Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: शाळेच्या मैदानात भरधाव कारने 12 वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात पावसाचा जोर वाढणार, रिक्षा चालकांना मराठी सक्ती, शिवसेना कुणाची यावर आज कोर्टात पुन्हा सुनावणी, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

शाळेच्या आवारात भरधाव कारची विद्यार्थिनीला धडक; १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आडोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भीषण अपघात झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या दिशेने भरधाव आलेल्या ईको कारने सोनम युवराज खरपडे (१२) हिला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सोनमचा जागीच मृत्यू झाला. सोनम सहावी इयत्तेत शिकत होती. या घटनेनंतर आडोरी गावावर शोककळा पसरली असून, मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

शाळेच्या मैदानात भरधाव कारने 12 वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले

मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आडोशाी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सकाळी घड़लेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कारने सोनम युवराज खरपडे वय 12 हिला जोरदार धडक दिली. या घटनेमुळे आडोरी गावावर शोककळा पसरली आहे . या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मृत सोनम युवराज खरपडे (वय12 ) ही आाडोरी येथील रहिवासी असून जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होती.

मीरा-भाईंदर शहरात बकरी ईद सणाच्या बकरा कुर्बानीवर पालिकेचे निर्बंध

पालिकेच्या आदेशानुसारच त्या त्या ठिकाणी कुर्बानी केली जाणार उपमहापौर यांची माहिती

मीरा-भाईंदर शहरात मागील वर्षी बकरी ईदच्या वेळी कायदा शुभेच्छाचा प्रश्न निर्माण झाला होता

दोन-तीन दिवस हे प्रकरण चिघळलं होतं त्यामध्ये मीरा-भाईंदर शहराचे नाव बदनाम झाले

या शहरामध्ये सर्वांनी गुणा गोविंदाने राहावं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी ही पॉलिसी निर्माण केलेली आहे

यामध्ये पालिका प्रशासन पोलीस प्रशासन या सर्वांचा विचार विनिमय करून शहरामध्ये कुठेही कुर्बानी करायची नाही

कोणत्याही ठिकाणी न बकरी मेंढी उभारायची

आपल्या जर कुरबानी करायचे असेल तर महानगरपालिका त्यासाठी परवानगी देईल

उघड्यावर जे मटण विकले जाते त्यांना देखील कायद्यानुसारच त्यांना दुकाने चालवावी लागतील

राहुल गांधींच्या "छात्रों की गुंज" ला "संपूर्ण वंदे मातरम्" गायनाचे मिळणार उत्तर?

पुण्यात उद्या एकाच वेळी पार पडणार दोन्ही कार्यक्रम

संध्याकाळी ५ वाजता राहुल गांधींचा "छात्रों की गुंज" तर त्याच वेळेला "संपूर्ण वंदे मातरम् गाऊया, राष्ट्रभक्तीचा जागर करुया" या कार्यक्रमाचे आयोजन

वंदे मातरम् गौरव कृती समिती ने केलं आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संपूर्ण वंदे मातरम् गीताचे गायन या कार्यक्रमाचे आयोजन

संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईला सहभागी होण्याचे आवाहन

ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

माजी कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत यांचा भाजमध्ये प्रवेश

ठाकरेंची साथ सोडून भाजपचा झेंडा घेतला हाती

राणेंच्या कणकवलीतील “ओम् गणेश” निवासस्थानी सचिन सावंत यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणे यांनी सचिन सावंत यांचे केले पक्षात स्वागत

माजी खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू शिलेदार अशी सचिन सावंत यांची ओळख

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट; समस्या सोडवण्याचे आश्वासन

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज मालेगावातील सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिदक्षता विभागाची पाहणी करून डॉक्टरांकडून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयातील रिक्त पदे, रुग्णसेवा आणि स्वच्छतेबाबत नागरिकांनी समस्या मांडल्या. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना उपचारासाठी बाहेर पाठवावे लागत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. रुग्णालयातील त्रुटी व समस्या प्राधान्याने सोडवून लवकरच कामकाजात सुधारणा दिसतील, असे आश्वासन मंत्री आबिटकर यांनी दिले.

आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

आंबेगावच्या पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा समोर आल्यानंतर जुन्नर तालुक्यातील काळवाडी ग्रामस्थही सतर्क झाले आहेत. पोषण आहारासाठी आलेल्या तांदळाच्या पोत्यांच्या वजनात तफावत असल्याचा तसेच धान्याचा दर्जा योग्य नसल्याचा ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी धान्याचे सॅम्पल घेतले असून तपासणीला सुरुवात केली आहे. तपासणी अहवालानंतर धान्याच्या गुणवत्तेबाबत नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

अंबरनाथमध्ये स्वामीनगर येथे अल्पवयीन मुलाची हत्या

अंबरनाथमध्ये स्वामीनगर येथे अल्पवयीन मुलाची हत्या ?

खेळता खेळता भांडण झाला आणि लाकडाने मारला !

आरोपी ही अल्पवयीन असून घटनास्थळी पोलिस दाखल!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

राष्ट्रवादी काँग्रेस च्या २ नगरसेवकांचा निधी अडवल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक

पुणे महापालिकेत राष्ट्रवादी चे नगरसेवक आक्रमक

भाजपच्या मनमानी कारभार असा आरोप करत राष्ट्रवादीचे आंदोलन

भिवंडी बायपास रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

भिवंडी बायपास रस्त्यावर जेवणासाठी ट्रक थांबवलेल्या चालकाची चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा कोणताही ठोस पुरावा नसताना तांत्रिक विश्लेषण आणि तब्बल १५० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कोनगाव पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. मृत चालक पवनकुमार काजू महतो (३३, बिहार) यांची हत्या झाली होती. रमीज अब्दुल रशीद अन्सारी (२३) आणि मोहम्मद अलकैश परवेज आलम मोमीन (२५, भिवंडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Pune:  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

पुणे -

राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेवकांची भाजप विरोधात आक्रमक भूमिका

नगरसेवकांचा निधी रोखल्यामुळे नगरसेवक आक्रमक

भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल, नगरसेवकांची ग्वाही

त्यांना लाज वाटली पाहिजे मनमानी कारभार, राष्ट्रवादीचा आरोप

नगरसेवकांचा निधी रोखला म्हणजे लोकांचा विकास रोखला आहे

मुख्यमंत्री यांना सुद्धा पत्र लिहून आम्ही या गोष्टी कळवणार आहोत

Nagpur: नागपूर महापालिका सभेतील अर्धवट ‘वंदे मातरम्’ गायनावरून काँग्रेसच्या टीकेनंतर महापौरांनी घेतली गंभीर दखल

नागपूर -

- नागपूर महापालिका सभेतील अर्धवट ‘वंदे मातरम्’ गायनावरून काँग्रेसच्या टीकेनंतर महापौरांकडून गंभीर दखल घेतलीय... चौकशीचे दिले निर्देश..

- २० ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे मातरम्’ अर्धवट गायल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले...

- भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतच ‘वंदे मातरम्’च्या अर्धवट गायनाचा प्रकार झाल्यानंतर काँग्रेसने जोरदार टीका केलीय..

- अर्धवट गायनामागील कारणांची चौकशी करण्याचे महापौरांचे प्रशासनाला निर्देश दिले...

- संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण मागण्याचे आदेश

Ratnagiri: भास्कर जाधवांच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा चर्चा, सुभाष देसाईंचे मोठे वक्तव्य

रत्नागिरी - ‘भास्कर जाधव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच माझेही स्वप्न’

भास्कर जाधवांच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा चर्चा

उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत राजकीय संकेत

सुभाष देसाईंचे मोठे वक्तव्य

सर्वसामान्य शिवसैनिकांचीही हीच इच्छा असल्याचा दावा

दापोलीतील शिवसैनिकाच्या भावनेला सुभाष देसाईंचा दुजोरा

भास्कर जाधव यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त

‘कष्टातून पुढे आलेल्या नेतृत्वाला संधी मिळावी’

Ratnagiri: कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले वातावरण – सुभाष देसाई

रत्नागिरी - कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले वातावरण – सुभाष देसाई

उत्तर रत्नागिरीतील पदाधिकारी बैठकीला मोठी उपस्थिती

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहता कोकणात ठाकरे शिवसेनेचे वातावरण चांगले असल्याचा दावा

आगामी काळात कोकणातील शिवसेनेची घोडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास

Pune: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

पुणे -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

राष्ट्रवादीच्या २ नगरसेवकांचा निधी रोखल्यामुळे नगरसेवकांची तातडीने बैठक

आमदार चेतन तुपे सुद्धा बैठकीला उपस्थित

लासलगाव येथे बाह्यवळण रस्ता उड्डाण पुलाचे लोकार्पण 

नाशिकच्या लासलगाव येथे 160 कोटी रुपयांचे विविध विकास कामांची मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी आशिया खंडातील सर्वात मोठे बाजारपेठ असलेल्या लासलगाव शहरात रेल्वे गेट मुळे वाहतूक कोंडीची समस्या होत होती,या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेऊन राज्य सरकारकडून 109 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.

....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर 

सरकारने अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती योजना जाहीर केली व शेतकऱ्यांना कर्जमाफी ही केली... मात्र नियमित कर्जदारांना दोन लाख प्रोत्साहन पर अनुदानासह आरटीआय भरणारे व पुनर्गठीत आणि 2019 पूर्वीचे वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकारने करावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली.

खिर्डी येथे भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

रावेर तालुक्यातील खिर्डी बु. येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. प्रदीप अशोक महाजन हे कामानिमित्त नाशिक येथे गेले होते. त्यांचा मुलगा शाळेत, तर आई शेतात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

दोन दिवसात सोनं- चांदी दरात मोठी वाढ! सोनं साडेचार हजारांनी तर चांदी अकरा हजार रुपयांनी महाग 

जळगाव गेल्या काही दिवसांपासून सोने– चांदीच्‍या दरात सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान काल झालेल्‍या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात साडेचार हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार रुपयांची वाढ झाल्याने सराफ बाजारात तेजी आली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

वाटाणा शिजत नाही, गरोदर माता आणि बाळाला दिली जाणारी सुकडीही खाण्यायोग्य नसल्याचा दावा 

अंगणवाडी सेविकेने पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर या दाव्यांची रिअॅलिटी चेकमध्ये पडताळणी करण्यात आली. प्रत्यक्ष अंगणवाडीत पाहणी केली असता वाटाणा शिजत नसल्याने तो मुलांना देत नसल्याचं सेविकेने सांगितलं, तर गरोदर मातांना दिली जाणारी सुकडीही महिला नेत नसल्याचं सांगण्यात आलं.

पंढरपुरात सुट्टे तेल विक्री बंदीमुळे दर वाढले 

अन्न व औषध प्रशासनाने सुट्टे तेल विक्रीवर बंदी घातल्याने दरात वाढ झाली आहे. दरम्यान पंढरपुरातील स्थानिक तेल व्यापार्यांनी मात्र स्वतः डबा बंद तेल विक्री सुरू केली आहे. पॅकींगमुळे पाच किलो मागे 40 रूपयांची वाढ झाली आहे. याचा सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

शक्तीपीठ सुरू असलेल्या मोर्चाला जयंत पाटील यांनी लावली शिस्त 

सांगली विश्रामबाग मधून मिळालेल्या शक्तीपीठ विरोधी मोर्चाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत तर जिल्ह्यातील व जिल्ह्यात राज्यातून अनेक शक्तीपीठ विरोधी भूमिकेत असणारे शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे या दरम्यान मोर्चा विखुरलेला होता. आंदोलनाला शिस्त लावण्यासाठी स्वतः जयंत पाटील यांनी आंदोलकांच्या पुढे येऊन गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्ते शेतकऱ्यांना मोर्चामध्ये रांगेत जाण्याचा सल्ला दिला व स्वतः शिस्त लावून मोर्चा पुढे सरकवला आहे.

अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना निकृष्ट आहार 

अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच कारवाई करण्यात आली आहे. वटाणा शिजत नाही, तेल-हळद निकृष्ट असून साखरेला अळ्या होत असल्याचा दावा करत सेविकेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता.

रणजितसिंह माणूस नाही, परग्रहावरून आलेला गुंड! रामराजेंचा रणजितसिंहांवर घणाघात

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत कडाडून टीका केली आहे.

"रणजितसिंह हा माणूस नसून मंगळ-शनीवरून आलेला प्राणी आहे, तो प्रख्यात गुंड असून सरकारी खर्चाने पोलीस आणि गाड्या घेऊन फिरतो," असा गंभीर वैयक्तिक आरोप रामराजेंनी भरसभेत केला.

संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर राहुल गांधी यांचं आंदोलन

FIR दाखल का नाही, राहुल गांधी यांचा सवाल

चाकणमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

चाकणमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर भीषण वाहतूककोंडी झाली असून वाहनांच्या तब्बल ५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. चाकण औद्योगिक परिसरात रस्त्याच्या कडेला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नवी मुंबई- सभागृहनेते सागर नाईक यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक

नवी मुंबई महापालिकेच्या डंपिंग ग्राउंडवरील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मंजूर करण्याच्या बदल्यात ठेकेदाराच्या कंपनीकडून मर्सिडीस कार सभागृहनेते सागर नाईक यांनी घेतली असल्याचा गंभीर आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय.. आणि याचाच निषेध करत आज सर्व नगरसेवकांनी काळे कपडे घालून हातात निषेधाचे पोस्टर घेऊन महासभेत प्रवेश केला

राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल

जखमी विद्यार्थ्यांना घेऊन पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये

एफआय़आऱ दाखल होत नसल्याने राहुल गांधी थेट पोलीस स्टेशनमध्ये

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात 'छात्रो की गुंज' कार्यक्रम

छात्रो की गुंज कार्यक्रमात राहुल गांधी मुलींची साधणार संवाद

मुलींच्या अडीअडचणीसह त्यांना दिलासा देण्यासाठी राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रम

पुण्यातील एस एस पी एम एस कॉलेजच्या मैदानावर होणार उद्या सायंकाळी कार्यक्रम

कार्यक्रमाला वीस ते पंचवीस हजार तरुणी येणार असल्याचा काँग्रेसचा दावा..

राहुल गांधी विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत कार्यकर्त्यांनी नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यास परवानगी नाही

शहरी भागातील 47 विधानसभा मतदारसंघांत 30-35% नावं डिलीट- किरीट सोमय्या

- महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जे सिस्टिमॅटिक काम केलं आहे त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये 288 पैकी 240 विधानसभा क्षेत्रात बऱ्यापैकी चांगलं काम झालं आहे

- 200 मतदारसंघात फक्त दहा-बारा टक्के डिलिशन आलं, पाच-दहा टक्के मृत्यू होतात आणि स्थलांतर त्याबद्दल निवडणूक आयोगाचे कौतुक करतो

- जे महानगर आहेत नागपूर,मुंबई,पुणे तिथे थोडी कार्यपद्धती न झाल्यामुळे महाराष्ट्रात शहरी भागातील 47 विधानसभा मध्ये जिथे एक सप्टेंबरला जे मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्यात सुमारे 30-35% नाव डिलीट झालेली आहेत

अमित ठाकरे पनवेलमध्ये दाखल

नवी पनवेल येथील पिल्लई कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते

पुणे इस्कॉन च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

इस्कॉन च्या वतीने सुनेत्रा पवार यांना देण्यात आले भगवान कृष्णाची पुस्तकं

भगवान कृष्णांची लीला असणारे पुस्तक दिली भेट

तसेच येत्या काही दिवसात होणाऱ्या पुण्यातील एका कार्यक्रमाला येण्याचे सुद्धा दिले आमंत्रण

जन्माष्टमी च्या कार्यक्रमाचे इस्कॉन ने दिले आमंत्रण

पुण्यात शहरात राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर, बॅनरवर भावी पंतप्रधान असा उल्लेख

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी उद्या पुण्यात येणार आहेत... उद्या पुण्यात त्यांचा छात्रो की गुंज कार्यक्रम पुण्यातील एस एस पी एम एस महाविद्यालय मैदानावर पार पडणार आहे.. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बॅनर सर्वांचं लक्ष आकर्षून घेत आहे.. उद्या राहुल गांधी यांच्या छात्र की गुंज या कार्यक्रमात राहुल गांधी मुलींची संवाद साधणार आहेत

नांदेड- बसच्या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांनी एस.टी. बस अडवून केले आंदोलन

नांदेडच्या कंधार तालुक्यातील सावरगाव येथून दररोज सुमारे १०० ते १२० विद्यार्थी अंबुलगा येथील माणिक प्रभू विद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत बससेवा अपुरी पडत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त विद्यार्थ्यांनी आज चक्क महामंडळाची एस.टी. बस अडवून आंदोलन केले.

नांदेडमध्ये 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचार

नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका शाळेत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली.शाळेतील मुख्याध्यापकाने त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे..मुलीने आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.यानंतर मुलीच्या पालकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे काल रात्री पोलिसांनी मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यवतमाळात वॉक फॉर वॉटर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्य सरकारच्या जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित्त यवतमाळात ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.पोस्टल मैदानातून या रॅलीला सुरुवात झाली.पाण्याचे महत्त्व, जलसंधारण, मृदसंधारण आणि भविष्यातील पाणी सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.

समृद्धी महामार्गावर ट्रक चालकांची रेस? प्रवाशांना नाहक त्रास

-अमरावतीच्या धामणगाव रेल्वे आणि वर्ध्याच्या जवळ समृद्धी महामार्गावर तीन ट्रक चालकांकडून एकमेकांमध्ये रेस लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भरधाव वेगाने धावणाऱ्या या ट्रक चालकांनी रस्त्यावर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा न दिल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मिड डे भोजनाची खासदार पडोळे यांनी केली पोलखोल

मिड डे भोजनाची खासदार पडोळे यांनी केली पोलखोल

एक्सपायरी डेटचा विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी साहित्याचा पुरवठा

काँग्रेस खासदारांचा खळबळजन दावा

वाशिष्ठी नदीत मगरीचा थरार; १० वर्षांच्या लेकीने वाचवला आईचा जीव!

वाशिष्ठी नदीत मगरीच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

वालोपे गणेशवाडी येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या नंदिनी पवार यांच्यावर मगरीने अचानक हल्ला करत त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांच्यासोबत असलेल्या अवघ्या १० वर्षांच्या स्वर्णीने प्रसंगावधान दाखवत आईचा हात पकडून तिला बाहेर खेचले.

Kolhapur : बाळूमामा देवस्थान गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन

आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकारी आणि आठ पोलिस अंमलदार अशा १२ जणांचे हे पथक तपास करणार आहे.

धुळ्यात एम.डी. ड्रग्ज आणि अवैध दारूचा साठा जप्त; दोघांना बेड्या

धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी आणि देवपूर परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई

मानवी मेंदूवर घातक परिणाम करणारे एम.डी. म्हणजे मेफेड्रॉन ड्रग्ज आणि अवैध देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे .

याप्रकरणी कुणाल भिमराव वारुडे आणि दिपक शंकर कापुरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नागपुरातील काटोल नाका चौकातील खड्डा पोलिसांनी बुजवला.

- नागपुरातील काटोल नाका चौकातील खड्डा पोलिसांनी बुजवला.

- यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत घटनास्थळी उपलब्ध साहित्याच्या मदतीने खड्डा बुजवला.

- पोलिसांच्या या तत्परतेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mumbai : मुंबई एक्स्प्रेस मिसिंग लिंकवर जीवघेणी स्टंटबाजी

मुंबई एक्स्प्रेस मिसिंग लिंकवर जीवघेणी स्टंटबाजी

भरधाव कारमधून तरुणांचे सेल्फी

पुणे मुंबई एक्स्प्रेस मिसिंग लिंकवर भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे

Pune : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या प्रतिकृतींची प्राणप्रतिष्ठा

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या प्रतिकृतींची प्राणप्रतिष्ठा

आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूर्तींची होणार सीमेवर प्राणप्रतिष्ठा

भारतीय लष्कर दलातील जवानांनी काल बाप्पाच्या मूर्ती स्वीकारून लष्करी ठाण्यांमध्ये पाठवल्या

भारतीय लष्करात गणेशोत्सवात सिमेवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा होणार

नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

* नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

* तपोवनातील वृक्षतोडीविरोधातील याचिकेवर आज २१ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता

* मागील सुनावणीवेळी याचिका सुनावणीच्या अनुक्रमांकापर्यंत पोहोचू शकली नव्हती

Parbhani : महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून घंटागाड्या अडवून कचरा संकलन बंद

महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून घंटागाड्या अडवून कचरा संकलन बंद

अकरा दिवसांपासून काम बंद आंदोलन; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दररोज विविध आंदोलनं, तरीही दुर्लक्ष

वंचित बहुजन आघाडी कडून अंगणवाड्या व शाळांचा पंचनामा

सी जे पी चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्या तपासायला सुरुवात केली आहे,

अंगणवाड्यांचे सोशल ऑडिट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत समस्या जाणून घेतल्या आहेत

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील माळेगाव मध्ये अंगणवाड्यांची दुरावस्था वंचित बहुजन आघाडीने पुढे आणली आहे

Nashik : मतदान,आधार,पॅन कार्ड रस्त्याच्या कडेला कच-यात आढळले

नाशिकच्या येवला-नागडे रोडवरील नागडे रेल्वे गेटच्या अलीकडे असलेल्या चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात महत्त्वाची ओळखपत्रे पडलेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कचऱ्यामध्ये अनेक नागरिकांची आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मतदान ओळखपत्रे पडलेली असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले.

नागपूर महानगर पालिकेच्या सभेत भाषेवरून गदारोळ

- नागपूर महानगर पालिकेच्या सभेत भाषेवरून गदारोळ

- नागपूर महानगरपालिका सभागृहात इतिहासात पहिल्यांदाच कधीही न घडलेला मराठी - हिंदीवाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं

- सत्ताधारी, विरोधक यांच्यात हिंदी मराठीतून संवादावरून शाब्दिक चकमक झाली.

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर परिसरात रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष ईशान चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस व हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजी मंडई परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले.

चिपळूणमध्ये महामार्गाच्या दुरावस्थेवरून भाजप आक्रमक..

चिपळूण शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून अनेक वेळा अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा रस्त्यातील खड्डे बुजवले जात नाहीत आणि महामार्गाच्या पुलाखालील साफसफाई देखील केली जात त्यामुळे चिपळूण शहर भाजपाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयावर धडक देण्यात आली.

Uday Samant : सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना बाहेर बोलणे न्यायालयाचा अवमान, मंत्री उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना बाहेर विधाने करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचे सामंत यांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली दोन क्रमांकावर असलेली शिवसेना उठावानंतर उबाठा गटाला ७ व्या क्रमांकावर घेऊन गेली, असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

Chanyachya Daliche Pani: १५ दिवस चण्याच्या डाळीचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

80s च्या ट्रेंडने सोशल मीडियावर क्रेझ; आमिर खानपासून कियारा आडवाणीपर्यंत सेलिब्रिटींचा भन्नाट रेट्रो लूक

Apple iPhone Duo: Apple चा पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च; 2TB स्टोरेजसह किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT