सांगली, कोल्हापूर नंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी आक्रमक झाले आहेत.. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उद्यापासून बेमुदत रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे.. शेतकरी नेते रवी मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध संघटनाउद्यापासून नगर मनमाड महामार्ग अडवणार आहेत..
पुण्यात लक्ष्मीपूजन जल्लोषात साजरी
दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा दिवस.. तो म्हणजे लक्ष्मीपूजन. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करून घरात सुख, शांती, धनधान्य आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली जाते. याच निमित्ताने राज्यात सर्वच ठिकाणी आज दिवाळीची धूम पाहायला मिळतेय. पुण्यात सुद्धा जल्लोषात आजचा दिवस साजरी केला जातोय. लहान मुलांकडून फटाक्यांची आतिषबाजी केली जातेय तर व्यापाऱ्यांकडून सुध्दा व्यापाऱ्याची वृद्धी व्हावी यासाठी लक्ष्मी मातेची पूजा केली जात आहे.
गोकुळ दूध संघावर शासननियुक्त स्वीकृत संचालक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आता गावागावांतून विरोधाचे सूर उमटू लागले आहेत.
भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला.
यावेळी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
तसेच या निर्णयाविरोधात उद्या कोल्हापुरात निघणाऱ्या मोर्चात म्हसवे गावातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
नंदुरबारमध्ये प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर परिवहन विभागाची मोठी कारवाई..
सणासुदीच्या काळात मनमानी भाडे आकारणाऱ्या 14 वाहनांवर कारवाईचा बडगा. .
जादा भाडे आकारले जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारीनंतर आरटीओ ची धडक मोहीम....
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा भक्तिमय वातावरणात सजला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक पोशाखासह मौल्यवान दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. दागिन्यांनी नटलेले विठुरायाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.
दुष्काळाचे सावट असताना शेतकरी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम हट्टीपाडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पांडुरंग शिदे या शेतकऱ्याच्या घरी जाऊन लक्ष्मीपूजन केले आणि त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.
मंत्र्यांनी थेट आपल्या घरी येऊन दिवाळी साजरी केल्याने शेतकरी कुटुंब भारावून गेले. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की एवढे मोठे मंत्री आमच्या घरी येतील. ज्या पद्धतीने आम्ही दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो, त्याचप्रमाणे आज आम्ही त्यांचेही पूजन करणार आहोत, अशा भावना शेतकरी कुटुंबाने व्यक्त केल्या.
मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे ऐन दिवाळीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडले. दुपारपासून लक्ष्मीपूजनाच्या वेळेपर्यंत वीज गायब असल्याने गावकऱ्यांना अंधारातच दिवाळी साजरी करण्याची वेळ आली. ऐन लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वीज नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकारी फोन उचलत नसल्याने किंवा फोन बंद असल्याने नागरिकांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ऐन सणासुदीच्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अहिल्यानगरमधील स्टेशन रोड परिसरात ऐन दिवाळीच्या दिवशी मंडप आणि डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
डेकोरेशनच्या साहित्यामध्ये प्लास्टिक आणि कापड मोठ्या प्रमाणात असल्याने आग अधिकच भडकत आहे. तसेच गोदामाच्या आजूबाजूला नागरी वस्ती असल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. नागरिकांनी घटनास्थळाजवळ गर्दी करू नये आणि आगीच्या जवळ जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याबाबत सूचक विधान केले आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र आले, तर तीच खऱ्या अर्थाने दिवाळी असेल, असे रघुवंशी यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेना पुन्हा एकत्र येणार की नाही, याबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र, शिवसेना दुभंगण्याचा प्रसंग यायला नको होता, असे मला पहिल्या दिवसापासून वाटत असल्याची स्पष्ट कबुलीही चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नंदनवन येथे दिव्यांग बांधवांसोबत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. यावेळी दिव्यांग बांधवांसोबत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग व्यक्ती हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपण मुख्यमंत्री असताना स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच जन्मतः हृदयात छिद्र असलेल्या मुलांसोबतही त्यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला.
यंदाची दिवाळी दुष्काळाच्या सावटाखाली असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, उद्या जालना येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी करणार आहोत, असे शिंदे यांनी सांगितले. आज राजकारण नको, राजकारण कधीही करता येईल. आपण संवेदनशील आहोत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशातील सर्व नागरिकांना प्रफुल्ल पटेल यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असून, या संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि त्यांना दिलासा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेबाबत विचारले असता, "आम्ही हॉस्पिटलमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा करणार आहोत का?" असा सवाल प्रफुल्ल पटेल यांनी केला. तसेच शरद पवार यांची प्रकृती चांगली राहावी, ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असल्याचे ते म्हणाले. १० तारखेपूर्वी आपण गोंदियात असणार असून, त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर याबाबत चर्चा करू, असेही त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत स्पष्ट केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व संचालक निवडून आले असून, येत्या १८ तारखेला बँकेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी केले होते. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रत्येक वेळी अध्यक्षपदाच्या निर्णयासाठी वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन त्यांना त्रास देण्यापेक्षा, पॅनेल बिनविरोध करताना जसे जिल्ह्यातील नेते एकत्र बसले होते, तसेच आताही स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढावा, असे मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. मात्र, जिल्हा पातळीवर तोडगा निघाला नाही, तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिन्ही वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसी परिसरातील सोलर प्लांटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सोलर प्लेट्स जळून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून नुकसानाचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
नागपूर जिल्ह्यात आज (८ नोव्हेंबर) दुपारी भूकंपाची सौम्य नोंद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर असल्याची नोंद करण्यात आली आहे.
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चटणी-भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली. सरकारकडून शेतकऱ्यांना अग्रिम मदत म्हणून दिलेले ५ हजार रुपये अपुरे असल्याचा आरोप वंचितने केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आज नांदेड तालुक्यातील सायाळ येथे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करीत आहोत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज परिसरातील बंद बसस्थानकात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पाईपला आज अचानक आग लागली. महानगरपालिकेचे हे प्लास्टिकचे पाईप बसस्थानकाच्या आवारात ठेवण्यात आले होते. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
दिवाळीनंतर तुटणाऱ्या उसाला प्रति टन 3500 रुपये पहिला हप्ता जाहीर करावा, अन्यथा 16 नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पंढरपुरात दिला.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी माण तालुक्यातील पिंपरी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांच्यासह त्यांनी थेट शेताच्या बांधावर बसून फराळाचा आस्वाद घेतला आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी यंदाची दिवाळी अंध, दिव्यांग आणि कुष्ठरोगी बांधवांसोबत साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिव्यांग बांधवांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी आमदारांचे वेतन बंद केले तरी चालेल, पण दिव्यांगांचे मानधन वाढवण्याची मागणी केली.
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला धमकी देणारा आरोपी अटकेत.
वैभव मिश्रा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव.
आरोपीने AI तंत्रज्ञानाचा वापर करून धमकीचा ऑडिओ तयार केला होता.
AI च्या मदतीने बनावट आवाज आणि ऑडिओ तयार करून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना धमकावल्याचा आरोप.
आरोपीच्या या कृत्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
पुनर्विकास प्रकल्पात जुन्या विकासकाची आर्थिक देणी नव्या विकासकावर टाकता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कांदिवलीतील पुनर्विकास प्रकल्पाप्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला. नवीन विकासक एच. ऋषभराज डेव्हलपर्सला ३७ लाख रुपये व्याजासह देण्याच्या महारेराच्या आदेशासह बँक खाती गोठवण्याचे आदेशही रद्द करण्यात आले. तसेच ही रक्कम मूळ विकासक जयंत मेहता यांच्याकडून वसूल करण्याची मुभा न्यायालयाने दिली. केवळ रखडलेला प्रकल्प हाती घेतल्याने नव्या विकासकाला जुन्या विकासकाच्या चुकीसाठी जबाबदार धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
यवतमाळमध्ये काँग्रेसने केली काळी दिवाळी साजरी
यवतमाळ जिल्ह्यात यंदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कापूस पिकाने धोका दिला, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे असे असताना सरकारने तटपुंजी मदत जाहीर केली मात्र जाहीर केलेली साधी मदतही देऊ शेतकऱ्यांना वेळेवर मिळाली नाही, याच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीने ऐन दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी साजरी करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास AI कॅमेऱ्याची नजर, थेट होणार दंडात्मक कारवाई
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता AI कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर जी-नॉर्थ विभागात सुरुवात करण्यात आली आहे. या विभागात एकूण २३ AI कॅमेरे बसविण्याची योजना आहे. कचरा टाकणारी व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाल्यास जवळ तैनात असलेल्या वॉर्डनमार्फत तिच्यावर लक्ष ठेवले जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर महापालिकेच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांत राबवण्याचेही नियोजन आहे.
दिवाळीच्या लक्ष्मी पूजेच्या मुहूर्तावर आज पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये फळांचा राजा म्हणजे हापूस आंबा दाखल झाला. आंब्याची पेटी मार्केट मध्ये येताच व्यापाऱ्यांमध्ये एक उत्साह पाहायला मिळाला. आंब्याच्या फळाची विक्री आणि त्यातून होणारी व्यवसायाची वृद्धी हे पाहता आज आंबा व्यावसायिक आनंदात होता. नोव्हेंबर महिन्यातच आलेला फळांच्या राजाला भाव सुद्धा तितकाच लागला. पुण्यातील मार्केटयार्ड मधून हापूस आंब्याच्या पेटीसाठ १५ हजारावरून सुरू झालेली बोली ४० हजारावर येऊन थांबून अंतिम बोली मध्ये तब्बल ४१ हजार रुपयांना या पेटीची विक्री झाली.
वाशिम जिल्ह्यात गोवर्धन येथील सिंचन तलावातून मोटारपंप लावून पाणी उपसा
पाटबंधारे विभागाकडून कारवाई, मोटारपंप जप्त
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या खुरपुडी खुर्द येथील शेतशिवारात दिवाळीच्या सणासुदीत बिबट्या आढळून आला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे किंवा अन्य कारणामुळे बिबट्याची प्रकृती खालावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्याला सुरक्षित पकडण्यासाठी रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Do you like this personality?
दुष्काळाच्या झळा फटाके विक्रेत्यांनाही; यंदाच्या दिवाळीत व्यवसायाला मोठा फटका!
दुष्काळाने हिरावला दिवाळीचा आनंद; फटाके विक्रेत्यांचा व्यवसाय मंदीत.
यंदाची दिवाळी फटाके विक्रेत्यांसाठी आर्थिक संकटाची; परळीत विक्रेत्यांची व्यथा.
ऐन दिवाळीत झेंडू उत्पादक शेतकरी संकटात...
फुलांना अवघा 20 ते 25 रुपये किलोचा कवडीमोल भाव....
कमी पाऊस झाल्याने झेंडूची योग्य वाढ न झाल्याने दर्जा घसरला, मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ....
झेंडू फुलांची आवक आणि मागणी घटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून पिकाची पाहणी केली
त्यांच्या समस्या आणि प्रश्न ऐकून घेतले. तसेच त्यांना धीर देत त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले
शरद सरोदे यांच्या शेतीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे...
पाच एकर कोरडवाहू शेतीत कापूस आणि सोयाबीन लावली होती
दिवाळीच्या खरेदीसाठी निघालेल्या तिघांवर काळाचा घाला...
शेवगाव-पैठण रस्त्यावर उसाच्या भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक...
या भीषण अपघातात खानापूर येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू.
शिवसेनेच्या नेत्यांची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाटकडे पाठ...
ठाण्यातील गुप्ते (चिंतामणी) चौकात मीनाक्षी शिंदे यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटच आयोजन करण्यात आलं होतं
मात्र यंदा मीनाक्षी शिंदेंसकट शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने वा नगरसेवकाने दिवाळी पहाट कार्यक्रमाला भेट दिली नाही.
देवाभाऊ शेतकऱ्यांच्या बांधावर, तर उद्धव ठाकरे घरात बसून ठिपक्यांची रांगोळी पाहत!
नेता लोकांच्या दारात शोभतो, घरात बसून नाही; देवाभाऊ आणि उद्धव ठाकरेंमधला हाच फरक!
देवाभाऊंची दिवाळी शेतकऱ्यांसोबत, उद्धव ठाकरेंची दिवाळी घरात!
शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी बांधावर जावे लागते, घरात बसून राजकारण करता येत नाही!
सातपुड्यातील अस्तंबा ऋषी यात्रेला विक्रमी गर्दी...
साडेचार हजार फूट उंचीवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी...
अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी भक्तांना लागतायत 3 ते 4 तास
सोलापूर जिल्ह्यात जाणवू लागल्या दुष्काळाच्या तीव्र झळा ; पाण्याविना 4 एकर सूर्यफूल करपले
अक्कलकोट तालुक्यातील करजगी परिसरातील शेतकऱ्यांचे सूर्यफूल पीकाची झाली दैना
दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त उल्हासनगर युवा प्रबोधिनीच्या वतीने शहरातील श्रीराम नगर येथे ‘दिवाळी पहाट स्वरतरंग’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नगरसेविका इंदिरा पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमात गायकांनी एकापेक्षा एक सुरेल गीतांचे सादरीकरण करत सप्तसुरांची मैफल रंगवली.
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर उद्या भेट घेणार
बोरवरील बंदी 15 डिसेंबत पर्यंत उठवली आहे
झाड वाचवणं गरजेचे असल्यानं पुढील 20 वर्षाचे झाड जाईल
त्यामुळे विशेष बाब म्हणून मजुरी देत आहे.
शेतकऱ्यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी साजरी केलेली दिवाळी हा क्षण मनाला स्पर्श करणारा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे आणि प्रयत्नशील आहे हे त्यांच्या कृतीतून अधोरेखित होते
यंदा अल निनो च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प कमी झाले आहे त्यामुळे यंदा यवतमाळकरांना आगामी काळात भीषण पाणी टंचाईचे गडट सावट उभे राहिले आहे असे असताना यवतमाळ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून यवतमाळच्या उमरसरा भागात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळा सर्वसामान्यांना बसू नयेत म्हणून प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन करत कडक निर्बंध लादण्याच काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अशा भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व व्यक्त केला आहे.
दिवाळीच्या उत्साहात डोंबिवलीतील प्रसिद्ध फडके रोडवर डोंबिवलीकरांची मोठी गर्दी.
आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान करून तरुण-तरुणी फडके रोडवर दाखल.
सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी तरुणाईमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
फडके रोडवरील डोंबिवलीच्या आराध्य दैवत गणरायाचे दर्शन घेत नागरिकांनी दिवाळी साजरी केली.
सध्या मुंबई महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेची जोरदार चर्चा आहे... कारण बोरिवलीत कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याने पालिकेने तातडीने अनधिकृत बांधकामे हटवली आणि दोन अधिकाऱ्यांना नोटीसही बजावली... मात्र, फटाके न फोडण्याचं आवाहन करणारी अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ भाजपने आक्षेप घेतल्यानंतर समाजमाध्यमांवरून हटवली गेली... उच्च न्यायालयाने ताशेरे ओढूनही पालिका प्रशासनाने ही चित्रफित पुन्हा प्रसारित केलेली नाही... न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यात पालिका प्रशासन वेगवेगळी भूमिका घेत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी यंदाची ठाणे शहरातील दिवाळी पहाट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी गडकरी रंगायतन चौक परिसरात मोठ्या जल्लोषात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा बळीराजा आणि पुणेकर कुटुंबीयांना आधार देण्यासाठी दिवाळी पहाट साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचे विचारे यांनी बॅनरद्वारे जाहीर केले आहे. 'दुष्काळाने बळीराजा खचला, मदत करूया हाच आपला धर्म' असा संदेशही या बॅनरमधून देण्यात आला आहे
कमळाजी किशोर लगड असे शेतकऱ्याचे नाव
हिंगोलीच्या सावरखेडा गावातील घटना
शेतातील पीके सुकल्याने शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले
ऐरोलीतील नागरिकांना सणांच्या आनंदात एकत्र आणण्यासाठी या संगीतमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली... यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरी जात त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या... तसंच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पारंपरिक जेवणाचा आस्वादही घेतला... या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमानं गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं... सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी केल्यानं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे...
दिवाळीच्या निमित्ताने आज पुण्यात विविध ठिकाणी "दिवाळी पहाट" च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील मॉडेल कॉलनी मधील नवनिर्माण अभियान आणि चित्तरंजन वाटिका ग्रुप प्रस्तुत दिवाळी पहाट या कार्यक्रमात गायक विराज जोशी, गायिका अनन्या वाडकर, बासरी वादक ऋषिकेश मुजुमदार आणि ताल वाद्य वादक शिखर नाद कुरेशी यांनी सादरीकरण केलं. यावेळी गायकांनी गायलेल्या गाण्यांनी रसिकश्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले. हलकी गुलाबी थंडी, सुरेल मैफिल आणि प्रेक्षकांच्या मोठ्या गर्दी ने वातावरण प्रसन्न झालं होतं. गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन राजू पवार यांनी या केलं होतं.
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त नरक चतुर्दशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची व आकर्षक पानांची मनमोहक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी सुमारे दीड टन फुलांचा वापर करण्यात आला असून, मंदिर परिसराला आकर्षक व प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले आहे.
* दिवाळी पहाट निमित्त डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
* फडके रोडसह ग्रामदैवत गणपती मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
* परिसरात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
* डोंबिवलीसह आसपासच्या शहरांतील तरुण-तरुणींच्या स्वागतासाठी फडके रोड सज्ज झाला आहे.
* दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पंढरपूरचे भाजप नेते प्रशांत परिचारक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छाननीत बाद करण्यात आलेला त्यांचा उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे परिचारक यांचा बँकेतील मार्ग आता मोकळा झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.