Maharashtra Weather Updates  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Updates : मुंबईकरांना पुढील २ दिवस IMD कडून हाय अलर्ट; उष्णतेच्या लाटेसह मुसळधार पावसाचा इशारा

Weather Updates : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांसाठी पुढील 2 दिवस महत्वाचे असणार आहेत. आज आणि उद्या मुंबईत उष्णतेची लाट आणखी उसळणार आहे. तसेच दोन दिवस काही भागांत ढगाळ वातावरण राहिल.

Ruchika Jadhav

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट उसळी आहे. वाढत्या तापमाणामुळे मुंबईकर पुरते त्रस्त झालेत. महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. तसेच मुंबईमध्ये कमाल ३४.७ अंश तापमानाची नोंद झालीये. तर कर्जतमध्ये तापमानाचा पार थेट ४४ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे कर्जत तसेच बदलापूरमधील नागरिक उष्णतेने त्रस्त झालेत.

उष्णतेच्या लाटेसह पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांसाठी पुढील 2 दिवस महत्वाचे असणार आहेत. आज आणि उद्या मुंबईत उष्णतेची लाट आणखी उसळणार आहे. तसेच दोन दिवस काही भागांत ढगाळ वातावरण राहिल. कोकण,मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार आहे.

गेल्या २ ते ३ दिवसांपासून राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसाण झालंय. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाघोली येथे गारपीट देखील झालीये. कुठे गारपीट तर कुठे उष्णतेची लाट असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम होत असल्याचं दिसत आहे.

मराठवाड्यामध्ये ९ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ५ हजार २५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाच्या प्रशासनाने तसा प्राथमिक अहवाल दिला आहे.

या महिनाभरापासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे जिरायती, बागायत, फळ पिकांचे नुकसान सुरू आहे. यात मराठवाड्यातील ४८१ गाव शिवाराला या आपत्तीचा फटका बसलाय. यात ९ हजार १२७ शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे.

या वित्तहानीसोबत आठवडाभरात दहा जणांचा मृत्यू झालाये. तर ३५ लहान, ८२ मोठी दुधाळ जनावरे, ३ लहान, ३२ मोठी ओढकाम करणारी जनावरे दगावली आहेत. मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात २३७ हेक्टर, जालन्यामध्ये ९९० हेक्टर, परभणीमध्ये ५३९ हेक्टर, हिंगोलीमध्ये ३३० हेक्टर, नांदेडमध्ये ८२० हेक्टर, बीडमध्ये सर्वाधिक १६९३ हेक्टर, लातूरमध्ये ३२४ हेक्टर तर धाराशिव मध्ये ३२१ हेक्टरवरील जिरायती, बागायत व फळ पिकाचे नुकसान झाले आहे.

सद्यःस्थितीत प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान सुरूच आहे. यात पंचनामे पूर्ण होणार का आणि मदत मिळणार का ही चिंता शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

Thursday Horoscope : खर्चाचा हिशोब लागणार नाही; मिथुनसह ५ राशींच्या लोकांचा जवळच्या लोकांकडून घात होण्याची शक्यता

Shocking: प्रेमाचा भयंकर शेवट! ४ मुलांची आई असलेल्या वहिनीच्या प्रेमात झाला पागल, भांडणानंतर २५ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

Maharashtra Politics: दोंडाईचामध्ये डाव साधला; शरद पवार गटात खिंडार, तीन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT