धाराशिव:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेनेचे नेते मदत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर
सरकारने दिलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिवाळीसाठी,आणखी मदत मिळणार
भुम परंडा वाशी मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे शिवजक्रांती योजनेचा टप्पा क्रमांक २ राबविण्यात येणार
मायक्रो फायनान्सच्या लोकांनी जर सक्तीने वसुली केली तर शिवसैनिक त्याचा बंदोबस्त करतील,मायक्रो फायनान्स कंपन्यांना सावंताचा इशारा
पुणे - दिवाळीत गुरुवारची पाणी कपात रद्द
पुणे महापालिकेने दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण दिवाळीच्या काळात गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजीची कपात रद्द केली आहे.
या दिवशी पुणेकरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पंढरपुरात ऊसदर मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक
पंढरपुरातील दोन साखर कारखान्यांचे गाळप बंद पाडले
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर रात्रभर शेतकर्यांचे भजन आंदोलन
पहिली उचल पाच हजार रुपये जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
करकंबच्या विठ्ठलराव शिंदे आणि गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शेतकर्यांचा ठिय्या आंदोलन
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरासह प्रस्तावित विनाशकारी प्रकल्पांविरोधात आज विराट जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढवण जवळील वरोर येथे ही जन आक्रोश सभा होणार आहे.
पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना विरोध दर्शवण्यासाठी नागरिक एकवटणार आहेत.
आज वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथे ठाकरेंची शिवसेना समृद्धी महामार्ग बंद करणार आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने १ लाखांची मदत न दिल्याच्या निषेधार्थ विदर्भातील शेतकऱ्यांना सोबत घेत ठाकरसेनेचे आंदोलन.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.