Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरूवात, ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा नेमकं काय म्हणाले

Maharashtra : महाराष्ट्रात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली आहे. ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी या प्रमाणपत्रांवर खाडाखोड होऊ शकते असा संशय व्यक्त करत कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र पडताळणीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात.

  • ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांनी खाडाखोडीचा संशय व्यक्त केला.

  • कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र पडताळणी व माहिती अधिकार वापरण्याचे आवाहन.

  • दिलेल्या अटींनुसार कागदपत्र नसतील तर दिलेले प्रमाणपत्र बेकायदेशीर ठरणार व कारवाई होणार.

हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राज्यभर सुरूवात झाली आहे. लारू, बीड, संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू झाले आहे. पण या कुणबी प्रमाणपत्रावर खाडाखोड करता येऊ शकते, असा संशय ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला आहे. त्याशिवाय हे प्रमाणपत्र योग्य आहे की अयोग्य यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले.

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू

जात प्रमाणपत्र पडताळणीच्या मुद्द्यावर तायवाडे म्हणाले," २ तारखेला जो शासन निर्णय निघाला त्यानुसार आजपासून जात प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू होत आहे. २००० पूर्वीपासून जी पद्धती सुरू आहे वडील,पणजोबा किंवा खापर पणजोबा यांच्याकडे वंशावळ नोंद असेल आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असेल ते प्रतिज्ञापत्र देऊ शकतात. ते प्रतिज्ञापत्र सादर केल्यावर सक्षम अधिकाऱ्याकडे कागदपत्र सादर करावे लागेल. त्यानुसार अधिकारी कागदपत्र तपासणी करतील. २०००, २००७, २०१२ आणि २०२४ च्या शासन निर्मयानुसार प्रमाणपत्र देता येईल." असे ते म्हणाले.

ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना आवाहन

ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना,पदाधिकाऱ्यांना, जागृत नागरिकांना तायवाडे यांनी आवाहन केले की, "एक टीम तयार करावी, प्रत्येक तहसील कार्यालयातून कुणाला प्रमाणपत्र दिले त्याची माहिती घ्यावी, माहितीच्या अधिकाराचा वापर करावा. जर प्रमाणपत्राच्या जारी करताना काही शंका असल्यास किंवा काही गडबड असल्यास तक्रार करावी. ज्याच्याकडे वंशावळनुसार महसूल किंवा शैक्षणिक कागदपत्र किंवा शिंदे समितीने जारी केलेल्या ४२ कागदपत्रशिवाय कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाऊ शकत नाही. जर तसे केले तर घेणारा आणि देणारा दोघांवरही कारवाई करण्यात येईल, शिक्षेची तरतूद आहे. दिलेले प्रमाणपत्र योग्य आहे की अयोग्य यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावे"

कुणबी प्रमाणपत्रावर खाडाखोड योग्य की अयोग्य ?

तायवाडे यांनी २०२३ मध्ये सांगितल्याप्रमाणे खाडाखोड करणे सोपे आहे. ती खाडाखोड योग्य आहे की अयोग्य हे अधिकारी तपासणार. जात प्रमाणपत्र मिळाल्यावर ते validity साठी जाणार. जात प्रमाणपत्र महसूल विभाग देतो, validity सामाजिक विभाग जारी करतो. जर खाडाखोड केल्याचे आढळल्यास तर त्यांच्यावर कारवाई होणार. असल्याचं तायवाडे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

Monsoon 2025 : मुंबईतून मान्सूनचा काढता पाय, ३ दिवसात राज्यातून गायब होणार, आज कुठे कुठे कोसळधारा?

SCROLL FOR NEXT