Weather Update News  AI image
महाराष्ट्र

Rain Update : महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस! १३ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; वाचा A to Z अपडेट्स

Maharashtra Weather Today Update News : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरासू चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असला तरी १३ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे

  • रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात

  • सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे

  • मुरासू चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर कमकुवत झाले आहे

राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असला, तरी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज १३ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही विजांसह पाऊस होऊ शकतो. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील उर्वरित भागांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिली होती. मंगळवारी पहाटे नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान ओंगोलजवळ या वादळाने जमिनीवर प्रवेश केला. त्यावेळी ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.

तसेच अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला.मात्र, जमिनीवर आल्यानंतर या वादळाची ताकद हळूहळू कमी होऊ लागली आहे. सध्या त्याचा प्रभाव कमी होत असून, आज या प्रणालीचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. एकूणच, चक्रीवादळाचा जोर कमी झाला असला तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम आहे.दिवाळी अवघ्या २ दिवसांवर आली असून पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : संगमेश्वरच्या गजबजलेल्या बाजारपेठेत बिबट्याचा वावर

भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, ४ घातक वेगवान गोलंदाजांना संधी, कुलदीप-सिराज बेंचवरच, पाहा प्लेईंग ११

शृंगेरी घाटात ट्रकचा भीषण अपघात! आगीचे भयानक लोळ; डोंगराला आग, ड्रायव्हरचा झाला जागीच कोळसा

Gokul Politics: 'गोकुळ'च्या संचालक मंडळात भेसळ? पाटलांना रोखण्यासाठी महायुतीचा मोठा डाव?

'सावत्र वागणुकीचा त्रास होतो, पण कर्तव्य आठवलं की...' मुंढेंनी सांगितला तणावमुक्तीचा मार्ग!

SCROLL FOR NEXT