Ram Shinde Vs Rohit Pawar saam tv
महाराष्ट्र

Karjat Politics: राम शिंदेंचा डाव,रोहित पवार चितपट; कर्जतमध्ये सत्तेला सुरुंग

Ram Shinde Vs Rohit Pawar: विधानपरिषद सभापती राम शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढत रोहित पवारांना धक्का दिलाय.. मात्र राम शिंदेंनी कोणती खेळी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

विधानसभा निवडणूकीतील निसटत्या पराभवानंतर राम शिंदेंनी अवघ्या 6 महिन्यातच रोहित पवारांना मोठा धक्का दिलाय. रोहित पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणत पवारांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावलाय. यावेळी नगरसेवकांनी उषा राऊतांवर गंभीर आरोप केलाय.

दुसरीकडे काँग्रेस, भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राम शिंदेंसोबत गुप्त बैठक घेतली. तर या बैठकीच्या वृत्ताला राम शिंदेंनी दुजोरा दिलाय. या बैठकीनंतर नगरसेवकांनी थेट उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केलाय.तर रोहित पवारांनी राम शिंदेंवर हल्लाबोल केलाय.

डिसेंबर 2022 मध्ये कर्जत नगरपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणूकीत रोहित पवारांनी राम शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या उषा राऊत यांना नगराध्यक्षा बनवण्यात आलं. मात्र 17 सदस्य असलेल्या कर्जत नगरपंचायतीत पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं? पाहूयात.

कर्जत नगरपंचायतीत कुणाचं वर्चस्व

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने राम शिंदेंना विधानपरिषदेच्या सभापतीपदाची संधी दिली. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच राम शिंदेंनी रोहित पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याची योजना आखत भाजप पक्षनेतृत्वाला रिटर्न गिफ्ट दिल्याची चर्चा रंगलीय. त्यामुळे आता उषा राऊत यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर होणार की रोहित पवार राम शिंदेंची खेळी पलटवणार? यावर कर्जत-जामखेडमधील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT