरकारला प्रशासनावर आपली पकड बसवता आली नाही. केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्या पलीकडे या सरकारने काहीच केलं नाही. जनतेने जो कौल दिला त्याचा भ्रमनिरास झालाय. जसा जावई निवडताना चोखंदळपणा दाखवता तोच लोकप्रतिनिधी निवडताना दाखवला पाहिजे असं राजू शेट्टी म्हणाले.
राज्यातील शिवकालीन तलाव बंधारे, प्राचीन तलाव,गावतळे व पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणारी सध्याची तलाव यामधील गाळ काढून पाणीपुरवठ्यात वाढ करण्याची मोहीम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर राबवण्यात येत आहे याचा शुभारंभ यवतमाळ मधून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त मोठा प्रगट दिन सोहळा साजरा होत आहे... प्रगट दिन उत्सवाचा समारोप आज रोजी होत असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक संत नगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत... गण गण गणात बोतेच्या गजरात हजारो पायी दिंड्या संत नगरी शेगावात दाखल झाल्या आहेत . या उत्सवात आज सकाळी १० वाजता श्री महारूद्रस्वाहाकार यागाची पुर्णाहूती, अवभृतस्नान होईल त्यानंतर दुपारी ४ वाजता उत्सवांची पालखी अश्व,रथ, मेणासह शहर परिक्रमा करीता निघणार आहे... व उद्याला या उत्सवाची काल्याचे किर्तनाने सांगता होणार आहे.
शिवजयंती उत्सव 2025 -किल्ले प्रतापगड येथे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ,पालखी मधील शिव प्रतिमेला वंदन करून नामदार मकरंद पाटील यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांनी शिवकालीन गाणी व विविध कार्यक्रम सादर करून मान्यवरांची दाद मिळवली.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह व किल्ले ,गडकोट स्वछता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.स्वतः मंत्री नामदार मकरंद आबांनी स्वतः हातात झाडू घेऊन प्रतापगड किल्ल्याची स्वच्छता सुरू केली.सोबतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याना सुद्धा या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करून हे स्वछता अभियान यशस्वी केले.
उल्हासनगर क्राईम ब्रँचने दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून दोन रिक्षा आणि एक बाईक हस्तगत करण्यात आलीय. संतोष पाटील आणि संजय मकवाना अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहेत. मागील अनेक महिन्यांपासून परिमंडळ ४ मध्ये या दोन चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर उल्हासनगर क्राईम ब्रँचने गुप्त माहितीच्या आधारे ह्या दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगर कॅम्प २ मध्ये राकेश कारीरा नामक राहत असून त्यांची MH 05 DX 6240 क्रमांकाची पांढरी ऍक्टिव्हा दुचाकी आहे. या गाडीला दंड लागल्याचे मेसेज कारीरा यांना दर महिन्याला येतात. मात्र दंडाच्या पावतीसोबत आलेला फोटो ओपन करून पाहिला असता त्याच नंबरची मरून रंगाची बर्गमॅन स्कुटर दिसते. त्यामुळं कारीरा यांच्या गाडीचा नंबर लावून बर्गमॅन चालक गाडी चालवत असल्याचं समोर आलंय. कल्याण परिसरात गाडीला हे दंड लागत असून २०२२ पासून हा दंड मात्र कारीरा यांना भरावा लागतोय. याबाबत त्यांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारही केली, पण पोलिसांकडून योग्य सहकार्य आणि प्रतिसाद मिळत नसल्याची कारीरा यांची तक्रार आहे.
सुरज हा त्याच्या दोन ते तीन मित्रांसोबत जीआयपी धरणावर आला होता. तिथे पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो बुडाला. याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी धरणावर धाव घेत सुरजचा शोध सुरू केला. मात्र बुधवारी दिवसभर शोध घेऊनही सुरज सापडलेला नाही. त्यामुळं आज शोधकार्य थांबवण्यात आलं असून उद्या पुन्हा शोधकार्य सुरू केलं जाणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे. सुरज हा मोतीराम।पार्क परिसरात एकटाच राहत असून त्याचं इलेक्ट्रिक वस्तू।रिपेअर करण्याचं दुकान आहे. त्याचं कुटुंब गावी असून या घटनेमुळे मोतीराम पार्क परिसरात खळबळ उडाली आहे.
तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.अभिषेक तिक्क्या रेड्डी वय २५, रा. देहूरोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह साबीर शेख याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला हे पिस्तूल साबीर शेख याने दिले असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या दोन स्तराचे काम पूर्णत्वाकडे
- तिसऱ्या आणि अंतिम स्तराचे काम दोन आठवड्यात सुरू होऊन 31 मार्च पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता..
- भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन, प्रवाश्यांना वाढलेल्या तिकीट दारापासून मिळणार दिलासा
- रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळ एप्रिलमध्ये जीएमआर कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे..
- नागपूर विमानतळाला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याचे आणि विस्तारीकरणाचे कंत्राट जीएमआर कंपनीला मिळाले आहे..
- या नव्या प्रकल्पात दुसरी धावपट्टी बांधण्याचाही प्रस्ताव आहे
- राज्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षकांची 816 रिक्त पदे भरण्यासाठी 11 मार्च पर्यंत निर्णय घेण्याचे नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाला सूचना
- वैद्यकीय शिक्षकांची 954 पदे रिक्त असून सामान्य प्रशासन येणे मागील वर्षापेक्षा 138 पद भरण्यासाठी मान्यता दिली..
- उर्वरित ८१६ रिक्त पद भरण्यासाठी आदेश दिला
- यासाठी राज्य सरकारने वैद्यकिय शिक्षकांचे रिक्त होणारी पद तातडीने भरण्यासाठी दोन मंडळांची केली स्थापना..
- राज्य सरकारकडून लोकसेवा आयोगाने सहाय्यक प्राध्यापकांची 419 पद भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. पण यासाठी सामान्य प्रशासनाने जलदगतीने प्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या आहेय.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुढीपाडव्याच्या दिवशी 30 मार्चला नागपुरात एकाच मंचावर असण्याची शक्यता...
- माधव नेत्रालय आय रिसर्च इन्स्टिट्यूट हे संघाशी सलग्नित असून त्याच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता...
- हिंगणा रोडवरील 6.8 एकरवरील जागेत हे नवीन अद्यावत नेत्र रुग्णालयाच्या भूमीपूजन सोहळा होणार आहे...
- यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघाकडून आमंत्रित करण्यात आले आहेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.