Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुण्यातल्या DJ च्या वादात मनसेची उडी, थेट एकनाथ शिंदेंना केलं टार्गेट

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे आंदोलन, राज्यात पावसाचा अंदाज , राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

पुण्यातल्या DJ च्या वादात मनसेची उडी, थेट एकनाथ शिंदेंना केलं टार्गेट

मुख्यमंत्री असताना निर्बंध मुक्त गणेशोत्सव केला म्हणून पुण्यात हा वाद पेटला

सण उत्सव, साजरे करा लोकांना त्रास होऊ नये याची देखील काळजी घ्या.

पुण्यातला वाद एकनाथ शिंदे मुळेच होतो, मुख्यमंत्री असताना गणेशोत्सव निर्बंध मुक्त केला मग या सरकारने निर्बंध लावायला हवेच होते.

आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपद आणि घराणेशाही वरून व्यक्त केली खदखद

'देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फाटका माणूस तळातून वर येतो, दीडशे आमदारांचा नेता होतो. वाड्यातले सरदार फडणवीस यांच्या पायाला जाऊन मिठी मारतात.आम्ही पण तुमचंच आहोत' असं म्हणत खोत यांनी घराणेशाहीवर टीका केली.

"पण पडळकर साहेब हे सरदार आले आणि साहेबांच्या पायाला लागले.ते मंत्री झाले आणि आपण फक्त बघत बसलो.आपल्यावर काय वाईट वेळ आली"

राज्याचा मुख्यमंत्री आपला विस्थापित झाला आणि प्रस्थापित त्याच्यासमोर लोटांगण घालायला लागले.. हा खरा आमचा विजय आहे.

लवेलजवळ भरधाव कारची दोन तरुणींना धडक; पाच जण जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर लवेल पेट्रोल पंपाजवळ भरधाव टाटा पंच कारने रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या दोन तरुणींना जोरदार धडक दिली. या अपघातात मानसी केसवान शर्मा आणि यास्मिन निजाम पाटाईत या दोघी गंभीर जखमी झाल्या.धडकेनंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने टाटा पंच रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. कारमधील तीन जणही जखमी झाले असून, अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

सप्तशृंगी देवी मंदिरावर कलश रोहन संपन्न

नाशिकच्या वणी गडावरील अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या शिखरावर आज दुपारी पंचधातूंच्या 501 किलोच्या भव्य कलस रोहन संत,महंत, ब्राम्हण,व ट्रस्टचे पदाधिकारी,प्रशासन अधिकारी व भाविक यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडले,गेल्या सहा महिन्यांपासून न्यायालयीन स्थगिती व प्रशासनाच्या अडथळ्यांनंतर आज हा भव्य कार्यक्रम पार पडला,मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत स्थानिक आमदार नितीन पवार यांचे नाव वगळण्यात आल्याने गडावरील ग्रामस्थ तसेच तालुक्यातील जनतेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत असून,या प्रकरणी ग्रामस्थ व राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून ट्रस्टच्या कारभारावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

सातारा–लातूर महामार्ग पुसेगावातूनच न्यावा; बाह्यवळणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

पुसेगाव येथील ग्रामसभेत सातारा–लातूर महामार्ग बाह्यवळणाने नेण्यास ग्रामस्थांनी एकमुखी विरोध दर्शवला आहे. आज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थिती विक्राम सभा पार पडली यावेळी हा महामार्ग पुसेगावातूनच जावा अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी केवळ ८० मीटरचे अपूर्ण राहिलेले काम स्थानिक पातळीवर पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. महामार्ग बाहेरून गेल्यास श्री सेवागिरी देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक आणि स्थानिक बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला यशवंत सेनेचा पाठिंबा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला यशवंत सेनेचा पाठिंबा

मनोज जरांगे यांचा काठी-घोंगडी देऊन सत्कार

पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करत यशवंत सेनेची रॅली

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आमदार राजेश पाडवींनी घेतली आदिवासी वसतिगृहाची पाहणी

शहादा शहरातील आदिवासी वसतिगृहातील पाणीटंचाईविरोधात विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री मोहिदा चौफुलीवर आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांनी वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहात १ हजार १०० हून अधिक विद्यार्थी वास्तव्यास असून पाणीटंचाई, अपुरी बससेवा आणि क्रीडांगणाचा अभाव अशा समस्या आहेत. आमदार पाडवींनी सुरू असलेल्या बोअरिंगच्या कामाची पाहणी करून संबंधित विभागाकडून आढावा घेतला. तसेच जादा बसेस उपलब्ध करून देण्यासह क्रीडांगणाचा प्रश्न आठवडाभरात सोडवण्याचे आश्वासन दिले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला यशवंत सेनेचा पाठिंबा...

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला यशवंत सेनेने पाठिंबा दर्शविला आहे. पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करत यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली. जालन्यातील वडीगोद्री ते अंतरवाली सराटीपर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. यावेळी यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जरांगे यांना पाठिंबा दिला आहे.

मालेगावात कंटेनरची वृद्ध महिलेला धडक

नाशिकच्या मालेगाव शहरातील कुसुम्बा रस्त्यावरील नवीन बसस्थानक परिसरात कंटेनर खाली सापडून ऐका वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे,नवीन बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अन्य वाहनचालक आपली वाहन लावत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असतो,या परिसरातील नागरिकांनी अवजड वाहने या मार्गाने नेण्यास प्रशासनाला सांगून ही उपाययोजना होते नसल्याने संतप्त नागरिकांनी अपघातानंतर काही काळ रस्ता अडवत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी अचानक माईक बंद

एकनाथ शिंदे थेट व्यासपीठाच्या खाली येऊन भाषण करायला लागले

माझा आवाज कुणीही बंद करू शकत नाही म्हणत पुन्हा भाषण करत करत निघाले

वैजापूर तालुक्यात कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी

या टेम्पोमध्ये तब्बल 20 भाविक प्रवास करत होते. वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे असलेल्या पिनाकेश्वर, अर्थात मोठा महादेव मंदिरासाठी दरवर्षी कावड यात्रा निघते.

याच कावड यात्रेसाठी भाविक वांजरगाव येथे जात असताना लाडगाव–वांजरगाव रोडवर टेम्पोचा अपघात होऊन तो पलटी झाला.

एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होण्याआधी सभेच्या बाहेर घोषणाबाजी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या ठिकाणाच्या बाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी.

घोषणा देणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतला ताब्यात

पन्नास पेक्षा अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पुणे-मुंबई महामार्गावरील कारला फाटा येथे चक्का जाम आंदोलन

एकवीरा कार्ला गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेहरगाव आणि देवली ग्रामस्थांनी रोपवे प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत, स्थानिकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे.रोपवे प्रकल्प रद्द करावा, एकवीरा देवीच्या पायथ्यापर्यंतचा अर्धवट रस्ता तातडीने पूर्ण करावा, वन विभागाची जागा ग्रामपंचायतीला देऊन भाविकांसाठी प्रशस्त पार्किंग, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिस चौकी उभारावी, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणीत दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द करा असे आव्हान जरांगे पाटील यांनी केल्यानंतर देखील उपमुख्यमंत्री परभणीमध्ये दाखल, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार शेतकरी व युवा मेळावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भाष्य करतात याकडे लागले लक्ष

भंडाऱ्याचा तुमसर तालुक्यात मंत्री अशोक उईके यांच्या पुतळ्याचे स्मशानभूमीत दहन 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात आदिवासी समाजबांधवांनी आक्रमक भूमिका घेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा पुतळा थेट स्मशान घाटावर नेऊन जाळला व जोरदार घोषणाबाजी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड विमानतळावर दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड विमानतळावर दाखल झाले आहेत. नांदेड विमानतळावरून एकनाथ शिंदे परभणीकडे रवाना होणार आहेत. खासदार बंडु जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला शिंदे लावणार हजेरी लावणार आहेत.

विरोधक खलनायक खलनायके सारखे येतात - डॉ.अनिल बोंडे

अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या दुर्घटनेवरून सरकारचे प्रतिनिधी हीरो हीरोइन सारखे येतात, अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली होती. या टिकीला भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिलाय. विरोधक खलनायक खलनायके सारखे येतात, सरकारचे प्रतिनिधी येथील समस्या सोडवतात तर विरोधकांना आरोग्य व्यवस्था डिस्टर्ब करायची आहे, सरकारला बदनाम करायचा आहे असं बोंडे म्हणाले.

१८,६०० फूट उंचीवर भारतीय लष्कराच्या वैमानिकांचा थरारक पराक्रम; एकाच स्किडवर लँडिंग करत जखमीची केली सुटका 

भारतीय लष्कराच्या वैमानिकांनी हिमालयातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत १८,६०० फूट उंचीवर जखमी व्यक्तीची यशस्वी सुटका केली. शनिवारी पार पडलेल्या या धाडसी मोहिमेत वैमानिकांनी अत्यंत कमी हवेचा दाब, जोरदार वारे आणि खडतर भूभागाचा सामना करत हेलिकॉप्टरचे अचूक लँडिंग केले.

प्रिया सुळे दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर, ग्रामस्थांच्या समस्या घेतल्या जाणून... 

बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. एवढी ग्रामस्थ आणि महिलांचा सहभाग पाहायला मिळाला.

मराठा कार्यकर्त्यांकडून परभणीतील शेतकरी मेळावा उधळण्याचा इशारा

परभणीत आज शिंदेसेनेचा शेतकरी मेळाव्याचे आयोजन

एकनाथ शिंदे मेळाव्यासाठी परभणीकडे रवाना

मराठा कार्यकर्त्यांकडून परभणीतील शेतकरी मेळावा उधळण्याचा इशारा

मालेगावच्या गिरणा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू,२४ तासानंतर शोध सुरु 

नाशिकच्या मालेगाव शहरातून वाहणा-या गिरणा नदीला अद्याप पुर पाणी असून,मालेगाव तालुक्यातील दाभाडी जवळ गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांपैकी तीन तरुण सुखरूप बाहेर आले, मात्र एक तरुण अद्याप बेपत्ता आहे.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहायलायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणीसाठी पोहचले

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वनमंत्री गणेश नाईक देखील आहेत

- गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात मुख्यमंत्री सफारी करणार आहेत,त्यानंतर वन विभागाची आढावा बैठक घेणार आहेत

एकनाथ शिंदे परभणीकडे रवाना

परभणीत आज शिंदेसेनेचा शेतकरी मेळाव्याचे आयोजन

एकनाथ शिंदे मेळाव्यासाठी परभणीकडे रवाना

एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमास्थळी नागरिकांची गर्दी जमायला सुरू

मनोज जरांगे पाटील यांनी खासदार संजय जाधव यांना फोन करून कार्यक्रम रद्द करावा असे सांगितल्यानंतर कार्यक्रम पार पडणार असे खासदार संजय जाधव यांनी जाहीर केले आहे त्यानंतर आता कार्यक्रम स्थळे गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे मोठ्या संख्येने नागरिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जमत आहेत

परभणीतील शेतकऱ्यांचा मेळावा रद्द होणार नाही - संजय जाधव

परभणीत आज होणाऱ्या शेतकरी मेळाव्यावरून राजकारण तापलेले पाहायला मिळते आहे

मनोज जरांगे यांनी हा मेळावा आणि एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द करण्याचा इशारा दिला होता

मात्र संजय जाधव यांनी हा मेळावा होणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.

भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

गेली चार-पाच वर्षे माझी आई भिमाशंकर येथे येत असते. मात्र आता वयोमानामुळे तिला येथे येणं शक्य होत नाही. त्यामुळे माझ्या आईची ही परंपरा आणि तिची श्रद्धा जपण्यासाठी मी भिमाशंकर येथे येत आहे.

भिमाशंकर येथे सध्या विकासकामे सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रात आता खड्ड्यांशिवाय ओळखच राहिलेली नाही. कोणत्याही जिल्ह्यात किंवा तालुक्यात गेलं, तरी हीच परिस्थिती पाहायला मिळते. ज्या ठिकाणी हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते करण्यात आले आहेत, ते रस्ते चांगले आहेत; मात्र सर्वसामान्य नागरिक राहत असलेल्या भागांमध्ये रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे.

पुण्यातील गुडलक चौकात डी जे विरोधात काही पुणेकर एकवटले

डी जे विरोधात अजूनही काही पुणेकर ठाम

डी जे ची बंदी आणण्यासाठी काही पुणेकर गुडलक चौकात जमा व्हायला सुरुवात

पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात

मनोज जरांगे परभणीत जाण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंच्या खासदाराला मेळावा रद्द करण्याचा इशारा

परभणीत होणार शेतकऱ्यांचा मेळावा रद्द करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी शिंदेंचे खासदार संजय जाधव यांच्याकडे केली आहे. असे न केल्यास मराठा बांधवाना घेऊन परभणीत येऊ असा इशारा दिला आहे.

दिल्लीतील लाकडाच्या गोदामाला भीषण आग; घटनास्थळी २५ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

दिल्लीतील राजधानी पार्क मेट्रो स्टेशनजवळील लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीचे कारण आणि नुकसानीबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कर्नाटकात मोठी राजकीय घडामोड; मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्री बी. नागेंद्र यांचा मंत्रिमंडळातील राजीनामा तत्काळ प्रभावाने मंजूर केला आहे. कर्नाटक वाल्मिकी महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत असताना नागेंद्र यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

चांदोली-वारणा धरण 100 टक्के भरलं, सांगली-कोल्हापूरची पाण्याची चिंता मिटली

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बातमी आहे. चांदोली-वारणा धरण 100 टक्के भरले आहे.. 99.86 टक्के असलेले धरण अवघ्या काही तासांत पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरणाची जलपातळी 626.90 मीटर झाली असून एकूण पाणीसाठा 34.40 टीएमसी झाला आहे.. उपयुक्त पाणीसाठा 27.52 टीएमसी झाला आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात 1.54 टीएमसी अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे.

सोलापूर महानगरपालिकेत 127 पदांची तातडीने भरती होणार

सोलापूर महानगरपालिकेतील रिक्त पदांमुळे विकासकामे आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होत असल्याने, शासनमान्य 130 पदांपैकी 127 पदे तातडीने भरण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

स्थायी समितीची सभा सभापती रंजीता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत दोन महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.

गट-ब, गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांची भरती पारदर्शक, विश्वासार्ह आणि गतिमान पद्धतीने करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे.

सोलापूर शहरात मास्टर कीचा वापर करून दुचाकी चोरणारा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या ताब्यात

सदर अल्पवयीन मुलांकडून नऊ दुचाकी करण्यात आल्या जप्त, अक्कलकोट तालुक्यातून येऊन दुचाकींची करायचा चोरी

सोलापुरातील सदर बाजार पोलिसांकडून करण्यात आली कारवाई, सोलापुरातील रेल्वे परिसरातून दुचाकी चोरायचा..

सदर बाजार पोलिसांनी 2 लाख 90 हजार किमतीच्या नऊ मोटरसायकली केल्या जप्त, नऊ गुन्हे आणले उघडीस

ठाण्यातील 32 व्या वर्षा मॅरेथॉनला मॅडल न मिळाल्याने शाळकरी मुलं नाराज

ठाण्यातील 32 व्या वर्षा मॅरेथॉनला मॅडल न मिळाल्याने शाळकरी मुलं नाराज

अल्फा जनरेशन असलेल्या लहान मुलांनी मेडल मिळाले नाही म्हणून केल ठिया आंदोलन

Pune : शिक्षक भरतीत महिलांना मोठी संधी

शिक्षक भरतीत महिलांना मोठी संधी

राज्यातील शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग

पवित्र संकेतस्थळामार्फत मुलाखती विना निवड प्रकारात १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस

रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या घटनास्थळी दाखल

​रबाळे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाली.

प्लॉट क्रमांक ८२३ मधील कंपनीमध्ये ही घटना घडली.

आगीच्या ज्वाळांसोबतच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.

अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या घटनास्थळी दाखल

दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन! ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांचा इशारा

दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन! ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांचा इशारा

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर;आमदार प्रवीण स्वामी आक्रमक

हिंगोलीत शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट, पाऊस पडत नसल्याने कोवळ्या केळी झाडावरच पिवळ्या पडल्या

हवामान विभागाने सहा महिन्यापूर्वी अंदाज वर्तविलेल्या आलनिनोचा मराठवाड्यात परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे, हिंगोली जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेला पाणी मिळत नसल्याने कोवळी केळी झाडालाच पिवळी पडत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची केळी खरेदी करायला स्पष्ट नकार दिला आहे,

नेपाळमधील महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात

राज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात

नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध शासकीय यंत्रणा कार्यरत

प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Pune : "चर्चा आणि समन्वयातून" डी जे बाबत वाद अखेर संपला?

"चर्चा आणि समन्वयातून" डी जे बाबत वाद अखेर संपला?

पुण्यात आज पर्यावरण प्रेमी आणि डी जे विरोधात असलेल्या पुणेकरांचा पायी मोर्चा रद्द

जन प्रबोधन सभा व गणेशउत्सव कृति समिति यांच्या संवादातून निघाला मार्ग

गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि डी जे विरोधातील पुणेकरांची पार पडली बैठक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस...

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणावरती मनोज जरांगे ठाम...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे 11 वे उपोषण

12 सप्टेंबरला मुंबईला जाण्याची तारीख जाहीर करणार

Akola : हिवरखेड नगरपरिषदेतला राडा; CCTV फुटेजसाठी संपूर्ण नगरपालिका सील

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत 27 नोव्हेंबरला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये झालेल्या राड्यानंतर आता संपूर्ण नगरपरिषद सील करण्यात आलीये.

सर्वसाधारण सभेत कार्यक्रम पत्रिकेसोबत विषयाची सविस्तर माहिती देणारी टिपणी न दिल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होतीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विकेंडला जास्त झोपून आठवडाभराची झोप भरून निघते का?

भाजपच्या दिग्गज युवा नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या बैठकी दरम्यान राडा

Blood Sugar :डायबिटीज नसतानाही वाढू शकते ब्लड शुगर! रोजच्या ‘या’ 7 सवयी ठरतात कारणीभूत

दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल; शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा; हायव्होल्टेज ड्रामा|VIDEO

SCROLL FOR NEXT