Maharashtra Lagislatitve Councial Election Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Lagislatitve Councial Election: नाशिक शिक्षक मतदारसंघात मविआचे अमेदवार संदीप गुळवे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, पाहा Video?

Sandeep Gawade

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान सुरू असून बी.डी.भालेकर शाळेच्या मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती आहे. संदीप गुळवे यांनी मतदान केंद्रावर आतमध्ये मोबाईल आणल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला. मोबाईल बाहेर ठेवण्यास सांगितल्याने मतदान केंद्रावर पुन्हा काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मोबाईल आतमध्ये घेवून येऊ नये, हा पोलिसांचा आक्षेप आहे. मात्र एखाद्या केंद्रावर गोंधळ झाल्यास कार्यकर्ते मला फोन करतील, म्हणून मोबाईल आत आणला होता. इथे पैसे वाटताना एकाला पकडले, पोलीस त्याला संरक्षण देत होते, हा प्रकार चुकीचा वाटला. मला मोबाईल आत आणू दिला नाही तशाच पद्धतीने त्याच्यावर कडक कारवाई करावी. प्रशासनानं पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करावी. लोकशाहीला काळीमा फासण्याचे हे काम.पोलिसांच्या प्रोटेक्शन खाली हे सगळं काम सुरू असल्याचा आरोप संदीप गुळवे यांनी केला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघात धक्कादायक प्रकार समोर आला होता. शिक्षक मतदारसंघाबाहेर मतदानासाठी पैशांचं पाकिट वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. या पैशांच्या पाकिटावर उमेदवार किशोर दराडे यांचे नाव असल्याची माहिती समोर आली होती. मतदान केंद्राबाहेर पाकीट वाटप करणाऱ्या व्यक्तीला ठाकरे गटाने पोलिसांत नेलं आहे. या प्रकारानंतर मतदारसंघाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला.

या प्रकारानंतर वसंत गीते, विलास शिंदे भद्रकाली पोलीस ठाण्यात पोहोचले होते. दरम्यान या पैशांच्या पाकिटावर किशोर दराडे यांचं नाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदान केंद्राबाहेर पैशांची पाकिटे सापडलेल्या ४ खाकी पाकिटात प्रत्येकी ५००० रुपये सापडले. तर पांढऱ्या रंगाच्या ४९ पाकिटात १००० रुपये होते. तर एका पाकिटात ५०० रुपये होते. पोलिसांनी एकूण ६९,५०० जप्त केले आहेत. त्यानंतर संदीप गुळवे मतदान केंद्रावर दाखल झाले होते. त्यावेळी मोबाईल मतदान केंद्रावर नेण्यावरून पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : विधानसभेच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; PM मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹11000 कोटीचं 'गिफ्ट'

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT